?️?  चित्रकाव्य  ?️?

?– मोगरा… कवयित्री : सुश्री ज्योती कुलकर्णी – ? ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

निळ्या आकाशात चांदण्यांची आभा

अलगद झेलून अंगणात मोगरा उभा

लावियला दारी मोगर्‍याचा वेल

म्हटले त्याला पुरे अवकाश झेल

उन्हाची लखलख झाली भारी

मोगरा दरवळला रंगत न्यारी

चांदण्यांचे मोती उधळले आकाशाने  

अलगद झेलले ओंजळीत धरतीने

सौंदर्य त्यांचे झाले सुगंधाविना उणे

मोगर्‍यात फुलवले धरतीने चांदणे

चांदणे पिऊन मोगरा खूप फुलला

पानोपानी कसा बहरून आला

बहर कानात काही सांगून गेला

तुझ्या घरी आलो  मी फुलायला

निळ्या आकाशात चांदण्यांची आभा

अलगद झेलून अंगणात मोगरा उभा …… 

कवयित्री : सुश्री ज्योती कुलकर्णी

अकोला

संग्रहिका  : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments