सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – जपा पर्यावरणाला जपा वसुंधरेला –  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

सूर्याभोवती पृथ्वी करितसे भ्रमण

फाटले की हो ओझोनचे आवरण

मानवा जागा हो सांभाळ पर्यावरण

वृथा होईल तुझी प्राणवायूसाठी वणवण…

झाडे तोडूनी जंगले ओसाडली

पर्जन्यराजाने नाराजी व्यक्त केली

मातीने तर आपली कूस बदलली

वार्‍याने उलट्या दिशेस मान फिरविली…

प्रखर दुपारी झाडांवरी कशी पाखरे गातील ?

गंध घेऊनी झुळूझुळू वारे सांगा कसे वाहतील ?

तार्‍यांचे ते लुकलुकणें तरी कसे पाहतील ?

पिढीतील लेकरे आपुलीच पुढे काय अनुभवतील..?

धरणीमाय तर तुझ्यासाठी आतुर

नको रे करूस तिचे स्वरुप भेसूर

हाती तुझ्याच आहे,रोख प्रदूषण

कर वृक्ष-संवर्धन तेच अमूल्य भूषण…

मनुजा जागा हो..हो तू शहाणा

नको लावूस बट्टा पर्यावरणाला

राखूनी हिरवं रान निसर्गाचं जतन

सांभाळ रे आपुल्या वसुंधरेला..

चल पृथेस हिरवळीने सजवायाला

चल पृथेस हिरवळीने सजवायाला…!!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments