डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ?

☆ ॥ अनंतस्तोत्र॥  ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री  ☆

मार्ग दावी रे अनंता | आज येथे ऐसे अडता ||

अंधःकारी बुडून जाता | दिशा काही दिसेना ||१||

 

कोण आम्ही कोठुनि आलो | आज येथे ऐसे अडलो ||

काय फळाची आशा राहो |  बूज ती राहीना ||२||

 

धरणीखाली बीज सापडे | जळे वेढुनि त्यास टाकिले ||

जगतासाठी जीवन दिधले | तुझियाचि कृपे ||३||

 

बघता बघता अंकुर आला | डोकावूनिया पाहू लागला ||

मार्ग आपुला शोधु लागला | सूर्यप्रकाशी ||४||

 

दिधले जीवन आदिपासुनी | ठेवुनि त्याची जाण ही मनी ||

घट्ट धरुनिया धरणी ठेवी | मुळीया रूपे ||५||

 

परोपकारी धरणीचा हा | वसा घेतला वृक्षलतांनी ||

फळे अर्पुनी जगतासाठी  | कृतार्थही जाहले ||६||

 

दिशा दाविशी रे अनंता | तृणांकुरांना पशुपक्षांना ||

पोरकाच मग मानवचि का | चाचपडे अंधारी||७||

 

कळत असूनि असा राहिलो | वळता नचही ताठ राहिलो ||

स्वार्था धरुनी अंध जाहलो | असा या जगी ||८||

 

परमार्थाची आस लागली | मोहाची पण भूलचि पडली ||

मजविण दृष्टी आड जाहली | काही कळेना ||९||

 

धाव धाव रे भगवंता | कृपाळू होऊन अनंता |

सोडव यातुनिया निशिकांता |  तेजा तव दावून ||१०||

 

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments