सौ. गौरी गाडेकर
इंद्रधनुष्य
☆ कोसळा… आणि वैशाली नाईक ☆ सौ. गौरी गाडेकर ☆
मोह वीज कडाडते
गडगडाट क्रोधाचा
अन सैराट चालला
काम मत्सर लोभाचा
धो धो घनू बरसला
मनसांदीकोपऱ्यात
शुचिर्भूत अभिषेक
मनअंतर्गाभाऱ्यात
गेले वाहुनिया पार
द्वेष राग नि विषाद
मन शुद्ध नि निखळ
अस्तित्वाला घाली साद
उसंतला तो पाऊस
झालं सारं शांत शांत
षड्रिपूही झाले नष्ट
झालं आयुष्य निवांत
पुन्हा दाटला पाऊस
पंचमहाभुतां साद
झाली सुरू बरसात
पुरं अस्तित्व झिम्माड
परमात्मा नि आत्म्याचा
आज मिलनसोहळा
कशी झेलू देहावरी
पावसाचा हा कोसळा
© सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈