मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ येशील केव्हा पुन्हा परतुन… ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ येशील केव्हा पुन्हा परतुन… 💐 ☆ सौ. विद्या पराडकर ☆

(विरह काव्य)

ताजमहालचया वाटेने प्रिये

का?तू गेली मजला सोडून

बसलो आहे मी मात्र येथे

प्रणय गीतांचे सूर लावून

 

संगमरवरी स्वप्ना चे त्या

भंगलेले‌ अवशेष राहिले

भावनांचे प्रीती पुष्प ‌हे

कोमेजुन गंध हीन ़झाले

 

जलविण जैसा मीन तळमळे

तैसा तळमळे मी रात्रंदिन

तुझ्या प्रीतिचा असे पुजारी

अहोरात्र करी मी‌ तुझेच पूजन

 

येशील केव्हा पुन्हा परतुन

संगमरवरीचया कलाकृतीतुन

की यमुनेच्या या धुंद जलातुन

स्वर्गीय ते भोग सोडून

 

वाट पहातो तुझी प्रिये ग

पुन्हा मीलनाची आस धरुन

तुझ्याविणा मज नसे किनारा

तव‌ स्मृतीच्या श्रावणधारा 💐

 

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #164 ☆ अंधार रात्र आहे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 164 ?

☆ अंधार रात्र आहे… ☆

काळोख शमविण्याला येतात काजवे हे

घेऊन दीप हाती फिरतात काजवे हे

 

अंधार रात्र आहे पत्ता न चांदण्यांचा

त्यांचीत फक्त जागा घेतात काजवे हे

 

गुंफून हात हाती करतात नृत्य सारे

सुंदर प्रकाश गीते गातात काजवे हे

 

छळतो तिमिर तरीही थोडा उजेड आहे

आधार जीवनाचा होतात काजवे हे

 

नाजूक जीव आहे हलक्या मुठीत माझ्या

घेतो कधी कधी मी हातात काजवे हे

 

शेतात चोर रात्री येऊ नयेत म्हणुनी

घालून गस्त रात्री जातात काजवे हे

 

आहे स्वयंप्रकाशी इवला प्रकाश तरिही

निर्माण राज्य येथे करतात काजवे हे

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जयलाभादिकरं श्रीदत्तस्तोत्रम्— श्री वासुदेवानंद सरस्वती — मराठी भावानुवाद☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ जयलाभादिकरं श्रीदत्तस्तोत्रम्— श्री वासुदेवानंद सरस्वती — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

जयलाभादिकरं श्रीदत्तस्तोत्रम्— श्री वासुदेवानंद सरस्वती 

मराठी भावानुवाद : जयलाभयशप्राप्ती स्त्रोत्र : डॉ. निशिकांत श्रोत्री 

श्रीगणेशाय नमः | श्रीसरस्वत्यै नमः| 

श्रीपादवल्लभ श्रीनृसिंहसरस्वती श्रीगुरुदत्तात्रेय नमः||

दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलम् ।

प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ १ ॥

दत्तात्रेया ब्रह्मरूपा वरदायी भक्तवत्सला

संकटहारी हे देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||१||

दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणम् ।

सर्वारक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ २ ॥  

दीनबंधू सिंधू कृपेचा कारण असशी विश्वाचा

सकल रक्षका हे  देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||२||

शरणागतदीनार्तपरित्राणपरायणम् ।

नारायणं विभुं वंदे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ३ ॥

शरणागत दीनांची पीडा निवारण तू करिशी

नारायणा श्रेष्ठ देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||३||

सर्वानर्थहरं देवं सर्वमंगलमंगलम् ।

सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तुगामी नोऽवतु ॥ ४ ॥

सकलानर्थ हरण कर्ता करिशी सर्व मंगला 

सर्वक्लेशनिवारकदेवा स्मरणसाक्षी नमन तुला ||४||

ब्रह्यण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनम् ।

भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ५ ॥  

तू तत्वज्ञ ब्रह्मज्ञानी वर्धिशी भक्तकीर्तिला 

भक्तकल्याणी हे देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||५||

शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः ।

तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ६ ॥

शोषणकर्ता पापांचा तू दीप तेजवी ज्ञानाचा 

तापशामक हे देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||६||  

सर्वरोगप्रशनम् सर्वपीडा निवारणम् ।

आपदुद्धरणं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ७ ॥

शमवुनी सर्व रोगांना सकल पीडा निवारिल्या

अरिष्टोद्धारक हे  देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||७||

जन्मसंसारबन्धघ्नं स्वरुपानंददायकम् ।

निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी स नोऽवतु ॥ ८ ॥

जननमरण बंधघ्न चिदानंद मोक्षदायका

दिव्योद्धारा हे देवा स्मरणसाक्षी नमन तुला ||८||

जयलाभयशःकाम-दातुर्दत्तस्य यः स्तवम् । 

भोगमोक्षप्रदस्येमं प्रपठेत्स कृती भवेत् ॥ ९ ॥

दत्तस्तोत्र हे पवित्र जयलाभ नि यशकीर्ती

स्तवन श्रवण करी त्यासी लाभे भोगासवे मुक्ती ||९||

*****

॥ इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं जयलाभादिकरं श्रीदत्तस्तोत्रम् संपूर्णम् ॥   

||इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती रचित निशिकांत भावानुवादित जयलाभयशप्राप्ती स्त्रोत्र संपूर्ण||

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

मो. ९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीप पाजळू या !!☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ ” दीप पाजळू या !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

आईबाबांचा लेक लाडका

दीप सर्वांच्या आशेचा असे

भविष्यातील आधार काठी

मानसिक स्वास्थ्य जपतसे ||

 

ज्ञानदीप उजळी जीवना

दूर करूनिया अज्ञानाला

विद्येचे हे पवित्र मंदिर

देतसे आकार आयुष्याला ||

 

स्नेहदीप हा माणुसकीचा

घराघरातून तेवतसे

स्नेहबंध हा मानवतेचा

घट्ट बांधुनिया ठेवीतसे ||

 

मांगल्याचा दीप उजळतो

शांतपणाने देवघरात

चैतन्याच्या लहरी उठवी

प्रसन्नचित्ते चराचरात ||

 

दीपकाचे पूजन करिती

कुटुंब स्वास्थ्य समृद्धीसाठी

विनम्र आवाहन तेजाला

उत्तम आरोग्य सर्वांसाठी ||

 

ज्योतीने पेटवितो ज्योत

दीप करीतसे दीपोत्सव

अखंडतेचे तत्व चेतवी

तिमिरातूनी  प्रकाशोत्सव ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अनंताचा मंत्र… ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ अनंताचा मंत्र… ☆ श्री आशिष मुळे ☆

दगडा वरती कोरत जावे

कागदा वरती छापत जावे

मना वरती उठवत जावे

लिहिणाऱ्याने लिहीत जावे।

 

बघणाऱ्याने निरखत जावे

जळणाऱ्याने निंदत जावे

हसणाऱ्याने चघळत जावे

लिहिणाऱ्याने लिहीत जावे।

 

भावणाऱ्याने रड़त जावे

जाणणाऱ्याने पारखत जावे

वाचणाऱ्याने शिकत जावे

शिकता शिकता लिहित जावे।

 

लिहिता लिहिता वाटत जावे

वाटता वाटता मरून जावे

मेल्यानंतर अमर व्हावे

लिहिणाऱ्याने लिहीत जावे।

 

कालचक्रात फिरता फिरता

स्मृतिरुपी पसरत रहावे

अंधकार जगी उगवता

ज्ञानप्रकाशे जगी अवतरावे।

 

लिहिणाऱ्याने लिहित जावे

वाचणाऱ्याने शिकत जावे

शिकता शिकता लिहित जावे॥

© आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 105 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 105 ? 

☆ अभंग… ☆

सोज्वळ नजर, सतत असावी

कधीच नसावी, अमंगल…०१

 

पाहता सहज, प्रेमळ भासावी

नकोच रुतावी, आरपार…०२

 

बोलतांना कधी, क्रोधीत न व्हावे

सहज जपावे, अनुबंध…०३

 

निर्भेळ बोलावे, मुक्तत्वे हसावे

आणि ते कळावे, सकळिक…०४

 

ऐसी व्हावी ख्याती, तुम्ही मितभाषी

न व्हावे दोषी, नजरेत…०५

 

शब्द माझे वेडे, लिहिले वाहिले

पूर्णत्वास नेले, अभंगाला…०६

 

तोडके मोडके, बोल हे बोबडे

गिरविले धडे, हळूहळू…०७

 

कवी राज म्हणे,असू द्यावे भान

आपण सुजाण, कविवर्य…०८

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 36 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 36 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

५७

प्रकाश, माझा प्रकाश,

विश्व भरून राहिलेला प्रकाश

नयनाला स्पर्श करून

ऱ्हदयाला आनंद देणारा प्रकाश

 

हे जीवलगा, माझ्या जीवनात

आनंद नाचून राहिला आहे

माझ्या प्रेमाच्या तारा प्रकाशात झंकारल्या आहेत.

प्रकाशामुळेच आकाश विस्तारते,

वारा बेफाट वाहतो, भूमीवर सर्वत्र हास्य पसरते.

 

फुलपाखरं आपल्या नौका

प्रकाशसमुद्रात सोडतात,

लिली आणि जास्मिनची फुलं फुलतात

ती प्रकाशाच्या लाटांवर!

 

हे प्राणसख्या, प्रत्येक ढगाच्या

सोनेरी छटेवर प्रकाश आहे

मुक्तपणे मोत्यांची उधळण करतो आहे.

 

पानांपानांतून अमर्याद

आनंदाची उधळण तो करतो.

स्वर्गनदी दुथडी भरून वाहते आहे.

सर्वत्र आनंद भरून राहिला आहे.

 

५८.

अल्लड गवत पात्याच्या तालावर

आनंदात जे सर्व पृथ्वी फुलवतं,

 

जन्म- मृत्यू या जुळ्या भावंडांना

जगभर ते नाचवत ठेवतं,

 

हसत हसत सर्व जीवन वादळीवाऱ्यातही

ते डोलवतं आणि जागं ठेवतं.

 

फुललेल्या लाल कमळाच्या पाकळीवर

आसूभरल्या नयनांनी ते विसावतं,

 

आपल्याकडं असलेलं सर्वस्व

मूकपणं जे धुळीत उधळतं,

 

त्या माझ्या आनंदगीताच्या सुरावटीत

सर्वानंदाचे स्वर मिळावेत.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सरली  दिवाळी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ सरली  दिवाळी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सरली आज दिवाळी,

 जपू मनी आनंदाचे क्षण!

प्रत्येक दिवाळीची ,

 मनी असे वेगळी आठवण!

 

वसुबारस ते भाऊबीज,

 दिवस असती प्रकाशाचे !

तोच प्रकाश मनात राहो,

 दिवे उजळीत अंतरीचे !

 

 स्नेहभाव वाढीस लागे ,

 उणी दुणी विरघळून जाती!

दीपावलीच्या आनंदात ,

 झरती स्नेहाच्या बरसाती!

 

रेखते अंगणी रांगोळी,

 ठिपक्यांची अन् नक्षीची!

तशी राखावी सर्वांची अंतरे,

 रेखीव, सुंदर नात्यांची !

 

असेच राहो मन आनंदी,

 निमित्त कशाला दिवाळीचे?

प्रार्थना करू ईश्वराची ,

 निरंतर राहो सौख्य मनाचे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वचन… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ वचन 💦 सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सागरलाटा धावत येती

किनाऱ्या भेटण्याला

अडवी वारा भाग पाडतो

परत लोटण्याला

 

किती काळ तिष्ठत राही

किनारा मीलनाला

पुनरपि लाटा धाव घेती

किनारी मिटण्याला

 

आर्जवे तरी किती करावी

मनास उमगत नाही

अचल मी साद घालतो

त्यांस समजत नाही

 

वेल्हाळ या लाटा उसळती

अधिर जाहल्या मनी

कवेत घेण्या आतुरसा

दाटली असोशी मनी

 

पूर्तता  कधी प्रतिक्षेची

आर्त आर्त उर्मी

अनंतकाळ वाट पाहीन

वचनची दिधले मी

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बोगनवेल ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? बोगनवेल ! ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ 

असे दुनिया रंगीत माझी

दुरून जणू कागदी वाटे,

नसे मज कुठला सुवास

फुलांपेक्षा अंगभर काटे !

शोभा वाढवी कुंपणाची

राखण गुराढोरांपासून,

नको जवळीक माझ्याशी

काटे काढतील सोलून !

दिसती पाकळ्या शोभून

माझ्या एखाद्या हारात,

वाढे सुंदरता कुणा घरची

कमान करता गवाक्षात !

नको मज जादा निगराणी

वाढीस पुरे थोडसं पाणी,

जरी नसले फुलांची राणी

नयन सुखावती रंग झणी !

© प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares