मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा ११ ते १६ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा ११ ते १६— म राठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३० (इंद्र, अश्विनीकुमार, उषासूक्त)

देवता – १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमार; २०-२२ उषा – ऋषी – शुनःशेप आजीगर्ति

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या  सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या  सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस  या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या  ऋचा उषा देवातेला  आवाहन करतात.

या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या अकरा ते सोळा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद ::

 अ॒स्माकं॑ शि॒प्रिणी॑नां॒ सोम॑पाः सोम॒पाव्ना॑म् । सखे॑ वज्रि॒न्सखी॑नाम् ॥ ११ ॥

 अमुचा अमुच्या सहचारीणींचा तू हितकर्ता

आम्हा पाठी सदैव असशी होऊनिया तू भर्ता

तुला आवडे सोमरसाचे करण्याला प्राशन

वज्रधारी देवेंद्रा तुजला  सोमाचे अर्पण ||११||

तथा॒ तद॑स्तु सोमपाः॒ सखे॑ वज्रि॒न्तथा॑ कृणु । यथा॑ त उ॒श्मसी॒ष्टये॑ ॥ १२ ॥

 वज्रधारी हे देवेंद्रा रे तू अमुचा मित्र

तुझ्या कृपेचे सदा असू दे अमुच्यावर छत्र

प्रसन्न होउनि देई आम्हा शाश्वत वरदान

अभिलाषा ना असावी दुजी इंद्रकृपेवीण ||१२||

रे॒वती॑र्नः सध॒माद॒ इंद्रे॑ सन्तु तु॒विवा॑जाः । क्षु॒मन्तः॒ याभि॒र्मदे॑म ॥ १३ ॥

 अमुच्या सहवासे इंद्राला परम मोद व्हावा

दिव्य वैभवाचा आम्हाला लाभ सदैव व्हावा

जलधिसारखी अमुची असुदे समृद्धी परिपूर्ण

या सामर्थ्ये आम्हा व्हावा अतुल्य परमानंद ||१३||

 आ घ॒ त्वावा॒न्त्मना॒प्तः स्तो॒तृभ्यो॑ धृष्णविया॒नः । ऋ॒णोरक्षं॒ न च॒क्र्योः ॥ १४ ॥

 चंडप्रतापी हे देवेंद्रा तुला सर्व मान

अनुपम तू रे अन्य तुला ना काही उपमान

आळविली प्रार्थना ऐकुनि सिंहासन सोडिशी

आंसापरी रे शकटाच्या तू धाव झणी घेशी ||१४||

 आ यद्दुवः॑ शतक्रत॒वा कामं॑ जरितॄ॒णाम् । ऋ॒णोरक्षं॒ न शची॑भिः ॥ १५ ॥

आभा पसरे  तव प्रज्ञेची  तेजोमय दिव्य

दास तुझे ही तुझ्या कृपेने  तृप्त सुखी  सदैव

हवी मिळाया सेवकासी तव जागृत तू राहशी

आंसापरी रे शकटाच्या तू धाव झणी घेशी ||१५||

शश्व॒दिंद्रः॒ पोप्रु॑थद्‍भिर्जिगाय॒ नान॑दद्‍भिः॒ शाश्व॑सद्‍भि॒र्धना॑नि ।

स नो॑ हिरण्यर॒थं दं॒सना॑वा॒न्स नः॑ सनि॒ता स॒नये॒ सः नो॑ऽदात् ॥ १६ ॥

 उन्मादाने नाद करिती ते सवे अश्व घेउनी

पराक्रमाने अपुल्या आणिशी संपत्ती जिंकुनी

शौर्य तयाचे अद्भुत जितके उदार तो तितुका

दाना दिधले सुवर्णशकटा वैभवास अमुच्या ||१६||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/o9wi_A2EK1g

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 6 to 10

Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 6 to 10

 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मोल  क्षणाच्…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “मोल  क्षणाच्” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

जगण्याची धडपड

कधीच नाही संपत

वेळ काढल्याशिवाय

वेळ कधीच नाही भेटत….

 

हरवलेल्या क्षणांचे

दुःख असते मोठे

रोज धावता धावता

जगायचे मात्र राहते…

 

वेळ नाही म्हणून

किती काळ ढकलणार

अर्ध आयुष्य संपल्यावर

मागे वळून मग पाहणार…

 

आजचा सुंदर दिवस

जगायचा राहून जातो

भूत भविष्यात

आपण हरवून बसतो….

 

काल गेलाय निघून

परतून न येण्यासाठी

उद्याची कोण देते हमी

सांगा या जीवनी….

 

आज आणि आता

यावर आपली सत्ता

नको विचारांचा गुंता

ओळखा आपली क्षमता..

 

झालं गेलं सोडून द्यावं

जगायचे ते जगून घ्यावं

उद्यासाठी का बरं थांबावं

आजच्या क्षणाचं मोल जाणून घ्यावं …

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस  : आकाशातला आणि डोळ्यातला ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?  कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस : आकाशातला आणि डोळ्यातला ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आकाशातल्या पावसाला असतो ऋतू आणि काळ

डोळ्यातला पाऊस कधी कुठेही सर्वकाळ

 

आकाशातल्या पावसाला येरे येरे विनवण

डोळ्यातल्या पावसाला नको नको हे सांगण

 

आकाशातला पाऊस सवे घेण्या सारे आतूर

डोळ्यातल्या पावसाला ठेऊ पाहती सारे दूर

 

आकाशीचा पाऊस हर्ष उल्हास लकेर

डोळ्यातला पाऊस दु:ख दावे काळीज विभोर

 

असले कितीही फरक ,साम्य पण आहे दोघात

दोघांचीही अतिवृष्टी किंवा कोरडी वृत्ती ये जीवन धोक्यात

 

भूवरील पाणी बाष्पीभवनाने वर जाऊन घनात दाटे

घनास या अनिलाचा कोमल स्पर्श सुखावे

मग जलौघ आर्ततेने भूवर धावे

हे पावसाचे चक्र

 

काळजातील वेदना नकळत नयनात दाटे

कोणाच्या तरी बोलण्याचा वारा त्याला विचारे

हाच जलौघ असहायतेने कपोली धावे

हे आसवांचे चक्र

 

अशीच समानता देवाने सर्वांसाठीच दिली

तुमचे विचार तुमची दृष्टी यानेच त्याची नीती बदलली

 

पहा थोडी दृष्टी बदलून

 डोळ्यातील पाऊसही येईल आनंद घेऊन

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆  कृतार्थ… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? कृतार्थ… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

ऐकून माझा मधुर स्वर 

चुके काळजाचा ठाव, 

कसे कळावे त्यासाठी 

सोसले मी किती घाव !

मी दिली अग्निपरीक्षा 

पडली छिद्र काळजाला,

तेव्हा कुठे मज मिळाला

स्वर तो मंत्रमुग्ध भरला !

गोड स्वर ऐकताच माझा

हरपे गोपिकांचे भान, 

देखल्या विना हरीला 

येती मग कंठाशी प्राण !

झाले सार्थक जीवनाचे 

लागता हरीच्या ओठी,

मोद भरल्या गोपिकांचा

रास रंगे यमुनेकाठी !

रास रंगे यमुनेकाठी !

…. (खरंच असं असेल का एखाद्या मुरलीचे मनोगत ? ) 

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “काचेमागचा पाऊस…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “काचेमागचा पाऊस…” ☆ सौ राधिका भांडारकर 

(२८ जून २०२३)

पंचतारांकित हॉटेलच्या

फ्रेंच विंडोतून पाऊस

मला वाकुल्या दाखवत होता

म्हणाला “बाहेर ये” घालू धुडगूस

 

काचेतून पाहत होते सागराला

 पावसामध्ये  तोही होता उधाणला

 लाटांवर लाटा उंच उंच लाटा

फुगड्या सरींशी घालत तोही रमला

 

 काचेने  अडवला पावसाचा आवाज

वारा झाडे लाटांचा वाद्यवृंद

बाहेर मैफल रंगली होती

पारदर्शी  पावसाने मन झाले धुंद

 

गावाकडचं आठवलं घर कौलारू

 टप टप छिद्रांतून  थेंबांची  गळती

 घराभोवती  तळी किती साठायची

 त्यात होड्या  कागदाच्या तरंगती 

 

 काचे मधला पाऊस कसा वेटरसारखा

 हाऊ कॅन आय हेल्प यू म्हणणारा

 पण गावाकडचा रानातला पाऊस

सखा माझा कानाशी गाणारा

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 194 ☆ कस्तुरी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 194 ?

☆ कस्तुरी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

यंदाच्या मोसमात

बहरलाच भरघोस,

मोगरा माझ्यासाठी !

 

त्याची कंच हिरवाई

डोळ्यात भरून राहिलेली

आणि शुभ्र दरवळ

आत खोलवर

प्राणापर्यंत !

 

मग मी ही

चंदनासारख्या

उगाळत राहिले

त्या ऋतुबहराच्या आठवणी….

 

काही घाव

दुख-या जखमा

घेतल्या लिंपून

त्या शीतल सुगंधाने !

 

आता मोगरा

फुललाय अंगोपांगी

आणि अवघा देह

कस्तुरी झालाय!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “पश्चात्ताप…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “पश्चात्ताप…” ☆ श्री आशिष मुळे ☆

दिली जीभ म्हणून चालवत गेलो

अजाणतेपणी भावना कापत गेलो

हेतू निराळा पण दिसत वेगळा गेलो

पश्चात बुद्धी दग्ध पश्चातापे झालो

 

बळावर बुद्धीच्या जिंकण्यासाठी

भावना तुमच्या विसरत गेलो

वरती जायच्या नादात

नकळत त्या चुरडत गेलो

 

विषयाशी एकरूप होता होता

परिस्थितीशी फारकत घेत गेलो

काळाच्या पुढे धावता धावता

वेळेचे महत्व विसरत गेलो

 

दुखवायचा कधीच हेतू नव्हता

इर्श्येचा लवलेश नव्हता

मात्सर्याचा तर पिंडच नव्हता

बुध्दीचा मात्र गर्व होता

 

तरी मूर्खपणा करत गेलो

जिंकायच्या नादात हरत गेलो

बोलत असलो सत्य तरी

बनत फाटक्या-तोंडाचा गेलो

 

चूक माझी मला मान्य आहे

सजा द्याल ती मंजूर आहे

बंदुकी साठी या तुमच्या

चिलखत आज उतरवले आहे

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “एक पाऊस असा यावा…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “एक पाऊस असा यावा” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

एक पाऊस असा यावा

मनातला कचरा वाहून जावा

झुळझुळ वहावा प्रवाह नवा…

 

एक पाऊस असा यावा

अहंकार सारा धुऊन जावा

पुन्हा बालपणातील मी आठवावा..

 

एक पाऊस असा यावा

निघून जावी नात्यातील कटुता

प्रेमाचा अखंड झरा खळखळावा ….

 

एक पाऊस असा यावा

मोह मायेचा गंध ना उरावा

निर्मळ मनाचा सुगंध पसरावा….

 

एक पाऊस असा यावा

तुझं माझं लवलेश न रहावा

साऱ्या विश्वाला एकरूप करून जावा ….

 

एक पाऊस असा यावा

प्रत्येक मनी श्रावणधारा

आयुष्याला हिरवागार पेहरावा….

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घाम… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ घाम…  ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

सांगा कुठे कुणाच्या वचनात राम आहे ?

केलेत कर्म त्यांचे पदरात दाम आहे

 

वाचाळ वीर सारे झालेत ठार वेडे

जनतेस रूप त्यांचे दिसले  तमाम आहे

 

होते हिरे कुणाचे लुटले कुणी कळेना

पण एकटा कसा हा बनला निजाम आहे

 

दिसतो वरून साधू मन आतले भिकारी

भरला मनात त्याच्या ठासून काम आहे

 

आहेत गोप गोपी साधेच भोवताली

त्यांच्यात गुंतलेला वेडाच शाम आहे

 

समता अजून नाही या द्वारकेत आली

घेवून दैन्य माथी फिरतो सुदाम आहे

 

देवा तुम्हीच सांगा तप साधना कराया

देशात आज कोठे आनंद धाम आहे

 

राबून खूप मेलो पोटात घास नाही

गळतो उगाच येथे फुकटात घाम आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #200 ☆ ‘वंदन मित्रा…’ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 200 ?

☆ वंदन मित्रा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

तू नारायण तुझी स्मृतीतर चंदन मित्रा

गंगेहुनही तुझे भावते गुंजन मित्रा

 

वेडी बाभळ पायाखाली होती कायम

अन् पोटाला धावपळीने लंघन मित्रा

 

हात पसरले कधीच नाही दान घ्यायला

निर्धाराला तुझ्या करावे वंदन मित्रा

 

हसरा मुखडा घेउन फिरला तू जीवनभर

अन् मित्रांचे केले कायम रंजन मित्रा

 

दुःख वाटते सहवासाला मुकलो आम्ही

तू  तर होता मित्रांमधला कुंदन मित्रा

 

तू गेला पण कारण त्याचे कळले नाही

त्या घटनेचे कायम करतो चिंतन मित्रा

 

तुझी पालखी ज्या वाटेने गेली आहे

त्या मातीचे घेतो आहे चुंबन मित्रा

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares