मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चौसष्ट घरांचा सम्राट ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

🌹 चौसष्ट घरांचा सम्राट ! 🌹 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

गु णांची कदर होते नेहमी 

 आज ना उद्या जगात 

 माळ जग्गजेतेपदाची 

 पडे गुकेशच्या गळ्यात 

*

के ला चमत्कार गुकेशने 

 झाले पूर्वसुरी अचंबित 

 बने चौसष्ट घरांचा राजा

 आज जगी तरुण वयात

*

ह काटशहाच्या खेळाचा 

 अनभिषिक्त सम्राट बनला

 भारतभूच्या शिरावर त्याने 

 एक तुरा मानाचा खोवला

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जीवनगाणे… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जीवनगाणे… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

घ्यावी म्हणतो

आता थोडी विश्रांती 

मी पुन्हा येईन बरं

नेहमीप्रमाणे प्रभाती…

*

नवजीवन देतो

अविरत,

नच कधी थकलो

कर्मयोगी म्हणोन

बक्षीसी न कधी पावलो…

*

किरणांनी माझ्या

दाह होतही असेल,

पण, सागराच्या पाण्याची वाफ

होईल तेव्हाच पाऊस बरसेल….

*

मीच मला पाहतो

बिंब माझे सागरात

विश्रांतीस्तव तुमच्या

नभांची चादर पांघरत..

*
गर्भित सूचक

माझे वागणे

येणे जाणे 

हेचि जीवन गाणे…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 253 ☆ देशातील मुलींची पहिली शाळा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 253 ?

☆ देशातील मुलींची पहिली शाळा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

किती पिढ्या सोसत राहिली,

बाई अनंत अत्याचार…

अचानक,

महात्मा फुलेंना झाला साक्षात्कार!

“ढोल, ढोर और नारी,

सब ताडन के अधिकारी”

असेच होते वास्तव जगाचे !

 ज्योतिबांना लागला  ,

स्त्री शिक्षणाचा ध्यास,

घेतला स्वपत्नीचा अभ्यास!

शिक्षिका बनविले ,

सावित्रीबाईंना —

 सोसला प्रस्थापितांचा त्रास,

परी स्त्री शिक्षणाची आस,

उभयतांमधे कमालीचा,

आत्मविश्वास!

देशातील पहिली मुलींची शाळा,

काढली भिडे वाड्यात,

अन् झाली स्त्री शिक्षणाची,

सुरुवात!!

© प्रभा सोनवणे

१४ नोव्हेंबर २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विठ्ठल… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ विठ्ठल… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

माती काळी विठ्ठल काळा

पंढरीचा बुक्का काळा ।। ध्रु।।

*

दिंडी निघाली माऊलीची

मुखे नाम भक्ती रसाची

चिपळ्या मृदंग वाजे टाळा

*

संत वैष्णवांचा दाटला मळा

माळा तुळशी घालुनी गळा

गोपीचंदनाचा भाळी टिळा

*

झाले चंद्रभागा तीरी गोळा

भागवत भक्तांचा ह्यो मेळा

खांदी पताका विरक्त सोहळा

*

माती काळी धरती काळी

हिरवे शेती पिके कोवळी

अमृतघनही काळा सावळा

*

भक्ती ओली माया भोळी

विठ्ठलाची कृपा साउली

वैष्णव भक्तीचा हा उमाळा

*

शरीर माझे प्रपंच माझा

अहंकाराचा केवळ बोजा

षड्रिपु पण झाले गोळा

*

द्वारकेचा कृष्ण काळा

पंढरीचा विठ्ठल काळा

चक्रपाणी साधा भोळा

*

रंगामध्ये काय आहे बोला

सर्व वारकरी झाले गोळा

परंपरागत सुख सोहळा

*

पंढरीचा बुक्का काळा

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गाव अन शहर… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ गाव अन शहर… ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

गाव अन शहर

रेषा धूसर झाल्यात

गावांत स्वच्छ हवा आहे

शहरात प्रदूषणाचा धूर आहे

सगळ्या सुख सोयी

घरोघरी शिरल्यात.

पिठाची गिरणही

घरोघरी आलीय.

सारं काहीं शहरातल

गावांत आहे…

पण तरीही मला कळत नाही

त्या काँक्रिटच्या जंगलात

माणूस का पळत आहे…

वीतभर पोटा साठी तिथे

जावून का? जळत आहे…

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुचते मनात कविता… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

सुचते मनात कविता… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

 सुचते मनात कविता

 फुलते मनात कविता

 खुपते मनात कविता

 सलते मनात कविता

*

 रुजते मनात कविता

 भिजते मनात कविता

 भिडते मनात कविता

 रुसते मनात कविता

*

 पण भाग्य थोर माझे

 ना विझते मनात कविता

 ना विझते कधीच कविता

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #266 ☆ वय झाडाचे लावणी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 265 ?

☆ वय झाडाचे लावणी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

वय झाडाचं झालं सोळा

पक्षी भवती झालेत गोळा

डोम कावळाही बघतोय काळा

हिरवंगार झाड आलंय भरून

आणि इथं, मालक मरतोय झुरून

*

कुणीही मारतंय खडा झाडाला

मजबुती आली या खोडाला

कैऱ्याही आल्या व्हत्या पाडाला

झाकू कसं, झाड हे सांगा वरून

*

पानाखालती पिवळा आंबा

केसरी होऊद्या थोडं थांबा

पहात होता दुरून सांबा

मोहळ हे, छानक्षच दिसतंय दुरून

*

काल अचानक वादळ आलं

झाड भयाणं वाकून गेलं

आणि लुटारू मालामाल झालं

किती, किती, ध्यान ठेवावं घरून

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आले आले ढग… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

श्री मुबारक उमराणी

? कवितेचा उत्सव ?

☆ आले आले ढग… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

आले आले ढग ढग

रानी पेरीत काजळ

झाडे आनंदात दंग

धारा वाहे खळ खळ

 *

अवखळ पोरे खेळी

रानोमाळ सूरपाट्या

संगतीला फुलबाळे

गंध देत वाट्या वाट्या

 *

पावसाचे येता थेंब

धूळ होई थेंब धार

पान पान शहारता

झाड होई गार गार

 *

माती गंधाळ गंधाळ

रात सुगंधात दंग

हर्ष उल्हासी होऊन

वारा वाजवी मृदंग

*

थेंब स्पर्श होताक्षणी

माती होई ओली ओली

रात माऊली होऊन

गीत अंगाई ती बोली

© श्री मुबारक उमराणी

राजर्षी शाहू काॅलनी, शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंद… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

आनंद… कवी अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

मी पेपर उघडला,

त्यात  मीच दिलेली

जाहिरात होती

 

हरवला आहे ..आनंद

पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद …

 

रंग … दिसेल तो

उंची ..भासेल ती

 

कपडे सुखाचे

बटण  दुःखाचे

 

कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून

थकलो आहोत सगळीकडे शोधून

 

आनंदा , परत ये

कुणीही तुझ्यावर रागवणार नाही

तुझ्यावर  कसलीही सक्ती करणार नाही

 

घरातले सगळे आसुसून बघताहेत तुझी वाट

दार उघडं ठेवलंय वाढून ठेवलंय आशेचं  ताट

 

शोधून आणणाऱ्याला दिलं  जाईल इनाम

 

मग म्हटलं आपणच करावं हे  काम

काय आश्चर्य! सापडला की गुलाम

 

जुन्या पुस्तकाआड

जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड

 

आठवणींच्या मोरपिसात

अगरबत्तीच्या मंद वासात

 

हवेच्या थंडगार झुळूकेत

लाटांच्या हळुवार स्पर्शात

 

अवेळी येणाऱ्या पावसात

प्राण्यांच्या  मखमली स्पर्शात

 

त्यानेच मारला पाठीत धप्पा

जुन्या मित्र मैत्रिणींशी मारताना गप्पा

 

मी म्हटलं अरे ,

इथेच होतास ?

उगाच दिली  मी जाहिरात

तो म्हणाला,’वेडी असता तुम्ही माणसं

बाहेर शोधता

मी असतो तुमच्याच मनात

☆   

 लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ उ स्ता द ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

🙏🌹 उ स्ता द ! 🌹🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

बोलविता धनी तबल्याचा 

आज मैफिलितूनी उठला 

ऐकून ही दुःखद बातमी 

रसिकांचा ठोका चुकला

*

केस कुरळे शिरावरती 

बोलके डोळे जोडीला 

सुहास्य गोड मुखावरचे 

दिसत होते शोभून त्याला

*

मृदू मुलायम बोलण्याची 

होती त्याची गोड शैली 

जाता जाता करून विनोद 

हळूच मारी कोणा टपली 

*

आज झाला तबला मुका 

तो होता अल्लाला प्यारा 

करती कुर्निंसात दरबारी   

येता उस्ताद त्यांच्या दारा 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares