मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 111 – हरवली पाखरं ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 111 –हरवली पाखरं ☆

अशी हरवली पाखरं

मन हळवे अतं री।

किती समजावू रे मना

आभासाची गत न्यारी।

 

सदा प्रेमामृत मुखी

देई मायेने रे घास।

नको पिलांच्या रे माथी

तुझ्या आकांक्षाची आस ।

 

घाली मायेची पाखरं

जशी दुधात साखर।

घेण्या आकाशी भरारी

खोल घरट्याची द्वार द्वारं।  

 

जगी अथांग झुंजण्या

देई कणखर आधार।

छाया तुझीच सानुली

कशी फिरेल माघार।

 

आचरणी सदा तुझ्या

संस्काराचे मिळे धडे।

मनामध्ये आभासी या

नको संशयाचे रडे।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – भक्त पुंडलिक – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – भक्त पुंडलिक–  ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

आईवडिलांची सेवा

त्यात गुंग पुंडलिक

त्याला जाणीवही नसे

वाट पाहतो श्रीरंग—–

पुंडलिका, मी आलोय

त्याने मारताच हाक

न पाहता फेकली

त्याला बसावया विट—–

चंद्रभागेचीया तटी

पुंडलिक वाळवंटी

वाट पाहे पांडुरंग

कर ठेवूनिया कटी—-

पुंडलिक विसरला

उभे केले विठ्ठलाला

युगे युगे  पांडुरंग

वाट पाहत राहिला—–

पुंडलिका भेटीसाठी

देव  तिष्ठत अजून

विटेवरी उभा  विठू

वाट पाहे आसावून—–

पुंडलिकाचे मंदिर

चंद्रभागा वाळवंटी

अजूनही उभा हरी

कर ठेवूनिया कटी—–

भक्तिभावे ओथंबून

पुंडलिकाला भेटती

मग माऊलीची ओढ

विठू गाभाऱ्याशी नेती—–

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काही हायकू… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ काही हायकू… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

अंगणातल्या झाडावर

कावळा ओरडतोय भुकेने…

घर नाचतय पाहुणे येणार या खुशीने…

         *

रुक्ष झाडाच्या फांदीवर

किलबिलत पाखरू येऊन बसलं…

रात्री झाडं स्वप्नांनी डवरलं…

       *

पहाटे थंडीत

रस्ते.. झाडं कुडकुडू लागली…

तशी धुक्याची चादर ओढून घेतली…

      **

धुवाधार पाऊस

सारे चिडीचूप घरात…

एक पाखरु बागडतय साचलेल्या पाण्यात…                

      **

पावसाच्या प्रतिक्षेत

उभी पिके वाळून गेली…

तो थांबेल म्हणता म्हणता वाहून गेली..

      **

तीन्हीसांजेस धुवाधार पाऊस

एक पाखरु वळचणीला…

केवढा आधार मनाला…

     *

पावसाळी आभाळ

गच्च आलंय भरून…

मी ही पापण्या घेतल्या मिटून…

      *

कुणीच नाही घरात

म्हणून आलो परसात…

तर फुलं.. पाखरं ही निमूट पानांत…

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खरा पाऊस… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ खरा पाऊस… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

व्हावे मनाचे आकाश,

यावे काळजांत मेघ.

दूर क्षितिज दिसावे,

जशी काल्पनिक रेघ.

 

मोर मनस्वी नाचावे,

पावसात लयबद्ध .

असो पाऊस उत्सव,

पापण्यात खोल बद्ध.

 

कधी ओलेचिंब व्हावे,

थेंब सुजाण जपावा.

पावसाळ्याच्या ऋतुत,

खरा पाऊस कळावा.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #133 ☆ गुरुपौर्णिमा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 133 – विजय साहित्य ?

☆ गुरुपौर्णिमा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

ज्ञानार्जन,  ज्ञानदान

नित्य हवे देणे घेणे

शिकविते चराचर

ज्ञान सृजनाचे लेणे. . . . !

 

गुरू रूप ईश्वराचे

जगण्याचा मार्ग देते.

कृपा प्रसादे करून

सन्मार्गाच्या पथी येते. . . . . !

 

गुरू ईश्वरी संकेत

संस्काराची जपमाळ

शिकविते जिंकायला

संकटांचा वेळ,  काळ. . . . . !

 

चंद्र  प्रकाशात जसे

तेज चांदणीला येते

पौर्णिमेत आषाढीच्या

व्यास रूप साकारते.. . . !

 

माणसाने माणसाला

घ्यावे जरा समजून

ऋण मानू त्या दात्यांचे

गुरू पुजन करून. . . . !

 

संस्काराचा  ज्ञानवसा

एक हात देणार्‍याचा

पिढ्या पिढ्या चालू आहे

एक हात घेणार्‍याचा.

 

असे ज्ञानाचे सृजन

अनुभवी धडे देते

जीवनाच्या परीक्षेत

जगायला शिकविते. . . !

 

ज्ञानियांचा ज्ञानराजा

व्यासाचेच नाम घेई.

महाकाव्ये , वेद गाथा

ग्रंथगुरू ज्ञान देई. . . . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – संत सोयराबाई – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – संत सोयराबाई –  ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

संत चोखा सहचर

संत बंका होता दीर

संत सोयराच्या घरी

विठ्ठल नामाचा गजर—

चोखामेळ्याच्या कुटुंबी 

पंढरीची नित्य वारी

विठ्ठल भरून उरला

मनमंदिरा गाभारी—

विठूमाऊली  भक्तीचा

वारसाच सासरचा

प्रथम दलित कवयित्री

मान आहे सोयराचा—

समाजाला लागलेली

अंधश्रद्धेची खोल कीड

सोयराबाईस होती त्याची

मना आतूनच चीड—

जातीभेद  शिवाशीव

नको नको आचरणी

कर्मकांड यज्ञयाग

सोयरा सांगते भजनी—

चराचरात विठ्ठल

नाही फक्त गाभाऱ्यात

ओतप्रोत  भक्तीतून

आणि व्यक्त आचरणात—

याच विषयाच्या केल्या

असंख्य अभंग रचना

अशा सोयराबाईला

मिळे भक्तिरस पान्हा—

(देहीचा विटाळ म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ म्हणती सर्व देहीचा विटाळ देहात जन्मला सोहळा तो झाला कवणाले – संत सोयराबाई)

या ताकदीने  त्या काळात लिहिणारी संत सोयराबाई

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ सावळ्या रे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

अल्प परिचय 

नाव- सौ.जयश्री अनिल पाटील.

शिक्षण – बी. कॉम.

प्रकाशन – कविता संग्रह व बाल कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर.

सन्मान एवं पुरस्कार – 

  • नवरत्न काव्य पुरस्कार.
  • ऑनलाइन व्हाट्सअप च्या माध्यमातून राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभाग व सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट प्रथम, द्वितीय, तृतीय, हृदयस्पर्शी, भावस्पर्शी पुरस्कार.

सम्प्रति – अनेक मासिकं किशोर ,जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, जन स्वास्थ्य, संवेदना इत्यादी मधून कविता व लेख प्रसिद्ध. दिवाळी अंकांतून लेख व कविता प्रकाशित. सकाळ सप्तरंग, पुढारी बहार मधून कविता प्रसिद्ध. आकाशवाणी वरून काव्यवाचन कार्यक्रम.

अनेक ठिकाणी काव्यवाचन तसेच कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती .अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग.महिला मंडळ व भजनी मंडळ अध्यक्षा. बॅडमिंटन व रींग टेनिस चॅम्पियन.

? कवितेच्या उत्सव ?

☆ सावळ्या रे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

तुझ्या दर्शनासी देवा

पंढरीच्या रे विठ्ठला

भेटीसाठी सावळ्या रे

जीव माझा आतुरला….१

 

धाव घेईल मन माझे

जीव होई कासावीस

कृपा करी भगवंता

मना तुझीच रे आस….२

 

मुखी तुझे नाम गोड

नित्य तुझाच रे ध्यास

दंग तुझ्या कीर्तनात

वाटे रहावे रात्रंदिस….३

 

तान्हे बाळ आईसाठी

टाहो फोडे वारंवार

तुझ्या कुशीत विसावा

मिळावा रे क्षणभर….४

 

रूप तुझे पाहूनीया

तृप्त होते माझे मन

तुझ्या भक्तीसाठी देवा

जन्म जावा हा संपून….५

 

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #117 – दत्तगुरु…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 117 – दत्तगुरु…! ☆

हा प्रत्येक श्वास माझा दत्तात्रेय गात आहे

दर्शनास गुरुदत्ता आतुरला जिव आहे…१

 

हे श्री गुरु दत्तात्रेया तू आहे चराचरात

भक्तास तारावयाला तू येतो कसा क्षणात …२

 

घेतसे मिटून डोळे मी तुझ्या दर्शनासाठी

चरणी ठेवतो माथा तुलाच पाहण्यासाठी…३

 

हे श्री गुरु दत्तात्रेया दे दर्शन तू मजला

गाणगापूरी आलो मी दत्ता तुला भेटण्याला..४

 

दिगंबरा दिगंबरा जयघोष होत आहे

तू दर्शन देता देवा आनंदला जिव आहे…५

 

दत्तात्रेया कृपा तुझी जन्माचे सार्थक झाले

जाहले दर्शन आणि आयुष्याचे सोने झाले…६

 

ह्या देहास माझ्या आता सेवा तुझीच घडावी

चरणावरीच तुझिया प्राण ज्योत ही विझावी..७

 

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – संत जनाबाई – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – संत जनाबाई –  ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

संत जनाबाई

तिची सावळी विठाई

तिचा नव्हता तो देव

तिला वाटे तो मानव—-

जनाबाई संगे

विठू गोवऱ्या थापतो

आणि तिच्यासंगे

तो धुणेही धुवतो —–

जनाबाईकडे देव

तिला भेटायला गेला

तिची वाकळ पांघरे

तिथे विसरला शेला—–

 जनी संगे देव

दळता दळण

चंद्रहार खुंटीवर

आला विसरून—-

जनीला भेटायला

जाई गोपाळपूराला

बडवे धुंडाळती इथे

गाभारी त्या हरीला—-

अशी जनाबाई

असा पांडुरंग

वेगळीच भक्ती

वेगळाच  रंग—-

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ मरवा ☆ कै. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित) ☆

कै. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित)

इंदिरा संत

? कवितेच्या उत्सव ?

☆ मरवा ☆ कै. इंदिरा संत (इंदिरा दीक्षित) ☆ 

पुस्तकातली खूण कराया,

दिले एकदा पिस पांढरे,

पिसाहुनी सुकुमार  काहीसे,

देता घेता त्यात थरारे.

 

मेजावरचे वजन छानसे,

म्हणून दिला नाजूक शिंपला,

देता घेता उमटे काही,

मीना तयाचा त्यावर जरला.

 

असेच काही द्यावे घ्यावे,

दिला एकदा ताजा मरवा,

देता घेता त्यात मिसळला,

गंध मनातील त्याहून हिरवा.

 – इंदिरा संत

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares