माहीतच नसतं आपल्याला, नियती मांडून बसली आहे वेगळाच खेळ!
आता हे घर निशब्द आहे,
यात नाही तुझ्या मायेची ओल,
आजही तुझा फोटो पाहिला की,
काळजात उठते कळ खोल!
आजही आनंद झाला की तुझ्यापुढे येऊन नाचतो, आजही कुणी दुखावलं
तर तुझ्यासमोर रडतो,
चूक झाली तर तुझ्यापुढे येऊन कान धरतो, नवीन काही सुरु करताना
नमस्कार करतो.
पण, फोटोत तुझे शब्द नाहीत,
तुझा स्पर्श नाही,
आई, तुझ्याशिवाय कशालाच अर्थ नाही!
बघ ना जमेल तर,
बोलता येईल का प्रत्यक्ष भरभरून,
खरंच का ग, एकदा गेलेली माणसं येत नाहीत परतून ?
☆
I miss you, Aai. ज्यांना आई आहे ना त्यांनी त्या मातेला कधीही अंतर देऊ नका… कारण मातेची किमया फारच निराळी आहे बरं..! आई म्हणोनी कोणी. आईस हाक मारी. ती हाक येई कानी…
कवी: अज्ञात
प्रस्तुती: डॉ. श्रीमती भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ (श्री महागणपती देवस्थान बदलापूरचे पुजारी आणि आमचे सहकारी प्रशांत पांडे यांचे काल दुःखद निधन झाले.. अतिशय सुस्वभावाने त्यांनी माणस जोडली.. All in one कोणतही काम असलं तरी स्वतःहून मदतीला पुढे येणं हा त्याचा स्वभाव…कधीही भरून निघणारी हानी झाली..त्यांना माझ्याकडून ही शब्दरूपी श्रद्धांजली..ॐ शांती…शांती…शांती 🙏)