मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंतर्बोध… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ अंतर्बोध… ☆ श्रीशैल चौगुले ☆

अन् त्या तिथे आहे

भक्तिचे मंदिर ऊभे

जिथे मन देहाविना

भक्तितच दंग, राबे.

 

कुठे नको पंढरी

तिर्थक्षेत्र रोज नवे

ध्येय एक ऊराशी

श्रध्देत संसार हवे.

 

संतांची हिच वाणी

संस्काराचे ठाई वसे

कर्म करता जीव

सत्य तिथे देव दिसे.

 

त्याग दुष्ट वर्तने

चैतन्य मुर्ती अंतरी

आत्मा संतुष्ट खरा

कर्तव्य भाव मंदिरी.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 166 ☆ द्वेषामुळे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 166 ?

☆ द्वेषामुळे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

एक होती जात आणिक धर्म नाही वेगळे

काल माझे गाव केवळ पेटले द्वेषामुळे

कोण अपुले कोण परके हे कळाले पाहिजे

वैर सारे या पुढे आता जळाले पाहिजे

झाड त्यांनी लावलेले खोल ही पाळेमुळे

काल माझे गाव केवळ पेटले द्वेषामुळे

धर्म जाती सोडुनी या एक होऊ सर्वथा

माणसांना तोडणा-या टाकुनी देऊ प्रथा

या ,स्वतःची शान राखू थांबवू ही वादळे

काल माझे गाव केवळ पेटले द्वेषामुळे

दीनबंधू जाहले जे भाग्य त्यांचे थोरले

अल्पस्वल्पच लोक,कोणी वीष येथे पेरले

गौर कोणी,कृष्ण कोणी,कोण होते सावळे

काल माझे गाव केवळ पेटले द्वेषामुळे

प्रेमभावानेच येथे माणसाने वागणे

हेच माझे ध्येय आणिक हेच माझे सांगणे

कळत आहे सर्व काही परि तयांना ना वळे

काल माझे गाव केवळ पेटले द्वेषामुळे

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आठवांचे पक्षी… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आठवांचे पक्षी 🧚☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

मम मनाच्या नभात

विहरती आठवांचे पक्षी

सुरम्यशी क्षणांची त्या

शोभे पंखांवरी नक्षी

 

मन माझे हे गोकुळ

रचलास तूच रास

इथे तिथे पानोपानी

सदा तुझाच रे भास

 

असा दाटला मनात

श्रावण तो ओला ओला

तुझ्या भेटीचा सुगंध

जीवनी या दरवळला

 

पौर्णिमा चांदणलेली

हात तुझा  हातात

 प्रतिबिंब तुझे गं

 माझ्याच डोळ्यांत

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #172 ☆ स्वामित्व… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 172 ?

☆ स्वामित्व…  ☆

हे विश्व तुझ्या बापाचे नव्हते आणिक नाही

स्वामित्व तुला देहाचे नव्हते आणिक नाही

 

अंगावर साधी तेव्हा लंगोटीही नव्हती

काहीच तुझ्या नावाचे नव्हते आणिक नाही

 

स्वामित्व जरी मुंग्यांचे नाग डसत हे होते

वारूळ कधी सापाचे नव्हते आणिक नाही

 

हे आप्त निघाले वैरी मात मिळाली म्हणुनी

हे राज्य इथे दुबळ्यांचे नव्हते आणिक नाही

 

सत्तेसाठी नाही ते रयतेसाठी लढले

हे राज्य इथे जाचाचे नव्हते आणिक नाही

 

शृंगार करूनी बसली नजरा वाटेवरती

काहीच तशा अर्थाचे नव्हते आणिक नाही

 

देहास निघाला घेउन एकटाच यात्रेला

कोणीच तुझ्या गावाचे नव्हते आणिक नाही

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन सत्याला भेटव बाबा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मन सत्याला भेटव बाबा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

(पादाकुलक)

निघून जाते वैभव बाबा

व्यर्थ धावणे थांबव बाबा

 

दिवस मागचे पुन्हा आठवत

कपट मनातच साठव बाबा

 

आदर्शाने जगण्यासाठी

स्वप्न तुझे तू रंगव बाबा

 

काळ कुणाचे नाही ऐकत

नकली बडबड थांबव बाबा

 

पंख पसरले नभात ज्यानी

बळ त्त्याना तू पाठव बाबा

 

तुझ्या सुखाच्या डबक्या मधले

पाणी थोडे आटव बाबा

 

परोपकाराच्या वाटेवर

मन थोडेसे गुंतव बाबा

 

फुकटपासरी अभिमानाचे

तुझेच नाटक संपव बाबा

 

उसने आहे ज्ञान मिळाले

तेच जगाला ऐकव बाबा

 

रडक्या कुजक्या या देहाला

वस्त्र रेशमी नेसव बाबा

 

अखेरचा मग सलाम करण्या

मन सत्याला भेटव बाबा

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 114 ☆ वेदनेच्या कविता… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 114 ? 

वेदनेच्या कविता

वेदनेच्या ह्या कविता सांगू कशा 

मूक झाली भावना ही महादशा..धृ

 

अश्रू डोळ्यांतील संपून गेले पहा 

स्पंदने हृदयाची थांबून गेली पहा 

आक्रोश मी कसा करावा, कळेना हा.. १

नाते-गोते आप्त सारे विखुरले 

रक्ताचे ते पाणी झाले आटले 

मंद मंद मृत शांत भावना.. २

 

ऐसे कैसे दिस आले, सांगा इथे 

कीव ना इतुकी कुणाला काहो इथे 

आंधळे हे विश्व अवघे भासे इथे.. ३

 

सांगणे इतुकेच माझे आता गडे 

अंध ह्या चालीरीतीला पाडा तडे 

राज कवीचे शब्द आता तोकडे.. ४

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वास्तव… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

📌 वास्तव… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

अनेक मरणे बघुन सुद्धा

अजुन आहे जगतो मी

कर्म भोग तो कुणास चुकला

त्यासाठी तर उरलो मी

       

अस्तीत्वा च्या साठीच केवळ

कितीक लढाया लढलो मी

कपटजाल ते मला न कळ ले

स्वकियांकडूनच हरलो मी

 

नाते गोते माया ममता

या साठी किती झुरलो मी

खस्ता खाऊन जीर्ण होऊनी

वस्त्रासम   जणु विरलो मी

 

सुख स्वप्नांची झाली शकले

जोडीत तुकडे फिरलो मी

वेड्यापरी या निळ्या नभाला

ठिगळे लावीत बसलो मी

 

ते तर केवळ मृगजळ होते

शोधीत ज्याला फिरलो मी

वास्तव म्हणजे ज्वलंत विस्तव

इतुके नक्कीच शिकलो मी

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आठवत नाही… ☆ श्री विठ्ठल बाबुराव घाडी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ आठवत नाही… ☆ श्री विठ्ठल बाबुराव घाडी ☆

आठवत नाही मला मी टाकलेल पहिल पाऊलं…

रोज दिसतो तोच आनंद अजूनही आईच्या चेहऱ्यावर..

 

आठवत नाही मला मी उच्चारलेला पहिला शब्द….

अर्थ गवसलेला आनंद दिसतो बाबांच्या चेहऱ्यावर..

 

आठवत नाही मला पाठीवरचा पहिला धपाटा….

रोज पहातो पाठीमागुन ही विश्वास बहिणींच्या चेहऱ्यावर..

 

आठवत नाही मला मी खेळात हरलेला दिवस….

माझ्या विजयाचा आनंद रोज पहातो मित्रांच्या चेहऱ्यावर..

 

आठवत नाही मला तुमच्या समोर मी कधी आलो….

रोज पहातो आत्मविश्वास माझा अनोळखी समाजाच्या चेहऱ्यावर….

 

आठवत नाही मला माझीच ओळख मिळालेला क्षण….

आणि आठवू सुद्धा नये त्या मी पणाची ओळख..

 

आठवत नाही मला कधी मिळाले शब्द तुमचे….

आपल्याच शब्दांचा ठसा उमटतो प्रत्येकाच्या मना मनावर..

 

आठवत नाही मला कधी शोधले आपल्या शब्दात अस्तित्व माझे….

त्याच अस्तित्वासाठी मन जडले या आपल्या विश्वप्रार्थनेवर..

 

सारे आठवण्यासाठीच तर शुभ प्रभात होते..

शुभेच्छा देऊन घेऊन लक्ष ठेवू कार्यावर…

 

© श्री विठ्ठल बाबुराव घाडी

चारकोप

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – क्षितिज – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– क्षितिज – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

वरती आकाश

खाली सागर

क्षितिजावरती

मिलन सुंदर

आकाशाच्या

प्रतिबिंबासह

लाटांचे लयदार

नृत्य  निरंतर

जल आकाश

शक्ति या तर

वंदन तयांना

जोडूनी दो कर

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

१८/०१/२०२३

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

श्री मुबारक उमराणी

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

पाऊस येता

तुला आठवतो

पापणपंखात

तुला साठवतो

 

विद्युल्लतेसवे

कडाडतेस तू

पाऊस वादळी

धडाडतेस तू

 

छत ही वाजते

तडतड बाजा

भिजवतो माती

हा पाऊसराजा

 

चिंब चिंब झाडी,

थेंबाची बरसात

संसारवादळी

तुझीच ग साथ

 

पाऊस शिकवी

जीवनाचे मोल

आनंदे नादतो

मनात या ढोल

© श्री मुबारक उमराणी

राजर्षी शाहू काॅलनी, शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares