मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कॉकटेल… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ कॉकटेल – लेखक  : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

आम्ही अजूनही शिकतोय ! आधीच्या पिढीकडून शिकलो. आता नंतरच्या पिढीकडून शिकतोय.

दोन्हीची कॉकटेल बनवली तर आयुष्य सुखाचे होईल !

*

आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो.

नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय.

*

आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो.

नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय.

*

आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो.

नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला‌ शिकतोय.

*

आधीच्या पिढीने, Use and use moreमधली उपयुक्तता शिकवली.

नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.

*

आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो.

मुलांकडून घरात असतानाही पिकनिक एंजॉय करायला शिकलोय.

*

आधीच्या पिढीबरोबर निरांजन लावून, दिवा उजळून वाढदिवस साजरा केला.

नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून, अंधार करून वाढदिवस साजरा करायला लागलो.

*

आधीच्या पिढीने बिंबवले, घरचेच लोणी सर्वात उत्तम.

नंतरची पिढी पटवून देत आहे, अमूल बटरला पर्याय नाही‌.

*

थोडक्यात काय, आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते;

तर नंतरची पिढी शिकवत आहे, मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते !

*

दोन्हीच कॉकटेल बनवलं तर आयुष्य सुखाचं होईल..

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बगळे, कावळे आणि कडबोळे ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बगळे, कावळे आणि कडबोळे ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

असते राजकारण गल्लीतले फारच वेगळे 

तेच असते प्रत्येक हायकमांडचे कल्पनातीत निराळे – –

*

सारे नेते वावरती नेहमी चेहऱ्याचे करून ठोकळे

करून सवरून सदा राहती नामा निराळे – –

*

करू शकत नाही कार्यकर्ते नेत्यांसमोर मन त्यांचे मोकळे

मनांत शिरण्या नेत्यांच्या पहावे लागतात अनेक पावसाळे – –

*

कधी झेलावी लागती कार्यकर्त्यांना अपमानाची ढेकळे

अशा ठिकाणी टिकत नाहीत कोणी कार्यकर्ते दुबळे – –

*

उभे इथे पदोपदी एका पायावर ध्यानस्थ बगळे

कळत नाही कोण नेता कोणता खेळ खेळे – –

*

बोलण्यात असून चालत नाही मोकळे ढाकळे

नाहीतर वेळ नाही लागणार स्वप्नांचे होण्या खुळखुळे – – 

*

पिंड खायला जागो-जागी टपले काळे गोरे कावळे

वाटे राजकारण्यांना निघाले जनतेच्या अकलेचे दिवाळे

शेवटी सत्तेवर येणार “यांचे” नाहीतर “त्यांचे” कडबोळे…

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 252 ☆ मुक्त मनोमनी झाले… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

 

? कवितेच्या प्रदेशात # 252 ?

☆ मुक्त मनोमनी झाले ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

किती मांडले हे

जिण्याचे पसारे

नसे मुक्तता यातूनी…

हवे जे मिळेना,

नको ते पुढे ठाकले  !

*

नियती— नशीब

प्रारब्ध– प्राक्तन

किती शब्द शोधीत,

स्वीकारून सारे—

आयुष्य हे सोसले !

*

जगरहाटी चालूच आहे ,

जरासे मनासारखे

वागले…

गुंतले जरी या,

पसार्‍यात साऱ्या,

 मुक्त मनोमनी जाहले !

© प्रभा सोनवणे

७ डिसेंबर २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आभाळाचे काळिज ज्यांचे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ आभाळाचे काळिज ज्यांचे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

आभाळाचे काळिज ज्यांचे, दुःखहि त्यांचे आभाळागत

हास्य जयांचे बुद्धागत ते, कधि ओघळती सुळि चढल्यागत

*

असिधारेवर अवघे जीवन, पदोपदी अन् अग्निपरीक्षा

देवदूत ते देवपणाची, अखंड देती सत्त्वपरीक्षा

*

प्रेषित होउन आले येथे, हाच तयांचा मुळी गुन्हा हो

सजा भोगण्या वनवासाची, राम जन्मतो पुनः पुन्हा हो

*

थोर महात्मे युगानूयुगे, प्राशत आले प्याले जहरी

तप्तलाल अन् तीक्ष्ण कट्यारी, द्रष्ट्यांच्याही घुसल्या नेत्री

*

युगपुरुषांच्या विटंबनेची, जन्मोजन्मी हीच कहाणी

साक्षीला ती कठोर नियती, खेद खंत ना डोळां पाणी!

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पांगारा… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ पांगारा… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

अंगावरून तुझ्या अलगद ओघळलेली ती,

पाण्यातून पावसाच्या मार्गस्थ होत होती.

अंगार्‍यासम भासणारी जरा पाण्यात सुखावली,

जलस्पर्शाने आनंदित ती, नयनसुखानेआंनदित मी

 जणू एकच वाटत होतो.

 

गळलेल्या फुलांकडे पाहून जणू काही

पागोळ्यांतूनन तुझे रुदन चालले होते

भारदस्त विशाल देह धारण कर्ता तू

पण मन मात्र खूपच हळवे वाटत होते.

 

एक दिवस असा उजाडला की नकळत तुझ्या

तुझी आंतरिक शक्तीक्षीण होऊ लागली होती,

भारदस्त, विशाल म्हटल्या जाणार्‍या तुझ्या मुळांनी

जमीन सोडली

आणि तू जीवंतपण.

तुझ्या विना त्या जागेला जाणवत राहील रितेपण.

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆3

१) जिथे राहता त्या कॉलनीत

 चार तरी कुटुंब जोडा,

 अहंकार जर असेल तर

 खरंच लवकर सोडा ।।

*

२) जाणं येणं वाढलं की

 आपोआप प्रेम वाढेल,

 गप्पांच्या मैफिलीत

 दुःखाचा विसर पडेल ।।

*

३) महिन्यातून एखाद्या दिवशी

 अंगत-पंगत केली पाहिजे,

 पक्वान्नाची गरजच नाही

 पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे ।।

*

४) ठेचा किंवा भुरका केल्यास

 बघायचंच काम नाही,

 मग बघा चार घास

 जास्तीचे जातात का नाही ।।

*

५) सुख असो दुःख असो

 एकमेकांकडे गेलं पाहिजे,

 सगळ्यांच चांगलं होऊ दे

 असं देवाला म्हटलं पाहिजे ।।

*

६) एखाद्या दिवशी सर्वांनी

 सिनेमा पहावा मिळून,

 रहात जावं सर्वांशी

 नेहमी हसून खेळून ।।

*

७) काही काही सणांना

 आवर्जून एकत्र यावं,

 बैठकीत सतरंजीवर

 गप्पा मारीत बसावं ।।

*

८) नवरा बायको दोन लेकरात

 “दिवाळ सण” असतो का?,

 काहीही खायला दिलं तरी

 माणूस मनातून हसतो का?

*

९) साबण आणि सुगंधी तेलात

 कधीच आनंद नसतो,

 चार पाहुणे आल्यावरच

 आकाश कंदील हासतो

*

१०) सुख वास्तूत कधीच नसतं

 माणसांची ये-जा पाहिजे,

 घराच्या उंबरठ्यालाही

 पायांचा स्पर्श पाहिजे ।।

*

११) दोन दिवसांसाठी का होईना

 जरूर एकत्र यावं,

 जुने दिवस आठवताना

 पुन्हा लहान व्हावं ।।

*

१२) वर्षातून एखादी दुसरी

 आवर्जून ट्रिप काढावी,

 “त्यांचं आमचं पटत नाही”

 ही ओळ खोडावी ।।

*

१३) आयुष्य खूप छोटं आहे

 लवकर लवकर भेटून घ्या

 काही धरा काही सोडा

 सगळे वाद मिटवून घ्या ||

 लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #265 ☆ फुलाला हेरले होते… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 265 ?

फुलाला हेरले होते ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कवीला हसताना मी एकदा पाहिले तेव्हा

सुरेली चाल लावुनी गीत मी गायिले तेव्हा

 *

तयाला गुढ शब्दांची थोरली जाण होती हो

सुरांच्या मुक्त साथीने मारली तान होती हो

सुमनांसारख्या ओळी शब्द मी ताणिले तेव्हा

 *

गुलाबालाही काट्यांनी पहा ना घेरले होते

सोडुनी गुण काट्यांचे फुलाला हेरले होते

मित्रता पाहुनी त्यांची सुखाला जाणिले तेव्हा

 *

हवा ही काय प्यालेली नशा ही काय केलेली

हवेलाही कळेना ती कशाने धुंद झालेली

फुलाच्या गंधकोशाचे अंश मी दाविले तेव्हा

 

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऐवज… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ऐवज… ☆ श्रीशैल चौगुले ☆

थंडिचा हिवाळा

काळीज धडके

हेमंत जिव्हाळा.

*

हरिते पाखरे

कधीची सकाळ

आळस भिनून

दुपार धुकाळ.

*

मनात मिठीची

अनोखीच ओढ

ओहोळही वाहे

आठवणी गोड.

*

क्षितीज सांजेत

कडाकी बिलग

हुडहुड अंग

शेकोटी सजग.

*

मनाला उमज

भावना समज

भोवती आगीच्या

ऋतूचा ऐवज.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पुन्हा एकदा… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पुन्हा एकदा… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

तुझी आठवण मनी उतरली पुन्हा एकदा

ग्रीष्म कधी श्रावण-सर झरली पुन्हा एकदा

*

बोलायाचे बरेच काही गेले राहुन

शब्दांची पाखरे बिथरली पुन्हा एकदा

*

शुक्राची होऊन चांदणी उगवलीस तू

पहाट रात्रीला फटफटली पुन्हा एकदा

*

ठेवताच तू तळहातावर फूल जुईचे

ओंजळ ही स्वप्नांनी भरली पुन्हा एकदा

*

तुझे वागणे नाटक आहे पक्के कळले

पण फसलो जेंव्हा तू हसली पुन्हा एकदा

*

पुन्हा तुझ्या येण्याने फुललो विसरुन सारे

घडी मनाची मी अंथरली पुन्हा एकदा

*

परतलीस नि:शंक मनाने लाटेसम तू

खूण प्रितीची अपुल्या पटली पुन्हा एकदा

*

तुझे मेघ आषाढी, वा-यासवे पांगले

हिरवटती आशा कोळपली पुन्हा एकदा

*

शांत सागरी जीवन-नौका होती माझी

भेटलीस तू अन् वादळली पुन्हा एकदा

*

नांव तुझे नकळतसे येता ओठांवरती

जखम वाळलेली ठसठसली पुन्हा एकदा

*

आठवणीतुन भेटलीस तू अवचित जेंव्हा

मजला ‘माझी’ भेटहि घडली पुन्हा एकदा

*

तुझी आठवण, अर्ध्यामुर्ध्या भातुकलीची

हसताना आसवे निसटली पुन्हा एकदा

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – ज्ञानराजा – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – ज्ञानराजा – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

इंद्रायणी काठी ! विसावला ज्ञाना !

आत्मसमाधाना ! समाधिस्थ !!१!!

*

कृपाळू माऊली ! बुद्धीचा सागर !

मायेचे माहेर ! ज्ञानराजा !!२!!

*

कैसा चमत्कार ! रेड्या मुखी वेद!

गर्विष्ठांचा भेद ! वदवूनी !!३!!

*

बसुनी भावंडे ! चालवली भिंत !

चांगदेवा खंत ! पाहुनिया !!४!!

*

पाठीवरी मांडे ! मुक्ताई भाजती !

क्षुधा भागवती ! जठाराग्नी !!५!!

*

भावार्थ दीपिका ! या गीतेचा अर्थ !

ज्ञानी नाम सार्थ ! ज्ञानेश्वरी !!६!!

*

अमृताचा घडा ! एक एक ओवी !

स्व अनुभवावी ! वाचूनिया !!७!!

(चित्र – साभार श्री आशिष  बिवलकर)

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares