श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ संभ्रम… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : पादाकुलक)

जाते वाहुन महापुरी ते

ताठ कण्याचे झाड वेंधळे

टिकुन राहते जपता जपता

शारण्याचा मंत्र लव्हाळे !

 

      इथे फुलांनी जखमी कोणी

      मुळी खुपेना कोणा काटा

      कुणास जाळी रात्र चांदणी

      कुणास वणवा फुटकळ चटका !

 

झुंज ज्योतिची प्रभंजनाशी

किती थरारक किती मनस्वी

शिक्कामोर्तब स्वमरणावर

सहीच अंती एक आंधळी !

 

      कोणी भोगी इहलोकीचा

      कोणी योगी मोक्ष मुक्तिचा

      प्रियतम कोणा सिंहासन अन

      बोधिवृक्ष हा ध्यास कुणाचा !

 

जगते कोणी अपुल्यापुरते

दूभंग दुजांस्तव इथे कुणी

कुणी नांदते गोकुळ हसरे

कमनशिबाची कहाणी कुणी !

 

      कोणी इथले कोणी तिथले

      कोणी असले कोणी तसले

      कुण्या दिशेला गाव आपुले

      कधी कुणा का येथे कळले ?

(शारण्याचा=शरण जाण्याचा)

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments