मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रभात फेरी ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ नाद ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

दृष्टीआड जरी तान्हा

आई घालते हो साद

जोजवते, जोपासते

कुशीतला ब्रह्मनाद

 

ओल्या मातीत हुंकार

भारत मातेचा श्वास

हळुवार उमलतो

नादखुळा घेत ध्यास

 

मन गाभाऱ्यात नाद

सप्तसुर प्रसवती

मोरपीस कर्तुत्वाचे

मोहक रंगसंगती

 

नादमधुर जिव्हाळा

प्राणात ये संजीवन

प्रेमात गुंफता नाती

बहरेल  हो स्पंदन

 

अंतर्नाद पवित्र जो

मुक्त स्वच्छंद हसावा

प्रभूचीच आस ऐसी

संसार सुखाचा व्हावा.

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

५/१/२०२२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 119 ☆ उर्मिला ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 119 ?

☆ उर्मिला ☆

राजकन्या ती ही होती

जनकराजाचीच दुहिता

जाणली कोणी कधी ना

तिच्या जगण्याची संहिता

 

तारुण्यात एकाकी ती

शय्येवर तळमळ साही

पतीविना जीवन अधुरे

कोमेजे नवयौवन ही

 

सौमित्राची अर्धांगी

पूर्णत्वा ना गेली कधी

जाणिले तिच्या मना कुणी ?

ना मिळाली सौख्यसंधी

 

सौभाग्याचे दान मिळे

पण ब्रह्मचारिणीच असे

 राजवैभव भोवताली

मनी तिच्या वनवास वसे

 

उपेक्षित ती सदैव ठरे

 वैदेही , मैथिली नसे

तिज न उपाधी जनकाची

इथे तिथे उपरीच असे

 

युगेयुगे इथे जन्मल्या

मरून गेल्या कितीजणी

अशा उर्मिला मौन व्रती

त्यांच्या दुःखा ना गणती

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विणकरी ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ विणकरी ☆ श्रीशैल चौगुले ☆

 

कसे गुंतले रे

बाहत्तर हजार

धागे या वसनी

सप्तकोटि शृंगार.

अष्टचित्र कोष

सुटेना कसा पाश

मन विणू पाहे

जन्मोजन्मीचा श्वास.

कळेना-टळेना

गुंता जड पेलेना

चिंता ठाई-ठाई

ओठ ‘विठ्ठला’विना.

भाव-भक्ती जोड

तरी ना लागे अंत

आत्मरंगी शोधे

नाम संदेश संत.

म्हणे सुखे सांगू

दुःख हेची लपवू

वसनाची कर्मे

विठू चरणी ठेऊ.

झालाची विसर

धागे वस्त्र नक्षींचा

राहिली कसर

विणकरी साक्षीचा.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 123 ☆ भाकरी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 123 ?

☆ भाकरी ☆

तिनं शिकून घेतलंय

भाकरी करण्याचं तंत्र

पीठ, पाण्याचं प्रमाण

दोघांना खेळवणारी

परात आहे तिच्या घरात

 

कणीक ओळखू शकते

बोटांची हालचाल

बोटांनाही कळतात

कणकीच्या भावना

बाळाला थोपटावं

तसंच थोपटते

आकार देते

इथवर सगळं ठीक आहे

 

तापलेल्या तव्यावर

भाकरी फिरवताना

कसरत करावी लागते

भाकर थोडी तापली की

पाठीवरून पाण्याचा

प्रेमानं हात फिरवावा लागतो

 

बाळाला शेक देताना

जपतात तशी

जपून शेकावी लागते भाकरी

तेव्हाच होते ती खमंग खरपुस

थोडी जर बिघडली तर

आहेच

जीभ नाक मुरडायला मोकळी…

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महात्मा गांधी ☆ श्री रवींद्र सोनावणी

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ महात्मा गांधी ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

एक वकील नामांकित होते,

मोहनदास करमचंद गांधी.

ब्रिटिश विरोधी लढ्याची,

त्यांनी आफ्रिकेत केली नांदी.

 

मायभूमीला आले परतून,

लढा इथेही पुकारला.

शस्त्राविण सत्तेशी लढाई,

 साबरमतीचा संत बोलला.

 

दया क्षमा शांती मार्गाने,

दानवास मानव केले.

हिंसेला नमवीते अहिंसा,

विश्वाला पटवून दिले.

 

जनतेला बापुजी बोलले,

स्वातंत्र्याचा करूया जागर.

नका करू आपसात दंगे,

नका सांडू रक्ताचे सागर.

 

सत्य अहिंसा शांती पुढती,

झुकली सत्ता ब्रिटिशांची.

चले जावचा देऊन नारा,

लाट उठविली क्रांतीची.

 

अखेर आम्ही स्वतंत्र झालो,

गगनी तिरंगा फडफडला.

झाली फाळणी जातीय दंगे,

जीव बापूचा तडफडला.

 

कुणी वेड्याने वेधुन छाती,

गोळी तयांवर चालविली.

“हे राम” म्हणत शांतिदूताची,

 प्राणज्योत ती मालवली.

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तृ  प्ती ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

⭐ तृ  प्ती ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

मन झाले मोरपीस

वाऱ्यासंगे हले-डुले

सप्त रंगांची रांगोळी

साऱ्या अंगात खुले

 

               कारण काय घडले

               माझे मला न कळले

               ऐकून हरीची धून

               असेल का ते चळले ?

 

मनी झाली घालमेल

पावलांचा चुके ताल

आर्त स्वर बासरीचा

करे आत घाव खोल

 

               झाले कावरी बावरी

               शोधले परस दारी

               परी दिसे ना कुठेच

               मज नंदाचा मुरारी

 

जादू अशी मुरलीची

वाट धरली वनीची

दिसता मूर्ती हरीची

जाहली तृप्ती मनाची

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

१२-०१-२०२२

संपर्क – (सिंगापूर) +6594708959, मो – 9892561086, ई-मेल – [email protected]

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 67 ☆ अभंग… स्वभाव जीवाचा ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 67 ? 

☆ अभंग…स्वभाव जीवाचा  ☆

वात कफ पित्त, त्रय दोष युक्त

नच कधी मुक्त, जीव पहा…!!

 

रोगाचे आगार, मानवाचा देह

सुटतो का मोह, कधी याला…!!

 

संपूर्ण आयुष्य, हावरट बुद्धी

नाहीच सुबुद्धी, याच्याकडे…!!

 

शेवट पर्यंत, पाहिजे म्हणतो

स्वतःचे करतो, अहंकारी…!!

 

वाईट आचार, सदैव साधतो

देवास भजतो, स्वार्थ हेतू…!!

 

कवी राज म्हणे, स्वभाव जीवाचा

उपाय कुणाचा, चाले ना हो…!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३२ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३२– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[1]

पणतीच्या हातून

मोठाच प्रमाद घडला एकदा 

काचदिव्याच्या ज्योतीला

मावसबहिण म्हणण्याचा…

वेडीवाकडी फडफडात

काचदिव्याची ज्योत

धमकावत राहिली तिला

कर्कश करड्या आवाजात

आणि तेवढ्यात

प्रकाशाचा गंध उधळत

चंद्रकोर उगवली

आणि काचदिव्याची ज्योत

नम्रकोमल झाली ,

लाडिक वळणांचे शब्द

लाडे लाडे निसटले-

‘ताई…

माझी लाडकी ताई

 

[2]

संपूर्ण सत्य बोलण्यासाठी

वाट पाहायची तयारी नसेल

तर किती सोपं असतं

परखड बोलणं

 

[3]

किती मौल्यवान असते

फळाची सेवा

आणि किती मधुर

फुलाची सेवा

पण हवी मला

पानाची सेवा

डेरेदार…

नम्र… अर्पित

शांत … शीतल

 

[4]

धुक्याचा आणि पावसाचा पदर

चेहर्‍यावर ओढून

उदास बसलेली

ही परित्यक्त संध्याकाळ …

माझ्या एकाकी हृदयात

जाणवत आहेत मला

तिचे खोल सुस्कारे  

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देवाघरचे ज्ञात कुणाला  ☆  वसंत कानेटकर 

 

? कवितेचा उत्सव ?

☆ देवाघरचे ज्ञात कुणाला  ☆  वसंत कानेटकर  ☆

देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम?

कुणी रखडती धुळीत आणिक

कुणास लाभे हेम

 

मी निष्कांचन,निर्धन साधक

वैराग्याचा एक उपासक

हिमालयाचा मी तो यात्रिक

मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम ?

 

देवाघरचे ज्ञात कुणाला ?

 

– वसंत कानेटकर.

नाटक संगीत मत्सगंधा

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मुकी होऊन जगतात माणसं….! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मुकी होऊन जगतात माणसं….! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

हल्ली बोटानेच अशी सारी बोलतात माणसं

टच् स्क्रीनशीच हितगुज साधतात माणसं.

 

अक्षरांच्या गोतावळ्यात मुकेच शब्द सारे

मुक्यानेच भावनांना व्यक्त करतात माणसं.

 

समोरुन जरी आला कुणी शब्द उसने घेऊन

फोनवर नंतर बोलू म्हणून टाळतात माणसं.

 

हल्ली म्हणे संवाद कमी झालेत एकमेकांशी

अभासी दुनियेलाच आपलसं करतात माणसं.

 

चेहरा फक्त स्वतःच्याच सेल्फी पुरता हसरा

स्टिकर्स-इमोजीनेच भाव दाखवतात माणसं.

 

सुख दुःखाना असं मोबाईल मध्ये सजवुन

बंदिस्त चौकटीत स्वतःलाच कोंडतात माणसं.

 

बोटांची भाषा बोटांनीच केलेले बोटांचेच नखरे

आपल्यासारखीच मुकी होऊन जगतात माणसं.

 

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares