मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझे दुःख… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ माझे दुःख… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

दुःख झाले एवढे की, आसवांना वाट नाही

तो किनारा दूर झाला, नाविकाला घाट नाही ||धृ.||

 

लाट आली, लाट गेली

जाहल्या ताटातुटी..

ऐन माध्यानी सुखाच्या

दाटले तम भोवती,

शुक्रतारा निखळला जो, तो पुन्हा दिसणार नाही ||१||

 

या मनाच्या मर्मबंधी

स्मरण यात्रा राहिली,

वेदना लपवून पोटी

जी जिवाने साहीली,

मंद झालेल्या प्रकाशी, सावली दिसणार नाही ||२||

 

हात हातातून सुटला

अंतरीचा बंध तुटला,

पंख तुटल्या पाखराला

सांत्वनाने धीर कुठला ?

आसवांची तेवणारी, ज्योत ही विझणार नाही ||३||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ होळीचा रंग… ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ होळीचा रंग.. ☆ श्रीशैल चौगुले ☆

रंग ऊधळतील दिशा

मनात भिजवीत आशा

होळी सप्तल इंद्रधनू

जीवन अनुभूती श्रुषा.

 

ओल्या संस्कृतीचा हा रंग

संस्काराने ओलेते अंग

प्रेम-भक्तीचा मैत्र संग

जणू गोकूळी राधा-श्रीरंग.

 

भेटी-गाठी नव्या जुन्या त्या

भरुन जाईल अंतरंग

ऋणानूबंध माणूसकीत

भेद विसरुन होळीत दंग.

 

 © श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मर्ढेकरांची कविता… ☆ कै बाळ सीताराम मर्ढेकर  ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ मर्ढेकरांची कविता… ☆ कै बाळ सीताराम मर्ढेकर ☆

 (१ दिसंबर १९०९ – २० मार्च १९५६)

        ह्या दुःखाच्या कढईची गा

        अशीच देवा घडण असू दे

        जळून गेल्या लोखंडातही

        जळण्याची,पण पुन्हा ठसू दे

        कणखर शक्ती,ताकद

        जळकट.

 

       मोलाची पण मलूल भक्ती

       जशी कुंतीच्या लिहिली भाळी,

       खिळे पाडूनी तिचे जरा ह्या

       कढईच्या दे कुट्ट कपाळी 

       ठोकुनी पक्के,काळे,बळकट

 

       फुटेल उकळी,जमेल फेस

       उडून जाईल जीवन वाफ

       तरी सांध्यांतून कढईच्या ह्या

       फक्त बसावा थोडा कैफ

       तव नामाचा भेसूर धुरकट

 

 – कै बाळ सीताराम मर्ढेकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – तरंग ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? तरंग  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

टाकताच खडा पाण्यात

जलाशयात तरंग उमटती

सागरातील उत्तुंग लहरी

किनार्‍यावरी येऊनी शमती..

सूर्यकिरण पडताच

चमचमती जलतरंग

अंतरडोहातूनी डोकाविती

अंतरंगातील आत्मरंग..

निसर्गात चौफेर दिसती

विविध छटांचे मोहीत रंग

सुखद कधी व्यथित करती

विचारांचे असीम भावतरंग..

तरंग असले हे मनातले

कुणास नाही दिसले

किनारी उभी राहता

मम मनाशीच जाणवले..!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “तानपुरे लतादिदींचे” ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “तानपुरे लतादिदींचे…” ☆ सौ. अमृता देशपांडे 

स्पर्श तिच्या अंगुलीचा

आणि तिचा शुद्ध स्वर

झंकारली काया माझी

आणि भारलेला ऊर  ll

 

आठ दशके पाच वर्षे

नाही कधीच अंतर

दीदी तुझ्या सेवेसाठी

आम्ही सदैव तत्पर  ll

 

आज मी हा असा उगी

गोठावलो गवसणीत

माझ्या तारा मिटलेल्या

आणि तुझे सूर शांत   ll

 

तुझे स्वर कानी येता

क्षण क्षण थबकतो

आम्ही तानपुरे तुझे

मूक आसवे ढाळतो ll

 

कुठे लुप्त झाला  सूर

आणि स्पर्श शारदेचा

धन्य जन्म की अमुचा

बोले तानपुरा दीदींचा ll

 

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा 

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 94– समयसुचकता ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 94 – समयसुचकता ☆

जाणलीस तू स्त्री जातीची अगतिकता.।

धन्य तुझी समयसुचकता।।धृ।।

 

दीन दलित बुडाले अधःकारी।

पिळवणूक करती अत्याचारी।

स्त्रीही दासी बनली घरोघरी ।

बदलण्या समाजाची मानसिकता।।१।।

 

हाती शिक्षणाची मशाल।

अंगी साहसही विशाल।

संगे ज्योतिबांची ढाल।

आणि निश्चयाची दृढता।।२।।

दीन दुःखी करून गोळा।

लागला बालिकांना लळा।

फुलविला आक्षर मळा।

आणली वैचारिक भव्यता।।३।।

 

तुझ्या कष्टाची प्रचिती।

आली बहरून प्रगती ।

थांबली प्रथा ही सती।

स्त्री दास्याची ही मुक्ताता।।४।।

ज्ञानज्योत प्रकाशली।

घरकले उजळली।

घेऊन विचारांचा वसा माऊली।

तुझ्या लेकी करती

अज्ञान सांगता।।५।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कलाकृती… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

 

? कवितेचा उत्सव ?

☆ कलाकृती… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

तेच तिखट तेच मीठ

तोच गॅस तिचं भांडी

स्वैपाकाला…..

रोज वेगळी चव

कधी मनाची

कधी जनाची

 

तेची अक्षरे तेच शब्द

तेच भाव तेच उमाळे

कविता उमलते

कधी मनाची

कधी फुकाची

 

तेच रंग

तसाच कुंचला

जसे अंतरंग

तसा आविष्कार साधला

 

स्वैपाक काय  कविता काय

एक…..    कलाकृती

ती साधते

कलाकारच्या साधनेत

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कविता # 116 – होळी विशेष – तमोगुण ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 116 – विजय साहित्य ?

होळी विशेष – तमोगुण  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

तत्वनिष्ठ संस्कारांनी

कटिबद्ध आहे होळी

अंतरीचे तमोगुण

बांधुयात त्यांची मोळी .. !! १ !!

 

तरू काष्ठ सुकलेले

त्याची समिधा तात्त्विक

रिती रिवाजांचा चर

तेज होळीचे सात्त्विक…!! २ !!

 

भक्त प्रल्हादाची कथा

भक्तीरुप अविष्कार

पानं पानं अहंकारी

होळीमध्ये स्वाहाकार..!! ३ !!

 

होळी पौर्णिमेच्या दिनी

करू दुर्गुण निःसंग

प्रासंगिक अभिव्यक्ती

सद्गुणांचा रागरंग…!! ४ !!

 

काम,क्रोध,लोभ,मोह

मद मत्सर भस्मात

फाल्गुनात वर्षाखेरी

चैतन्याची रूजवात… !! ५ !!

 

मार बोंब,घाल शिव्या

सर्व धर्म समभाव

नाना रंग स्वभावाचे

दाखविती रंक राव… !! ६ !!

 

ऋतूचक्र सांगतसे

आली आली बघ होळी

खरपूस समाचार

खाऊ पुरणाची पोळी…. !! ७ !!

 

नको हिरण्य रिपूचे

संसारीक आप्तपाश

अंतरंगी नारायण

करी तमोगुण नाश… !! ८ !!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्ञानाक्षरे… ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ज्ञानाक्षरे… ☆ श्रीशैल चौगुले ☆

 अशी अलंकारे

भुषवीते शब्दे

धर्म नि प्रारब्धे

युगांतरी.

संत श्लोकांचीया

पुण्य ज्ञानीवंता

पवित्र अनंता

ग्रंथभक्ता.

सांडे वाहूनीया

अमृत वर्षाव

अनुभवे ठाव

जन्म मृत्यू.

कोणते कारणे

शरीर धोरणे

बांधावी तोरणे

इंद्रियाशी.

दिव्य प्रबोधन

मानवा साधन

संसारी सदन

ज्ञानाक्षरे.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #104 – एक कविता तिची माझी..! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 104  – एक कविता तिची माझी..! 

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती .

कधी भिजलेल्या पानांची ..

कधी कोसळत्या सरींची ..

कधी निथळत्या थेंबाची ..

तर कधी.. हळूवार पावसाची…!

 

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती.

कधी गुलाबांच्या फुलांची ..

कधी पाकळ्यांवरच्या दवांची ..

कधी गार गार वा-याची ..

तर कधी.. गुणगुणां-या गाण्यांची…!

 

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती .

कधी वाहणा-या पाण्याची..

कधी सुंदर सुंदर शिंपल्याची ..

कधी अनोळखी वाटेवरची ..

तर कधी ..फुलपाखरांच्या पंखावरची…!

 

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती.

कधी उगवत्या सुर्याची ..

कधी धावणा-या ढगांची..

कधी कोवळ्या ऊन्हाची ..

तर कधी पुर्ण.. अपूर्ण सायंकाळची…!

 

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती .

कधी काळ्या कुट्ट काळोखाची..

कधी चंद्र आणि चांदण्यांची ..

कधी जपलेल्या आठवणींची ..

तर कधी.. ओलावलेल्या पापण्यांची…!

 

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती .

कधी पहील्या वहील्या भेटीची ..

कधी गोड गुलाबी प्रेमाची ..

कधी त्याच्या तिच्या विरहाची ..

तर कधी.. शांत निवांत क्षणांची ..!

 

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती .

कधी तिच्या मनातली ..

कधी माझ्या मनातली..

एक कविता तिची माझी ..

रोज भेटते फेसबुक वरती..!

 

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares