मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 89 ☆ प्रीत तुझी माझी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 89 ? 

प्रीत तुझी माझी.… ☆

(सहा-अक्षरी रचना…)

प्रीत तुझी माझी

सहज खुलावी

आपल्या प्रीतीला

दृष्ट न लागावी…

 

प्रीत तुझी माझी

बोलकी असावी

मनाची भावना

मनाने जानावी…

 

प्रीत तुझी माझी

बंध घट्ट व्हावे

गुज मनातले

तुजला कळावे…

 

प्रीत तुझी माझी

केवडा सुगंधी

निर्मळ सोज्वळ

शुद्ध ही उपाधी…

 

प्रीत तुझी माझी

मोगरा फुलला

ये मिठीत सखे

संध्या समयाला…

 

प्रीत तुझी माझी

राज हे मनीचे

मागणे मागतो

दान दे प्रेमाचे…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – नरहरी सोनार – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? –नरहरी सोनार  ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

हरी हर शब्दामधे

थोडेसे अंतर

अर्थामध्ये जाता

फरकच फार—–

हरी वैजयंती माळ

हरी हातामधे टाळ

हरी कटी पितांबर

त्याचे चंदनी कपाळ—

शिव सर्पमाळ गळा

भस्म लेपन सोहळा

शिव कटी व्याध्रचर्म

शिवमनी भाव भोळा—

  नरहरी शिवभक्त

वैष्णव  विरुद्ध

वैष्णव देवता दर्शन

तो मानत निशिद्ध—

विठ्ठलाने दाखविले

हरी हर असे एक

डोळे बांधुन स्पर्शाने

दावियेले  विश्वात्मक—

नरहरी समजला

लागे हरी चरणाला

गळा माळ भाळी टिळा

हरी भक्तीत  रमला—

हरी भक्तीत  रमला—

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गु ड घे ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🦵 गु ड घे ! 🦵 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

सारे बघा शरणागत

बसती यावर खाली,

क्षमा मागण्याची रीत

पूर्वापार चालत आली !

 

हे दुखती म्हणूनी मग

नसे उत्साह चालण्या,

धैर्य गोळा करावे लागे

वजन काट्या पाहण्या !

 

वजन वाढता शरीराचे

हे ‘बोलावया’ लागती,

मग चालतांना वेदनेने 

डोळा पाणी आणती !

 

लेप, तेल मॉलीशला

दाद देईनासे होती,

शस्त्रक्रियेविना डॉक्टर

पर्याय नाही म्हणती !

 

घ्या काळजी यांची तुम्ही

वजन ठेवून आटोक्यात,

आणू नका वेळ तुमचे

कुणा समोर हे टेकण्यात !

© श्री प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भूतली वैकुंठ… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ भूतली वैकुंठ… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

वैकुंठ पंढरी | आषाढीची वारी |

भावे नेम करी | दर साल || १ ||

 

वाट पंढरीची | ओढ विठ्ठलाची |

साथ भाविकांची | मेळा चाले || २ ||

 

श्रद्धेचा मृदुंग | मनाचा अभंग |

संकीर्तनी दंग | नाम घेई || ३ ||

 

देहबुद्धी सोडी | लोभ माया तोडी |

अभंगाची गोडी | मना जडे || ४ ||

 

रिंगण जन्मांचे | धावणे मनाचे |

चंदन भक्तीचे | लावियले || ५ ||

 

वारीतले क्षण | जीवन शिक्षण |

संत शिकवण | मनी ठसे || ६ ||

 

पूर्व सुकृताची | वारी पंढरीची |

ध्वजा वैष्णवांची | फडकते || ७ ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – संत सावतामाळी – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? –संत सावतामाळी  ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

माळ्याचा सावता

भक्त  विठ्ठलाचा

विठू नाम घेता

मळा फुले त्याचा—–

कांद्यामुळ्यामधे

दिसे त्या विठाई

पाटातले पाणी

हरी गुण गाई—–

माळ्याच्या फुलांना

वास अबिराचा

विठूच्या कपाळी

टिळा चंदनाचा—–

भिजवी मळ्याला

भक्तिरस वाणी

सावताच्या मुखी

पांडुरंग गाणी—–

सावत्याला भेटे

सखा पांडुरंग

गळामिठी देई

तया येऊन श्रीरंग—-

जीव गुंते त्याचा

विठ्ठलाचे पायी

केवढी तयाला

लाभली पुण्याई—–

रखुमाईवरा

भुलला सावता

पांडुरंग त्याचा

झाला माता पिता—–

मातेचे रुधिर

बालकाशरीरी

तसा सावत्याच्या

शरीरी श्रीहरी——

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उतरले घनभोर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ उतरले घनभोर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

उतरले घनभोर

नाचले मोर

तुझ्या डोळ्यात

विखुरले रंग

स्फटिक जळावर

गगनजुईचे

थरथरले अंग.

…………….

कडाडे आस्मान

जाहले तूफान

उडाले मोर

कुठे साजणी

स्फटिक जळावर

बहर जुईचा

विखुरला राणी

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संवाद ज्ञानोबा तुकयाचा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ संवाद ज्ञानोबा तुकयाचा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

संवाद ज्ञानोबा तुकयाचा

समस्त ज्ञानासी असशी तूच पाया

 

तूच ज्ञानराया, तुका म्हणे

केले तुवां खुले ज्ञानाचे भांडार

हर्ष अपरंपार होई लोका.

 

थोर तुझा महिमा

काय मी वर्णावा

निःशब्द हा तुका ज्ञानदेवा.

 

दावियली लोकां ऐसी शब्दकळा

फुलविला मळा अमृताचा

सोसुनी प्रहार लोकनिंदेचे

बोल अमृताचे प्रसवले.

 

गीतेचा तो अर्थ

सांगे ज्ञानेश्वरी

दिव्य ती वैखरी अमृताची.

 

म्हणे ज्ञानराजा ऐक ऐक रे तुकया

माझिया सखया भूलोकीच्या

रचियली तुवां अभंगाची गाथा

भाविक तो माथा टेकतसे.

 

रूढी परंपरा, दंभ अभिमान

व्यर्थ ते लक्षण भाविकांचे

दावियला तुवां भक्तिमार्ग लोका

धन्य माझा तुका बोले ज्ञानदेव.

 

काळावरी तरले तुझे ते अभंग

धरूनिया संग श्रीहरीचा.

 

असे मी जरी पाया

तू झालासी कळस

आली देवळास

अलौकिक शोभा.

 

तुका म्हणे ज्ञानराजा

आता वंदितो चरण

न करी वर्णन

आणिक माझे.

साक्षी तया दोघा

इंद्रायणी पार

सोन्याचा पिंपळ डुलतसे.

 

धन्य  इंद्रायणी, धन्य चंद्रभागा

कृपा पांडुरंगा झाली तुझी.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 111 – हरवली पाखरं ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 111 –हरवली पाखरं ☆

अशी हरवली पाखरं

मन हळवे अतं री।

किती समजावू रे मना

आभासाची गत न्यारी।

 

सदा प्रेमामृत मुखी

देई मायेने रे घास।

नको पिलांच्या रे माथी

तुझ्या आकांक्षाची आस ।

 

घाली मायेची पाखरं

जशी दुधात साखर।

घेण्या आकाशी भरारी

खोल घरट्याची द्वार द्वारं।  

 

जगी अथांग झुंजण्या

देई कणखर आधार।

छाया तुझीच सानुली

कशी फिरेल माघार।

 

आचरणी सदा तुझ्या

संस्काराचे मिळे धडे।

मनामध्ये आभासी या

नको संशयाचे रडे।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – भक्त पुंडलिक – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – भक्त पुंडलिक–  ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

आईवडिलांची सेवा

त्यात गुंग पुंडलिक

त्याला जाणीवही नसे

वाट पाहतो श्रीरंग—–

पुंडलिका, मी आलोय

त्याने मारताच हाक

न पाहता फेकली

त्याला बसावया विट—–

चंद्रभागेचीया तटी

पुंडलिक वाळवंटी

वाट पाहे पांडुरंग

कर ठेवूनिया कटी—-

पुंडलिक विसरला

उभे केले विठ्ठलाला

युगे युगे  पांडुरंग

वाट पाहत राहिला—–

पुंडलिका भेटीसाठी

देव  तिष्ठत अजून

विटेवरी उभा  विठू

वाट पाहे आसावून—–

पुंडलिकाचे मंदिर

चंद्रभागा वाळवंटी

अजूनही उभा हरी

कर ठेवूनिया कटी—–

भक्तिभावे ओथंबून

पुंडलिकाला भेटती

मग माऊलीची ओढ

विठू गाभाऱ्याशी नेती—–

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काही हायकू… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ काही हायकू… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

अंगणातल्या झाडावर

कावळा ओरडतोय भुकेने…

घर नाचतय पाहुणे येणार या खुशीने…

         *

रुक्ष झाडाच्या फांदीवर

किलबिलत पाखरू येऊन बसलं…

रात्री झाडं स्वप्नांनी डवरलं…

       *

पहाटे थंडीत

रस्ते.. झाडं कुडकुडू लागली…

तशी धुक्याची चादर ओढून घेतली…

      **

धुवाधार पाऊस

सारे चिडीचूप घरात…

एक पाखरु बागडतय साचलेल्या पाण्यात…                

      **

पावसाच्या प्रतिक्षेत

उभी पिके वाळून गेली…

तो थांबेल म्हणता म्हणता वाहून गेली..

      **

तीन्हीसांजेस धुवाधार पाऊस

एक पाखरु वळचणीला…

केवढा आधार मनाला…

     *

पावसाळी आभाळ

गच्च आलंय भरून…

मी ही पापण्या घेतल्या मिटून…

      *

कुणीच नाही घरात

म्हणून आलो परसात…

तर फुलं.. पाखरं ही निमूट पानांत…

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares