मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “कैसे द्यावे उत्तर…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “कैसे द्यावे उत्तर…” ☆ श्री सुनील देशपांडे

जबाबदारी नको कोणती

हक्कासाठी मारू पत्थर

झुंडशाहीला लोकशाहीने

सांगा कैसे द्यावे उत्तर

 

मला हवे ते मला मिळावे

मी म्हणतो ते एकच उत्तर

ठोकशाहीला लोकशाहीने

सांगा कैसे द्यावे उत्तर

 

मोडू तोडू सदा कायदा

नशेत बरळू आम्ही निरंतर

झोकशाहीला लोकशाहीने

सांगा कैसे द्यावे उत्तर

 

सीमेवरती शत्रू ठाकला

सडेतोड ते देऊ उत्तर

अराजकाला लोकशाहीने

सांगा कैसे द्यावे उत्तर

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नंदादीप… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ नंदादीप… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मनाच्या सुरक्षित कोप-यात

सतत तेवणारा

तुझा नंदादीप

भवसागरात भरकटलेल्या

माझ्या आकांक्षांच्या गलबताला किना-यावर प्रकाशमान झालेल्या परोपकारी दिपस्तंभासारखा वाटतो.

 

तो खुणावत असतो,

सांगत असतो,

ये , थांब इथं,

हा संपन्न किनारा सुरक्षित आहे तुझ्यासाठी.

इथ भक्कमपणे पाय रोवून बघ एकदा

आकाशाकडे

कर सेवा विशाल धरतीची

ती स्वीकारतील तुला,

पुरवील तुझ्या सर्व आकांक्षा,

पण अट एकच,

श्रद्धेनं वास्तवाला आलिंगन देण्याची,

चालत राहण्याची, .

स्वकष्टाने प्रकाशित होण्याची,

 

तरंगत राहून स्वप्नं

पूर्ण होत नाहीत कधी,

इथं वावरणारे सारेच तुला

सटीक समृद्धिची भाषा शिकवतील

दिशा दाखवतील

उज्वलतेच्या

कारण इथं अस्तित्वात असलेलं सारं

इथंच वाढणारं आणि

इथंच  मुरणारं आहे.

इथे नाही गाज झुलवत ठेवणारी.

इथल्या प्रत्येक प्रकृतीला तुला मिठी मारता येईल माझीच म्हणून.

मग तुला  नंदादीपाची

गरज भासणार नाही

कालांतराने तूच होशील नंदादीप वास्तवतेतला, पुजणारा, भजणारा, मानणारा.

आणि तिच्याच चरणी लीन होणारा.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #203 ☆ ‘शालीन तंबोरा…’ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 203 ?

☆ शालीन तंबोरा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

पतंगासारखा होतो, कुणी हा छाटला दोरा

गगन हे भेदणारा मी, क्षणातच उतरला तोरा

हृदय तू चोरुनी नेले, जरी कुलपात ते होते

कसा रे प्राणवायूतुन, उतरला आत तू चोरा

सुका दुष्काळ पडलेला, ढगातुन होइना वृष्टी

तुला पाहून बरसूदे, असा तू नाच रे मोरा

दुधावर साय धरताना, फसफसू लागले आहे

कमी कर आच तू थोडी, उतू जाऊ नको पोरा

उतरते कर्ज श्वासाचे, कुडी सोडून जाताना

तनाचा सातबाराही, बघा झाला कसा कोरा

असे अंधार पाठीशी, समोरी तू उभी आहे

नको ना दीप तू लावू, तुझा तर चेहरा गोरा

रसिकता कालची येथे तुला दिसणारही नाही

सखे तू गा तुझे गाणे तुझा शालीन तंबोरा

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पाऊलखुणा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि सुश्री निलांबरी शिर्के ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  पाऊलखुणा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि सुश्री निलांबरी शिर्के ☆

श्री आशिष बिवलकर   

?– पाऊलखुणा… – ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

( १ )

हातात हात तुझा,

करू सोबत जीवनाचा प्रवास !

हृदयावर कोरले नाव तुझे,

रम्य वाटतो तुझा सहवास !

श्वासात माझ्या,

दरवळे तुझाच गंध !

स्वर्गीय सुखासारखे,

तुझ्या प्रीतीचे मर्मबंध !

फेसळणारा विशाल सागर,

तुझ्या माझ्या प्रीतीची देतोय साक्ष !

अथांगता त्याची हृदयात,

तुझ्या प्रीतीतच दिसतो मज मोक्ष !

तुझ्या माझ्या पाऊलखुणा,

या लाटा  सहजच  पुसतील !

मनातल्या गाभाऱ्यात सदैव,

आपल्या प्रेमाचे ठसे दिसतील !

चिरंजीवी असू दे,

आपल्या प्रेमाची कहाणी !

माझ्या हृदयाचा तू राजा,

तुझ्या ह्रदयाची मी राणी !।

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

सुश्री नीलांबरी शिर्के

?– पाऊलखुणा… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

( २ ) 

हातात  हात आश्वासक  साथ

न बोलता कळते काय मनात

जोडीने पावलाचे ठसे उठती

ओलसर वाळूत सागर काठात — 

 लाटा गाजेच गीत गात येतील 

 पाऊल खुणांना सवे नेतील

 रोज समूद्राच्या गाजेमधून 

 आपल्या प्रेमाचे गीत गातील —

 अथांग  सागर असंख्य  लाटा

 त्यात आपला तरलसा वाटा

लाटा ,सागर ,रेती ,किनारा

आपल्या आनंदाच्या पेठा —

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी म्हणाले… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मी म्हणाले… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

मी म्हणाले , ये

लवकर ये

रिमझिमत ये

फूलकोषात झिरपत ये

नदी-नाले भरत ये

बीजातला अंकुर जागवत ये

नवे जीवन घडवत ये

सृष्टी सुजलाम् सुफलाम् करत ये

तू आलास

लगेचच आलास

दौडत आलास. झोडत आलास.

फूल-पाने मोडत-तोडत

नदी-नाल्यांना पूर आणत

बीजातला अंकुर कुजवत

अवघे जीवन नष्ट करत

सृष्टीमध्ये विनाश घडवत

तू आलास

असा रे कसा आलास ?

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 141 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 141 ? 

☆ अभंग…

आपुले जपावे, यशस्वी होवावे

यश संपादावे, अनेकांना.!!

कुणी नं कुणाचे, एकटे शेवटी

आवरा शेपटी, योग्य-वेळी.!!

पाहणी करावी, आखणी करावी

घाई ती नसावी, अवकाळी.!!

कवी राज म्हणे, चार ते जोडावे

बाकीचे तोडावे, बिनकामी.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मी आणि माझा एकांत…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “मी आणि माझा एकांत” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

मी आणि माझा एकांत

यांची पडता गाठ

एक नाही दोन नाही

प्रश्न सुटतात साठ…

 

माझ्यातील मला

दिशा नवी मिळते

काय चूक काय बरोबर

इथेच तर कळते..

 

कधी कुठं त्याला गाठायचं

हे लागलं कळायला

त्याची न माझी वेळ मग

आपोआप लागली जुळायला…

 

जगाच्या पसाऱ्यातही

मी असते पसार

कितीही असली गर्दी

वाटतो एकांताचाच आधार…

 

आपल्यातच दडलेले रहस्य

इथेच तर उलगडते

कमी जास्त सारं काही

स्वतःमध्येच सापडते….

 

त्याच्यासोबत प्रत्येक क्षण

असतो नवा कोरा

दिवस असो वा रात्र

वाटतो वेळ अपुरा…

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चांद्रयान मोहीम ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ चांद्रयान मोहीम ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

 काल चांदणे खुदकन हसले,

   नभांगणी या रात्री !

अवनी वरच्या यान भेटीने,

   केली जगाशी मैत्री !……१

 

यान उतरले चंद्रावरती,

  पहात होत्या चांदण्या!

चमचम करीत सज्ज जाहल्या,

  स्वागतास जाण्या !…..२

 

पहात होते अनुपम सोहळा,

 पृथ्वीवरचे जन !

आनंदाने न्हाऊन  गेले ,

भारतीयांचे मन !……३

 

भारत भूचा विजय दिन,

  असे हा अवर्णनीय!

चांद्रयानाने कोरले वरती,

   सुवर्णाचे ते पाय……४

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ‘चांद्रयान – ३’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘चांद्रयान – ३‘ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

आकाशाशी जोडले नाते धरणीमातेचे,

 चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके!

 

 शास्त्रज्ञांनी देखियले हो स्वप्न भव्य येथे,

  इस्त्रोमधूनी हालवली मग पहा त्यांनी सूत्रे,

 प्रयत्न त्यांचे आज पहा हे यशस्वी झाले,

चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके! ||१||

 

  चंद्रावरती प्रथम उतरूनी, विक्रम हा केला ,

  जगामध्ये या  वाजतसे हो भारताचा डंका,

  बांधली  राखी चांदोबाला, आज वसुंधरेने,

 चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके! ||२||

 

  कडकडाट टाळ्यांचा झाला, दुमदुमली अवनी,

  शास्त्रज्ञांच्या डोळ्यांमधूनी आनंदाश्रू झरती,

  सार्थक झाले आज वाटते त्यांच्या तपस्येचे,

  चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके! ||३||

 

    अपयशातून रचली आम्ही आज  यशोगाथा,

       ठेवू उन्नत सदैव आम्ही भारतभूचा  माथा,

     रवी-शुक्र हे लक्ष्य आमुचे, आता या पुढचे,

    चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके! ||४||

 

    आकाशाशी जोडले नाते धरणीमातेचे,

     चांद्रयान चंद्रावर गेले, तिरंगा डौलाने फडके!

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – सोनेरी तारा… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– सोनेरी तारा… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

गच्च  काळोखाची रात

तारा सोनेरी प्रकाशला

माणकांचा इवला तुरा

त्यास कोणी जडविला …. 

 तारा  चमचम करी

 काळ्या पार्श्वभूमीवरी

 मोतियाची ही आरास

 शोभतसे  तयावरी …. 

 तारा आकाशात  उगवला 

सुवर्ण  झळाळी अंधाराला 

दुधाळ चांदणे नित्य पसरते

आजची रजनी गुरूपुष्याला …. 

 गुरूपुष्य नक्षत्र  आभाळाला

 दान मिळाले कुठून आजला

 निशाराणीच्या  तमशालीवर

 सोनेरी तारा जडला गेला …. 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print