मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “तक्रार…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “तक्रार…” ☆ श्री मंगेश मधुकर

सकाळी दहाच्या सुमारास पोलिस चौकीत आलो तेव्हा वाटलं की अर्ध्या तासात काम संपवून घरी जाता येईल पण कसलं काय!!बारा वाजले तरी चौकीतच होतो. तक्रारीचे स्वरूप समजल्यावर प्रत्येकानं साहेबांची भेट घ्यायला सांगितलं आणि ते कामासाठी बाहेर गेलेले. वाढतं ऊन आणि पोटातली भूक यामुळं चिडचिड वाढली तरीही चडफडत बसून राहिलो. काही वेळातच साहेब आले. तेव्हा अस्वस्थता कमी झाली. दहा मिनिटात बोलावणं आल्यावर केबिनमध्ये साहेबांसमोर उभा राहिलो.

“नमस्कार साहेब” 

“बोला. काका. डोक्याला बँडेज??, काय झालं??. ”

“त्यासाठीच आलोय पण माझी तक्रार नोंदवून घेतली जात नाहीये”

“का?”साहेबांनी हवालदारांकडे पाहत विचारलं पण हवालदार काहीच बोलले नाहीत.

“मी सांगतो”

“हं बोला”साहेब.

“कपाळावरची ही पट्टी दिसतेय ना. सकाळीच तीन टाके पडलेत. ”

“अक्सीडेंट, टु व्हीलर की कार”

“फ्लेक्स”

“म्हणजे”साहेबांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि उत्सुकता.

मी पुढे काही बोलणार इतक्यात हवालदार म्हणाले “मोठ्या लोकांविरुद्ध तक्रार करायची म्हणतात म्हणूनच लिहून घेतली नाही. ”

“हे खरंय”माझ्याकडं पाहत साहेबांनी विचारलं.

“शंभर टक्के!!या भागातील माननीय, मान्यवर आणि त्यांचे चार कार्यकर्ते यांच्यामुळे ही दुखापत झाली. असा माझा आरोप आहे. ”

“नक्की काय घडलं ते जरा नीट सांगा?”साहेबांचं बोलणं संपायच्या आत मी मोबाइल पुढे केला. फोटो पाहून साहेब जरासे वैतागले. “आता हे काय?”

“पुरावा”

“फ्लेक्सच्या फोटोत कसला पुरावा?”

“साहेब, यातच सगळं काही आहे. वेगवेगळ्या बाजूने फोटो काढलेत त्यावरूनच तक्रार करतोय.” 

“काय बोलताय ते तुमचं तुम्हांला तरी समजतेय का?”साहेब.

“हा फ्लेक्स बेकायदेशीररित्या लावलाय. रस्ता ओलंडताना डिवायडरमध्ये जी दहाएक फुटाची जागा असते तिथे लावलेल्या फ्लेक्सची किनार मला लागली. तीन टाके घालावे लागले. ”

“म्हणून थेट पोलिसात तक्रार!!”

“का करू नये. थोडक्यात निभावलं पण जर काही गंभीर दुखापत झाली असती. डोळा फुटला असता तर.. ”

“काही झालं नाही ना. ”

“मग काही गंभीर व्हायची वाट पहायची का?”

“तक्रार करून काय मिळणार आणि ज्या लोकांची नावं घेत आहेत. त्यांना काही फरक पडणार नाही. ”

“असं कसं. फ्लेक्स माननियांना शुभेच्छा देण्यासाठी लावलाय कार्यकर्त्यांची नावं आणि फोटो आहेत. फ्लेक्स चुकीच्या ठिकाणी आणि धोकादायक स्थितीत लावलाय. त्याचा पुरावा म्हणून शूटिंग सुद्धा केलंय. ”

“फार काही हाती लागणार नाही परंतु मनस्ताप मात्र वाढेल. ”

“तक्रार करायला आलो तेव्हाच मनाची तयारी केलीय.

“जरा शांत डोक्यानं विचार करा” 

“साहेब, आम्ही सामान्य माणसं सार्वजनिक ठिकाणी जीव मुठीत घेऊन फिरतो. त्यातही पायी चालणाऱ्यांचे फार हाल. एकतर लोक बेफाम गाड्या चालवतात आणि त्यात भर म्हणजे जागोजागी लावलेले फ्लेक्स. आमचा विचारच कोणी करत नाही उलट ‘घरात बसा कशाला बाहेर पडता’ असं उद्धटपणे बोलतात. ”

“तुमचा त्रास समजू शकतो. याविषयी नक्की मार्ग काढू. नको त्या भानगडीत पडू नका. त्रास होईल. ” 

“निदान तुम्ही तरी असं नका बोलू. आम्हांला फक्त कायद्याचा आधार म्हणजे पर्यायाने तुमचाच आधार. वाट्टेल तिथं फ्लेक्स लावतात. इच्छा असूनही विरोध करता येत नाही अन भांडूही शकत नाही. त्रास सगळ्यांना होतो. सहन होत नाही अन सांगता येत नाही अशी अवस्था. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात राहतो. आज वाचलो तेव्हा ठरवलं की या त्रासाविरुद्ध तक्रार करायची. ”

“त्यानं काय साध्य होईल. ”

“माननियांचे नाव असल्यानं तक्रारीची निश्चितपणे दखल घेतली जाईल आणि बाकी सोशल मीडिया आहेच आणि न्यूज चॅनल तर ब्रेकिंग न्यूजसाठी तडफडत असतातच” माझ्या बोलण्यानं साहेब विचारात पडले.

“थोडा वेळ बाहेर बसता का?काहीतरी मार्ग काढतो. ”

बाहेर बाकावर जाऊन बसलो. डोकावून पाहीलं तर आत फोनाफोनी सुरू होती. काही वेळानं आत बोलावलं. बसायला सांगून साहेबांनी चहाची ऑर्डर दिली.

“एक उत्तम उपाय सापडलाय. त्यामुळे तक्रारीची गरज भासणार नाही. ”

“काय?”मी 

“आपल्या भागातील सगळे बेकायदेशीर फ्लेक्स उतरवण्याचं काम सुरू झालंय. ”

“अरे वा!!अचानक हा चमत्कार??”

“चमत्कार वैगरे काही नाही. तुमच्या तक्रारीविषयी माननीयांशी बोललो. तुमचं म्हणणं त्यांना शंभर टक्के पटलं आणि या कामी घेतलेल्या पुढाकाराबद्दल माननियांनी तुमचं खास कौतुकसुद्धा केलं. ताबडतोब कार्यकर्त्यांना फ्लेक्स काढायच्या कामाला लावलयं. आता ठीक आहे. ”

“खूप खूप धन्यवाद साहेब!!, फार मोठी मदत झाली. अजून काय पाहिजे. इतरांप्रमाणे मीसुद्धा निमूटपणे सहन करत होतो पण आज थोडक्यात बचावलो तेव्हाच ठरवलं की याविषयी काहीतरी करायला पाहिजे. जखमेचे फोटो काढले. डोक्याला बँडेज बांधलेल्या अवस्थेत घटनाक्रम शूट करून इथे आलो. ”

“आता पुढं काहीही करू नका”साहेब.

“जे हवं होतं ते तुम्ही झटपट केलंत त्यामुळे आता बाकी काही करण्याची गरज नाही. खूप खूप धन्यवाद!!आणि माझी एक विनंती माननीयांपर्यंत पोहचवा. पुन्हा बेकायदेशीर फ्लेक्स लावले जाऊ नयेत एवढीच अपेक्षा आहे. त्यांनी मनात आणलं तर हे सहज शक्य आहे. पुन्हा एकदा मनापासून आभार!!” साहेबांचा निरोप घेऊन चौकीच्या बाहेर पडलो. घरी येताना चौकातले फ्लेक्स उतरवण्याचे काम सुरू होतं ते पाहून नकळत चेहऱ्यावर हसू उमललं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फक्त अंतर एका हाताचं… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? जीवनरंग ?

☆ फक्त अंतर एका हाताचं…  ☆ सौ. वृंदा गंभीर

आई वडील मुलांना जन्म घालतात, त्यांना परिस्थिती नुसार अति कष्टाने वाढवतात पायावर उभं करतात. फक्त एकचं स्वप्न असतं जे “आम्ही भोगलं ते मुलांना नको. ”

“असचं गावात एक कुटुंब होतं. खूप गरीब कष्टाळू पदरी चार मुलं, स्वप्न मोठं बघितलं आणि कामाला लागले. जे काम मिळालं ते करत गेले. कशाची लाज धरली नाही. मुलांना शाळेत घातलं, “गावात दहावी पर्यंत शाळा होती. नंतर बाहेर टाकायचं ठरलं, ” मुलं हुशार होती दोन दोन वर्षाचं अंतर होतं. मोठ्या मुलाला ठेवलं बाहेर शिकायला, खूप काटकसर करावी लागत होती. तो बारावी झाला दुसरा दहावी झाला. आता खर्च वाढला होता, पाऊस कमी जास्त झाल्यामुळे गावात कामं मिळत नव्हती. मग त्यांनी गावं सोडायचं ठरवलं राधा ताईंच्या, हाताला चव होती. मुलांच्या मदतीने ओळखीने डबे मिळवले. बघता बघता खूप डबे वाढले. परिस्थिती सुधारली, आता मुलं सगळेच कॉलेज ला जात होते. मोठ्या मुलाने “हॉटेल मॅनेजमेंट चा कोर्स” केला, त्याला छान नोकरी मिळाली. दुसरा M. B. A झाला, तिसरा “सॉफ्टवेअर इंजिनियर झाला “व चौथा “वकील झाला” दिवस सरले होते. आनंदाचे वारे वाहू लागले होते. मुलांना आई वडिलांचा अभिमान होता. खूप सुख द्यायचं असं म्हणायचे मुलं पण पुढचं कुणी बघितलं होतं.

“मोठ्या मुलाचं लग्न झालं, सुरवातीचे दिवस छान गेले, नंतर मुलात बदल जाणवायला लागला. त्याचं बोलणं कमी झालं दुसरे मुलं म्हणायचे दादा असं का वागतो, तो पहिल्यासारखा बोलत का नाही. खूप प्रश्न पडायचे मुलांना पण, आई वडील कळून न कळल्यासारखं त्यांना समजून सांगायचे. अरे त्याला कामं वाढली असतील लग्न झालं, जबाबदारी वाढली म्हणून, कदाचित नसेल बोलत. होईल पुन्हा पाहिल्यासारखं, मुलं शांत बसायची.

“दुसऱ्या मुलाचं लग्न त्याच्या ऑफिस मधल्या मुलीशी झालं. तिने पण M. B. A. केलं होतं. दोघांना पगार छान होता. आता गाडी बंगला सर्व काही झालं होतं. त्यांचा संसार सुरळीत सुरु होता. बरोबर जाणं येणं छान चालू होतं. पण मोठ्याचं बघून यांचं वागणं बदलायला वेळ लागला नाही. “आई वडिलांना वाईट वाटतं होतं. पण अजून दोन मुलांची लग्न बाकी होती. म्हणून सगळं सहन करत होते.

“तिसऱ्या व चौथ्या मुलाचं एकत्र लग्न झालं. दोघी बहिणी होत्या, एक इंजिनियर तर दुसरी डॉक्टर होती. जोड्या सुंदर होत्या, घर गोकुळा, सारखं भरलं होतं. आई वडील समाधानी होते.

या दोघी अपवाद होत्या, त्यांना कुटुंब आवडत होतं. म्हणून त्या प्रेमाने वागत होत्या. असेच दिवस जात होते. सगळ्यांना मुलं झाली कुटुंब वाढलं होतं. हळू हळू मुलं बाहेर पडली. स्वतःचा संसार सुरु केला, छोटा वकील आणि त्याची बायको डॉक्टर असलेली घरीच राहिले. वकिलाने परीक्षा दिली तो आता जज झाला होता.

“रोज नवनवीन केस समोर येत होत्या, तो योग्य न्याय देऊन केस सोडवत होता. एक दिवस त्याच्या समोर अशी केस आली की तो इतका गुंतून गेला, की न्याय कसा आणि काय द्यायचा आपण चं आईवडिलांवर अन्याय केला आहे. आपण दुसऱ्या आई वडिलांना काय न्याय देणारं आहोत.

“तर ती केस अशी होती, एका म्हाताऱ्या आईवडिलांनी हक्कासाठी मुलांवर केस केली होती. ते आजोबा आम्ही कुठल्या परिस्थितीत मुलांना शिकवलं वाढवलं, आमच्या जवळच सगळं देऊन, आम्ही विश्वासाने सगळं दिलं आता हे मुलं बाहेर पडली आम्ही काय करायच कोण सांभाळेल. आम्हाला आमच्य्याकडे कोण लक्ष देईल काय असेल आमचं उर्वरित आयुष्य, ते पोट तिडकीने बोलतं होते. कोर्टात शांतता पसरली होती. जज ही शांत होते. त्यांनी पुढची तारीख देऊन टाकली घरी आले मन उदास होतं.

“काय न्याय द्यायचा माझ्या भावांनी पण अन्याय केला. तेही बाहेर पडले. आज डोकं सुन्न झालं माझं, तत्याला कळत नव्हतं, तेवढ्यात तिथे आई आली चेहरा बघून म्हणाली काय झालं बाळा, आज उदास दिसत. आहे तेंव्हा तो आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागला. म्हणाला, “आई आजची केस बघून मी हैराण झालो. वाईट वाटतं ग, आई तुम्हीही किती कष्टातून शिकवलं मोठं केलं आज तुम्हाला सुख देण्याऐवजी, आम्ही दुःख चं देत आहोत. “आम्ही आहे तुमच्या जवळ राहतो. आपण आनंदात पण तुमचं मन त्या तिघांसाठी व्याकुळ होतं. ते येत ग लक्षात पण काय करणार, , , समाजाने अजब परंपरा निर्माण केली. असं वाटतं, नसतं तुम्ही शिकवलं गावातच राहिलो असतो…… तिथेच कामधंदा केला असतातर, आज एकत्र असतो. का आपण मी काय करू काय न्याय देऊ आई सांग ना.

“आई म्हणाली ” बाळा फक्त एक हाताचं अंतर असतं रे “

मी म्हणालो मला समजले नाही, तेंव्हा आई बोलायला लागली, अरे तुम्ही पण आई वडील झाले. आता मुलांना वाढवण्यासाठी काय कष्ट करावे लागतात. तुम्हाला आम्ही हातभार लावला. आम्हाला कुणाचाच हातभार नव्हता. लोकांच्या शेतात मिळेल ते काम केलं. तुम्हाला शिकवलं आता, फक्त तुम्हाला आरामात वाढवायचंय आम्ही कसं केलं असेल याचा विचार केला. की जाणीव होईल तुम्हाला, मी म्हणालो, “आई मला आहे, जाणीव प्रीतीला पण आहे. म्हणू, न मी तुमच्या जवळ आहे ग, आई म्हणाली होय आहे. “मला मान्य आहे, पण सगळेच सगळ्यांचे मुलं असे जाणीव ठेवतात, असं नाही ना. मी आहे नशीबवान तसें अनेक असतील, असं नाही. ना उद्या तुम्हीही असेच एकटे पडले तर, , , , , , ,

म्हणून म्हणते “फक्त एका हाताचं अंतर असतं. “

“अरे ज्या पलंगावर तुमचा, जन्म झाला, , जिथे तुम्ही लहानचे मोठे झाले. आईच्या कुशीत मायेने झोपले. आईच्या उबीत वाढले. तिचं आई नकोशी होते. कधी तर त्या पलंगावर बायको येते. त्या वेळी आई खाली असते. पलंगाची उंची असते फक्त एका हाताची, मग आई का नकोशी होते. ज्या आईने त्याच पलंगावर वाढवलं असतं, निजवलेलं असतं, किती प्रेम माया लावलेली असते. ती पण एक स्त्रीच असते, मग एवढा बदल का होतो. एकीने घडवलेलं असतं, एक साथ देणारं असते, ती पण आयत्या पिठावर रेघोट्या मरणार असते. आईचं मन कधीच विचलित होत नाही. मुलगा आला नाही तर, काळजी जेवण केलं नाही. काळजी ती स्वतःला उठून जेवायला वाढायला तयार असते. पण बायको मनासारखं झालं नाही, तर तण तण करते. रुसून बसते, भांडणं होतात, माहेरी निघून जाते. शेवटी आई सांगते, “बाबा रे तुझं सुख तू बघ नसेल तिला आवडत आमच्या बरोबर… रहायला तर बाहेर पड. आनंदात संसार करा. मग मुलगा तिचे ऐकून बाहेर पडतो. आई वडील विसरतो, नाती महत्वाची नसतात का?

आईच्या जागी आई असते. बायकोच्या जागी बायको असते. मग तिचं ऐकून आई वडिलांना त्रास देणं, किंवा घरा बाहेर काढणं, चांगलं आहे का? का मुलगा म्हणून आई वडिलांना समजून घेत नाही. तुम्हीही पळता ना मुलांसाठी, तेंव्हा माझे आई वडील असच माझ्यासाठी पाळले, मला मोठं केलं, हे का नाही मनात येत? का नाही बायकोला सांगू शकत, माझ्या “आई वडिलांनी खूप कष्ट केले. त्यांना आता सुखी ठेचायचे आहे. त्यांना फिरायला पाठवायचेआहे, चारिधाम यात्रेला पाठवायचे आहे, आता हे सगळं तुला सांभाळावं लागेल… पण नाही. हल्लीची मुलं बदलतात. “आज तुम्ही बदलले उद्या तुमची मुलं बदलतील. म्हणून बाळा “हाताचं काय वितेच सुद्धा अंतर पडू देऊ नका माया, ममता प्रेम फक्त आई कडे, मिळतं बाजारात सगळं मिळेल आई वडील नाही मिळणार…

“मुलींच्या आई वडिलांनी पण कष्ट घेऊन मुली शिकविलेल्याअसतात. त्यांनाही त्रास झालेला असतो. पण आता त्या गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो. आम्हाला जे संस्कार करून शिकवून सासरी पाठवलं होतं, ते मुलीला शिकवलं जात नाही. रोज फोन करून घरातलं विचारायचं, मग तिला “शिकवायचं संसारात आईची लुडबुड चांगली नाही. उद्या तिलापण वाहिनी येणार असते. त्या जे वागणार तसेच फळ मिळणार असतं, पण कोण शिकवणार त्यांना… म्हणून मुलांनी जाणीव ठेवावी. ” आई वडिलांचा आधार असतो, मुलगा मुलं जर कडक राहिली, तर वृद्धाश्रमात आई वडील जाणार नाहीत.

“मुलाने फार विचार केला व बायकोला घेऊन भावांकडे गेला. तिथे सर्व समजून सांगितलं. भावांना एकत्र राहण्यासाठी तयार केलं. त्यांनाही पटलं होतं, दुनियेचा त्रास बघितला होता, खस्ता खाल्ल्या होत्या, तेही घरी आले.

मग जज ने निकाल दिला, मुलांनी आई वडिलांना आदराने वागवायचं. नाही, तर वारस हक्क रद्द होऊन, नुकसान भरपाई व मुलांना वाढवतांना, झालेला आजतागायत खर्च, व्याजासहित परत करायचा. निर्णय ऐकून सगळे चकित झाले. मुलांनी आजोबा आज्जीची माफी मागून घरी नेलं, व आनंदात राहू लागले.

“तात्पर्य काय तर प्रश्न मुलानेच सोडवला मग असा प्रश्न आधीच का निर्माण करायचा म्हणून अंतर नको प्रेम हवं…”

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “म्हैस…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “म्हैस…” ☆ श्री सुधीर करंदीकर

मी राहतो पुण्याला कर्वेनगर या भागात. आम्ही रोजच दुपारी बावधन या भागात मुलीकडे जातो. नातवंडं दुपारी शाळेतून घरी येतात. त्यावेळेला आम्ही घरी असल्यामुळे त्यांचे दुपारचे खाणे – पिणे, अभ्यास, क्लास ला सोडणे / आणणे वगैरे, याची काळजी रहात नाही. संध्याकाळी मुलगी किंवा जावई ऑफिस मधून घरी आले, की, थोड्या गप्पा मारून, आम्ही साधारण ६ – ६. ३० ला तिथून निघून कर्वे नगरला, आमच्या घरी येतो. आमचे जाणे येणे स्कुटरनी असते. कधी कधी बायको बावधनहून स्कुटर घेऊन आधी निघून जाते, अशावेळेस, मी घरापर्यंत कधी पायी जातो, कधी अर्धे अंतर बसनी व पुढचे पायी जातो.

एक दिवस बायको स्कूटर घेऊन लवकर घरी गेली म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मला बसनी घराकडे जायचं होतं.

मुलीकडून ६. ३० ला निघालो. साधारण ५ – ७ मिनिटे चालत गेलो, की मेन रोड लागतो. रस्ता ओलांडला, की, समोरच बसचा थांबा आहे. ट्रॅफिकच्या पीक- आवर्स मध्ये पुण्यात कुठलाही रस्ता ओलांडणे हे एक दिव्यच असते. मी जाऊन रस्त्याच्या अलीकडे उभा राहिलो व ट्रॅफिक मध्ये गॅप पडण्याची वाट बघत थांबलो. त्या दिवशी ट्रॅफिक जरा जास्तच होता. या रोडची खासियत अशी आहे, की, पुणे विद्यापीठ ते व्हाया पाषाण रोड – व्हाया चांदणी चौक – पौड डेपोपर्यंत, म्हणजे साधारण ५ – ६ किमी अंतरामध्ये कुठेही सिग्नल नाही. त्यामुळे सगळ्याच गाड्या, म्हणजे कार/ स्कुटर/ मोटर सायकल/ बसेस आणि ऑटो, रस्त्याच्या दोन्हीकडून सुसाट स्पीडनी धावत असतात. बहुदा, ४-५ मिनिटे गेली, की, छोटीशी गॅप मिळते व त्यामध्ये जीव मुठीत धरून रस्ता क्रॉस करता येतो. आज काय प्रकार होता माहित नाही, मधे गॅपच येत नव्हती. बाजूला बघितलं, तर काही तरुण मंडळी गॅप नसतांना पण, धावून रस्ता क्रॉस करत होती. तेवढ्यात एक अंध व्यक्ती समोरून आरामात रस्ता ओलांडून आली. अज्ञानात सुख असतं, असं म्हणतात, ते असं!

मी बऱ्याच वेळेला ४ – ५ पावले पुढे जायचो आणि वेड्यावाकड्या येणाऱ्या गाड्यांना घाबरून परत मागे यायचो. पण पुढे जायची हिम्मत होत नव्हती. वाट बघता बघता १० मिनिटे झाली, पण ‘नो चान्स’. अशा वेळेस वाटतं, की, काहीतरी घडून ट्रॅफिक जॅम व्हावा, त्यामुळे आपोआपच क्रॉस करणाऱ्यांची सोय होते. पण तसही आज काही घडत नव्हतं. १५ मिनिटे झाली, तरी मी होतो त्याच ठिकाणी होतो.

तेवढ्यात माझी नजर मागे गेली. मागे एक तगडी म्हैस उभी होती व तिच्या गळ्यातली दोरी धरून मुलगा उभा होता. म्हशीकडे बघताच मी मनातल्या मनात ‘युरेका’, ‘युरेका’ (म्हणजे ‘सापडले’, ‘सापडले’) असे ओरडलो. मी लगेच त्या मुलाकडे गेलो.

मी : दादा, म्हैस घेऊन पलीकडे चलणार का?

मुलगा : कशाकरता? काय करायचं आहे?

मी : करायचं काहीच नाही. फक्त पलीकडे माझ्याबरोबर चलायचं आणि लगेच परत यायचं. ५ रुपये देईन.

(मुलाला काहीच अर्थबोध झाला नसावा. पण ५ रु मिळणार आणि करायचं काहीच नाही, हे त्याला समजलं 

मुलगा : काका, चला 

मुलगा म्हैस घेऊन निघाला. मी म्हशीची ढाल करून, तिच्या उजव्या बाजूनी रस्ता क्रॉस करायला सुरुवात केली. इतका धुव्वाधार ट्रॅफिक असूनही मी मजेत रस्ता ओलांडत होतो. काही वाहन चालकांनी म्हशीकरता कर्कश्य हॉर्न वाजवले, काहींनी म्हशीला मनात शिव्या दिल्या असतील. आम्ही थाटात पलीकडे पोहोचलो. मी मुलाला ५ रु दिले आणि आभार मानले. पलीकडे ४ वयस्कर रस्ता क्रॉस करायला उभेच होते. मला इतक्या आरामात रस्ता ओलांडतांना बघून, सगळेच मुलाला म्हणाले – अरे आम्हाला पण पलीकडे सोड. आम्ही २ – २ रु देऊ. लगेच मुलानी म्हैस मागे वळवली आणि सगळे म्हशीच्या आडोश्यानी पलीकडे निघाले. मला हे बघतांना मजा वाटली. मी जवळच्या बस थांब्यावर जाऊन बस ची वाट बघत बसलो.

रस्त्यावरचा ट्रॅफिक मगाशी होता, तसाच टॉप गिअर मधे होता. सहजंच माझं लक्ष पलीकडून येणाऱ्या म्हशीकडे गेलं. २ वयस्कर म्हशीच्या आडोशाने रस्ता क्रॉस करत होते. म्हशीच्या फेऱ्या सुरु झालेल्या बघून मला मजा वाटली आणि लक्षात आलं, की, म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करणं, या सारखा सुरक्षित पर्याय नक्कीच नाही. तेवढ्यात त्या मुलाचं लक्ष माझ्याकडे गेलं व त्यानी आनंदानी हात हलवला. बहुदा मनामध्ये मला थँक्स म्हटले असेल. मी पण हात हलवून त्याच्याशी संवाद साधला. तेवढ्यात माझी बस आली आणि मी आत चढलो.

नंतर साधारण महिनाभर माझी जा- ये स्कुटरनीच सुरु होती. स्कुटर असली, की, माझा जाण्यायेण्याचा रस्ता थोडा बदलतो.

आज बायको स्कुटर घेऊन बावधनहून लवकर घरी गेली, त्यामुळे मला बसनी जायचे होते. मुलीकडून निघालो आणि चालत मेनरोडला पोहोचलो. साडेसात ची वेळ असल्यामुळे रस्त्याच्या दोन्हीबाजूनी सुसाट गाड्या धावत होत्या, सगळीकडून हेडलाईट डोळ्यावर येत होते, कर्कश्य हॉर्न वाजत होते. काही टू व्हीलरवाले उलटीकडून येत होते. काही फुटपाथवरून येत होते. थोडक्यात म्हणजे, पुण्यातल्या कुठल्याही हमरस्त्याचं चित्र समोर होतं. चित्रातला एक रंग मिसिंग आहे, हे पटकन लक्षात आलं. जीव मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करतांना कुणीच दिसत नव्हते. मी मनात म्हटलं, हे गेले कुठे? तेवढ्यात माझं लक्ष थोडं पलीकडे उभ्या असलेल्या म्हशीकडे गेलं आणि म्हशीबरोबरच्या मुलाचं माझ्याकडे गेलं. मला बघताच मुलांनी हात उंचावला आणि ओरडला, ‘काका, चला पलीकडे सोडतो. फ्री मध्ये, पैसे द्यायचे नाही’.

माझ्या डोक्यात महिन्यापूर्वीच्या घटनेची ट्यूब पेटली, आपण याला म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करण्याचे ५ रु दिले होते.

मुलगा मला थांबा म्हणाला आणि धावत जवळच्या फुलवाल्याकडून एक फुलांचा सुंदर गुच्छ घेऊन आला. मला गुच्छ देऊन त्यानी खाली वाकून मला नमस्कार केला व म्हणाला, काका चला.

आम्ही म्हशीच्या आडोशाने रस्त्यावर उतरलो आणि चालायला लागलो. महिन्यापूर्वी गेलो होतो, तेव्हा म्हैस थोडी बिचकत होती. आज ती एकदमच कंफर्टेबल वाटत होती. आपल्याकडे सिग्नल तोडणारे, उलटे येणारे, फुटपाथवर गाड्या घालणारे जेवढे कंफर्टेबल असतात तेवढीच.

चालता चालता —

मी : अरे म्हशीला घेऊन इकडे काय करत होतास? आणि मला हा गुच्छ कशाकरता?

मुलगा : काका, गेल्या वेळेला आपण भेटलो होतो, त्या दिवसापासून मी रोजच इथे असतो. आणि रोजचं तुमची वाट बघत होतो.

मी : कशाकरता?

मुलगा : तुम्हीच मला हा मार्ग दाखवला. संध्याकाळी रोज म्हशीला घेऊन इथे येतो आणि रस्ता क्रॉस करणाऱ्यांची मदत करतो, मला पण छान पैसे मिळतात. गेल्या १० दिवसांपासून ह्याच रोडवर आता ८ म्हशी सोडल्या आहेत. घरचे सगळेच म्हशींबरोबर इथे निरनिराळ्या चौकात येतात, व २- ३ तास थांबतात. रोजचे म्हशीमागे ८० – १०० रु मिळतात. ह्या वेळेला म्हशींना काहीच काम नसते. त्यांची खाण्यानंतरची शतपावली होते. रात्री त्यांना झोप पण छान लागत असेल. त्यामुळे दूध पण वाढले आहे.

मी : ट्रॅफिक कमी असेल तर ट्रिपा मिळत नसतील!

मुलगा : काका, क्रॉस करणारी पब्लिक कायमच असते. आणि ट्रॅफिक कमी असतांना गाड्यांवाले जास्तच स्पीडनी आणि वेड्यावाकड्या गाड्या मारतात. त्यामुळे माझ्या ट्रिपांना मरण नाही. अगदीच दुपारी किंवा रात्री ९ नंतर मीच येत नाही.

मी : वा, क्या बात है!

तेवढ्यात आम्ही पलीकडे पोहोचलो. तिथे ५- ६ वयस्कर स्त्री – पुरुष उभे होतेच. मुलानी लगेच त्यांना माझी ओळख करून दिली – ह्या काकांनीच मला ही म्हशीची कल्पना दिली. वगैरे.

मी मनातून आनंदलो व देवाचे आभार मानले.

सगळ्यांनीच मला थँक्स दिले. त्यातल्या तिघा जणांनी मला बाजूला घेतले व मुलाला सांगितले, ‘आम्ही पुढच्या ट्रिप ला येतो. तू जा पुढे’.

एक जण (मला) : तुम्ही आमचा व आमच्या घरच्यांचा फार मोठा प्रॉब्लेम सोडवला आहे. आता घरून बाहेर पडतांना बायको बजावते, ‘म्हैस असेल तरच रस्ता क्रॉस करा. २ -५ रु जाऊ देत’.

दुसरी व्यक्ती : पूर्वी रोज रस्ता ओलांडताना समोर म्हशीवर बसलेले यमराज दिसायचे. आता त्यांची म्हैसच बरोबर असते, त्यामुळे एकदम ‘बी – न – धा – स’.

तिसरी व्यक्ती : आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढच्या मीटिंगला आम्ही तुम्हाला बोलावू. आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. तुम्हाला नक्की यायचे आहे. तुमची म्हशींची कल्पना म्हणजे – तोड नाही. फोन नंबर ची देवाण घेवाण झाली.

त्यांना बाय करून मी बस स्टॉप वर पोहोचलो. तिथे बसायला नवीनच बाक केले आहेत. बाकावर बसलो आणि कल्पनेच्या दुनियेत पोहोचलो ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳

पुढच्या काही दिवसांनंतरची वर्तमानपत्रे मला दिसायला लागली ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳ ⤳

# ‘सिनियर सिटिझन्सच्या मदतीला म्हशी सरसावल्या’

पुण्यातल्या रस्त्यांवर चालणे ‘मौत का कुंवा’ मधे गाडी चालवण्याइतके धोकादायक होते. तुम्हाला कोण आणि केंव्हा उडवेल, ही चालणाऱ्यांच्या मनात सतत धास्ती असायची. म्हशीचा आडोसा घेऊन चालतांना लोकांची ही धास्ती आता संपली आहे. खाली निरनिराळ्या चौकातले वयस्कर मंडळींना घेऊन रस्ता क्रॉस करणाऱ्या म्हशींचे फोटो होते.

# ‘रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकर्स ना रामराम’

बहुतेक रस्त्यांवरचे स्पीड ब्रेकर्स हद्दपार झाले आहेत. रस्त्यांवर ठराविक अंतरांवर म्हशींची जा – ये सुरु असल्यामुळे वाहनांच्या वेगावर आपोआपच वचक बसला आहे. ‘वाहने सावकाश चालवा, पुढे स्पीड ब्रेकर आहे’ ह्या पाट्या जाऊन, ‘म्हशी पुढे आहेत’ अशा पाट्या आल्या आहेत.

# ‘आर्थोपेडीक क्लिनिक मधली गर्दी ओसरली’

रस्त्यांवरचे स्पीड ब्रेकर्स काढल्यामुळे वाहन चालकांचे पाठीचे व कंबरेचे दुखणे यात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे.

# ‘शाळा चालकांची म्हशीला पसंती’

शाळा सुटल्यानंतर लहान मुले रस्ता ओलांडताना वाहनांची नेहेमीच दशहत असायची. शाळेनी शाळा सुटतांना शाळेसमोर २ म्हशी तैनात कराव्या, अशी पालकांनी शाळा चालकांकडे मागणी केली आहे. बहुतेक शाळा चालकांनी याला मंजुरी दिली आहे.

# ‘म्हशींना सर्वच शहरांमध्ये डिमांड’

सर्वच मोठ्या शहरांमध्ये पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेकरता म्हशींची मदत घेणार. पाहणी पथके पुण्यात दाखल.

# वर्षातली सगळ्यात इनोव्हेटिव्ह कल्पना म्हणून लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!

मीडिया संशोधकाच्या शोधात! ! !

काहीतरी गोड आवाजामुळे माझी तंद्री मोडली. शेजारी बसलेली मुलगी सांगत होती, बस येतेय, चला. लांब बस दिसत होती. मी उठून पुढे आलो. बाजूला म्हशीच्या ट्रिप सुरु होत्याच. तेवढ्यात बस आली. मी म्हशीकडे बघून तिला बाय केलं आणि बसमध्ये चढलो.

लेखक : सुधीर करंदीकर 

मोबा 9225631100

इमेल < srkarandikar@gmail. com >

 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “शिकार…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? जीवनरंग ?

“शिकार…☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“आई मी आता खूप खूप थकलोय गं! होत नाही हल्ली पूर्वीसारखी शिकार करणं!

तारुण्यातली रग, उमेद गळून पडली या म्हातारपणात… का कुणास ठाऊक सतत तुझी मला अलीकडे फार आठवण येत होती…

आणि आजही ती आठवण मला येते, तेव्हा डोळे भरून येतात आई. त्यावेळी किती लळा

लावलास तू आई मला! मी लहान बछडा असल्यापासून सांभाळलंस.

मला माझे गणगोत कुणी असतील असं आठवतंही नव्हतं…

नाही म्हणायला तूच कधीतरी मला ते सांगत असायचीस. काळाचा घाला यावा तसा त्या नराधम शिकाऱ्यांनी आमच्या कुटुंबावर बंदुकीच्या फैरीवर फैरी झाडल्या..

आमच्या कुटुंबातले सगळे बळी पडले. तेव्हा मी एकटाच मृत आईच्या कुशीत पहुडलेलो..

त्या शिकाऱ्यांनी मला पाहिलं आणि उचलून घेत गुहेतून बाहेर आले..

तसा मी टणकन खाली उडी घेतली. माझ्या आयुष्यातील ती पहिली उडी..

मी पळत पळत निघालो. शिकारी माझ्या मागे मागे येत होते…

आणि तितक्यात आई तू कुठून तरी अवतरलीस, मला तू अलगदपणे तोंडात धरून जंगलात नाहीशी झालीस..

शिकार्‍यांना बंदुकीचा चाप ओढताच आला नाही..

आणि तु माझा जीव वाचवलास.. तिथून पुढे मी तुमच्या बरोबरच राहू लागलो..

मला तू घेऊन आलेली तुझ्या दादल्याला आवडलं नाही हे त्याचं वेळी मला जाणवलं.

त्यानं तुला म्हटलं देखील,

‘हि पीडा इथं कशाला आणलीस आणि कळून सवरून आपलाच मृत्यू लवकरच का ओढवून घेतेस? कधी असं झालयं का आजवर वाघाच्या जातीनं आपली शिकार केलेली नाही. तो एक ना एक दिवस आपली शिकार नक्की करणारं’

 तेव्हा तू तुझ्या दादल्याला म्हणाली होतीस,

 ‘लहान अनाथ बछडं पाहून माझं आईचं हृदय द्रवलं. मी त्याला सांभाळेन आणि कळता सवरता झाला कि त्याला त्याच्या बिरादारीत सोडेन. त्यानं शिकार करणं हा त्यांचा जीवन धर्म आहे, त्याचा तो पाळेल आणि मी एक आई आहे, तो माझा धर्म मी पाळेन’..

 पण तुझ्या दादल्याला ते तितकसं रूचलं नाही तुझ्यापुढे त्याचं काही चाललं नाही..

 पहिले काही दिवस तुझ्या अपरोक्ष मला त्रास देऊन हाकलू पाहात होता पण तू मात्र मला सतत जपत असायची.

तुमच्या कळपातील इतरजण दादल्याच्या सांगण्यावरून मला कितीतरी वेळा त्रास देऊ लागले.. पण मी तिकडं तुझ्याकडे पाहून दुर्लक्ष केले..

हळूहळू मी वयात येऊ लागलो आता मला माझी बिरादारी हवी हवीशी वाटू लागली तसचं तुझ्या कळपातले देखील माझ्यापासून दोन हात लांब राहू लागले..

आणि एक दिवस तूच मला आमच्या बिरादारीच्या वेशीवर सोडून गेलीस.

त्यावेळी तुझे ते पाणावलेले डोळे मी पाहिले..

अगदी संथ गतीने तू निघालीस सारखी सारखी मान वेळावून तू माझ्या कडे पाहात होतीस..

मला गलबलून आलं होतं. डोळेही पाणावले होते गं माझे तेव्हा.. कदाचित नैसर्गिक ती गोष्ट असावी माय लेकरात ताटातूट होते असते तेव्हा अशीच घडणारी.

अशी जगावेगळी, न भुतो न भविष्यती अशी आपली माय लेकराची जोडी जमली होती..

तू मला तिथे सोडून गेलीस खरी, पण माझ्या बिरादारीतल्या लोकांनी मला जवळ केलं नाही..

 ते मला डरकाळया फोडत म्हणाले,

‘आपल्या बिरादारीत शेळपटांना थारा नाही.

तुला आम्ही बहिष्कृत केले आहे.. तुझा तुला स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे.

स्वतःची शिकार, गुहा तुझं असेल. आमच्यापैकी कुणीच तुझ्या मदतीला सोबतीला असणार नाही. तू त्या हरणांच्या कळपात लहानाचा मोठा होत गेल्याने डरपोक झाला आहेस. ’

अशी बरीच निर्भत्सना त्यांनी माझी केली आणि तिथून त्यांनी मला बाहेर हाकलं..

आई! आता परत तुझ्याकडे येणं सुज्ञपणाचं नव्हते.

मग मी एकट्याने राहण्याचा निर्णय घेतला.

गुहेचा प्रश्न सोडवला आणि भुक भागविण्यासाठी सगळं जंगल पालथं घालावे म्हणून भटकू लागलो. पण पदोपदी माझ्या बिरादारीतल्या लोकांनी धमकावलं.

 ‘हे जंगल आमच्यासाठी आहे. इथं तुला शिकार करता येणार नाही. तुला दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल’..

त्यामुळे मला शिकार करणं मुश्किल झालं. इकडं माझी भुक खवळू लागली..

एक दिवस गेला, दोन दिवस गेले. दुसऱ्या जंगलात जाण्याचा मी विचार केला. पण ते कुठे असेल किती लांब असेल. असेल का नसेल याचा काही अंदाज येईना..

बरं तिथवर जाण्यासाठी अंगात ताकद तरी हवी होती..

आधीच दोन चार दिवसाच्या उपासमारीने जीव घायकुतीला आलेला आणि केलेली सततच्या पायपीटेने शरीर गलितगात्र झालेले..

आता एक तरी अन्नाचा कण पोटात गेल्याशिवाय काही होणे नव्हते..

मी हताश, पेंगळून टेकडीवर बसलो होतो आणि माझी नजर सहज कुरणावर चरणाऱ्या त्या तुमच्या कळपावर गेली..

भूक शमवणे हाच एकच विचार डोक्यात घोळत असताना, मागचा पुढचा कोणताच विचार न करता जीवाच्या आकांताने मी धावत सुटलो..

आई तुला सांगतो मी सुसाट धावत येतोय हे त्यांना दिसले, मग तेही पाच दहाजण, आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. त्यात एक लंगडत धावताना मला दिसले.. आणि माझी शिकार पक्की झाली..

मी होता नव्हता त्राण आणला आणि त्या भक्ष्यावर झडप घातली..

आपला पाय ओढत जिवाच्या आकांताने पळू पाहणारा तो… अखेर माझी शिकार बनला..

मी प्रथम लचक्यावर लचके तोडून काढले बकाबका दोनचार घास गिळले असतील नसतील तोच मला तो चेहरा दिसला.. तुझ्या दादल्याचा… माझी भुकच मेली.. आई!…

आई मी तुझा खूप खूप अपराधी आहे. ज्याला जिवापाड जपून मातेच्या वात्सल्याने वाढंवलंस, आपल्या शत्रूच्या बिरादारीतला असून मी, बछ्डा असल्यापासून आईचं प्रेम दिलंस… आणि मी… मी मात्र आमच्या वाघाच्या मुळ स्वभावधर्माला भुकेला शेवटी बळी पडलो गं… आई मी कृतघ्न ठरलो. मला क्षमा कर असं मी कोणत्या तोंडाने म्हणू ?आता आई तुला जी काही मला शिक्षा करशील, ती भोगायची माझी तयारी आहे.. “

 एकीकडे आपलं कुकूं आज पुसलं गेल्याच दु:ख आईला दाटून आलं होत आणि त्याची शिकार करणारा आपलाच मानसपुत्रच निघावा या नियतीच्या कात्रीत एक आईच प्रेम सापडलं गेल होतं. पण शेवटी मातृहृदयच जिंकलं गेलं होतं.

“आई तू मला जवळ ओढलंस तुझं तोंड माझ्या डोक्यावर ठेवलंस.. नि आपल्या डोळ्यांतील आसवांना मुक्त वाहू दिलेस. माझ्या पाठीवरून तुझा प्रेमळ हात फिरला गेला, ती तुझी मुक संमती समजून तिथून मग मी मूकपणे निघून गेलो… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ राजवैद्य — भाग-३ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ राजवैद्य — भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(ज्ञानेश गप्प बसून होता. पण तो मनातल्या मनात पुढची आखणी करत होता. कंपनीने त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली होती. आणि ती पुरी करण्याची त्याची जबाबदारी होती.) – इथून पुढे —- 

 ज्ञानेश बापूसाहेब तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. केरबा सारखी प्रामाणिक माणसं आता क्वचित. पण मला सांगा हा केरबा राहतो कुठे?

बापूसाहेब इथून 15 किलोमीटरवर भडगाव नावाचे गाव आहे, तेथील बाजूच्या जंगलात याची झोपडी आहे. याची म्हातारी मेली. आता हा आणि त्याचा मुलगा म्हदबा दोघेच राहतात. बरं तर मग असं म्हणून ज्ञानेश उठला आणि आपल्या हॉटेलवर गेला.

ज्ञानेश च्या लक्षात आलं आता केरबाचा मुलगा  म्हदबा याला गाठावं लागणार. त्याने त्याच्या कंपनीचा सेल्समन अजय याला बोलावले आणि ताबडतोब हॉटेलकडे बोलावले.

ज्ञानेश अजय एक कंपनीचे महत्त्वाचे काम आहे. आणि तुझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. येथून 15 किलोमीटरवर भडगाव नावाचे गाव आहे हे तुला माहित असेलच. त्या गावात जायचं. तेथे केरबा धनगर नावाचा माणूस राहतो. अर्थात तो जंगलात झोपडीत राहतो. शेळ्या मेंढ्या राखत असणार. त्याचा मुलगा आहे महादबा. त्याची माहिती काढायची. त्याला जास्त काय आवडते हे चौकशी करायची. पण लक्षात ठेव. त्याची चौकशी करत आहोत हे  म्हदबाला कळता कामा नये. तू हे महत्त्वाचे कंपनीचे काम आहे, ते व्यवस्थित केलेस तर मी तुझी शिफारस करीन.

अजय मोटार सायकलने भडगाव मध्ये गेला.  भडगाव मधील केमिस्ट मनोहर त्याच्या खास ओळखीचा.

अजय मनोहर तुला या गावातला केरबा धनगर माहित असेल. त्याचा मुलगा म्हदबा याला ओळखतॊस का, कसा आहे आणि कसले व्यसन वगैरे आहे का?

मनोहर केरबा हा सरळ माणूस आहे, दारूच्या थेंबालाही शिवत नाही, पण त्याचा मुलगा महादबा हा पक्का बेवडा आहे. दिवस-रात्र दारूच्या नशेत पडून असतो. आता थोड्यावेळाने या देशी दारूच्या दुकानात येईल.

आणि खरंच थोड्या वेळाने म्हदबा देशी दारूच्या दुकानाकडे जाऊ लागला. अजयला अंदाज होताच म्हणून जाताना त्याने पाच सहा इंग्लिश दारूच्या बाटल्या बरोबर घेतल्या होत्या. त्याने म्हदबाची ओळख काढली दारूच्या बाटल्या दाखवून त्याला गाडीवर बसवले आणि ज्ञानेश च्या हॉटेल कडे घेऊन आला. एवढं मोठं हॉटेल बघून म्हदबा बावचाळून गेला. खोलीत आल्यावर ज्ञानेशने त्याला आपल्याकडच्या बाटल्या दाखवल्या.

म्हदबा मला इत कशाला आणलंय?

ज्ञानेश दारू प्यायला! पी हवी तेवढी दारू.’

ज्ञानेशने दारूची बाटली उघडली आणि ग्लासात ओतली, म्हडबाने एका दमात ग्लास रिकामा केला. दुसरा भरला दुसरा रिकामी, असे पाच ग्लास पटापट रिकामी केली.

ज्ञानेश मादबा लेका, एक काम होत, तुझ्या बाबाकड एक औषधाची मुळी आहे, त्याच्यामुळे पोटाचे आजार बरे होतात. ती मुळी कोणत्या झाडाची हे फक्त तू आम्हाला सांगायचे. तू जर ते सांगितलेस तर तुला हवी तितकी दारू देतो. आणि भरपूर पैसे देतो. ज्ञानेशने पैसे भरलेली सुटकेंस दाखवली. तुझा बाबा तसा मुळी द्यायला ऐकायचा नाही, जर ऐकला नाही  तर त्याला हे दाखवायचं, अस म्हणून ज्ञानेशने एक सुरा म्हडबाच्या हातात दिला. हा सुरा मानेवर ठेवलास की तो घाबरून ती मुळी तुला दाखवेल. त्या मुलीचे झाड आम्हाला दाखवायचे. मग तुला हे सगळे पैसे हवी तेवढी दारू  “.

दारू पिऊन पिऊन तोल जाणाऱ्या म्हदबाला अजय ने त्याच्या गावात सोडले.

दुसऱ्या दिवशी सकाळी बापूसाहेब घरी हॉलमध्ये चहा घेत होते. एवढ्यात ” बापूसाहेब, बापूसाहेब चला माझ्याबरोबर ” असं म्हणत केरबा धावत धावत बापूसाहेबांच्या घरी आला,

” अरे कुठे?

” बापूसाहेब, माझ्या जीवाचं मला काय खरं वाटत नाय, माझा पोरगा राती सुरा घेऊन माझ्या मागे धावत होता. त्या मुळीच झाड मला दाखव म्हणूंन सांगत व्हता. बापूसो, तुमास्नी त्ये झाड दाखवितो आणि जबाबदारीतून मोकळा होतो. “.

” कसली जबाबदारी?’

“माझ्या आजानं मला सांगितलं व्हतंमुळीचा बाजार करायचा न्हाई, झाड कधी दाखवायचं असलं तर फकीत राज वैद्यना दसखवायचं. कारण त्या घराण्याने आमच्या राजाला बर केल व्हतं.’.

” आरो पण मी त्या मुळीच झाड बघून काय करू?

” बापूसो, तुमी राज वैद्यसाच्या घराण्यातले, परत एकदा दवा तयार करा, “.

आर, पण तू त्याचा बाजार करायचा नाही असं म्हणतोस ना?”.

“तुमी सोडून कुंनी नाही करायचं, फक्त तुमी करू शकत “. चला चला बापूसाहेब घाई करा “.

 बापूसाहेबांनी आपला मुलगा दिलीप ला सोबत घेतला. दिलीप ने गाडी बाहेर काढली  आणि केरबा आणि बापूसाहेब मागे बसले. किरबा दाखवत होता त्या रस्त्याने दिलीप गाडी चालवत होता. वीस पंचवीस किलोमीटर गेल्यावर कीरबानी गाडी थांबवायला सांगितली. आणि खूप उभ्या चढणीवर तो चालायला लागला. बापूसाहेबांना एवढं चढणे शक्य नव्हते म्हणून फक्त दिलीप त्याचे बरोबर गेला.

केरबाने तेथेच दिलीप ला ती झाडे दाखवली. त्याची मुळी कशी काढायची हे पण दाखवले. बापूसाहेब केरबाला आपल्या घरी चल आज तिथेच रहा म्हणून आग्रह करत होते, पण केरबा ने  मानले नाही.

त्याच रात्री दारूच्या नशेत केरबाच्या मुलाने म्हडबाने केरबाचा सुरा पोटात खुपसून खून केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी बापूसाहेबांना ही बातमी कळली, बापूसाहेब मुलगा दिलीप सह धावले, केरबाचे प्रेत झाडीत टाकून दिलेले होते. आणि बाजूला दारू पिऊन म्हडबा पडला होता. बापूसाहेबांनी दोन-तीन माणसांना बोलावून केरबाचे प्रेत आपल्या गाडीत घेतले आणि दोन किलोमीटर वरील आपल्या स्वतःच्या जमिनीत त्याचे पुढचे विधी केले.

बापूसाहेब कित्येक दिवस सुन्न सुन्न होते, आपल्यामुळे केरबा हकनाक मेला असे त्यांचे मत झाले. मुंबईच्या शिर्के साहेबांना किरबाच्या मरण्याची बातमी कळली. ते मुद्दाम बापूसाहेबांना भेटायला आले. बापूसाहेबांनी त्या दिवशी मुद्दाम केरबा धावत धावत आला आणि त्या मुळीची वनस्पती दाखवली हे पण सांगितले.

शिर्के साहेब बापूसाहेब तुम्ही राजवैद्य आहात. तुम्ही पुन्हा औषधाच्या व्यवसायातउतरायला पाहिजे. तुमच्याकडे ज्ञान आहे आणि आता ही मुळी आणि तिची वनस्पती पण तुम्हाला कळली आहे, मग आता वाट कसली बघता?

बापूसाहेब शिर्के साहेब, आम्ही राजवैद्य असलो तरी आमच्याकडे पैशाची कमी आहे, आमच्याकडे दाम नाही आम्ही एवढी वर्ष गप्प आहोत.

शिर्के साहेब बापूसाहेब, . तुम्ही पैशाची काळजी करू नका. तुम्हाला वाटेल तेवढे कर्ज बँक देईल. तुम्हाला कर्ज देण्याची व्यवस्था मी करतो. आणखी काही रक्कम कमी पडत असेल तर मी तुमच्या मागे आहे. पण तुम्ही आता आयुर्वेदिक कंपनी सुरू करायलाच हवी. केरबाचीमुळीचा लोकांना फायदा व्हयला हवा “.

आणि शिर्के साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एका बँकेचा मॅनेजर सकाळीच त्यांच्या घरी हजर झाला. शिर्के साहेबांनी तुम्हाला हवे तेवढे कर्ज द्यायला सांगितले आहे, जामीन स्वतः शिर्के साहेब राहणार आहेत, तुम्हाला किती कर्ज हवे ते मला सांगा ‘. बापूसाहेबांनी मुलगा दिलीप याला हाक मारली. दोघांनी म्हणून विचार केला आणि कर्जाच्या अर्जावर सही केली.

ज्या ठिकाणी केरबाचे अंत्यविधी केले गेले, त्याच्या शेजारीच ” केरबा फार्मा ‘ उभी राहिली. गेटमधून आत गेल्यावर केरबा धनगरच पुतळा तुमचे स्वागत करेल, त्याला नमस्कार करून आत गेल्यावर  केरबा फार्मा ची भली मोठी फॅक्टरी आणि दिलीप रावांचे मोठे सेल्स ऑफिस भेटेल.

दिलीप रावांनी आपल्या मित्रमंडळींची मदत घेऊन केरबा फार्मा चा व्यवसाय खूप वाढवला. यावर्षी केरबा फार्माने शंभर कोटीचा व्यवसाय पुरा केला.

आपले राज वैद्य बापूसाहेब नवीन नवीन आयुर्वेदिक संशोधनात मग्न आहेत, हे सर्व केरबा धनगराच्या कृपेने याची जाणीव राजवैद्यन आहे.

– समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ राजवैद्य — भाग-२ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ राजवैद्य — भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(शिर्के साहेब मुंबईला जाताना बरोबर त्या गोळ्या घेऊन गेले आणि नियमित घेऊ लागले. त्यांची इतर पत्ते चालू होतीच.) – इथून पुढे —- 

दर दोन महिन्यांनी शिर्के साहेब आपल्या डॉक्टर कडे तपासून घेत असत. नेहमीप्रमाणे शिर्के साहेबांनी लिव्हरची सोनोग्राफी केली आणि सर्व पॅथॉलॉजी मध्ये जाऊन लिव्हर टेस्ट केल्या.

डॉक्टर मोटवानी लिव्हर वर उपचार करणारे डॉक्टर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होते. शिर्के साहेब नेहमी त्यांचे कडून तपासून घेत असत. नवीन केलेली सोनोग्राफी आणि लिव्हर टेस्ट घेऊन शिर्के साहेब मोटवानी ना भेटायला गेले. डॉक्टर मोटवानी सोनोग्राफी चे रिझल्ट पाहायला लागले आणि आश्चर्यचकित झाले, तसेच त्यांनी पॅथॉलॉजी मधील केलेल्या लिव्हर टेस्ट बघितल्या, त्यांच्या आश्चर्याचा धक्का बसला.

डॉ मोटवानी – मिस्टर शिर्के, धिस इज मिराकल, your bilrubin reched normal level, युवर सोनोग्राफी टेस्ट अल्सो शोज युवर युवर लिव्हर इज नियर टू नॉर्मल. हाऊ दिस हॅपेंड?

शिर्के साहेबानं खूप खूप आनंद झाला, सर्व डॉक्टर नी त्यांच्या लिव्हर च्या रिकव्हरी बद्दल नकारघंटा लावली होती, आणि आपले पाहुणे आनंदराव यांच्या शब्दाखातर आपण राजवैद्यना रिपोर्ट दाखवले, आणि राजवैद्य आणि मोठे आश्चर्य आपल्या बाबतीत घडवले. असे वैद्य अजून आहेत यावर आपला विश्वास नव्हता. राजवैद्य आणि ही जादू केली आहे.”

“डॉक्टर, मी कामानिमित्त एका शहरात गेलो होतो, माझ्या एका नातेवाईकाने त्यांच्या संस्थांच्या राजवैद्ययाना बोलावून घेतले आणि माझे रिपोर्ट्स दाखवले. या राज्यवैद्ययांचे आजोबा 60 70 वर्षांपूर्वी राजांच्या पदरी होते. त्यांच्याकडे अजूनही काही आश्चर्यकारक औषध आहेत. ते त्याचा फारसा प्रसार करत नाहीत. ‘

डॉ मोटवानी – मिस्टर शिर्के, या अशा जादू सारख्या औषधांचा इतर लोकांना पण फायदा व्हायला पाहिजे. तुम्ही जर या राजवाड्यांचा पत्ता मला दिलात तर इतरही पेशंटसाठी मी ते औषध त्यांचे कडन घेऊ शकतो. हे आपल्या समाजाचे काम आहे. जास्तीत जास्त पेशंट बरे व्हायला पाहिजेत. “

शिर्के साहेबांनी त्यांना आनंदरावांचा आणि राजवैद्य यांचा पत्ता दिला. शिर्के साहेब बाहेर जातात डॉक्टर मोटवानी यांनी बेंगलोर मधील जया ड्रग कंपनीचे मालक नियाज शेख यांना फोन लावला. जया ड्रग कंपनी ही आयुर्वेद मधील भारतातील पहिल्या तीन आतली कंपनी होती. डॉक्टर मोटवानी त्यांचे एक डायरेक्टर होते.

जया ड्रग कंपनीचे मालक मियाज शेख शक्यतो कुणाचा फोन घेत नसत, पण डॉक्टरमोटवानी हे त्यांच्या कंपनीचे डायरेक्टरच होते म्हणून त्यांनी फोन घेतला.

डॉक्टर मोटवानींनी मियात शेख यांना सांगितले माझ्याकडे एक शिर्के नावाचा पेशंट गेली दहा वर्षे येत आहे. त्याची लिव्हर पूर्ण खराब झाली होती. इंग्लंड मधून येणाऱ्या औषधावर तो जगत होता. परंतु आज तो तपासणीला आला तेव्हा त्याची लिव्हर जवळजवळ रिकव्हर झाली आहे. मला याचे आश्चर्य वाटले आणि मी चौकशी केल्यानंतर कळले महाराष्ट्रात एका शहरात एका माजी संस्थांनाचे राज्य वैद्य राहतात. ही त्यांची तिसरी पिढी आहे. त्या त्या राजवैद्याने शिर्के साहेबांना हे औषध दिले. मला वाटते लिव्हरच्या उपचारासाठी ही एक जादू आहे. आपण जर ते औषध मिळवले तर आपलं सबंध भारतभर धंदा करू शकतो, या औषधाला सध्या तरी स्पर्धा नाहीये. त्यामुळे कोणी ते औषध मिळवण्याआधी आपण ते औषध मिळवायला हवे. यासाठी तातडीने हालचाल करायला हवी ‘.

डॉक्टर मोटवानी ही बातमी देतात, नियाज शेखचे डोळे चमकले, त्याच्या तीन पिढ्या या व्यवसायात मोठया झाल्या, डॉक्टर मोटवानी हे मुंबईतील मोठे प्रस्थ, लिव्हर समस्येवर मुंबई मधील विशेषतःज्ञ्, त्यांचा अंदाज आणि मत चुकीचे ठरणार नाही. हे आयुर्वेदिक औषध लिव्हर समस्येवर जादू आहे हे शेखने जाणले.

त्याने तातडीने हालचाल सुरु केली. सर्व डायरेक्टर्सना बोलाविले, मोटवानींनी कळवलेल्या माहितीबद्दल सर्वांना सांगितले. हे आयुर्वेदिक औषध आपल्याला मिळाले तर आपण भारतात नंबर वन वर पोहोचू असा विश्वास सर्वांना दिला. याकरिता ते औषध आपल्याला मिळायला हवी. त्या वैद्य राजा पर्यंत पोहोचण्यासाठी चांगला माणूस हवा होता. त्यांच्या एका डायरेक्टरनी त्यांच्या कंपनीच्या पुन्हा विभागाचा मुख्य ज्ञानेश सबनीस याचे नाव सुचवले. सर्वांनी ज्ञानेश च्या नावाला एकमताने संमती दिली.

ज्ञानेश ला बेंगलोरला बोलवले गेले. त्याला सर्व माहिती आणि वैद्य राजांचा पत्ता दिला गेला. हवे तेवढे पैसे खर्च करण्याची मुभा दिली गेली. ज्ञानेश्वर मराठी असल्याचा त्यांना फायदा होता. वैद्य राजांबरोबर बोलू शकणार होता. शिवाय त्याला महाराष्ट्रातील सर्व माहिती होती.

ज्ञानेश त्या शहरात आला आणि एका मोठ्या हॉटेलात उतरला, त्याच संध्याकाळी तो बापूसाहेबांना भेटायला गेला.

ज्ञानेश – बापूसाहेब मी ज्ञानेश सबनीस जया ड्रग कंपनीचा सेल्स मॅनेजर, तुम्हाला माहिती असेलच आमची कंपनी भारतातील अग्रगण्य आयुर्वेदिक कंपनी आहे. आमच्या कंपनीचा विस्तार भारतभर आहे. मुंबईचे जे शिर्के नावाचे एक लिव्हर पीडित पेशंट तुमच्याकडे आले होते, ते मुंबईच्या डॉक्टर मोटवानी चे पेशंट होते. तुमच्याकडचे औषध घेतल्यानंतर त्यांचा आजार जवळजवळ संपला. हे एक मोठे आश्चर्य घडले. मोटवानीने चौकशी करता करता शिर्के म्हणाले या शहरातील आयुर्वेदाचार्य राजवैद्य बापूसाहेब यांच्या औषधाने हा चमत्कार झाला. तुम्ही जी वनस्पती या आजारासाठी वापरलात ती जर आमच्या कंपनीला दिलीत तर कंपनी तुम्हाला त्याचे योग्य मोबदला देईल.

बापूसाहेब – शिर्के साहेबांची लिव्हर बरी झाली याचे श्रेय माझे नव्हे. माझा एक जंगलात राहणारा मित्र आहे, जो शेळ्या मेंढया राखतो, त्याचे हे ज्ञान आहे. त्याच्या आज्यानं ही विद्या त्याला दिली आहे.

ज्ञानेश – मग बापूसाहेब, तुमच्या त्या मित्राला बोलवाल तर बरं होईल. त्यांनी जर त्या वनस्पतीची माहिती आम्हाला दिली तर त्यांना आम्ही मोबदला देऊच पण तुम्हाला पण देऊ.

बापूसाहेब – ज्याचं श्रेय माझं नाही, त्याचा मोबदला मी कसा घेऊ? पण केरबाला जर तुम्ही पैसे देणार असाल तर त्याने ते घ्यावे. म्हणजे त्याचे दारिद्र्य मिटेल.

बापूसाहेबांनी त्यांचा मुलगा दिलीप याला बोलावून केरबा धनगर ला आणायला सांगितले. दिलीप केरबायला भेटायला गेला आणि येताना गाडीतून त्याला घेऊन आला.

आता बापूसाहेबांच्या घरात ज्ञानेश सबनीस, बापूसाहेब आणि केरबा समोरासमोर बसले होते.

बापूसाहेब – केरबा, तु जी झाडाची मुळी मला दिली होतीस, मी ती माझ्या औषधास मिसळून मुंबईच्या शिर्के साहेबांना दिले. त्यामुळे त्यांची लिव्हर एकदम बरी झाली. त्या औषधाच्या शोधात हे एका औषध कंपनीचे माणूस माझ्याकडे आले आहेत. ते औषध जर तू त्यांना दाखवलं, तर तुला ते दोन कोटी रुपये द्यायला तयार आहेत. त्यांचं म्हणणं आहे, या औषधामुळे अजून अनेक लिव्हरच्या पेशंटला फायदा होईल. त्यामुळे तू त्याचा विचार करावा.

केरबा –असल्या पैशावर थुंकतो मी बापूसाब, मी हाय तो झोपड्यात बरा हाय. या मुळीचा मी बाजार करणार न्हाई, माज्या आज्यान मोठया विश्वासन माझ्याकडं ही मुळी दावली, तेचा व्यापार करू? न्हाई जमायचं.

ज्ञानेश – केरबा कंपनी तुम्हाला शहरात घर देईल. तुमच्या मुलाला नोकरी देईल.

केरबा –अरे हट, मान कापली तरी मुळी दवणार न्हाई. मला तुमच पैस नग, घर नग. नोकरीं नग. माझा शेळ्या मेंढया विकायचा धंदा हाय तो बरा हाय. बापुसो, मी चाल्लो.’

म्हणत केरबा निघून गेला.

बापूसाहेब पण गप्प बसून होते. बापूसाहेबांना पण मनातल्या मनात समाधान वाटत होतं. पैशाला न बोलणारी अजून माणसे आहेत याचे त्यांना समाधान वाटले. ज्ञानेश गप्प बसून होता. पण तो मनातल्या मनात पुढची आखणी करत होता. कंपनीने त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली होती. आणि ती पुरी करण्याची त्याची जबाबदारी होती.

– क्रमशः भाग दुसरा

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ राजवैद्य — भाग-१ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ राजवैद्य — भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

आनंदराव गाडीतून उतरून हॉटेलच्या पायऱ्या चढू लागले, तर शिर्के साहेब त्यांची गॅलरीत बसून वाट बघत होते. त्यांना पायऱ्या चढताना पाहून शिर्के साहेब म्हणाले ” गुड इव्हिनिंग आनंदराव, लॉन वरच बसू, हवा छान आहे.

“गुड इव्हिनिंग शिर्के साहेब, चालेल.” असं म्हणून दोघे हॉटेलच्या lawn मध्ये ठेवलेल्या खुर्चीत बसले.

“झाली का काम?” आनंदरावांनी शिर्के साहेबांना विचारले.

“अजून दोन दिवस लागतील, कारखान्याचे मुख्य डायरेक्टर दिल्लीला गेले आहेत, शनिवार पर्यंत येतील’.”

“हो, ते खासदार आहेत ना या भागातले, सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे ते शनिवारीच येतील.”

“बरं मग शिर्के साहेब, तुम्ही आमच्या गावात आलात, बोला काय घेणार? या हॉटेलला इम्पोर्टेड मिळते.”

“नाही आनंदराव, मी ड्रिंक घेत नाही. आश्चर्य आहे, तुमच्या व्यवसायानिमित्त तुम्हाला देशात आणि प्रदेशात फिरावे लागते. तरी पण तुम्ही ड्रिंक घेत नाही याचे आश्चर्य वाटते “.

काय आहे आनंदराव, पूर्वी मी ड्रिंक घेत होतो. पण गेली काही वर्षे मला लिव्हर चा त्रास सुरू आहे,.

“मग तुम्ही उपचार केलेत असतील!”

“उपचार? भारतातील सर्व लिव्हर स्पेशालिस्ट कडे आणि इंग्लंड मध्ये डॉक्टर स्टीफन कडे जाऊन उपचार घेतो आहे.”

“मग डॉक्टरांचे काय म्हणणे?”

“भारतातील बहुतेक डॉक्टर्स माझे लिव्हर जन्मतः खराब आहे. त्यावर निश्चित असे बरे करण्याचे उपाय नाहीत. लिव्हर ट्रान्स प्लांट करणे अशक्य आहे. कारण ऑपरेशन करताना अमोनिया वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच डॉक्टरांचे म्हणणे आहे लिव्हरची काळजी घेत चला. सध्या डॉक्टर स्टीफन यांच्याकडून आलेल्या इम्पोर्टेड गोळ्यांवर माझे चालू आहे. त्यामुळे कंट्रोल मध्ये आहे. माझ्या डॉक्टर्सनी सांगितले आहे, दारूचा एक थेंब जरी पोटात गेला तरी तरी खेळ खल्लास होईल.. म्हणून म्हणतो आनंदराव तुम्हाला काय हवं ते मागवा”. “नाही शिर्के साहेब, तुम्ही माझे पाहुणे आहात. तुम्ही ड्रिंक घेत नसताना मी मागवू शकत नाही. आपण लिंबू पाणी घेऊ.”. असं म्हणून आनंदरावांनी दोघांसाठी लिंबू पाणी मागवले.

आनंदराव शिर्के साहेबांना म्हणाले “तुम्ही एवढे उपचार केलेत, मग एकदा राजवैद्यांचा मत घेऊ. आमच्या राज्यवैद्यांकडे काही आश्चर्यकारक आयुर्वेदिक औषधे आहेत. तसं ते फारसे कुणाला माहित नाही. पण आम्ही दोघे एका कल्चरर क्लब मध्ये एकत्र असतो. त्यामुळे आमची मैत्री आहे.”

“राजवैद्य? कोण हे राजवैद्य?”

“शिर्के साहेब, आमचा हा जिल्हा म्हणजे पूर्वी संस्थान होते. राज घराण्याची गादी होती इथे. म्हणजे अजूनही आहे पण त्यावेळचा मान वेगळा होता. 60-70 वर्षांपूर्वी आमच्या महाराजांच्या पदरी हे राजवैद्य होते. महाराजांच्या खास मर्जीतले. त्याकाळी महाराजांना शरीरभर गळू आले होते. असह्य वेदना सुरू होत्या. अनेकांनी उपचार केले. अगदी मिशनरी डॉक्टर नी उपचार केले. मग कुणीतरी बातमी दिली मलकापूर भागात एक वैद्य आहे, त्यांचे कडे अनेक रोगांवरची औषधे आहेत. राज घराण्याने त्यांना बोलावले. त्यांनी पंधरा दिवसासाठी औषध लावायला व पोटात घ्यायला दिले. आश्चर्य म्हणजे आठ दिवसानंतर एक एक गळू फुटून साफ झाले. महिन्याभरात महाराज खडखडीत बरे झाले. त्या वैद्यांना महाराजांनी या शहरात आणले आणि राजवैद्य बनवले. त्या राज्यवैद्याने महाराजांची आणि महाराजांच्या कुटुंबाची अखेरपर्यंत सेवा केली. सगळीकडे नाव कमावले. महाराजांच्या शेवटच्या आजारपणात या वैज्ञानिक त्यांच्यावर उपचार केले. त्यामुळे या संस्थांच्या सर्व लोकांना त्यांचे बद्दल मोठा आदर होता.”

“आणि आता?” शिर्के साहेबांनी विचारले.

“आता राज्य वैद्य यांचे नातू आहेत. बापूसाहेब त्यांचं नाव. त्यांना पण आयुर्वेदाची चांगली माहिती आहे. पण आता काळ बदलला. इंग्लिश औषधे भारतात आली आहेत. डॉक्टर्स ऍलोपथी शिकून आले आहेत. ते ऍलोपॅथी औषधे वापरतात. त्यामुळे राजवैद्य मागे पडले.”

“पण आयुर्वेदिक डॉक्टर्स पण आहेत ना भारतभर?”

“आयुर्वेदिक डॉक्टर्स पण इंग्लिश औषधे वापरतात. ते शिकतात आयुर्वेदिक पण औषधे वापरतात ऍलोपॅथिक. अजून काही वैद्यपूर्ण आयुर्वेदिक औषधे वापरतात. पण आयुर्वेद मध्ये सुद्धा आता मोठ्या मोठ्या कंपन्या उतरले आहेत. त्यांच्याकडे मोठे कारखाने आहेत. आमचे बापूसाहेब वैद्यराज मात्र मागे मागे राहिले. ‘ कारण त्यांना पैशाचे पाठबळ नाही मी आमच्या वैद्य राज्यांना बोलावतो ते नाडी परीक्षा करतात. आणि मग औषध देतात”.

“हो बोलवा तुमच्या राज्य वैद्य ना, त्यांचे कडून काही फायदा होतो का पाहू.”

“दुसरे दिवशी आनंद रावांनी बापूसाहेब राजवैद्ययाना फोन केला. बापूसाहेब आले. त्यांची शिर्के साहेबांची भेट झाली. त्यांनी शिर्के साहेबांचे सोनोग्राफी रिपोर्ट पाहिले. नाडी परीक्षा केली. आणि यावर एक जालीम औषध मिळते का बघतो असे म्हणून ते गेले.

बापूसाहेबांच्या लक्षात आले, शिर्के साहेबांवर उपचार करण्यासाठी केरबाचे औषध मिळवणे आवश्यक आहे. नुसत्या आपल्या औषधाने शिर्के साहेबांची लिव्हर व्यवस्थित होणार नाही.

बापूसाहेब स्कूटर वरून निघाले ते 15 किलोमीटर वरील भडगाव या गावी पोहोचले. एका जंगलाजवळ त्यांनी आपली स्कूटर ठेवली. आणि लहानशा पायवाटेने जंगल चढू लागले. पंधरा-वीस मिनिटे चढण चढल्यावर त्यांना शिळ्यामेंढ्या चढताना दिसायला लागल्या. तसं त्यांनी “केरबा, केरबा” अशा हाका मारायला सुरुवात केली. दहा-बारा वेळा हाका मारल्यानंतर “जी जी” उत्तर मिळाले. आणि दोन मिनिटात त्यांच्यासमोर केरबा धनगर उभा राहिला.

“आव बापूसाब, तुमी सवता, सुरवं कुनिकडे उगवला मनायचं”.

“आर मित्रा, तुझी लय आठवण आली न्हवं” बापूसाहेब उदगारले.

“मित्र म्हणताय हे तुमच मोठेपण बापूसाहेब, तुमी कुठं आमी कुठं, तुमी आमचे राजवीद्य, तुमास्नी आमच्या महाराजणं पदवी दिली न्हवं”.

“आर पदवी दिली आमच्या आजोबांना, मला न्हवं”.

“बरं बापूसाहेब, का आला व्हता गरिबाकडं!”

 केरबा, आमचा एक दोस्त आहे आनंदराव, त्याचे साडू मुंबईचे शिर्के, ते इकडं आपल्या गावात आलेत कामासाठी, त्या शिर्केंच यकृत खराब झालंय, यकृत समजतय न्हवं (बापूसाहेबांनी पोटाजवळ हात ठेऊन लिव्हर दाखवले).

“समजलं कीं, कावीळ व्हते न्हाई का?’, पण तुमी काविली वर दवा देताय न्हवं”.

आर, नुसती कावीळ असती किंवा बारीक सारीक काय बी असत, तर मी इलाज केला असता, पर या पवण्याचं पूर यकृत खराब झालाय, त्यासाठी माझ्या कडे इलाज न्हाई बाबा, तेला तुझी मुळी हवी, माग दादा डॉक्टर साठी ती मुळी तू दिलेली ‘.

“दादा डागदार तसा भला माणूस, किती लोकांचे परान वाचवले त्याने, माझ्या आजा न दाखवलेली मुळी तुमच्या कडच्या औषतून दिली तुमी, पन माझ्या आज्यान मला बोलून ठेवलंय “या मुळीचा बाजार करू नको केररबा, म्हणून मी तस कुणला ह्या मुळी च सांगत न्हाई आणि पैस भी घेत न्हाई”.

“होय, मला माहित आहे ते, पण आनंदरावांचे हे पाहुणे भले माणूस आहेत. मी त्यांना शब्द दिला आहे, माझ्यासाठी एकदा तू ती मुळी मला दे”.

“होय बापूसाहेब, राजवीद्य हाय तुमी आमचे, आमच्या म्हरंजाचे राजवीद्य, तुमास्नी मी न्हाई म्हणु शकत न्हाई”.

“उद्या राती पर्यत मुळी पोच करतो, तुमच्या कविलीच्या दावंय मध्ये घालून द्या.”

बर, म्हणून बापूसाहेब घरी आले, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी केरबाने ती मुळी आणून दिली. बापूसाहेबांनी ती मुळी आपल्या नेहमीच्या लिव्हर वरील औषधात मिसळली. त्यांच्या फॅक्टरीतल्या मुलीला सांगून त्याच्या दोन महिन्यासाठी च्या गोळ्या तयार केल्या आणि दुसऱ्या दिवशी शिर्के साहेबांच्या हवाली केल्या.

शिर्के साहेब मुंबईला जाताना बरोबर त्या गोळ्या घेऊन गेले आणि नियमित घेऊ लागले. त्यांची इतर पत्ते चालू होतीच.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक नंबर शिवणार… भाग-२ – लेखक – श्री राजेंद्र परांजपे ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ एक नंबर शिवणार… भाग-२ – लेखक – श्री राजेंद्र परांजपे ☆ सौ.प्रभा हर्षे

(तिथून जेवून परत घरी येताना, हॉल स्टेशनजवळ होता, म्हणून जेवण जिरवायला चालत स्टेशनकडे निघालो. नेमकं त्याचवेळी माझ्या बुटाच्या सोलने मला दगा दिला. बुटाला सोडून सोल लोंबकळू लागला.) इथून पुढे —

मात्र माझ्या नशिबाने तिथून पन्नास फुटावरच मला एक चांभाराचं दुकान दिसलं. कसातरी खुरडत मी त्या दुकानापर्यंत पोचलो. तिथला चांभार खालमानेने काहीतरी शिवत होता. मी त्याच्या पुढ्यात माझा सोल सुटलेला बूट टाकला.

“सोल सुटलाय का, आत्ता शिवतो बघा. ” तो म्हणाला.

“दादा, जरा चांगला शिवा हं. मला लांब जायचंय. ” मी म्हणालो.

“साहेब, अगदी एक नंबर शिवणार बघा. काळजीच नको. ” त्याच्या तोंडचे हे शब्द ऐकून मी चमकलो. हा राजाराम तर नव्हे?

“राजाराम?” मी सरळ हाकच मारली.

हाकेसरशी त्याने वर बघितलं. तो राजारामच होता. माझ्याकडे त्याने दोन मिनिटं बघितलं आणि म्हणाला, “साहेब, तुम्ही ते अंधेरीचे इतिहास संशोधनवाले ना?” 

मी हो म्हणालो. पठ्ठ्याच्या लक्षात होतं तर. मला बरं वाटलं.

एकमेकांना ओळखल्यावर साहजिकच आम्ही गप्पा मारु लागलो. बोलता बोलता तो म्हणाला, “आता मी कामासाठी पूर्वीसारखा फिरत नाही. हे खोपटं भाड्याने घेतलय. रोज इथे मी आणि मुलगा येतो, आणि काम करतो. माझ्या फिरण्यामुळे आणि चोख कामामुळे बरेचजण मला ओळखतात. ते फाटकी पुस्तकं, वह्या वगैरे इथे घेऊन येतात. माझा मुलगा ते शिवतो आणि मी चपला, बूट वगैरे शिवतो.” 

मुलगा? मी चमकलो. माझ्या आठवणीप्रमाणे राजारामला मूलबाळ नव्हतं, मग हा मुलगा कुठून आला? माझ्या चेहऱ्यावरील प्रश्न ओळखून राजारामच पुढे म्हणाला,

“साहेब, माझा सख्खा मुलगा नाही. त्याचं काय झालं, सात आठ वर्षांपूर्वी एक दिवशी मी ठाण्याला स्टेशनवर उतरलो, तेव्हा पुलाखाली मला एक लहान पांगळा मुलगा दिसला. कुठल्या तरी भिकाऱ्याचा असावा. चेहऱ्यावरून उपाशी दिसत होता. मला त्याची दया आली म्हणून मी एक बिस्कीटचा पुडा घेऊन त्याला द्यायला गेलो, तेव्हा तो गुंगीत आहे असं लक्षात आलं. मी त्याच्या अंगाला हात लावून बघितलं, तर अंग चांगलंच गरम लागलं. सणकून ताप भरला होता. मग मी तसाच त्याला उचलला आणि स्टेशनजवळच्या एका ओळखीच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासून त्याला औषध दिलं. तोपर्यंत हे सगळं ठीक होतं. त्यानंतर आता ह्या मुलाचं काय करायचं हा विचार माझ्या मनात आला. पण मी धाडस करुन आणि काय होईल ते बघू असं ठरवून त्याला थेट माझ्या घरीच घेऊन गेलो. बायकोने आणि आईने त्या मुलाला बघून बरेच प्रश्न विचारले. मी त्यांना काय घडलं ते सविस्तर सांगितलं. आधी त्यांनी दुसऱ्याच्या अनोळखी मुलाला घरात घ्यायला काचकूच केलं. पण नंतर त्याची अवस्था बघून त्या तयार झाल्या. थोड्या दिवसांनी औषधांनी आणि चांगल्या खाण्यापिण्याने तो मुलगा बरा झाला. म्हणून मी त्याला, ‘परत होता तिथे सोडून येतो’ म्हणालो, पण तोपर्यंत त्या दोघींना त्याचा लळा लागला. त्यांनी नेऊ दिलं नाही. तसंही आम्हाला मूलबाळ नव्हतं आणि इतक्या दिवसात त्याची चौकशी करायला कुणीही आलं नव्हतं. हा अपंग मुलगा कुणाला तरी जड झाला असेल, म्हणून दिला असेल सोडून. दुसरं काय? राहू दे राहील तितके दिवस. माझ्या आईने त्याचं नाव किसन ठेवलं. आधी आम्हाला तो नुसता पांगळाच वाटला, पण नंतर त्याची जीभही जड आहे, हे लक्षात आलं. तो तोतरा बोलतो. पण ह्या दोन गोष्टी सोडल्या तर अगदी हुशार आहे. घरी मी पुस्तकं शिवायचं काम करायचो, तेव्हा माझ्या बाजूला बसून माझं काम तो लक्षपूर्वक बघायचा. तीन चार वर्षातच त्याने माझं काम आत्मसात केलं. आता तो लिहा वाचायला पण शिकतोय.

साहेब, आमचं हातावर पोट आहे. त्याला घरी ठेवला तर माझ्या बायकोला किंवा आईला त्याच्यासाठी घरी थांबायला लागतं, त्यांचा कामावर खाडा होतो. त्यात त्याच्या तोतरेपणामुळे आजूबाजूची मुलं त्याला चिडवून बेजार करतात, म्हणून मी त्याला पाठुंगळीला मारुन रोज इथे माझ्या मदतीला घेऊन येतो. ” एका दमात राजारामने सगळं कथन केलं.

“अरे पण आहे कुठे तो? मला तर दिसत नाही. ” सगळं ऐकून आणि आश्चर्यचकित होऊन मी म्हणालो.

“या, दाखवतो, ” असं म्हणून राजाराम मला त्याच्या दुकानाच्या मागच्या बाजूला घेऊन गेला.

तिथे कंपाऊंडची भिंत आणि राजारामचं दुकान याच्या मधल्या, प्लॅस्टिकचं छप्पर असलेल्या छोट्याश्या जागेत एक पांगळा मुलगा अगदी तन्मयतेने एक जुनं पुस्तक शिवत बसला होता. राजारामने उजेडासाठी तिथे एका बल्बची सोय केली होती. त्या मुलाच्या आजबाजूला काही फाटकी आणि काही शिवलेली वह्या, पुस्तकं होती. कामातली त्याची सफाई अगदी राजारामसारखीच वाटत होती. राजारामने त्याची आणि माझी ओळख करुन दिली. माझ्याकडे बघून त्याने हात जोडले व तो छान हसला. मला राजारामचं आणि त्या मुलाचं खूप कौतुक वाटलं. त्याचबरोबर मला त्या मुलाची दयाही आली, म्हणून मी राजारामला विचारले,

“राजाराम, तू ह्याला मागे का बसवतोस? पुढे तुझ्या बाजूला बसव. तिथे उजेड चांगला आहे आणि जागाही मोठी आहे. ” 

“साहेब, आधी त्याला मी पुढेच बसवायचो. पण नंतर लक्षात आलं, की लोकं एकाच ठिकाणी चपला आणि पुस्तकं शिवायला द्यायला बिचकतात. त्यातूनही काहींनी काम दिलं तर ते पैसे किसनच्या कामाकडे न बघता त्याच्या पांगळेपणाकडे बघून द्यायचे. ते मला आवडत नव्हतं. म्हणून मग मी त्याला मागे बसवायला लागलो. त्या अरुंद जागेची त्याला आता सवय झालीय. आता तो कुणाला दिसत नाही. त्यामुळे सगळेच प्रश्न सुटले. साहेब, तो त्याच्या पांगळ्या पायांवर कधीच उभा नाही राहिला तरी चालेल. पण आपल्या हिमतीवर उभा राहीला पाहिजे. कुणाच्या दयेवर नको. ” राजारामने स्पष्टीकरण दिलं.

राजारामच्या ह्या विचारांनी मी थक्क झालो. अश्या विचारांची माणसं आजच्या जगात खरंच दुर्मिळ आहेत.

राजारामचं आणि किसनचं पुन्हा एकदा कौतुक करुन, त्यांचा निरोप घेऊन मी निघणार, इतक्यात राजाराम म्हणाला,

“साहेब आणखी एक सांगू? आजवर आम्ही तिघांनी चपला, वह्या, पुस्तकं, गोधड्या, पिशव्या ह्या निर्जीव वस्तू खूप शिवल्या, त्यावर आमचं पोट भरलं. पण आता आम्ही ह्या पांगळ्या मुलाचं फाटलेलं आयुष्य शिवणार आणि अगदी एक नंबर शिवणार बघा. हे देवाने दिलेलं काम आहे, ते करायलाच पाहिजे. “

राजारामचं ते वाक्य माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं, आणि माझ्या मनातली त्याची प्रतिमा शतपटीने उंचावली.

– समाप्त –

लेखक : श्री राजेंद्र परांजपे 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक नंबर शिवणार… भाग-१ – लेखक – श्री राजेंद्र परांजपे ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ एक नंबर शिवणार… भाग-१ – लेखक – श्री राजेंद्र परांजपे ☆ सौ.प्रभा हर्षे

रविवारची सकाळ. आम्ही सगळे झोपेत होतो. इतक्यात दारावरची बेल वाजली. आधी मी दुर्लक्ष केलं. वाटलं भास असेल. पण दोन मिनिटांनी पुन्हा वाजली. तिसऱ्या वेळेस जेव्हा वाजली, तेव्हा नाईलाजाने उठावं लागलं. उठून घड्याळात बघितलं तर जेमतेम साडेसात वाजत होते. म्हणजे रविवारच्या मानाने पहाटच म्हणायची.

मी आळस देतदेतच दार उघडलं. दारात साधारण चाळीस एक वर्षांचा एक काळासावळा माणूस उभा होता. अंगात पांढरा लेंगा झब्बा, आणि डोक्यावर मळकी गांधीटोपी. दाढीचे खुंट वाढलेले. त्याच्या हातात एक कापडी पिशवीपण होती. मी त्याला ओळखलं नाही.

माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून तोच म्हणाला, “साहेब, नमस्कार. मी राजाराम. ” 

“सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. ” मी म्हणालो.

“अहो कसं ओळखणार? आपण पहिल्यांदाच भेटतो आहोत. मला बाबासाहेब देशमुखांनी तुमचा पत्ता दिला आणि भेटायला सांगितलं. “, त्याने स्पष्टीकरण दिलं.

बाबासाहेब देशमुख म्हणजे प्रसिद्ध इतिहास संशोधक. माझे चांगले आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचे मित्र. त्यांनी पाठवलंय म्हणजे हा माणूस नक्कीच कामाचा असणार. हे लक्षात आल्यावर, मी राजारामला म्हणालो,

“या ना, आत या. बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. “

“साहेब, तुम्ही मला अहो जाहो नका करु. नुसतं राजाराम म्हणा. मी लहान माणूस आहे. ” राजाराम म्हणाला.

“बरं, बस राजाराम. मी आलोच” असं म्हणून मी आत जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन आलो, आणि काय काम आहे ते विचारलं.

“साहेब, मी जुनी फाटकी पुस्तकं शिवतो. देशमुखसाहेब म्हणाले की तुम्ही पण त्यांच्यासारखेच इतिहास संशोधक आहात. त्यामुळे तुमच्याकडे पण शिवण्यासारखी अशी दुर्मिळ आणि फाटकी पुस्तकं असतील तर ती द्या. एक नंबर शिवतो बघा मी ती. अगदी नव्यासारखी करुन देतो. ” राजारामने त्याच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं.

त्याचं म्हणणं खरं होतं. मी देखील गेली तीसेक वर्ष इतिहासाचा अभ्यासक असल्यामुळे, कुठून कुठून जुनी आणि दुर्मिळ पुस्तकं, ग्रंथ, बखरी आणि इतर बरेच ऐतिहासिक दस्तावेज जमा केले होते. त्यातल्या काहींची अवस्था खूप नाजूक होती. ती व्यवस्थित शिवणं गरजेचं होतं. नाही तर त्यातली पानं सुटून गहाळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे मी अशाच एखाद्या माणसाच्या शोधत होतो. बरं झालं बाबासाहेबांनी त्याला धाडला ते.

“आहेत अशी पुस्तकं वगैरे. अरे पण ती बेडरुममधे कपाटात आहेत. बेडरूममध्ये माझी बायको आणि मुलगा झोपले आहेत. कपाटातून पुस्तकं बाहेर काढताना कदाचित त्यांची झोपमोड होईल. तू असं कर, तू दुपारनंतर ये. तोपर्यंत मी ती काढून ठेवतो. ” मी म्हणालो.

“दुपारनंतर? ” तो चाचरत पुढे म्हणाला, “साहेब, मी अंबरनाथला राहतो. आता घरी जाऊन परत यायचं म्हणजे खूप उशीर होईल. त्यापेक्षा मी तुमच्या बिल्डिंगच्या खालीच थांबतो, आणि तासाभराने वर येतो. चालेल?

अंबरनाथला राहतो? अरे बापरे! तिथून निघून हा माणूस रविवारी इतक्या लवकर अंधेरीला माझ्या घरी पोहोचला? पहिल्यांदाच आल्यामुळे माझं घर शोधण्यातदेखील त्याचा थोडा वेळ गेला असेलच. कमाल आहे या माणसाची. म्हणजे घरुन निघाला तरी किती वाजता असेल हा? मनातल्या मनात विचार करुन मी त्याला म्हणालो, “बरं, चालेल. मी लवकरात लवकर पुस्तकं बाहेर आणतो. पण तू घरुन काही खाऊन निघालास का? “

“हो साहेब” तो म्हणाला खरा, पण त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं की तो खोटं बोलतोय. घरुन निघताना किंवा वाटेत त्याने काहीच खाल्लेलं नसावं. मी खणातून माझं पाकीट काढलं, आणि त्यातली शंभरची नोट काढून त्याच्या पुढ्यात धरुन म्हटलं, “हे घे आणि कोपऱ्यावर जाऊन आधी चहा, नाश्ता करुन ये. ” 

राजारामने थोडे आढेवेढे घेतले, पण मी ती नोट त्याच्या खिशातच कोंबल्यावर त्याचा नाईलाज झाला. तो नाश्ता करायला गेला.

तो चहा, नाश्ता करुन येईपर्यंत, मी पुस्तकं काढून ठेवली होती.

ही पुस्तकं शिवायचं काम तो कुठे बसून करणार, असा माझ्या मनात प्रश्न आला. पण जणू काही तो वाचून, राजारामच म्हणाला, “साहेब, तुम्ही तुमची गॅरेजमधली गाडी थोडा वेळ बाहेर लावलीत तर मी तिथे बसून काम करतो. चालेल का? “

राजाराम हुशारीने आधीच सगळा विचार करुन आला होता तर. मला त्याचं कौतुक वाटलं.

आणि त्याचा प्रस्तावही चांगला होता. मग आम्ही दोघांनी मिळून पुस्तकं आणि एक मोठी चटई खाली नेली. मी माझी गाडी बाहेर लावली, आणि गॅरेजची जागा त्याला मोकळी करुन दिली. त्याने ताबडतोब चटई अंथरुन त्याच्या जवळच्या पिशवीतून दाभण, दोरा, गोंद, चिकटपट्टी वगैरे सामान काढलं आणि तो कामाला लागला.

“एक नंबर शिवणार बघा साहेब. काही काळजीच नको तुम्हाला आता या पुस्तकांची. या तुम्ही तुमचं आवरुन. ” तो म्हणाला.

वॉचमनला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगून मी घरी गेलो आणि आंघोळ, चहा, नाश्ता करुन पुन्हा तासा दीडतासाने खाली गेलो. तोपर्यंत त्याने अर्धअधिक काम संपवलं होतं. कामातली त्याची सफाई बघून मी खूश झालो. त्याच्याशी गप्पा मारता मारता मला समजलं की त्याच्या घरी त्याची बायको आणि आई आहे. त्या दोघी लोकांकडे धुणी, भांडी करतात आणि फावल्या वेळेत गोधड्या, पिशव्या वगैरे शिवण्याचंही काम करतात. आणि हा चपलांपासून पुस्तकांपर्यंत सगळं शिवतो. तसे खाऊन पिऊन सुखी होते तिघे, पण त्याच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली तरी अजून पाळणा हलला नव्हता. हा सल त्याच्या मनात होता, तो त्याने दोन तीन वेळा बोलूनही दाखवला. असतं एकेकाचं नशीब.

आणखी तासाभरात त्याचं काम संपलं. आम्ही पुस्तकं घेऊन वर घरी आलो. अगदी मला हवं होतं तसं काम केलं होतं त्याने. त्याला काही खायला देऊन, मी पैसे विचारले. माझ्या अंदाजापेक्षा त्याने कमीच सांगितले. मी ते दिले. त्याबरोबर त्याने त्यातले शंभर रुपये मला परत दिले. “साहेब, हे सकाळी तुम्ही मला नाश्त्यासाठी दिले होते. ” तो म्हणाला.

मी अवाक् झालो. आजच्या लबाडीच्या जगात इतका प्रामाणिकपणा? नाही तर लोक ठरलेले पैसे दिल्यावरसुद्धा वर लोचटपणे आणखी बक्षिसी मागतात. मी ‘राहू दे’ म्हटलं. पण त्याने ऐकलं नाही. ती नोट त्याने टेबलावर ठेवली आणि नमस्कार करुन तो निघून गेला. जाण्याआधी, ‘परत काही काम असेल तर सांगा साहेब, एक नंबर शिवणार’, हे सांगायला, आणि आपला फोन नंबर एका कागदावर लिहून द्यायला तो विसरला नाही.

पण दुर्दैवाने राजारामने लिहून दिलेला त्याचा नंबर माझ्याकडून हरवला. त्यामुळे नंतर त्याच्याशी कुठलाच संपर्क झाला नाही. बाबासाहेबांकडून त्याचा नंबर घेईन म्हटलं, पण तेही राहूनच गेलं.

ह्या घटनेनंतर साधारण नऊ दहा वर्षांनी एकदा दुपारी ठाण्याला मी एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. तिथून जेवून परत घरी येताना, हॉल स्टेशनजवळ होता, म्हणून जेवण जिरवायला चालत स्टेशनकडे निघालो. नेमकं त्याचवेळी माझ्या बुटाच्या सोलने मला दगा दिला. बुटाला सोडून सोल लोंबकळू लागला.

– क्रमशः भाग पहिला

लेखक : श्री राजेंद्र परांजपे 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

 ९८६०००६५९५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अजून पहाट उगवायचीय….” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? जीवनरंग ?

“अजून पहाट उगवायचीय….☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

उगवतीला तांबड नुकतंच फुटू लागलं. कावळ्यांची काव काव, पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. आणि आणि तेव्हढ्यात राजा कोंबडयानं एक खर्जातली धारदार बांग दिली. मग त्या वाडीवरच्या इतर कोंबडयांनी आपला सुरात सूर मिसळला. उषाचं कोवळं उन अंधाराच्या दुलईला गुंडाळून ठेवून लागलं. घराघरांतून चुली फुलू लागल्या. जागी झालेली वाडी हळूहळू आपल्या नेहमीच्या कामाला लागली.

चंद्राक्काला आज श्वास घ्यायलासुद्धा उसंत मिळणार नव्हती. आज तिच्या लेकीची सुंदरीची सुपारी फुटायची होती… सुंदरीनं नशीब काढलं तिला तहसीलदार नवरा मिळाला होता नि चंद्राक्काला स्वर्ग दोन बोटं उरला होता… घरची माणसं, पै पाव्हणं जमू लागली होती. संध्याकाळी चारच्या सुमारास तिकडची मंडळी येणार आहेत असा सांगावा आला होता. सकाळपासून चंद्राक्काचं घड्याळ आज जरा जोरातच पळत होतं… तयारी सुरु झाली आणि बघता बघता अर्धा दिवस संपला; तरी चंद्राक्काची लगबग चालूच होती.. संध्याकाळी पाव्हणं जेवुन जाणार; म्हणजे एक का दोन गोष्टी असणार होत्या.. गोडाधोडाचा स्वयंपाक त्यात जावयाला काय गोड आवडत असेल याचा अंदाज… डाव उजवं.. ताट कसं पंचपक्वानानं भरून गेलं पाहिजे यातच चंद्राक्का बुडून गेली.

दुपारचा सूर्य कलला… घरातल्या गणगोतांचा कलकलाट वाढत गेला. तशात पाव्हण मंडळीं खळयात उतरली. घरातल्या बायांनी जावयासाकट आलेल्या पाव्हण मंडळींचं औक्षण केले. पुरुष मंडळीं जावयासह सोप्याकडे निघाले. तेव्हढ्यात राजा कोंबडयानं आपला लाल तुरा असलेली मान उंचावून एक जोरदार बांग देत त्यांना सामोरा गेला. जणू काही तुमचं स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे अश्या थाटात तो डौलात चालत गेला.

 पाव्हणं ते पाहून अचंबित झाली. जावयाचं लक्ष त्याच्यावर खिळून राहिले… कितीतरी जण वेगवेगळे बोलत होते. पण जावयाच्या मनात तो कोंबडा मात्र घर करून राहिला. शिष्टाचार झाला आणि कार्यक्रम सुरु झाला. काय द्यायचं, काय घ्यायचं. मानपान विषय रंगु लागला. तेव्हा जावई मधेच म्हणाला,

“ फक्त नारळ नि मुलगी एव्हढंच दया! आणि आजच्या जेवणाला तो कोंबडा घाला!” आपल्या बापाकडं बघत जावई पुढं म्हणाला,

 “ मी काय म्हणतो आबा हे इतकचं असुद्या. आता ठरलं म्हणजे ठरलं. जास्त वेळ न दवडता सुपारी फोडा नि कधी आणायचा लग्नाचा घोडा ती तारीख ठरवा”.

जावयाचं हे बोलणं पाव्हण्या मंडळींनी उचलून धरले. पण ते ऐकून चंद्राक्काला धक्काच बसला.. देणं घेणं नाही, मानपान नाही, किती किती सालस माणसं म्हणावीत तरी. पण रितीप्रमाणं गोडधोड जेवण असतयं ते सोडून कोंबडं कापायला सांगितलं म्हणून खट्टू झाली. तसं तिनं एकदा आडून सांगून पाहिलं पण जावयाच्या पुढं पाव्हणं मंडळींचं काहीच चाललं नाही.

तशी चंद्राक्का म्हणाली,

“अवो एक का मस घरात धा कोंबड्या आहेत! करूया कि चमचमीत तुमच्या पसंती प्रमाणं मग तर झालं!”

“धा कोंबड्या राहू द्या बाजूला, तो समोर आलेला कोंबड्याचंचं झणझणीत जेवण होऊ द्या” अशी जावयानं पुष्टी दिली.

“करूया कि! त्या कोंबड्या परास आणखी बाजरीचं दुसरं कोंबडं असं करून घालते कि तुम्ही सगळी बोटं चाटत राहशिला!”चंद्राक्का म्हणाली…

“हे बघा मामी आम्हाला तोच कोंबडा हवाय. दुसरं घालणार असाल तर सुपारी फुटायची नाही. तेव्हा काय ते आताच सांगा.. नसलं जमत तर आम्ही माघारी निघतो”जावयानं निकराचं बोलणं केलं.

चंद्राक्काचे सगळे मार्गच बंद झाले.. एक-दोन जणांनी मध्यस्तीचा प्रस्ताव बुजुर्ग मंडळींपुढे ठेवून पाहिला, पण तोड निघण्याऐवजी तुटण्याची पाळी आली. नाईलाज झाला आणि तोच कोंबडा घालण्याशिवाय पर्याय उरला नाही…

मग घरातल्या मंडळींनी लेकीच्या भल्यासाठी राजा कोंबडा कुरबान केला तर बिघडलं कुठे असं चंद्राक्काला समजवून सांगू लागले.

चंद्राक्का बिचारी दुःखी कष्टी झाली. तिच्या उरात कालवाकालव सुरू झाली… एकिकडे मुलीच्या लग्नाची सुपारी आणि ती फुटण्यासाठी घरच्याच जीवापाड प्रेमानं जतन केलेल्या कोंबडयाची कुरबानी. हे दु:ख तिच्या एकटीचंच असल्यामुळे इतरांना तिच्या भावना कळल्या नाहीत.

अखेर हो ना करता करता शेवटी तो निर्णय झाला आणि त्या कोंबड्याला धरून आणलं. आपल्या कशासाठी आणलय गेलंय हे त्या मुक्या प्राण्याला समजलं..

राजा कोंबड्याला धरून सोप्यातून परसात जाताना एकवार सगळ्या मंडळीकडे त्याने पाहताना चंद्राक्काची दयाद्र नजरेला त्याची नजर भिडली आणि शेवटचा सलाम करावा तसा त्याने एकदाच कॉक कॉक केलं…

 आणि पुढे मानेवरून सुरी फिरवून घेतली. क्षण दोन क्षणाची तडफड मानेची आणि धडाची झाली. चंद्राक्काला वाटलं ती सूरी आपल्याच मांनेवरून फिरली गेलीय. तिच्या डोळ्यातूनं टचकन अश्रू ओघळले…

रात्री आठच्या सुमारास स्वयंपाक तयार झाला. अष्टमीचा चंद्र वर आकाशात लुकलुकणार्‍या चांदण्यासाह प्रकाशू लागला. पण आजा त्याचही तेज निष्तेज वाटत होतं. चांदण्यांच्या प्रकाशात खळयात ताटावर ताट फिरतं होते. हसणे खिदळण्याच्या दंग्यात कोंबड ओरपून खाणं चालल होत… त्यानं जेवणाची लज्जत वाढली होती. चंद्राक्का जरा दुरूनच ते पाहात होती. वरवर हासू दाखवत होती आणि आतून आपलंच काळीज शिजवून घातलं आहे या दुखात ती बुडाली होती…

रात्री उशिरापर्यंत जेवणावळ चालली आणि मध्यरात्रीच्या सुमारास जावई आणि पाव्हण मंडळीं निरोप घेऊन गेली. घरातले इतर नातेवाईक जेवून झोपी गेले. एकटी चंद्राक्का त्या रात्री जेवली नाही आणि चांदण्यांच्या प्रकाशात मुक्यान आपले अश्रु वाहू देत राहिली.

तोच तिच्या कानाशी कुणी बोलले,

‘चंद्राक्का नको रडूस! तसं माझं आयुष्य राहिलं होतं किती? अंग कुणी तरी मानेवर कधीतरी सुरी फिरवून मारण्यापेक्षा घरच्या माणसांच्या कामाला आलो यातच माझं सोनं झालयं! किती जिवापाड जपलंस मला आजवर.. मागे दोन-चार वेळा चोरांनी पकडून नेला होता पण माझ्या ओरडण्याने तू मला सोडवून आणलंस. राजाचा दिमाख तूच मला दिलास!’

चंद्राक्काला हुंदका आवरेना ती म्हणाली,

“असं होईल कधी वाटलं नव्हतं बघ!. तू दुपारी दिमाखात त्यांना स्वागतासाठी गेलास काय आणि त्याच रात्री त्यांच्या जेवणासाठी तुझी कुरबानी व्हावी काय? हि विपरीत लिला का दिसावी?”

‘आपल्या सुंदरीच्या लग्नाला माझाही हातभार लागायला हवा होता ना. मग तो असा आला त्यात काय बिघडल’ राजा कोंबड्यान समजूत घातली.

ती रात्र उसासे टाकत विलय पावत गेली. पहाटेचं तांबड फुटू लागलं. आज कितीतरी दिवसात ते नेहमी पेक्षा अधिकच लाल गडद दिसतं होतं. कावळ्यांची काव काव, पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. आणि आणि…

चंद्राक्काचे जागराणाने डोळे जडावले होते तिला वाटतं होतं कि… राजाची बांग झाल्याशिवाय पहाट काही व्हायची नाही….

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares