(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा रचित एक भावप्रवण रचना – “अभी भी बहुत शेष है” । हमारे प्रबुद्ध पाठकगण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।)
☆ काव्य धारा # 182 ☆ ‘अनुगुंजन’ से – दुख से घबरा न मन ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆
आपल्या समुहातील कवयित्री सौ जयश्री पाटील यांच्या बालजगत’ या कवितासंग्रहाने, अ.भा.शब्दमंथन साहित्य समुह, स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार, प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था पुरस्कार, तितिक्षा इंटरनॅशनल आणि अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्था पुणे यांचा पुरस्कार असे पाच पुरस्कार प्राप्त केले आहेत.सौ. जयश्री पाटील यांच्या या यशाबद्दल त्यांचे ई-अभिव्यक्ती समुहाकडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.!
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आत्ताच्या पिढीला “गुराखी” हा शब्दही माहीत नसेल. पण श्रीकृष्ण कथा ऐकली असेल तर श्रीकृष्ण गुरं हाकायला रानात जात असे आणि त्याच्या बासरी वादनाने गाई गुरं मंत्रमुग्ध होऊन आवाजाच्या मागे मागे जात वगैरे आपण वाचलेलं आहे.
पण आता ना इतकी गुरं ढोरं राहिली, ना कृष्ण अन् त्याची बासरी.
पण इथे ऑस्ट्रेलियात मात्र विस्तीर्ण पसरलेली कुरणं, हजारोनी गुरं ढोरं.
पण ती हाकायला माणसंच नाहीत. इतकी वर्ष मोटार सायकल वर बसून तीन चार माणसांकडून 3000 हेक्टर वर हे काम करून घ्यायचे. .पण शांतपणे चरणा-या गुरांना ऊंच सखल प्रदेशातून फिरताना बरेच वेळा मोटर सायकल वरून गुराखी पडायचे, गुरं दगावायची. सोबत एखाद दोन कुत्रीही सोबतीला द्यायला लागायची. हे सगळं ड्रोननी टाळलं गेलं. एका कळपातून हाकून मूळ जागी परत आणणे, परत दुसरा कळप असे करता करता दूर दूर जावं लागणा-या दुचाकीस्वार गुराख्यालाच घरी जेवायला येता यायचं नाही. ऊंच सखल प्रदेशातून फिरताना बरेच वेळा मोटर सायकल वरून गुराखी पडायचे, गुरं दगावायची. हे सगळं ड्रोननी टाळलं गेलं.
मग आणले हेलीकाॅप्टर… पण ते प्रकरण तसं खर्चिक. श्रीमंत मालकांनाच ते परवडायचं.
आपल्या भारतात आत्ता आत्ता कुठं तुरळक ड्रोनचा वापर शेतीत औषधं फवारणीसाठी होऊ लागला आहे. बाकी सगळे ड्रोन हे एकतर भारतीय सैन्याचे नाहीतर लग्नाच्या रिसेप्शनच्या शूटींगचे.
पण इथे जगात प्रथमच एकाने ड्रोननी गुरं हाकायची ठरवली, त्यासाठी साॅफ्टवेअर तयार करवून घेतली आधी ती उडवून प्राणी दिलेल्या कमांड ऐकतात का ते तपासलं आणि हळूहळू त्याचा वापर वाढवत वाढवत हजारोंचा कळपच्या कळप हॅक् हॅक् न करता, पाठीवर दंडुका न मारता , हवा तसा, हव्या त्या दिशेला, थांबा म्हणलं की थांबणारा, घराकडं चला म्हणल्यावर मुकाट माघारी फिरणारा असा Drone चा भन्नाट वापर सुरू केला आहे. शेतक-यांना त्याचा उपयोग कसा करायचा याचं प्रशिक्षण देत आहे. हातासरशी गेलाच आहे ड्रोन 35 मीटर ऊंच तर कुठे पीक किती वाढलं आहे, पाणी आहे शेतात की घालायला हवंय हे सगळं एका जागेवरून ठिम्म न हालता ड्रोनवरील हातसफाईने करत आहे. गुरांची संख्या पण मोजता येते, आसपास एखादा कोल्हा आला तर त्याला हा ड्रोन हुसकावतो सुध्दा. हेलीकाॅप्टरच्या आवाजापेक्षा गाईंना ड्रोनचा आवाज सुसह्यही वाटतोय. त्यांना ड्रोनचा आवाज ऐकला की वाटतं कुठला तरी किडा गुणगुणतोय.
आता पुढचा प्रयोग हे सगळे आख्या जगातून जिथे कुठे इंटरनेट, GPS आहे अशा कुठूनही करता यायला पाहिजे याची चाचपणी सुरू आहे.
या प्रयोगशील शेतक-याची एकच व्यथा आहे ती म्हणजे त्यांचे संरक्षण खाते, सरकार पटापटा परमिशन देत नाही. खरेतर सरकारही अजून ह्या बद्दल तितके जागरूक नाही शिवाय अशा वापरास ऊठसूट परवानगी दिली तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनचा गैरवापर तर होणार नाही ना हे अजमावून पाहात आहे.
पण एकंदरीत उपयोगिता बघता, हळूहळू का होईना पिझ्झा डिलीव्हरी साठी ड्रोनच्या वापरापेक्षा ह्या अशा उपयुक्त कांमासाठी, जिथे आधीच मनुष्यबळ खूप कमी आहे आणि चराऊ कुरणं नजर ठरत नाही इतकी दूर आहेत, तिथे परवानगी द्यायच्या विचारात सरकार आहे. हेक्टरी फक्त एक डाॅलर खर्च येत असेल तर शेतकरी आग्रह धरणारच ह्या सुविधेचा. पैसा, वेळ, श्रम वाचणा-या या सुविधेचा लाभ हळूहळू वाढणार आणि ” Technology – शाप की वरदान ” अशा निबंध लिहीणा-यांना
” वरदान ” मुद्दा पटवायला हा एक किस्सा लिहीता येणार .
गाईंच्या गळ्यातील घंटांचा मंजूsssळ नाद,
सांज ये गोकुळी,
धूळ उडवीत गाई निघाल्या
असं काही नसलेल्या देशात
ड्रोन हाच गुराखी!
— समाप्त —
लेखिका – सुवर्णा कुलकर्णी
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
भयंकर थंडी! पारा शुन्याहून वीस डिग्री खाली. नाकातली ओल बर्फाचा खडा बनून नाकात टोचत होती. बर्फाचे शुभ्र, लहान लहान कण एकत्र जमून सर्व ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करत होते. डांबरी रस्त्याचा काळेपणा शिल्लक नव्हता, की छताच्या कौलांचा कुठला रंग ! बर्फाच्या या कणांनी मिळून प्रत्येक रंग पांढऱ्या रंगात बदलून टाकला आहे. झाडा झुडुपांच्या फांद्या बर्फांनी लगडून जणू स्वागतासाठी झुकल्या आहेत. एखाद दुसरा चालत जाणारा माणूस बर्फाचं गाठोडं चालत जात असल्यासारखा दिसतोय. त्यांच्या गरम कपड्यांवर आणि जाडजूड बुटांवर सफेद बर्फकण हसत बसले आहेत असं वाटतंय. जमलेल्या बर्फावरही खारी, हिरव्या गवतावर जशा उड्या मारत, बागडत होत्या, तशाच बागडताना दिसताहेत. सुनसान रस्त्यांवर कधी कधी जंगली प्राणीही दिसून येत असत.
निसर्गाच्या या रूपाला तोंड देण्यासाठी माणसाला फार तयारी करावी लागते. कधी कधी जर माणसाच्या मेंदूची काही चूक झाली, तर “आ बैल मुझे मार” च्या चालीवर “ ये बर्फा, मला गोठवून दाखव” अशा तऱ्हेने सोफीसारखी, जाणून बुजून या बर्फाळ हवेला आव्हान देण्याची चूक घडून येते. सोफीचा हट्ट म्हणा, की नाईलाज, ती या वेळी, अशा जीवघेण्या हवेत हायवे वर गाडी चालवते आहे. उद्या तिला कामावर हजर व्हायचे आहे. जाणं आवश्यकच आहे. सगळी विमानोड्डाणं रद्द झाल्याने तातडीने तिला हा निर्णय घेणं भाग पडलं. धाडस करणंच भाग पडलं होतं. कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशात रात्रीचं गाडी चालवणं खूप सुरक्षित आणि सोपं असतं. आणि या बर्फाळ हवेसाठी तिच्या गाडीला स्नो टायर्स पण आहेत. त्यामुळे हवा अधिक बिघडली, तरी ती सुरक्षित राहू शकते. दूरवरच्या ठिकाणी गाडी चालवत जायची क्षमता पण आहे तिच्यात. असा धोका पत्करणं रोमांचक वाटत होतं तिला. तरुण आहे ती, आत्ता नाही धाडस करायचं, तर काय पन्नाशी नंतर करायचं का? तसंही पेईंग गेस्ट म्हणूनच रहात होती ती. सामान म्हणजे, फक्त दोन सुटकेस आहेत, ज्यात तिचे कपडे आहेत. एवढ्या प्रचंड बर्फवृष्टीमधेही रोजचं आयुष्य काही थांबत नाही. टोरांटो पासून न्यूयॉर्क शहरापर्यंतचा प्रवास गाडीने करायचा उत्साह तिला खूप उर्जा देत होता. मधे एखादा स्टॉप घेतला तरी बास आहे. हॉटेलमध्ये सामान टाकून ती लगेच ऑफिसलाच जाईल. हवा कितीही खराब असली तरी सब वे रेल्वे असो किंवा रोजचं आयुष्य सगळं काही त्याच गतीने चालू रहातं.
अमेरिकेची सीमा पार केल्यावर एकाएकी जोरदार वारा आणि बर्फवृष्टीचा हल्ला होऊ लागला. बर्फाळ हवेच्या थपडा गाडीच्या काचेवर वारंवार आदळू लागल्या. अंधाराला चिरत वाऱ्याचा सों सों आवाज गुंजत होता. रस्त्यावर जमलेल्या बर्फाच्या घसरणीमुळे त्या भरभक्कम चाकांनाही धोका निर्माण होत होता. हवा आणखी बिघडू शकते, हे माहित तर होतं, पण अशी वादळी होईल याचा अंदाज नव्हता, बिघडत्या हवेची लक्षणं बघून, तिला वाटायला लागलं की आपला निर्णय चुकीचा होता. अशा प्रकारे धोका पत्करायची काही गरज नव्हती. आता ती मधेच अडकली होती, ना धड इकडे, ना तिकडे! परत जायचं म्हंटलं, तरी तेव्हढाच त्रास होणार होता. गाणी ऐकताना तिच्या लक्षात आलं, की फोन चार्जला लावायला पाहिजे. फोन जर बंद झाला, तर तिचं काही खरं नाही.
गाडीचा वेग सतत कमी होत होता. काळाकुट्ट अंधार आणि समोर सतत उडत असणारा बर्फ यामुळे निर्माण होणाऱ्या धुरकटपणामुळे समोरचं दिसायला त्रास होत होता. गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाशही कमी वाटत होता. रस्त्यावर जमा झालेला बर्फ साफ करायला या वेळी कोणी येणार नव्हतं. गाडीत हीटरची सोय असल्यामुळे बाहेर थंडीचा कहर असला तरी सोफीला त्याचा त्रास होत नव्हता. समोरच्या काचेवर पडलेला बर्फ आता घट्ट होऊन काचेवर त्याचा थर जमा होऊ लागला होता. ते साफ करण्यासाठी गाडीचे वायपर्स काहीतरी रसायन त्याच्यावर उडवत होते, पण समोरचा रस्ता काही दिसत नव्हता. तिने विचार केला, गाडी थांबवून पुढच्या-मागच्या काचा, हेडलाईट्स, बाजुच्या काचा आणि गाडीच्या चारी बाजुंना साठलेला बर्फ साफ करून घ्यावा. गाडी बंद करून तिने ब्रश काढला आणि सगळा बर्फ काढून टाकला. परत नव्याने बर्फ पडतच होता, पण तो काढून टाकण्यासाठी वायपर्स पुरेसे होते.
गाडीच्या सगळ्या बाजूंचा बर्फ काढून टाकून परत ती गाडीत येऊन बसली. पण गाडी चालू करण्याआधी हात गरम करण्याची आवश्यकता होती, सगळी बोटं आखडून गेली होती तिची. काही वेळ हातमोजे काढून हात एकमेकांवर घासायला सुरवात केली तिने. सगळं अंग पण गारठून गेलं होतं. हुडहुडी भरली होती. गाडी सुरु करून ती सुटकेचा निश्वास टाकणारच होती, तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, की गाडी सुरूच झालेली नाही! “अरे! हे काय?” परत सुरु करण्याचा प्रयत्न केला. परत तेवढाच हलकासा आवाज. इंजिन चालू होण्याचा कुठलाच आवाज नाही. परत परत ती बटण दाबत राहिली, पण गाडी एखाद्या हट्टी मुलाप्रमाणे ओठ बंद करून जागच्या जागी थटून उभी राहिली होती. सोफी एकटक त्या मूक झालेल्या बटणाकडे पहात राहिली. अनेक शक्यता तिच्या मनात एकदम घोंघावू लागल्या. असं गाडी सुरु न होणं म्हणजे, बॅटरी बंद पडली असणार. अशा वेळी बॅटरी डेड होणं म्हणजे एक प्रकारे सोफीचंच मरण होतं. हेल्पलाईनला फोन करावा म्हणून तिने फोन हातात घेतला, तर फोन पण डेड झालेला! त्याची बॅटरी चार्जच झालेली नव्हती. आता कोणाला मदतीला बोलावणं पण शक्य नव्हतं. आता काय करायचं? शंका कुशंकांनी तिला घेरून टाकलं. सगळ्यात मोठी धोक्याची घंटा तिच्या डोक्यात घण घालत होती, ती म्हणजे, “आज या थंड रात्रीत ही गाडीच तिची कबर बनणार आहे की काय?”
मागच्या सीटवर ठेवलेलं ब्लॅन्केट तिनं अंगभर लपेटून घेतलं आणि सुन्न होऊन बसून राहिली. या थंडीत शरीर काकडून त्याची बर्फकांडी बनत जाण्याचा अनुभव नरकमय यातना देणारा असणार होता, त्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने मृत्यू आला असता, तर तो ठीक असता असा विचार तिच्या मनात आला. असं वाटायला लागलं, की जणू तिने स्वतःच स्वतःला मृत्युच्या स्वाधीन केलं होतं. संपूर्ण शरीर ब्लॅन्केटमधे गुंडाळून घेतलेलं असूनही थंडीची तीव्रता वाढत होती. थोड्याच वेळात बाहेरच्या ओल्या, तीव्र, हाडं फोडणाऱ्या थंडीने गाडीचा हीटर बंद पाडला. हुडहुडी भरायला लागली होती, दात वाजायला लागले होते. हळुहळू हाताची बोटं गोठणं सुरु झालं. पायात बूट होते, त्यामुळे पाय थोडे उबेत होते. या निर्जन रस्त्यावर, या वेळी दूरवरही कुठे दुसरी कुठली गाडी येईल अशी शक्यता दिसत नव्हती.
मृत्यू पावला पावलांनी जवळ येत शरीर शिथिल करत चालला होता. आता वाचण्याची आशा सोडून देऊन ती आपल्या जवळच्या माणसांची आठवण येऊन हळवी होऊ लागली होती – “माझ्या मृत्यूची बातमी त्यांना केंव्हा कळेल, कोणजाणे! मला इथून कसं घेऊन जातील ते? की इथेच बर्फाखाली दबून, गाडलं जाईल माझं शरीर? मृत्यूची एक मूक अशी चाहूल कानांना ऐकू येत होती. अरे! कानांना खरंच काहीतरी ऐकू येत होतं. ही चाहूल स्पष्ट होती. असा काही मृत्यूचा आवाज नसतो! पहिलाच अनुभव आहे, काय माहित, कसा असतो ते! कान आता सावध झाले. मेंदूला संदेश मिळाला—“हा तर कुठल्या तरी गाडीचा आवाज आहे”. नसानसात जीवनाशा फुरफुरू लागली. मागून आलेल्या गाडीच्या दिव्यांचा प्रकाश दिसू लागला. मनात आलं, थांबवून मदत मागावी, पण परत वाटलं, की कोणजाणे, कोण असेल? आत्ता तर नुसतं थंडीनीच मरायचं आहे, या गाडीला थांबवून आणि कुठल्या त्रासातून जाऊन मरायची वेळ येईल, कोणजाणे! मरणाची भीति तर होतीच, त्यात अजून एका संकटाच्या भीतीचं भूत मानगुटीवर येऊन बसलं. ती ब्लॅन्केटमधे अजूनच गुरफटून बसली, म्हणजे त्या येणाऱ्या गाडीतल्या माणसाला या गाडीत कोणीच नाहिये असं वाटून तो निघून जाईल. ती श्वास रोखून त्या गाडीच्या निघून जाण्याची वाट बघत होती. तेवढ्यात त्या गाडीचे ब्रेक जोरात दाबले गेले आणि चर्र करत ती थांबली.
जगदीश खेबुडकरांच्या या काव्यपंक्ती आठवल्या आणि मनात विविध विचार प्रवाह वाहू लागले. झेप घेणे, भरारी मारणे, “लाथ मारीन तिथे पाणी काढेन”, भयमुक्त, निर्भय, धडाडीचे आयुष्य जगणे, “हम भी कुछ कम नही” “मनात आलं तर खडकालाही पाझर फोडू” हे सारं नक्कीच सदगुणांच्या यादीतले गुणप्रकार आहेत यात शंकाच नाही. भित्रा माणूस काहीच करू शकत नाही. तो मागेच राहतो. कसंबसं जीवन जगतो, कधीही प्रकाशझोतात सकारात्मकपणे येतच नाही.
सकारात्मकपणे हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. धोका पत्करण्यामागे दोन बाबींचा अंतर्भाव खचितच आहे. यश आणि नुकसान या त्या नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे धोका पत्करताना सावधानता, नियमांची चौकट, आत्मभान, स्वसामर्थ्याची ओळख आणि उडी मारण्यापूर्वी पाण्याच्या संभाव्य खोलीचा घेतलेला अंदाज म्हणजेच परिपक्व, समंजस धाडस नाहीतर फक्त बेधडकपणा, एक प्रकारचा माज, मिजास, गर्व आणि पर्यायाने प्रचंड हानी! वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक..
पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात कल्याणीनगर मध्ये घडलेली “पोरशे कार धडक घटना ही या प्रकारात बसते. या घटनेनिमित्त अनेक स्तरांवरच्या, अनेक बाबींविषयी अपरंपार घुसळण झाली— होत आहे. प्रामुख्याने बदलती जीवनपद्धती, यांत्रिकतेचा अतिरेक, हरवलेला कौटुंबिक संवाद, बेदरकारपणा, “ नियम आमच्यासाठी हवेत कशाला”, “हम करे सो कायदा” ही बेधुंदी,पैसा, सत्ता याचा गैरवापर, २४x७ बोकाळलेली माध्यमे आणि नको त्या वयात नको ते अनुभवण्यास उपलब्ध झालेले मैदानं, ना कोणाचे बंधन ना कोणाची भीती आणि या पार्श्वभूमीवर पौगंडावस्थेतलं, गोंधळलेलं, अमिबा सारखं ना आकार ना रूप असलेलं एक बेढब, भेसूर, अधांतरी लटकणारं मन, शरीरात रक्तप्रवाहात चाललेलं संप्रेरकांचं सुसाट वादळ आणि त्या वादळाला शांतवण्यासाठी अस्तित्वात नसलेली आधारभूत समंजस, परिपक्व यंत्रणा.
मी जेव्हा या सद्य घटनांच्या पार्श्वभूमीवर मागे वळून माझे आयुष्य साक्षी भावाने पहाते तेव्हा मला सहजच वाटते इतर भावंडांमध्ये मी अधिक धाडसी होते. मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यावासा वाटायचा. नवनवीन गोष्टींबाबत प्रचंड औत्सुक्य असायचं.(ते आजही आहे) एकाच वेळी वडील सांगत,” पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहता येत नाही. त्याचवेळी इतर कौटुंबिक सदस्य मला “हे करू नकोस ते करू नकोस” असेही सांगायचे. मी काही “बडे बाप की बेटी”ही नव्हते. तशी मी बाळबोध घराण्यातच वाढले. ठरवून दिलेल्या सांस्कृतिक आणि आचारसंहितेच्या नियमबद्ध चौकटीतच वाढले. तरीही माझं एक पाऊल प्रवाहाविरुद्ध जाण्यासाठी उत्सुक असायचं. कधी परवानगीने तर कधी छुपी-छुपे मी ते उचललंही. एक धडकपणा माझ्यात होता म्हणून अगदी काही वर्षांपूर्वी मी रिप लायनिंग केलं, पॅरासेलिंग केलं, थायलंडला अंडर सी वॉक” केला. मनावर प्रचंड भय असतानाही भयावर मात करत अशी मी अनेक साहसकृत्ये नक्कीच केली. जेव्हा ड्रायव्हिंग शिकले तेव्हा दुतर्फा झाडी असलेल्या मोकळ्या रस्त्यावरून सुसाट गाडी पळवाविशी वाटली पण आता असं वाटतं की अनेक भीत्यांच्या वर एक भीती सतत होती आणि तिचं वर्चस्व नाकारता आलं नाही ती म्हणजे सद्बुद्धीची. मन आणि बुद्धीतला वाद नेहमीच विवेक बुद्धीने जिंकला म्हणून माझ्या कुठल्याही धाडसात धडक असली तरी बेधडकपणा नव्हता. सावधानता होती हे नक्कीच. एक वय असतं धोक्याचं, प्रचंड ऊर्जेचं, सळसळणाऱ्या प्रवाहाचं. नदीचं पात्र सुंदर दिसतं पण जेव्हा तीच नदी किनारे सोडून धो धो पिसाट व्हायला लागते तेव्हा ती सारं जीवन उध्वस्त करते म्हणून फक्त एकच…
थोडं थांबा, विचार करा, योग्यायोग्यतेचा मेळ घाला. नंतर दोषारोप करण्यापेक्षा वेळीच यंत्रणांना चौकटीत रोखा, बाकी कुठल्याही कायद्यापेक्षाही मनाचे कायदे अधिक संतुलित हवे आणि तसेच शिक्षण सुरुवातीपासून अगदी जन्मापासून देणारी भक्कम मानवीय संस्था हवी.
☆ युद्धग्रस्त आफ्रिकेतील भारतीय शांतिदूत☆ श्री संभाजी बबन गायके☆
War is not just a strong wind that blows into our lives; it is a hurricane that rips apart everything we hold dear.
अर्थात, युद्ध म्हणजे काही केवळ आमच्या आयुष्यांत सुटलेला जोराचा वारा नव्हे…हे तर वादळ असतं आमच्यापासून आमचं सर्वस्व हिरावून घेणारं! गांभिर्याने विचार केला तर हे निरीक्षण अत्यंत वास्तववादी म्हणावं लागेल. महिला आणि मुले युद्धात सर्वाधिक प्रमाणत बाधित होतात, असा जगाचा आजवरचा इतिहास आणि वास्तवही आहे. मागील पिढीला पाकिस्तान्यांनी त्यांच्याच देशबांधवांवर आणि विशेषत: भगिनींवर केलेल्या अत्याचाराच्या कथा माहित आहेत. वांशिक संघर्ष हा शब्द केंव्हातरी आपल्या वाचनात येऊन गेला असेल बहुदा! अफ्रिका खंडातील अनेक देश गेली कित्येक दशके वांशिक संघर्षात अडकून पडलेली आहेत. आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषद या देशांमध्ये विविध देशांतील सैन्यातील अधिकारी,सैनिक यांचा समावेश असलेली शांतीसेना पाठवून किमान शांतता राखण्याचा प्रयत्न करत असते. आपला भारत या १२४ देशांपैकी सर्वाधिक सैन्य पाठवण्या-या देशांत ९व्या क्रमांकावर आहे. या उपक्रमात भारतीयांची कामगिरी नेहमीच सर्वोत्तम ठरत आलेली आहे. सध्या सहा हजारांपेक्षा जास्त भारतीय सैनिक अफ्रिकेत कार्यरत आहेत.
भारताच्या युएन पीस किपींग फोर्से पथकात पुरूष सैनिकांसोबतच महिला सैनिकांचे एक छोटेखानी पथकही सहभागी असते. एप्रिल २०२३ ते मे २०२४ या कालावधीत मेजर राधिका सेन यांनी ३२ आंतरराष्ट्रीय महिला सैनिक असलेल्या पथकाच्या कमांडींग ऑफिसर म्हणून अतिशय अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. या पथकाला एंगेजमेंट प्लाटून (इंडियन रॅपिड बटालियन) असे नाव आहे. कांगो किंवा कॉंगो या देशात त्यांना कामगिरी सोपवण्यात आली होती. पुरुष सैनिकांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय सैन्य पथकासोबत आपल्या महिला सहका-यांसह हिंसाचार ग्रस्त भागांत गस्त घालणे, वेळ पडल्यास सशस्त्र प्रतिकार करणे ही त्यांची कर्तव्ये तर होतीच. पण या सैनिक महिलांकडून एक आणखीही कार्य अपेक्षित होते…ते म्हणजे युद्धमुळे बाधित झालेल्या महिला आणि मुलांना सर्वप्रकारचे साहाय्य करणे.
या संघर्षामध्ये प्रतिस्पर्धी वंशातील पुरूष सैनिकांची निर्दयी हत्या करणे ही तर सर्वसामान्य गोष्ट असते. मात्र महिला हाती सापडल्या तर त्यांची अवस्था अगदी जीणं नको अशी करून टाकली जाते. किंबहुना शत्रूचे मर्मस्थान म्हणजे त्यांच्या महिला. त्यांची जितकी जास्त विटंबना करता येईल तेव्हढी विजयी सैन्य करीत असते. दुर्दैवाने काही वंशातील सैन्यातील महिलाही यात मागे नसतात. अर्थात यात भरडल्या जातात त्या महिलाच.
या पिडीत महिलांना मानसिक आधार देण्याचं,जीवन प्रशिक्षण देण्याचं काम आपल्या मेजर राधिका सेन यांनी अत्यंत प्रभावीपणानं पार पाडलं. मेजर सेन यांनी या महिलांचा विश्वास जिंकून त्यांना एकत्रित केलं. त्यांच्यासाठी आरोग्य,मानसिक समुपदेशन यांसारख्या सुविधा उपलब्ध होतील याकडे लक्ष दिलं. बलात्कार पिडीत अल्पवयीन मुली, तसेच महिलांना आपलं मन मोकळं करण्यासाठी मेजर राधिका या हक्काचं स्थान ठरलं.
आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याची उर्मी त्यांच्यात जागृत व्हावी यासाठी मेजर राधिका यांनी प्रयत्न केले. त्यांच्यासाठी रात्री-अपरात्री त्या आपल्या पथकासह सज्ज असायच्या. इंग्लिश संभाषणाचे वर्ग सुरु करण्यात त्यांनी यश मिळवले. हल्ला होण्याच्या परिस्थितीत बचाव करण्याची तंत्रेही त्यांनी महिलांना,मुलांना शिकवली. गरज पडली तेंव्हा त्यांनी या महिलांना सशस्त्र संरक्षणही पुरवले..आपल्या जीवाची पर्वा न करता. त्याचबरोबर त्यांनी आपल्या वरीष्ठांच्या सहकार्याने संघर्षग्रस्त पुरुषांना व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधीही त्यांनी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी कांगोच्या उत्तर किवु या क्षेत्रात आपला ठसा उमटवला.
हिमाचल प्रदेशात जन्मलेल्या राधिका सेन या ख-यातर आय.आय.टी. मुंबई येथे बायोटेक्नोलॉजी विषयात इंजिनियरींचे शिक्षण घेत होत्या, पण सैन्यदलात सेवा करण्याच्या त्यांच्या पूर्वीपासूनच्या इच्छेने उचल खाल्ली आणि हे क्षेत्र सोडून त्यांनी सैन्यात प्रवेश मिळवला आणि आठच वर्षांच्या सेवेनंतर त्यांची थेट यु.एन.पीस किपींग फोर्समध्ये मेजर म्हणून नियुक्ती झाली. केवळ एकाच वर्षाच्या कारकीर्दीत मेजर राधिका यांनी अतुलनीय कामगिरी करून प्रतिष्ठेचा मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ दी इअर पुरस्कार प्राप्त केला आहे. हा पुरस्कार प्राप्त करणा-या ह्या दुस-या भारतीय सैन्य अधिकारी आहेत. या आधी २०१९ मध्ये मेजर सुमन गवानी यांनी संयुक्तरित्या हा पुरस्कार पटकावला होता.
३० मे २०२४ रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला आहे. चला,आपण सर्वजण मिळून मेजर राधिका सेन यांचे अभिनंदन करूयात.!