मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सखी कवितेस… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ सखी कवितेस… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

(मुक्त छंद)

कविते, तू आहेस तरी कोण ?

माझ्या भावना जाग्या करून

मुक्त करणारी सखी?

तू आहेस म्हणून तर मी जगतेय!

तुझा हात धरून हळुवार फिरतेय

*

सखी कविते, तूच माझी

जीवनदायिनी आहेस!

तूच माझे अस्तित्व टिकवलेस!

मी उन्मळून गेले तेव्हा,

तूच मला सावरलेस!

 

सखी कविते, तू आहेस अथांग!

लपतेस तू अंतरंगात !

 

भावनांचा कल्लोळ करताना,

घेतेस शब्दांचा आधार!

तुझे वर्णन मी काय करणार?

सखे, तू तर जीवनाधार!

 

मनाच्या अथांग सागरी तरंगतेस

 अन् माणिक मोत्यासारखी

येतेस!

माझ्या लेखणीत,

सजीव जीव बनून!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || आई कळली सगळी || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? कवितेचा उत्सव ?

☆ || आई कळली सगळी || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

चूल मांडली वेगळी, मजा वाटली आगळी

दिसा माग दिस गेले, आई कळली सगळी

*

खूणा सांगती भाजल्या, खस्ता केवढ्या खालल्या

तिने मारता फुंकर, थंड कातडी सोलल्या

*

किती कमवावे तरी, काही हिशेब लागेना

धुंडाळले डबे सारे, भूक त्यानेही भागेना

*

कशी जपू नातीगोती, अडसर कुंपणाचा

तिच्या पदराचा झेंडा, साज होतो अंगणाचा

*

जेव्हा थोडे आईपण, आले माझ्या खांद्यावर

झाला चेहरा मळका, थांबल्याने बांद्यावर

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जादू… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जादू… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

शितलता

दोहोतही

एक शशी

दुजी सदगुरु आई…

*
सुखद शांत

तरंगे मन

अलवार क्षण

पिसापरी वर जाई…

*
उघड्या नयनी

ध्यान लागे

निसर्ग पाहूनी

मन आनंदाने नाचे….

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 266 ☆ बदल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 266 ?

☆ बदल ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

किती बदलते सगळेच ,

एका रंगपंचमीला रंगीबेरंगी साड्या

नेसून मॉर्निंग वाॅकला गेलो….

आणि झाशीच्या राणीच्या,

पुतळ्याजवळ ,

साजरी झाली गप्पांची

रंगपंचमी !

 

एका तुकाराम बीजेला,

केली देहूची वारी,

कविता तिथेही होतीच,

आपली सांगाती!

 

गुढीपाडवा ही साजरा केला,

कवितेची गुढी उभारून

धुळ्यात!

दौंडची ‘भोगी’

 संक्रांत, दसरा,

दिवाळी, पंधरा ऑगस्ट,

सव्वीस जानेवारी, शिवरात्र….

सारेच सण आणि उत्सव,

कवितेच्या रंगात रंगलेले !

 

पण आता,

कुणाच्या तरी कवितेत ऐकलेलं—-

हे कवितेचं मांजर,

मलाही पोत्यात घालून,

दूर कुठेतरी सोडून —

द्यावसं वाटतंय ,

आणि हीच समारोपाची ,

कविता ठरावी असंही !!

१ एप्रिल!२०२५

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कविता म्हणजे… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ कविता म्हणजे… सौ. वृंदा गंभीर

कविता म्हणजे शुभेच्छा शब्दांचे मोती

कविता म्हणजे फुलतात नाती गोती

*

कविता म्हणजे एक लघु कथा

कविता म्हणजे कविंच्या मनातील व्यथा

*

कविता म्हणजे शब्दांचे भांडार

कविता म्हणजे अक्षरांचे आगार

*

कविता म्हणजे फुलणारे प्रेम

कविता म्हणजे बेवफा जखमी प्रेम

*

कविता म्हणजे अन्याया विरुद्ध लढा

कविता म्हणजे अनुभवाने दिलेला धडा

*

कविता म्हणजे कस लागलेली बुद्धीमत्ता

कविता म्हणजे कवी ने मिळविलेली सत्ता

*

कविता म्हणजे छंद, आनंद, विश्वास

कविता म्हणजे कवीच्या लेखणीचा श्वास

💐जागतिक कविता दिनाच्या सर्व कवी कवियत्री साहित्यिक बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा 💐

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रिक्त मडके… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ रिक्त मडके… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

तिने अ‍ाणल्या पावसात,

मलाही भिजायचे होते.

तिच्या प्रेमाच्या सावलीत,

मलाही निजायचे होते.

*

अनाकलनीय तिची ती माया.

गूढ, अतर्क्य जी तितिक्षा.

वाट्याला माझ्या केवळ,

आली घोर उपेक्षा.

*

सरी आल्या बरसून गेल्या,

ठेऊन मडके रिक्त.

पावसात शोधणे आता,

हटवादी शैशव फक्त.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सूक्ष्मजीव… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

डॉ. मधुवंती कुलकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ सूक्ष्मजीव… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

💐जागतिक कविता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐

(सूक्ष्मजीव शास्त्र व कविता यांचा समवाय साधण्याचा प्रयत्न. कोणत्याही विज्ञान शाखेतील पुस्तकांच्या निर्मितीसाठी, परस्पर मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण यशस्वी होण्यासाठी भाषा ही महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.)

सूक्ष्मजीव असति जळी स्थळी काष्ठी आणि पाषाणी

करावी लागते सूक्ष्मदर्शकातून त्यांची नेमकी पहाणी

*

सुंदर निर्मियले जग हे परमेश्वराने चित्र मनोवेधक जाहले

मानवा बरोबर जीवाणू, विषाणू, अल्गी प्रोटोझोआ अवतरले

*

विरजण लावत, इडलीचे पीठ आंबवत आई-आजी मोठ्या झाल्या.

लॅक्टोबॅसिलस आणि यीस्ट त्यांच्या प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडू लागल्या

*

ॲंटोनी, पाश्चर, ॲलेक्झांडर, रॉबर्ट यांनी आयुष्य सर्व वाहिले.

सूक्ष्मजीवांवर संशोधन करताना जीवन समर्पित जाहले.

*

आरोग्य, उद्योग, औषधे, अन्न सुरक्षा यांना विस्तारते सूक्ष्मजीवशास्त्र

अथांग पसरलेले सखोल, शाश्वत असे हे मार्गदर्शक तत्त्वांचे शास्त्र

*

महाकुंभ मेळ्यात भरला माणसांच्या गर्दीचा अपूर्व हाट

कोडे सुटेना साथीचे रोग नाहीत गंगेचे गुण आवडीने गाई भाट

*

ठेवला प्रश्न पुढे उत्तर शोधण्या सर्व ज्ञानी संशोधक प्रतिभावान

उत्तर मिळता सुदिन म्हणूया संसाधने असती ही गुणवान

*

जागतिक कविता दिनी प्रसन्नतेने वाहते ओंजळभर कृतज्ञ फुले

आशिर्वाद गुरूंचे घेऊनि विस्तारू विज्ञान कक्षा वेचूनि ज्ञान फुले

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #278 ☆ हेका टाळण्यात गोडी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 278 ?

☆ हेका टाळण्यात गोडी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

देह गुऱ्हाळ केलेत, इतकी वागण्यात गोडी

वाटे घुंगरासारखी, तुमच्या बोलण्यात गोडी

*

येता दुसऱ्याच्या घरात, केला निर्मिती सोहळा

संसाराच्या चुलीमध्ये, हाडे जाळण्यात गोडी

*

गाठ मित्राच्या सोबती, होती सकाळीच पडली

सूर्यासोबत वाटावी, येथे पोळण्यात गोडी

*

कष्ट विस्मरणात जाती, बाळा पाहुनी झोळीत

फांदीवरती ही झोळी, वाटे टांगण्यात गोडी

*

सात जन्मातही नाही, त्यांचे फिटणार उपकार

आई-बापाचे हे ऋण, आहे फेडण्यात गोडी

*

वृक्षवल्ली तुकारामा, सारे तुमचेच सोयरे

माझ्यामध्ये शिरला तुका, झाडे लावण्यात गोडी

*

संन्यस्ताश्रमास पाळा, देईल शरीर इशारा

टाळा साखर झोपेला, हेका टाळण्यात गोडी

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कविता माझी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ कविता माझी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

(जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !)

वेगे येते, ठावही घेते

सर्वांसाठी वेधक ठरते

कधी सुखाचे, सडे शिंपते

दु:खाने कधी, मनास भिडते

शब्दांचाही साज मिरविते

प्रतिभेचे ही लेणे लेते

एकलीच मी कधी न उरते

सांगाती ती सदाही ठरते

माझी कविता क्षणात स्फुरते

कविता माझी सोबत करते.

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद.

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आश्चर्य… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

आश्चर्य… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

पोट दुखो, पाठ दुखो, हात दुखो, मान

डोकं दुखो, पाय दुखो, नाक दुखो, कान

काही झालं, तरी आपलं, औषध पोटात घ्यायचं?

औषधाला कसं कळतं, कुठल्या गल्लीत जायचं?

*

जिथे दुखतं, तिथे कसं, हे औषध पोचतं?

उजेड नाही, दिवा नाही, त्याला कसं दिसतं?

हातगल्ली, पायगल्ली, पाठीचं पठार

छातीमधला मोठा चौक, पोटाचा उतार

*

फासळ्यांच्या बोळामधून, इकडेतिकडे वाटा

औषधाला कसं कळतं, कुठून जातो फाटा?

लालहिरवे दिवे नाहीत, नाही पाटी, खुणा

पोलीसदादा कुठेच नसतो, वाटा पुसतं कुणा?

*

आई, असं वाटतं की, इतकं लहान व्हावं

गोळीबरोबर पोटात जाऊन, सारं बघून यावं

आईने गपकन धरलं, म्हणे, बरी आठवण केली

आज तुझी आहेच राजा, ‘एरंडेलची पाळी

कवी : अज्ञात

प्रस्तुती :सौ. उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares