सुश्री नीलांबरी शिर्के
☆
इवल्या इवल्या रोपांसाठी
तुझा पाय वामन ठरतो
पाय पडताच रोपांवर
त्याच जगणच नष्ट करतो
☆
म्हणून चालताना पहावच
पायाखाली येतय काय
आपण पुढे जाता जाता
डोळस असावेत आपले पाय
☆
काहिंच फुलण झुलण सार
केवळ असत दुसऱ्या साठी
परिमलही वाऱ्यास देतात
तीच गंधित श्वासासाठी
☆
आभार त्याचे मानू नका
दुर्लक्षही करून चालू नका
जमल तर थोड पाणी देऊन
आधार तयांना द्यावा मुका
☆
हिरवाई टिकेल तरच
सम्रुद्वीच होईल जगण
आपल्या सकल हितासाठी
सुधाराव आपलच वागण
☆
चित्र साभार – सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के