मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गतसालातुन नववर्षाकडे …. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ कवितेचा उत्सव ☆ गतसालातुन नववर्षाकडे …. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे 

काय लिहावे तुझ्या वरती,

हे मावळत्या गत साला!

शतकानंतर संकटाचा,

कसा घातलास तू घाला!

 

स्वागत तुझे केले तेव्हा,

आम्ही जरी नव उत्साहाने!

बीज पेरले जगी त्या क्षणी,

ह्या कोरोनाच्या व्याधीने !

 

जाणीव झाली  कोरोनाची,

येई तो मुंगीच्या पावली !

जगभर पसरत गेली ,

हळूहळू मृत्यूची सावली!

 

कसा जिवाणू, कुठे प्रकटतो,

त्या होते जग अज्ञानी !

मास्क, सॅनिटायझर आधार ,

होती सार्या समाज जीवनी!

 

कसे वर्ष हे गेले अमुचे,

भीतीच्या छायेखाली!

नव साल हे येईल आता,

जगी सुखद पाऊली !

 

आशेवरती जगतो माणूस,

विश्वास दाखवत स्वतः वरी!

व्हॅक्सीन शोधून मात करील

तो आल्या संकटावरी !

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 78 ☆ पाचोळा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 78 ☆ पाचोळा ☆

मी मृत्यूच्या काठावरती बसून आहे

मृत्यू पुरता माझ्यावरती रुसून आहे

 

काठावरती ऐकू येते खळखळ त्याची

याच मृत्युने केली आहे माझी गोची

कळते त्याला मी तर गेलो खचून आहे

 

झाडावरती सडून जाणे नको नशिबी

दाणे भरले छाटा आता लवकर ओंबी

पडूदेत रे फळ जे गेले पिकून आहे

 

फळा फुलांना हिरवी पाने कवेत घेती

पानगळीचा ऋतू कसा हा खुडतो नाती

डोळ्यांमधले गेले पाणी सुकून आहे

 

आठवणींचा पाडा होता माझ्या सोबत

त्याच त्याच त्या जुनाट गप्पा असतो मारत

भूतकाळ तो रोज काढतो पिसून आहे

 

आत्मा गेला देहाचे ह्या हलके ओझे

तरी वाटते छानच आहे नशीब माझे

पाचोळा मी  तरी मातिला धरून आहे

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लपंडाव ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ लपंडाव ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

अशीच एक सायंकाळ

विरहाने व्यापलेली

दुःखाने ओथंबलेली

अस्वस्थतेच्या गाभार्यात

खोलवर दडलेली

 

अशीही एक सायंकाळ

हास्याने फुललेली

आनंदाने बहरलेली

उत्फुल्लतेच्या जाणिवेत

उत्साहाने ओसंडलेली

 

ही संध्या-ती संध्या

कोण ही?कुठली ती?

नव्हे ,हा तर खेळ असे

लपाछपीचा-सुखदुःखांच्या पाठशिवणीचा.

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 30 ☆ ओढ़ ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 30 ☆ 

☆ ओढ….

ओढ कृष्णाची

मिरेस होती

कृष्ण ध्यासात

पूर्ण निमग्न ती

 

तिला नको होते

अजून ते काही

फक्त एक कान्हा

त्याची होण्यास ती पाही

 

तुपाचा घास तिला

विष भासत होता

प्रत्यक्ष विष प्याला

तिने प्यायला होता

 

दिली विष परीक्षा

ओढ प्रबळ झाली

त्या मुळेच विष

अमृतवेल बनली…

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दृष्टीकोन ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ कवितेचा उत्सव ☆ दृष्टीकोन ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे 

निसर्गचित्र पाहून ती म्हणाली

बघ आभाळ

मी म्हणालो स्वप्नांचे विश्व.

 

ती म्हणाली वाहते पाणी.

मी म्हणालो जागृत जीवन

 

ती म्हणाली फुले

मी म्हणालो समर्पण

 

ती म्हणाली मार्ग दगडाचा

मी म्हणालो विकासाचा संघर्ष.

 

ती म्हणाली बैलबंडी

मी म्हणालो गतीचे सहजीवन

 

ती म्हणाली डोंगराची रांग

मी म्हणालो  हिम्मत संघर्षाची

 

ती म्हणाली उगवता सूर्य

मी म्हणालो जगाचा पोशिंदा

 

ती म्हणाली शेत,शेतकरी

मी म्हणालो निर्मितीचा आनंद

 

ती म्हणाली अरे निसर्ग हा

मी म्हणालो दृष्टिकोन जीवनाचा

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चाफा ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

☆ कवितेचा उत्सव ☆ चाफा ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

उमलावया कळ्यांची असतेच आस बाकी

मौनात आज त्यांच्या लपलाय ध्यास बाकी

 

योजून ठेवलेले घडले जरूर नाही

करण्यास साध्य सारे फुलतोय श्वास बाकी

 

खपलो जरी तरीही शेती दगाच देते

कर्जात अडकल्याचा बसतोय फास बाकी

 

संमृद्ध ज्ञानसाठा सरला कधीच नाही

उधळा कुणी कितीही दिसतेच रास बाकी

 

प्रेमात प्रेमिकांचा असतो रुबाब मोठा

संसार मांडताना होतोच दास बाकी

 

दडवून ठेवलेला गंधाळतोच चाफा

हळव्या मनास त्याचा कळतोच वास बाकी

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एकांती ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक उमराणी

☆ कवितेचा उत्सव ☆ एकांती ☆ श्री मुबारक उमराणी ☆

एकांती ठसते

वेदना कुणाला

काहूर सलतो

निशब्द मनाला

 

अंतरी जळतो

विचार जळण

धुरांचे वेटुळे

श्वासांचे दळण

 

थरथरे ओठ

अश्रुंचा तो पूर

स्मित हास्यरेषा

लोपतो तो नूर

 

अंकुश वेदना

सहन होईना

प्रयत्न करुनी

रडता येईना

 

रस्त्याची वर्दळ

मारीते रेघोट्या

दिवे लाल, रक्त

भरती रे पेट्या

 

धुराने माखती

फुलझाडे येथे

छळती अंतरी

वेदनेचे जथ्थे

 

© श्री मुबारक बाबू उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य – वाटे तुलाच स्मरावे ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ विजय साहित्य ☆ वाटे तुलाच स्मरावे ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अष्टाक्षरी)

वाटे तुलाच स्मरावे

विरहाची ज्वाला व्हावे.

स्मृती यज्ञी पूर्णाहुती

सुमनांची माला व्हावे .

 

प्रेम, प्रीती अन प्रिया

जगण्याची भाषा झाली.

बकुळीच्या झाडाखाली

जीवनाची वाचा न्हाली.

 

नवथर तारूण्याची

आस मला जगवीते.

हरण्याची नाही चिंता

भास जीवा फसवीते.

 

अनुभूती अन भाषा

रस्ते बदलत आहे .

हळवेल्या भेटी सा-या

शल्य  विचारत आहे.

 

भेटी गाठी श्वास तुझा

पदोपदी जाणवतो.

आठवांचा ऋतू  असा

आठवात घालवतो.

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ख्रिसमस ट्री ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ कवितेचा उत्सव ☆ ख्रिसमस ट्री ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

निळ्याशार त्या सागराच्या

भव्य त्या किनारी

 

गर्द त्या माडबनी

अवखळ  पक्षांपरी

वाऱ्यासंगे मारू भरारी

 

पिऊनी मग नारळपाणी

मनी भरू तरारी

दुरुनी माड पाहता  परी

जणू वाटे ख्रिसमस ट्री

 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रेमरंग…. ☆ सौ. राधिका भांडारकर

☆  कवितेचा उत्सव ☆ प्रेमरंग… ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

प्रेम प्रेमच असते

त्याला लांबी रुंदी नसते

ऊंची जाडीही नसते

नव्हे कसलीच भूमिती नसते…

 

प्रेम प्रेमच असते

त्याला  वय नसते

वेळही नसते

कसली चौकटही नसते……

 

प्रेम प्रेमच असते

काय पाहिलंस तिच्यात

ना रंग ना  रुप ना आकार

प्रेमात या प्नश्नाला ऊत्तर नसते…

 

प्रेम प्रेमच असते

कधी मृदु कधी कठोर

कधी अबोल कधी शब्दात असते

सदैव दवबिंदुत भिजलेले असते

 

प्रेम प्रेमच असते

मातीच्या बोळक्यांवर असते

लेकुरवाळ्या परिवारावर असते

नाति चरामी  या शपथेवरही असते……

 

प्रेम प्रेमच असते

तालात असते सुरात असते

भूपाच्या शांतरसात असते

ठुमरीच्या शृंगार रसातही असते….

 

म्हणून म्हणते

प्रेम प्रेमच असते

आभाळात मावत नसते

प्रेमाचा रंग कोणता ?माहीत नसते….

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares