मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पंढरीची वारी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ पंढरीची वारी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆

वारी चालली हो

चंद्रभागे तीरी

एकमुखे गाती हो

नाम जप हरी।।१।।

       शोभतसे भाळी

       चंदनाची उटी

       तुळसीमाळा गळी

       कर ते हो कटी।।२।।

वैष्णवांच्या गजरी

दुमदुमे पंढरी

पायी चाले वारी

विठाईचे द्वारी।।3।।

       वैष्णवांची भक्ती

       विठुराजा प्रती

       नाम हीच शक्ती

       लाख मुखे गाती।।४।।

सावळी विठाई

गुण गावे किती

मूर्ती साजरी ती

भक्त साठविती।।५।।

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 110 – पायवाट ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 110 – पायवाट

धुंद पहाटेच्या वेळी

पायवाट ही जागली।

लाल केशरी रंगानी

काया हिची तेजाळली।

 

चकाकती पानोपानी

दवबिंद मोत्यावानी।

मुग्ध गंध उधळण

केली प्राजक्त फुलांनी।

 

ताल धरून चालती

सर्जा राजाची ही जोडी।

घुंगराच्या नादासवे

बळीराजा तान छेडी।

 

कळपाने गाई गुरे

कशी डौलात निघाली।

खोडकर गोपालाची

शीळ रानात निमाली

 

रोजचीच पायवाट

पुन्हा नटली नव्याने।

जणूकात टाकलेली

चाले नागीन तोऱ्याने।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पांडुरंग भेटीचा गं किती वियोग साहिला… ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ पांडुरंग भेटीचा गं किती वियोग साहिला… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

कालचा त्या वादळात

संसार किती लोपले

हळहळे भक्तजन

उन्मळले वृक्ष ओले

पांडुरंग भेटीचा गं

किती  वियोग साहिला

अंतरी, इथे- तिथेच

असता किती शोधला

 

मानवाचा हट्ट सारा

बाधा निसर्गचक्रात

आवडे ना प्रभू तुला

ध्यानस्थ तू एकांतात

पांडुरंग भेटीचा गं

किती वियोग साहिला

अंतरी, इथे- तिथेच

असता किती शोधला

 

जिवाणू तो विषाणू तो

धन्वंतरी तोच आहे

विसर पडला कसा

सर्वत्र तूच तू आहे

पांडुरंग भेटीचा गं

किती वियोग साहिला

अंतरी, इथे- तिथेच

असता किती शोधला

 

विठू तो लेकुरवाळा

भक्त रक्षिण्या गुंतला

थोपवी वादळ वारा

तेणे वाढ वेळ झाला

पांडुरंग भेटीचा गं

किती वियोग साहिला

अंतरी, इथे- तिथेच

असता किती शोधला

 

व्याकुळता संपवली

वारकरी तो धावला

उच्च स्वरे पंढरीत

जयघोष निनादला

पांडुरंग भेटीचा गं

किती वियोग साहिला

अंतरी, इथे- तिथेच

असता किती शोधला.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अभंग… ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? कवितेचा उत्सव ?

☆ अभंग… ☆ श्री आनंदहरी ☆

तुला भेटण्याला । मन हे आतुर ।

तरी दूर दूर । राहसी तू  ।।

 

हवीशी वाटते । तुझी नित्य वारी ।

धाम माझे चारी । तुझ्याठायी ।।

 

अशी लावलीस । जीवाला या ओढ ।

मन झाले द्वाड । तुझ्यासाठी ।।

 

नको नको आता । दुजा पाश काही ।

अंतरात पाही । तूंचि एक ।।

 

कधी मी पाहीन । तुला याची डोळा ।

जिवा या आगळा । ध्यास आहे ।।

 

तुला का न माझा । येतसे आठव ।

तूच तू भेटव । तुज मला ।।       

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #132 – ☆ भगवान महावीर ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 132 – विजय साहित्य ?

☆ भगवान महावीर ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

सिद्धार्थ  त्रिशला

जनक लाभले

महावीर भले

उद्धारक. . . . !

 

केला परीत्याग

राज वैभवाचा

वर्धमान साचा

महावीर. . . !

 

मानव जातीचे

कल्याण साधले

आयुष्य वेचले

शुभंकरी.. . !

 

पंचशील तत्वे

केला अंगीकार

अंतरी संचार

तीर्थंकर.. . !

 

अहिंसा, असत्य 

अपरिग्रहाचे

आणि अचौर्याचे

मूल तत्व.

 

मूलत्तवी दिले

ब्रम्हचर्य सेतू

सुखशांती हेतू

पंचशील. . . !

 

जगा नी जगू द्या

केला उपदेश

स्वार्थ निरपेक्ष

सर्वोदयी.. . !

 

शुक्ल त्रयोदशी

चैत्र महिन्याची

नांदी कल्याणाची

जन्मोत्सवी.. . !

 

आत्मिक सुखाचा

मार्ग दाखविला

दीप चेतविला

ज्ञानमयी.. . !

 

असा भगवान

पूज्य महावीर

झुकविले शीर

वंदनेत.. . . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जगद्गुरु तुकोबाराय… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ जगद्गुरु तुकोबाराय… ☆ श्री तुकाराम दादा पाटील … ☆ 

देहू गाव माझे संतांचे माहेर

इंद्रायणी काठी तुकोबांचे घर —

 

 नाम संकिर्तन विठ्ठलाचे केले

 केला उपदेश  लोक उद्धरले

भक्ती मार्गासंगे जोडला संसार —

 

कैवल्याची खूण चित्ती समाधान

सांगे उकलून वेद, विद्या,ज्ञान

धर्म कर्मठांचे मोडले व्यवहार —

 

शुद्ध भक्तिमार्गी रचीयला गाथा

विठ्ठल चरणी ठेवुनीया माथा

भेदा भेद भ्रम सारियले दूर —

 

लोभ मोह माया मानला विटाळ

संत संगतीचा जमवुनी मेळ

टाकले वाटून ज्ञानाचे भांडार —

 

संत श्रेष्ठ ऐसा जगद्गुरु झाला

रंगुनी कीर्तनी अखंड नाचला

ध्यान समाधीत झाला निर्विकार —

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – उंबरा… – ☆ सुश्री हेमा फाटक ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – उंबरा… –  ? ☆ सुश्री हेमा फाटक 

उंबर्‍याशी विसावलं

घाई नाही कसलीही

म्हातारपण द्वाड बाई

सय नाही सुटलेली—- 

घर खाया उठलेलं

सारं कसं चिडीचूप

दिसागणिक वाढते

लेकरांची याद खूप—-

भरलेला होता वाडा

ओसरीला आला-गेला

पायताणांचा राबता

सडा पडे गर्द ओला—-

लेकरांनी माजघर

तिथं कालवा केवढा

रडे हट्ट हाणामारी

शांत रातीस तेवढा—-

पाखरा इवं सारी पोरे

शिकूनिया दूर गेली

विसरोनी गांव खेडी

शहराची वासी झाली—-

धनी काळवासी झाले

आता कोठला दरारा

म्हातारीच्या डोईवर

उभा रिता हा पसारा—-

फक्त उन्हाळ्याची सुट्टी

घालवण्या पोरे येती

म्हातारीच्या सोबतीला

फक्त मोकळ्याच राती—-

रस्त्यावर वाटसरू

येतां जातां ख्याल पुसें

अवचित बोला साठी

माय उंबर्‍याला बसे—–

माय उंबर्‍याला बसे !!—-

चित्र साभार – सुश्री हेमा फाटक

© सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निष्ठा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ निष्ठा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

किती लाजिरवाणे । किती ओरबाडणे

किती टाळूवरचे  । लोणी खाणे !

 

निष्ठा होतीच खरी । संपली का अशी ?

विश्वास मानवाप्रति !  सत्ता माज भारी

 

निष्ठेला पाय फुटले । काल होती घरी

लाचार पळून गेली । सत्तेच्या दारी

 

सत्य कुठे लपते । नजरेस का नाही ?

माज कसा रुजला । मृत्यू सत्य तरी ?

 

खेळ जगण्याचा । दिवसांचा काही

खेळ आकड्याचा । सरकार खेळ खेळी

 

रडीच्या डावाने । जनता त्रस्त बळी

काळीमा मानवतेला । ना भूषणावह काही

 

शालीनता,सभ्यता,नम्रता । सर्वश्रेष्ठ सद् वर्तनी

काय डोंगर, काय झाडी । निसर्ग, स्तब्ध दरी

 

नव्याने अंकुरेल का !  लोकांनी, लोकांकडून,

लोकांसाठी चालवलेली । लोकशाही देशांतरी !

 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कृपासाद… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ कृपासाद… ☆ श्रीशैल चौगुले ☆

पावसाने पावसाला

पाहूनीया पालवीले

फुलांपरी फुलांवरी

फुलथेंब फुलविले.

 

घनातूनी घनकुंभ

घरंगळ  घळंगले

तरुवर   तनांवर

तरतरी  तरंगले.

 

वनातुनी वनवृंद

वनवेणू  वननाद

कृष्णसंग कृष्णरंग

कृष्णवत् कृपासाद.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 140 ☆ आता… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 140 ?

☆ आता… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आता सगळ्या कविता….

बासनात बांधून माळ्यावर टाकल्या….

किंवा अडगळीत फेकल्या…

काय फरक पडणार आहे?

 

कधीतरी वाटायचं आपल्याला सुचते कविता….

काहीतरी उगवतंय मेंदूत..

आणि उतरतंय कागदावर…

 

किती तरी वेगळे आहोत

आपण

इतरांहून !

 

….जे उगवतंय…ते अव्वल नसलं

तरी सुमार ही नाही…..

पण ही ओळख स्वतःची स्वतःला…!!

 

कुणी म्हटलं कुत्सितपणे,

एवढे कागद आणि शाई

खर्च करून काय उपयोग?

ज्ञानपीठ मिळणार आहे का ??

 

तर कुणी म्हटलं ….

“तुझं जगणं हीच कविता आहे.”

आणि मी लिहीत गेले कविता…

त्या सा-या अलवार क्षणांवर…..!!

 

आता भूतकाळाचं फुलपाखरू भुर्र्कन उडून गेलं…..

कविता म्हातारी झाली

की आऊट डेटेड माहित नाही…..

 

आता झाडं बोलत नाहीत….

पक्षी गात ,

माझ्या कवितेच्या प्रदेशातले ….

 

कविता संपली आहे माझ्यातली….की माझ्यातून ??

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares