सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ आयुष्याची उतरंड… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(तितिक्षा इंटरनॅशनल पुणे,या कार्यक्रमात सादर केलेली माझी कविता : ” आयुष्याची उतरंड)

   आयुष्याच्या उतरंडी मधली,

   किती गाडगी मडकी उरली !

   मोजून दिली ‘त्या’ कुंभाराने ,

   कशी रचली अन्  किती दिली!

 

    जन्माला येतानाच मृत्तिका ,

    घेऊन आली तिचे काही गुण!

     फिरता गारा चाकावरती,

     आकारास येई तिचे हे रांजण !

 

    आयुष्याच्या भट्टीमध्ये ,

    भाजून निघते प्रत्येक मडके !

    असेल जरी ते मनाजोगते ,

     कधी लहान तर कधी मोठे !

 

    मंद आचे ही आता होई,

    वाटे शांत होईल ही भट्टी !

    एक एक मडके सरतची जाई,

    हाती राहील त्याची गट्टी !

 

   नकळत कधीतरी संपून जाईल,

    उरात भरली ही आग !

   शांत मनासह निघून जाईल,

    मडक्यांची ही सारी रांग !

 

   बनले मडके ज्या मातीचे,

    त्यातच तिचा असेल शेवट !

   मिसळून जाईल मातीत माती,

     ती तर असेल ‘त्याचीच’ भेट !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments