मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नंदनवन ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ नंदनवन ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

तुझे अचानक घडता दर्शन,

मनात फुलते नव नंदनवन  ||धृ ||

 

संगमरवरी स्वप्न मनोहर,

कसे प्रगटलें या अवनीवर?

स्वप्न, सत्य की भास असे हा?

 मनांस माझ्या पडतो संभ्रम

 

ओठांतून मधुकुंभ झिरपती,

कुंदकळया रसगंध उधळती,  

 कपोलकल्पित नव्हे, सत्य हे,

नयनांतून तव झूरतो श्रावण

 

गुणगुणता कंठातून वीणा,

सप्त सुरांच्या झुकल्या माना,

अधरांतून अलगुज गुंजता,

वसंतात ये वनवासीं मन

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 129 ☆ गझल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 129 ?

☆ गझल… ☆

शुद्ध पाण्या सोबतीही गाळ आला होता

चांगल्या मित्रा,तुझ्यावर आळ आला होता

 

चालताना थांबले मी त्या तिथे एकांती

ओळखीचा तो सुरंगी माळ आला होता

 

सातबारा दावला मी शेत होते माझे

बांगड्या भरण्यास की वैराळ आला होता

 

मर्द माझ्या मावळ्यांचे भाट गाती गाणे

झुंजले शर्थीत तेव्हा काळ आला होता

 

चौकटी मोडाच सा-या या ठिकाणी येण्या

विसरुनी जाऊ इथे चांडाळ आला होता

© प्रभा सोनवणे

२२ एप्रिल २०२२

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रामायण… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ रामायण… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

पाहिलेस मज हसून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण

लाजलीस तू वळून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण

 

नेमकाच तो गुलाब साधा होता हाती माझ्या तेव्हा

घेतलास तू दडून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण

 

आस लागली खरीच वेडी दोघानाही भेटायाची

थांबलीस तू नटून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण

 

वेळ लाभली तशीच होती  दोघानाही एकांताची

बोललीस तू जपून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण

 

फार देखणे स्वरूप होते मौना मधल्या चंद्राचेत्या‌

शोधलेस तू हटून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण

 

आज काल ही नवीन चर्ची जेथे तेथे चालू आहे

भेटतेस तू लपून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण

 

नाव जोडले अजून आहे घेणारानी घेत बसावे

ओठघेतले मिटून जेव्हा तेव्हा घडले हे रामायण

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सप्रेम द्या निरोप ☆ सुश्री आरती प्रभू ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ सप्रेम द्या निरोप ☆

तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे

निद्रिस्त शांतकाया आता पडून आहे

 

गुंफून शेज त्याची हळूवार पाकळ्यांनी

हा वेल मोग-याचा पानी मिटून आहे

 

अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला

सारा गुलाब आता रोखून श्वास आहे

 

जाईजुई बसून कोन्यांत दूर कोठे

अस्फुट गीत मंद हुरहूर बोलताहे

 

वनवेळू वाजताहे एकांतकिर्र ऐसा

माळीच की अखेरी निश्वास टाकताहे

 

वाजून मेघ जातो घननीळसा विरून

सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे

 

बोले अखेरचे तो:आलो ईथे रिकामा

“सप्रेम द्या निरोप,बहरून जात आहे”

© आरती प्रभू

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #135 ☆ धग ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 135 ?

☆ धग ☆

आठवांचे जाळले मी प्रेत नाही

आसवांना झोप म्हणुनी येत नाही

 

मी उकिरड्यावर तिला फेकून आलो

राहिली धग आज त्या राखेत नाही

 

पान पिकले अन् तरीही देठ हिरवा

त्यागण्याचा देह अजुनी बेत नाही

 

मेंढरे शिस्तीत सारी चालली पण

तुजकडुन हे माणसा अभिप्रेत नाही

 

वादळाचे रूप घेतो तू म्हणूनी

बसत आता मी तुझ्या नावेत नाही

 

फूल काट्या सोबतीने हासणारे

आज दिसले का मला बागेत नाही ?

 

चेहऱ्याला वाचता येते मलाही

मी जरी गेलो कुठे शाळेत नाही

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्ञानसाद… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ज्ञानसाद… ☆ श्रीशैल चौगुले ☆

कुठे देव आता

खाली येई ऊतरुन

भक्तीत भाव हे

मन जाई कातरुन.

 

वीट स्थीर नित्य

ऊभे कर कटेवरी

एक तरी सत्य

युग अहं वाटेवरी.

 

ऊगी गोड हास्य

मोह मोक्ष मुखावरी

चरणी जन्म हा

प्रकटे ना आत्मांतरी.

 

सोडू कि धरु हे

पाप-पुण्य वादभेद

शब्द अभंगात

घाले देवा ज्ञानसाद.

 

 © श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विश्व पुस्तक दिवस विशेष – एक तरी पुस्तक – गुरु ठाकुर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

 ☆ विश्व पुस्तक दिवस विशेष – एक तरी पुस्तक – गुरु ठाकुर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

 – गुरु ठाकुर 

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

मो. 9403310170,   e-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे #78 ☆ महाराष्ट्राचे हे स्वादिष्ट व्यंजन… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 78 ? 

☆ महाराष्ट्राचे हे स्वादिष्ट व्यंजन… ☆

प्रथम मान मिळतो ज्यांना

कांदा पोहे म्हणतात त्यांना…

 

पाहुणे आले कांदे पोहे

भूक लागली कांदा पोहे…

 

सोयरीक जुळते नवीन जेव्हा

कांदा पोहे तेव्हा तेव्हा…

 

कांदा चिरावा मस्त

त्यात हिरवे वाटाणे रास्त…

 

हिरवी मिरची सवे कोथिंबीर

जिरेपूड आणि तेल धार…

 

मीठ आणि हळद मिळते

खाणाऱ्यांची झोप पळते…

 

असा होतो बेत मस्त

जसा मिळावा,दोस्तास दोस्त…

 

महाराष्ट्राचे हे स्वादिष्ट व्यंजन

मानून घ्या तुम्ही गोड करुनि मन…

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अन् माझिया मनात… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

अन् माझिया मनात…  ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

सखी ग नको विचारू का आज धुंद मी ते

दिसता शशी नभात का रातराणी फुलते

 

मनी ध्यास एक होता त्यानी मला बघावे

पण पाहता तयांनी लाजून लाल झाले

 

नयनात होती त्यांच्या भाषा अशी निराळी

कळली मला उगीच,का हासले मी गाली

 

कधी शब्द नाही वदले पण भाव जाणती ते

बघता तयास दुरूनी मन सैरभैर धावे

 

मज लागलीसे ओढ त्या दिव्य मिलनाची

होईन काय सखये अर्धांगी मी तयांची

 

येऊनिया समीप हलकेच स्पर्शतील

अन् माझिया मनात मग चांदणे फुलेल.

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मधुदीप रचना… तप्त धरा ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

? कवितेचा उत्सव  ?

☆ मधुदीप रचना… तप्त धरा ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

या

तप्त

झळांचा

पेटवला

अग्नीचा कुंड

ग्रीष्मासवे

रवीने

भला

सोडला सुस्कार धरतीने जणू अंगार

भासते रुष्ट विरहपीडिता नार

भेटण्या प्रियतमास आतुर

फेकला लाल शेला पार

पलाश वृक्षावर

क्रोध अपार

 

नि

पीत

सुवर्णी

कर्णफूल

झेली बहावा

कानातील

धरेचा

डूल

चैत्रात नेसली नवीन हिरवी वसने

सुरकुतली सजणाच्या विरहाने

अंगाग मृत्तिका धुसमुसळे

वेढली उष्ण धुरळ्याने

तरी करी अर्जवे

पुन्हा प्रेमाने

 

तो

चंद्र

प्रियेला

मनवित

संध्यासमयी

अळवितो

प्रीतीचे

गीत

रतीमदनाचा जणू हा मिलनसोहळा

पवन देतसे हलकेच हिंदोळा

चांदण्या न कुंदफुलांचा मेळा

धरेच्या ओंजळीत गोळा

तृप्त युगुल मग

मिटते डोळा

 

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares