डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त): ऋचा १ ते ४ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त) – ऋचा १ ते ४
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – इंद्र
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील एकोणतिसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी इंद्र देवतेला आवाहन केलेले असल्याने हे इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे.
आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या पहिल्या चार ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद ::
☆
यच्चि॒द्धि स॑त्य सोमपा अनाश॒स्ता इ॑व॒ स्मसि॑ ।
आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ १ ॥
सत्यस्वरूपी उदार इंद्रा आम्हा नाही मान
धेनु नाही अश्वही नाही सवे नाही पशुधन
यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी
जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||१||
☆
शिप्रि॑न्वाजानां पते॒ शची॑व॒स्तव॑ दं॒सना॑ ।
आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ २ ॥
सामर्थ्याधिपति देवेंद्रा उदार प्रतापी देवा
तुझ्या कृपेचा अमुच्या वरती वर्षाव व्हावा
यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी
जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||२||
☆
नि ष्वा॑पया मिथू॒दृशा॑ स॒स्तामबु॑ध्यमाने ।
आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ ३ ॥
नजर फेकती एकसारखी परस्परांवरती
दोघींना त्या निद्रिस्त करी नको त्यांस जागृती
यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी
जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||३||
☆
स॒सन्तु॒ त्या अरा॑तयो॒ बोध॑न्तु शूर रा॒तयः॑ ।
आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ ४ ॥
सारे अमुचे शत्रू असू दे सदैव निद्रेत
अमुचे स्नेही अमुच्यासाठी राहो जागृत
यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी
जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||४||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1, Sukta 29, Rucha 1 – 4
Rugved Mandal 1, Sukta 29, Rucha 1 – 4
अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈