मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समई मधील वात ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ समई मधील वात ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

समईतील ती शुभ्र वात

पसरूनी धुक्याची दुलई

पर्वा ना शुभ्र तमाची

मनी तेवते तव आठवणींची समई..

 

मन समईची वात मंद तेवते

त्यात मी पण जळते

मन सोने उजळता

मन सावळेची होते..

 

नयनातील काजळी

उगीच मना दुखविते

कोठूनी तो झरोका

आशा-किरण दाखविते…

 

दाखविते वाट

मनाच्या अंधारात

अंतरंग ते माझे

उगीच मंद हासते..

 

त्या किरणातूनी आशा

मजकडे  पाहते

निराशलेले मन माझे

क्षणभरी आनंदते…!!

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 90 – गोष्ट..! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #90 ?

☆ गोष्ट..! ☆

 

माझा बाप

माझ्या लेकरांना मांडीवर घेऊन 

गावकडच्या शेतातल्या खूप गोष्टी सांगतो..

तेव्हा माझी लेकरं

माझ्या बापाकड हट्ट करतात

राजा राणीची नाहीतर परीची 

गोष्ट सांगा म्हणून तेव्हा..

बाप माझ्याकडं आणि मी बापाकड 

एकटक पहात राहतो

मला…

कळत नाही लेकरांना

कसं सांगाव 

की राजा राणीची आणि परीची 

गोष्ट सांगायला 

माझ्या बापान कधी अशी स्वप्न

पाहिलीच नाहीत..,

त्यान..

स्वप्न पाहिली ती फक्त..

शेतातल्या मातीची

पेरणीनंतरच्या पावसाची..,

त्याच्या लेखी 

नांगर म्हणजेच राजा 

अन् माती म्हणजेच राणी 

मातीत डोलणारी पिक म्हणजेच

त्यान जिवापाड जपलेली परी…,

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुलुप ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ कुलुप ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

आजी नावाचं एक कुलुप

असतं बहुतेक घरात

किल्लीही त्याची असते

सर्वांच्याच खिशात !

कुलुप उघडण्याचा

असतो सदाच हुरुप

घेण्यासारखे आजीचे

असतेच खूप खूप !

कधी लाडीक हट्टाने

तर कधी कौतुकाने

किल्ली फिरवली जाते

हवे नको घेतले जाते !

आजीजवळ मात्र नसते

तिच्याच कुलपाची किल्ली

मायापाशात हरवलेली आजी

मूग गिळून गप्पच बसते !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुझा पंथ गे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ तुझा पंथ गे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

 

तुझा पंथ गे तुला मोकळा

माझ्यामार्गे मला जाउ दे

कोसळेल जे अभाळ सारे

प्राणावरती मला वाहु दे !

 

     प्राणसखा तो तुटला तारा

     माझ्यासाठी विझले अंबर

     अग्निहोत्र हे जीवन आता

     धुमसत राहिल माझे अंतर !

 

रुतून राहिल गच्च उरी ही

मंतरलेली सुरी दुधारी

प्राणांतिक काळीज कळवळो

जखम वाहती ठेविन मी ही !

 

     लाल लाल अन् कभिन्नकाळी

     वाहत राहिल धारा झुळझुळ

     येउन मिळतिल स्रोत आंधळे

     गात विराणी खळखळ खळखळ !

 

विस्तारत मी जाइन तेंव्हा

डोह आंधळा अथांग होइन

दीपकळी पण अपुली हळवी

तरंगात मी तेवत ठेविन !

 

     वाळुरणीही असेल बरसत

     तव स्मरणांची रिमझिम सखये

     जरी जाहलो बेपत्ता मी

     तुलाच शोधित असेन सखये !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रिकामे मधुघट…. ☆ भास्कर रामचंद्र तांबे

भास्कर रामचंद्र तांबे

भा. रा. तांबे

? कवितेचा उत्सव  ?

 ☆ रिकामे मधुघट…. ☆ भास्कर रामचंद्र तांबे ☆ 

मधु मागशि माझ्या सख्या ,परी 

  मधुघटचि रिकामे पडती घरी /ध्रृ/

 

आजवरी कमळांच्या द्रोणी

मधु पाजिला तुला भरोनी,

सेवा ही पूर्विची स्मरोनी,

करि रोष न सखया,दया करी   //1//

 

नैवेद्याची एकच वाटी

अता दुधाची माझ्या गाठी ;

देवपुजेस्तव ही कोरांटी

बाळगी अंगणी कशीतरी  //2//

 

तरूण-तरूणिंची सलज्ज कुजबुज,

वृक्षझ-यांचे गूढ मधुर गूज,

संसाराचे मर्म हवे तुज,

मधु पिळण्या परी बळ न करी ! //3//

 

ढळला रे ढळला दिन सखया !

संध्याछाया भिवविती ह्रदया,

अता मधूचे नाव कासया ?

लागले नेत्र रे पैलतिरी  //4//

 

–  भास्कर रामचंद्र तांबे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 115 ☆ दरी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 115 ?

☆ दरी ☆

गोष्ट आहे हीच खरी

दोघामधे आहे दरी

भेट व्हावी सांग कशी

पृथ्वी मी तू आहे शशी

 

लग्न आपले मोडले

असे कसे हे घडले

घरामध्ये रुसलेल्या

आहे पहा बारा राशी

 

सूर्य चंद्र दोस्त माझे

माझ्यासाठी दोघे राजे

एक वाटते द्वारका

दुसरी ती आहे काशी

 

जरी आलो मी साठीला

पांडुरंगाच्या भेटीला

आसुसला जीव माझा

आज आहे एकादशी

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दृढ विश्वास… ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ दृढ विश्वास….☆ श्रीशैल चौगुले ☆

अंधारल्या दिशांना

आठवणींची ज्योत

मावळतीच्या खुणा

भविष्याचे गणगोत

 

रेतीत साचलेले

क्षण भरुन मोती

डोळ्यांसमोर तेज

काजव्यांची ख्याती.

 

क्षितीजाच्या किनारी

घटनांच्या सोबती

लहरींच्या नौबती

जगण्यासाठी वाती.

 

विनाशणारे भय

चांद-तारे आभाळ

दृढ विश्वास बळ

तेजोमयी प्रपात.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 59 ☆ माझे बालपण… ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 59 ? 

☆ माझे बालपण… ☆

(काव्यप्रकार… अंत्य ओळ-आष्टाक्षरी…)

माझे बालपण आता

नाही येणार हो पुन्हा

पुन्हा रडतांना मग

नाही फुटणार पान्हा…

 

नाही फुटणार पान्हा

आई आता नाही आहे

सर्व दिसते डोळ्याला

तरी मन दुःखी राहे…

 

तरी मन दुःखी राहे

बाप सुद्धा माती-आड

बोटं धरून चालावे

प्रेम केले जीवापाड…

 

प्रेम केले जीवापाड

त्याची सय आता येते

छत हे कोसळतांना

मज पोरके भासते…

 

मज पोरके भासते

आई-बाप नसतांना

त्यांचे छत्र शीत शुद्ध

त्यांची स्मृती लिहितांना…

 

त्यांची स्मृती लिहितांना

शब्द हे अडखळती

कवी राज साठवतो

अशी निर्मळ ही प्रीती…

 

म्हणत कवी राज शास्त्री…

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 24 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 24– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

 

[११३]

सत्य उठवतं

एक प्रचंड वादळ

आपल्याच विरुद्ध

ज्यातून पुन्हा

दशदिशांना विखुरतात

सत्याची बीजं

 

[११४]

माझ्या घरी ये

असं नाहीच म्हणत

मी तुला

प्रिय,

तू माझ्या 

अनंत एकटेपणात

येशील?

 

[११५]

कधीही घाबरू नकोस         

क्षणांना

शाश्वताचा आवाज

मंद लयीत

झिरपत असतो

क्षणांमधूनच

 

[११६]

खोलवर सुकून गेलेला

हा अफाट-सुका पसारा

त्यातून उसळावी

अस्सलवाणी दाद

सरगम बनून

तशी दरवळते आहे

मृद्गंधाची ही धून 

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संगीत अभद्र…. ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ संगीत अभद्र…. ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(मुळ गाणे: यूट्यूब लिंक >> वद जाऊ कुणाला शरण  – नाटक : संगीत सौभद्र)

आमचं : संगीत अभद्र ?

 

वद जाऊ कुणाला शरण

करील जो हरण ‘ओमिक्राॅनचे’

मी धरीन चरण त्याचे !

 

अग लस-घे !!

 

बहु ताप बंधु- बांधवा, प्रार्थिले बघुनी दु:ख जनांचे!

ते विफल न होय त्यांचे !

 

अग लस-घे !!

 

मग जिल्हा- बंदी मात्र ती, लावुनी कष्ट इ-पासचे!

न चालेचि काही त्यांचे!

 

अग लस-घे !!

 

जे मास्क लावुनी नाकापुढे, वाचले थवे मानवांचे !

अनुकूल होती साचे!

 

अग लस-घे !!  ?

 

©  श्री अमोल अनंत केळकर

? २/१२/२१

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares