आपल्या समूहातील लेखिका व कवयित्री सुश्री दीप्ती कुलकर्णी यांना नुकताच “माझी लेखणी साहित्य मंच “ ता. शहापूर, जि. ठाणे आयोजित, रामायण काव्यलेखन मंच या अंतर्गत “रामायणावर आधारित काव्यलेखन “ या विषयावरील महास्पर्धेत “सर्वोत्कृष्ट काव्यलेखन “ म्हणून प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले आहे. आपल्या सर्वांतर्फे दीप्तीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.💐
आजच्या अंकात ही पुरस्कारप्राप्त कविता प्रकाशित करत आहोत.