मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नाताळ ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? नाताळ ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

येशू जन्मला..येशू जन्मला

नसे पारावार आनंद उर्मीला

ख्रिस्ती धर्माचा सण हा मोठा

मोद पसरवीत नाताळ आला..

 

चमचमती शुभ्र चांदण्या नभात

मेणबत्यांचा मिणमिणता प्रकाश

अंगणी झाडांवरती झगमगाट

रोषणाईतूनी लखलखतो हर्ष जल्लोष..

 

कसे विसरावे बरे अतूट नाते

सण नाताळ आणि सांताक्लाॅजचे

आदल्या रात्रीच भेटवस्तू वाटे

फार आवडते पात्र शिशुबालकांचे..

 

नाताळ सणाच्या स्वागतासाठी

मुले येशू जन्माची गाणी गाती

घरोघरी सजते झाड सूचिपर्णाचे

खास चाॅकलेट्स अन केक बनविती..!

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

6    चित्रकाव्य : उषा ढगे.

 

-नाताळ-

 

येशू जन्मला..येशू जन्मला

नसे पारावार आनंद उर्मीला

ख्रिस्ती धर्माचा सण हा मोठा

मोद पसरवीत नाताळ आला..

 

चमचमती शुभ्र चांदण्या नभात

मेणबत्यांचा मिणमिणता प्रकाश

अंगणी झाडांवरती झगमगाट

रोषणाईतूनी लखलखतो हर्ष जल्लोष..

 

कसे विसरावे बरे अतूट नाते

सण नाताळ आणि सांताक्लाॅजचे

आदल्या रात्रीच भेटवस्तू वाटे

फार आवडते पात्र शिशुबालकांचे..

 

नाताळ सणाच्या स्वागतासाठी

मुले येशू जन्माची गाणी गाती

घरोघरी सजते झाड सूचिपर्णाचे

खास चाॅकलेट्स अन केक बनविती..!

 

-उषा ढगे-

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तिढा ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? कवितेचा उत्सव ?

☆ तिढा  ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

पापपुण्याचा पाढा

किती पुढे जाणार

कर्माच्या सीमा रेषा

अश्याच आडव्या येणार

 

डिग्री घेवून शहाणपण येते

हे कुठे पहायला मिळते

पाय धरण्यात आयुष्य सरते

तत्वज्ञानावर का पोट भरते ?

 

लख्ख उजाडले असे वाटते

क्षणात मन स्वर्गात पोहचते

गाडीची हवा इथं संपते

आशेची दोर तुटते

 

कसे…? किती ..? केव्हा..?

कुठे…? प्रश्न सुटणार

स्वतः च्या हिंमतीवर काही करणार?

काहीच खरं वाटत नाही

नवे काही होत नाही

 

कर्माच माहित नाही

प्रयत्न करायला संधी भेटत नाही

दात आहेत तर चणे नाही

चणे आहेत तर दात नाही

हे कोड  सुटणार ?

कि……

तिढा असाच वाढत राहणार…..?

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

सांगली 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 106 – स्वीकार  … ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 106 – विजय साहित्य ?

☆ स्वीकार  .. . !  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

अपघातानं

आलेलं

एकुलत्या 

एक मुलाचं

अपंगत्व

तिनं स्वीकारलं

पचवलं

पण

अपघातानं

आलेलं वैधव्य

समाज स्वीकारेल ?

तिला जगू देईल

उजळ माथ्याने ?

तिच्या कुटुंबासाठी . . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांगून सर्व झाले… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ सांगून सर्व झाले… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त: अनलज्वाला)

सांगून सर्व झाले,झाली शिळी कहाणी

डोळ्यातल्या धुक्यातुन,झरती अजून गाणी !

 

भरल्यात सर्व जखमा,मिटल्यात शोकगाथा

दंशाविना फणा हा,विरहाविना विराणी !

 

श्रोते बधीर दर्दी,बेसूर मैफिलीत

मृगजळ मृगास सांगे,वाळूरणी कहाणी !

 

आभाळ भास कळता,नभ कोसळून आले

पंखांत गोठलेली,ती झेपही इमानी !

 

यात्रा त्रिखंड झाली,दिसला न देश माझा

संपन्न ही भ्रमंती,उपऱ्याच पावलांनी !

 

वाटेस दोष कैसा,दोषी दिशा न दाही

संदिग्ध व्यूह होता,आला न भेद ध्यानी !

 

जखमांवरी फुलावी,ती पालवी नव्याने

बहरास ये,वसंता!रानात पानपानी !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवनाची वाट वेडी…☆ कै. गंगाधर महांबरे

? कवितेचा उत्सव ? 

☆ जीवनाची वाट वेडी…☆ कै. गंगाधर महांबरे

जीवनाची वाट वेडी, ती कधी ना संपते!

थांबतो थोडा प्रवासी, वाट कुठली थांबते ?

 

आसवांसाठीच डोळे, पापण्यांचे रांजण

हुंदक्यांचा हक्क येथे, हासण्यावरी बंधन

एकटे बिन-चेह-याचे दैव केवळ हासते

 

भोवताली दिसती जे जे ते सुखाचे सोबती

जीवनी कोणी न साथी, कोण धावे संकटी ?

मरण घेऊन रूप गोंडस जगून पुन्हा पाहते.

 

कै. गंगाधर महांबरे

कोल्हापूर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 92 – कोण म्हणतं…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #92 ?

☆ कोण म्हणतं…!☆

कोण म्हणतं आई

देवाघरी जाते..

ती देवघरातच असते

कारण देव कधी

देवघर सोडून जात नाही

जसा देवघरात मला

देव दिसत नाही

तसंच..

हल्ली घरात मला आई

दिसत नाही..‌.!

 

© सुजित कदम

पत्ता.117,विठ्ठलवाडी जकात नाका 

सिंहिड रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वृक्षसंदेश….. ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ वृक्षसंदेश… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆

उठ मानवा, शोध घेई रे, मनोमनी तू खरा

निसर्ग राजा, सखा-सोबती, दुजा न कोणी बरा.

शिवार फुलते, धरती नटते, हेमपुष्प जन्मते

वनचर, जलचर, खेचर, पन्नग विश्वची हे गाते.

 

फळाफुलांनी सुगंधित हा वायुही बोलतो

चराचराच्या तनामनाला स्पर्शुनी तो जातो

वृक्ष तोडुनी, शिकारीतुनी, काय तुला लाभते

उजाड धरती, दूषित प्रांगण, मूकपणे सांगते.

 

निसर्गाविना अपूर्ण मानव,अक्षय हे नाते

तयासवे रे परीपूर्ण तू, सत्यही साकारते. 

वृक्ष लावुनी, तयासी जपुनी, वाढविता रे तुला

अक्षय ठेवा, शुद्ध जलासह, सापडेल रे मुला.

 

वृक्षा जपसी, कीर्ती पावसी, ताड-माड साक्षीला

वड-जांभुळ, अश्वत्थासह, आम्र येई दिमतीला.

नाजुक वेली, सान रोपटी, ठेवा पुष्पातला

गुंजारव भ्रमरासह येईल, मधुरस चाखायला.

 

छाया देईल, सौरभ देईल, तरु धरतीवरला

नको हरवू हे, प्रेमळ छत्र नि राख मान आपुला.

वृक्ष वल्ली या महान जगती, शिकवण देती तुला

परोपकारा धन्य मानुनी, मार्गा चल आपुल्या.

                               मार्गा चल आपुल्या.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 113 ☆ गज़ल ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 113 ?

☆ गज़ल ☆

(वृत्त-मनोरमा)

दूर माझे गाव आहे

चांगले से नाव आहे

 

हे कुणाला काय ठावे

कुंपणाशी धाव आहे

 

एवढेही खूप झाले

त्या तिथे ही वाव आहे

 

काल जे स्वीकारले तू

आज का मज्जाव आहे

 

 भोग माझा वेगळा हा

काळजाशी घाव आहे

 

सांज झाली का अवेळी

संपलेला डाव आहे

 

 कोळियाला सांग राजा

मासळीला भाव आहे

 

वल्हवू आता कशी मी

कागदाची नाव आहे

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बिंदू… ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ बिंदू… ☆ श्रीशैल चौगुले ☆

आकाश किती विशाल

चांदणे तरी ईवलेसे

पाषाण किती प्रचंड

मुर्तीचे रुप ईतुकेसे.

 

समुद्र किती अथांग

लहरी परी लहानशा

धरती असे अनंत

सृष्टीची बीजे ईवल्याशा.

 

कायेचे व्यक्त मोठाले

आत्मजीव असे सूक्ष्मांत

ग्रंथाची पाने कितेक

शब्द-शब्द ज्ञान कोषात.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 117 ☆ पंखामधले वारे ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 117 ?

☆ पंखामधले वारे ☆

बंधनात या आकाशाने कुठे ठेवले

सीमांनीही देशांच्या ह्या कुठे रोखले

 

पल्ला होता खूप लांबचा गाठायाचा

वाऱ्यानेही पंखी माझ्या  श्वास ओतले

 

अंगाला या चाटत होता मूर्ख कोठला

चावट वारा काय करू मी गप्प सोसले

 

वयात आला अजून नव्हता ऊस तरीही

कुमार होते पाचट त्याने मला छेडले

 

खेळतात ह्या चंद्रा सोबत खेळ चांदण्या

खेळण्यास मज त्यांनी कोठे मला घेतले

 

ग्रीष्म ऋतूचा संबध नव्हता येथे काही

शिशिर म्हणाला सांग कशाने रान पेटले

 

फाटे नाही मीही फोडत तुझ्या सारखे

म्हणून वृक्षा ‘अशोक’ माझे नाव ठेवले

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares