मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 93 ☆ गुढी उभारू दारी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 93 ☆

☆ गुढी उभारू दारी ☆

 

नववर्षाचे स्वागत करुया गुढी उभारू दारी

गुढीस साडी नेसवलेली होय पैठणी कोरी

 

अंधाराची सुटका करण्या अवतरली ही स्वारी

एक सूर्य अन् दिशा उजळल्या धरतीवरच्या चारी

 

सडसडीत ह्या युवती साऱ्या साड्या नेसुन भारी

सज्ज स्वागता उभ्या ठाकल्या घरंदाज ह्या पोरी

 

गुढी बांधली नववर्षाची बळकट आहे दोरी

प्रसादात या लिंब कोवळे गूळ आणखी कैरी

 

चौदावर्षे वनवासाची सजा संपली सारी

आयोध्याच्या नगरीमधले हर्षलेत नर नारी

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चैत्र  पालवी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ चैत्र  पालवी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

 

काल होते शुष्क सारे

आज  फुटले हे धुमारे

पालवीचे हात झाले

अन् मला केले इशारे

चैत्र आला,चैत्र आला

सांगती हे  रंग  सारे

नेत्र झाले तृप्त आणि

शब्द  हे  अंकुरले

आम्रवृक्षाच्या तळाशी

दाट छायेचा विसावा

पर्णराशीतून अवचित

कोकीळेचा सूर यावा

ही कशी बिलगे सुरंगी

रंग मोहक लेऊनी

मधुरसाच्या पक्वपंक्ती

वृक्ष हाती घेऊनी

जांभळीला घोस लटके

शिरीषातूनी खुलती तुरे

पळस,चाफा,सावरीच्या

वैभवाने मन भरे

चैत्र डोले हा फुलांनी

वृक्ष सारे मोहोरले

पाखरांच्या गोड कंठी

ॠतुपतीला गानसुचले

भावनांचे गुच्छ सारे

शब्दवेलीवर फुलावे

रंग माझ्या अंतरीचे

त्यात मी पसरीत जावे

साल सरले एक आता

सल मनातील संपवावे

स्वप्नवेड्या पाखराने

चैत्रमासी गीत गावे.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शुभकामना ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ कवितेचा उत्सव ☆ शुभकामना ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

नवे संवत्सर

नवसंक्रमण

सुखस्वप्नांना

नवे परिमाण ||

 

कात टाकूनी

सृष्टी नव्याने

बहरून येईल

नव्या जोमाने ||

 

नव्या वाटेवर

सरतील भोग

नव्या दमाचे

नवे उपभोग ||

 

लाभो सकलांना

आरोग्याचा ठेवा

आनंदाने जावे

सौख्याच्या गावा ||

 

सर्वे सन्तू निरामय:

ही मनोमनी प्रार्थना

नवे वर्ष सुखाचे जावो

देते शुभकामना ||

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ क्षण—- ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ कवितेचा उत्सव ☆ क्षण—- ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

व्यस्त व्यग्र दिवसातले

मोजकेच, मोहक पण

निसटते क्षण ..

भेटतात मला न चुकता

चोरुन भेटणाऱ्या

प्रेयसीसारखे ||

आसाभोवती फिरणाऱ्या

चाकासारखं

आयुष्याला जखडून फिरतांना

मनाची झीज थोपवायला

धावून येतात हे क्षण —

वंगण असल्यासारखे ||

चहूबाजूंनी मनावर कोसळू

पहाणारा

आघातांचा बेभान पाऊस

निश्चलतेच्या गोवर्धनावर

थोपविण्यासाठी ..

पुरतात हे क्षण

कृष्णाच्या करंगळीसारखे||

उदास निराश काळोखात

अंदाजानेच चाचपडतांना

हळूच वाट दाखवतात हे

आशेचे प्रकाशकण होऊन

काजव्यांसारखे ||

नकळत पहाते वाट मी

या संजीवक अनमोल क्षणांची

जेव्हा उरते फक्त मीपणच

माझे ..

वादळवाऱ्यात, एकाट-देवळात

मिणमिणत राहिलेल्या

पणतीसारखे || ……..

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 41 ☆ कुठे हरवली प्रीत… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 41 ☆ 

☆ कुठे हरवली प्रीत… ☆

(दश-अक्षरी…)

कुठे हरवली प्रीत सांगा

तुटला कसा प्रेमाचा धागा…०१

 

स्नेह कसे आटले विटले

तिरस्काराचे बाण रुतले…०२

 

अशी कशी ही बात घडली

संयमाची घडी विस्कटली…०३

 

मधु बोलणे लोप पावले

जसे अंगीचे रक्त नासले…०४

 

तिटकारा हा एकमेकांचा

नायनाट ऋणानुबंधाचा…०५

 

अंधःकार भासतो सर्वदूर

लेकीचे तुटलेच माहेर…०६

 

भावास बहीण जड झाली

पैश्याची तिजोरी, का रुसली…०७

 

कोडे पडले मना-मनाला

गूढ उकलेना, ते देवाला…०८

 

माणूस मी कसा घडवला

होता छान, कसा बिघडला…०९

 

राज विषद, मन मोकळे

सु-संस्कार, सोनेचं पिवळे…१०

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साधू ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

☆ कवितेचा उत्सव ☆ साधू ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

कल्पतरूच्या छायेखाली दिसला साधू

देवपणाचे दान मागुनी फसला साधू

कफनी अंगी जटा बांधल्या डोईवरती

परंपरांचे खूळ माजवत बनला साधू

 

चिलीम छापी घेऊन हाती भरला गांजा

झुरक्यावरती मारीत झुरके गुतला  साधू

ध्यानधारणा करून खोटी मजा मारतो

देवासंगे मारत बाता‌ बसला साधू

 

भाळावरती  नाम ओढला वैराग्याचा

जग फसल्यावर मनात त्याच्या हसला साधू

गंडवण्याला समाजातले दुवे शोधले

माणसातल्या अर्धवटांवर टपला साधू

 

शृंगाराची नामी संधी आली तेव्हा

शिष्यामधल्या मासोळीतच रमला साधू

सत्व कोठले तत्व कोठले दिसले  नाही

ढोंग माजवत आयुष्यातून उठला साधू

 

थाटमाट तर भव्यपणाचा मठात त्याच्या

बडवत डंका चौमुलखावर  फिरला साधू

मंबाजीच्या जातकुळीची ब्याद निपजली

मग लोकांनी उखळा मध्ये कुटला साधू

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बेलगाम सत्य ☆ सौ. सुजाता काळे

सौ. सुजाता काळे

☆ कवितेचा उत्सव ☆ बेलगाम सत्य ☆ सौ. सुजाता काळे ☆

जगण्याच्या शर्यतीत धावत होतो,

मरणाच्या वारीस ढकलीत होतो;

कैफियत मांडली लोक दरबारी,

मी शाश्वत सत्यास तुडवित होतो.

 

केल्या कैक मैफिली सुरेल गाण्याचा,

आनंद निरागस शोधित होतो;

सुकलेले गजरे चुरगळले जेव्हा,

मी माज देहाचा उतरवित होतो.

 

हारलो स्वजनांचे चोचले पुरवित,

आभास मृगजळाचा लपवित होतो;

संपलेल्या रात्री शोधल्या पहाटे,

मी हरवलेले क्षण मोजित होतो.

 

भावुक झालो आतुरल्या नात्यात,

प्रतारणेत वेदनेच्या वाहत होतो;

नव्हतेच माझे कळल्यास जेव्हा ,

मी सत्यास बेलगाम दौडवित होतो.

© सुजाता काळे
 8/8/19

पाचगणी, महाराष्ट्र, मोबाईल 9975577684

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 15 – कवितेशी बोलू काही ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

 ☆   साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 15 – कवितेशी बोलू काही ☆ श्री शेखर किसनराव पालखे ☆ 

अनामिक हे सुंदर नाते

तुझ्यासवे ग जुळून यावे

तुझ्याच साठी माझे असणे

तुलाच हे ग कळून यावे

 

आनंदाने हे माझे मन

सोबत तुझ्या ग खुलून यावे

दुःखाचे की काटेरी हे क्षण

कुशीत तुझ्या ग फुलून यावे

 

भेटावी मज तुझी अशी ही

घट्ट मिठी ती हवीहवीशी

अथांगशा या तुज डोहाची

अचूक खोली नकोनकोशी

 

रुजावेस तू मनात माझ्या

प्रेमळ नाजूक सुजाणतेने

तूच माझे जीवन व्हावे

अन तुच असावे जीवनगाणे

 

© शेखर किसनराव पालखे 

सतारा

05/06/20

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ‘नि:संग’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर

सुश्री संजीवनी बोकील

 ☆ कवितेचा उत्सव ☆ ‘नि:संग’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ 

स्वत:चं सामान्यत्व

फार छळू लागलं

की म्हातारीच्या पिसाकडे बघावं

स्वच्छंदपणे कसं

उडत असतं हवेत

आपल्याला कुणी गरुड

म्हणत नाही

याची त्याला खंत नसते

बळकट पंख नसल्याचा

खेद नसतो

आकाशाचा अंत गाठण्याचा

हव्यास नसतो

अन् पृथ्वीचा ठिपका

होउन जाण्याइतकी

उंची गाठायचा मोह नसतो.

आपल्याच मस्तीत भिरभिरत

हवेशी जुळवून घेत

आपल्या हलक्या अस्तित्वाला

सहजपणे स्वीकारत

ते मजेत जगून घेतं

उंचावर गेल्यावर

जमिनीची भीती नसते

अन् जमिनीवर उतरल्यावर

नसतो आकाशाचा मोह!

म्हणून

स्वत:चंं सामान्यत्व

फार सलु लागलं

की बघावं

नि:संग भिरभिरणार्‍या

म्हातारीच्या पिसाकडे….

 

सुश्री संजीवनी बोकील

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)

प्रस्तति: सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 82 – विजय साहित्य – अस्तित्व….! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 82 – विजय साहित्य ☆ अस्तित्व….! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

शब्दांनीच शब्दांची

ओलांडली आहे मर्यादा

फेसबुक प्रसारण आणि

ऑनलाईन सन्मानपत्र,

नावलौकिक कागदासाठी

धावतात शब्द…..

अर्थाचं, आशयाचं,

आणि साहित्यिक मुल्यांचं

बोटं सोडून…..;

आणि करतात दावा

कवितेच्या चौकटीत

विराजमान झाल्याचा..

खरंच कविते,

लेखक बदलला तरी चालेल

पण तू अशी

विकली जाऊ नकोस

किंवा येऊ नकोस घाईनं ;

कवितेच्या, काव्याच्या

मुळ संकल्पनेशी

फारकत घेऊन….!

तू सौदामिनी,

होतीस,आहेस आणि

राहशीलही….!

पण तुला खेळवणारे

खुशाल चेंडू हात

एकदा तरी,

होरपळून

निघायला हवेत..;

तुझ्या बावनकशी

अस्तित्त्वासाठी…!

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares