मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बाई म्हणून… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? कवितेचा उत्सव ?

☆ बाई म्हणून… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

किती

सहन करावं लागलंय तिला,

टिकलीचं आाणि बिगर टिकलीचंही

बाई म्हणून.

तिने

उगारलेच समानतेचे हत्यार तर

पुरुषालाही करायला लावेल ती शृंगार

आणि

लावायला लावेल कुंकू टिकली एक दिवस.

पण

अजूनही तिने

पाळलीय सभ्यता

आणि जपलंय

प्रत्येक घराचं घरपण

युगान युगे.

एकीकडे कपाळ पुसायला लावणारे

आणि दूसरीकडे

टिकली लावायला लावणारे

सगळेच

आजूबाजूला

दबा धरून

तिच्या आसपास

ती

बाई म्हणून.

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #179 ☆ महिला दिन… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 179 ?

☆ महिला दिन… ☆

सकाळी सकाळी उठल्यावर

समोर माझ्या ठेवते चहा

आई, बहीण, बायको किंवा

ती मुलगी असते पहा…

 

माझ्या घरात रोज असे

सकाळ दुपार महिला दिन

मला वाटते रोजच व्हावे

त्याच्यासमोर आपण लीन…

 

महिला दिन चालू ठेवू

खरंच आपण वर्षभर

ज्यांच्यामुळे चालू आहे

या विश्वाचं चराचर…

 

आमच्या आवडीनिवडी पाहून

करतात त्या रोज नाष्टा

मीठ कमी साखर जास्त

म्हणत आम्ही करतो चेष्टा…

 

त्यांचे हात खेळत असतात

विस्तवाशी रोजच खेळ

चटक्याकडं लक्ष द्यायला

त्यांच्याकडे नसतोच वेळ…

 

तवा आणिक पातेले

कायमच देतात चटके

आमच्यासाठी बनवितात

स्वयंपाक त्या हटके…

 

आई आणि बायकोच्या

स्पर्शात असतो फरक

दोन्ही स्पर्श माझ्यासाठी

तरीही असतात प्रेरक…

 

प्रत्येक दिवस माझ्यासाठी

खरंच असतो महिला दिन

तुम्ही देखील नारीला

कसमजू नका कधीच हीन…

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बाजार की बोजवारा ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? बाजार की बोजवारा ? ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक 

जुन्या सार्थ म्हणींचा

येतो आजकाल पडताळा

कुंपणच खाई शेत

पाहिले मी आज डोळा

भरला बाजार शिक्षणाचा

मिळे प्रश्नपत्रिका हजारात

मुख्याध्यापकच करी धंदा

त्याला शिक्षकांची साथ

जीव सोडून सध्या सारे

विकत मिळते हॊ बाजारी

कुणी सांगावे भविष्याचे

तो ही दिवस नसे दूरी !

© श्री प्रमोद वामन वर्तक

०९-०३-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अभंग कीर्ती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ अभंग कीर्ती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

घर हलके हलके माझे

            फिरताना वारे फरते

पण उंबरठ्यावर पणती

         वा-यात वादळी जळते

 

अस्तित्व मनाला माझ्या

        माझेच अविरत छळते

वळणाच्या खडतर वाटा

        चढताना मन अवघडते

 

नेमक्या अनामिक जागी

         निरगाठ मनाला बसते

मग रित्या रित्या देहाचे

        जगणे ही खडतर बनते

 

ही ओढ जीवाला कसली

          कसले हे अनघड नाते

आयुष्य दळाया साठी

           नियतीचे फिरते जाते

 

पाण्यात उथळ असताना

                काठावर येता येते

पण खोल गोल पाण्यातच

          पडतात जीवाला गोते

 

झोकून दिल्यावर जगणे

           माझेपण प्रचिती देते

जगताना दुसऱ्या साठी

         जगण्याचे सार्थक होते

 

तेजोमय जगता येणे

              भाग्याचे लेणे ठरते

पण स्वार्थ उपजतो तेव्हा

           मरणांची कत्तल होते

 

हे कठीण काम जगण्याचे

          सर्वांच्या पुढती असते

माणुसकी जपतो तेव्हा

          मग वाळवंट ही फुलते

 

चिखलातच फुलती कमळे

           हे खरेच वास्तव आहे

पण अभंग कीर्ती साठी

         हौतात्म्यच पदरी पडते

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जागर स्त्रीशक्तीचा… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ जागर स्त्रीशक्तीचा… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

आठवांचा पिंगा बाई

माझिया तनामनात

तुझ्या अनंत रुपांची

सजे आरास मनात

 

माता तू मायासागर

लेक तुची गं हसरी

प्रेम सरिता पद्मिनी

भार्या होसी गं सुंदरी

 

कधी वज्रापरी तर

कधी कुसुम कोमला

अशी कर्तव्य तत्परा

झळाळती तू चपला

 

त्रिखंडात तुझी कीर्ती

घेसी गगन भरारी

पराक्रमी तेजयुता

देशासाठी लढणारी           

 

शूरवीर घडविसी

जपतेस गं संस्कृती

नवी पिढी संस्कारित

करतेस सरस्वती

 

अन्यायाची परिसीमा

सोसलीस एकेकाळी

हिमतीने चाललीस

काटेकुटे पायदळी

 

सारी क्षेत्रे पादाक्रांत

केली या नारीशक्तीने

शिक्षणाने ज्ञानवंत

जाहलीस गं  जिद्दीने

 

नित करुया आपण

जागर गं स्त्रीशक्तीचा

पूज्य भाव असो मनी

थोर स्त्रीत्व जपण्याचा

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 121 ☆ अभंग… (मित्र…) ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 121 ? 

☆ अभंग… (मित्र…)

सुखात दुःखात, साथ देतो खरा

तोच मित्र बरा, ऐसे जाणा.!!

 

कठीण समयी, पाठ जो नं दावी

मैत्री ती प्रभावी, प्राचीवर.!!

 

अडणी क्रियेला, धावून जो येतो

तोच प्रभवतो, मित्र छान.!!

 

स्वार्थी नी कपटी, लोभी ज्याची वृत्ती

करावी निवृत्ती, संगतेची.!!

 

पुरण-पोळीचा, ठेचा भाकरीचा

प्रश्न भावनेचा, ज्याचा त्याचा.!!

 

चंदन सुगंधी, पर-उपकारी

ऐसा मित्र तरी, भाव द्यावा.!!

 

तयाचे ऐकावे, तयाचे जाणावे

तया सुखवावे, सदैव हो.!!

 

कवी राज म्हणे, दूध साखरेचा

तैसा मित्रत्वाचा, संग हवा.!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उघडुन डोळे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ उघडुन डोळे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : पादाकुलक)

☆ 

उघडुन डोळे सताड अपुले

तपशीलासह जग निरखावे

मिटून लोचन कधी आपुले

अंतर्यामी खोल बुडावे !

☆ 

एक फूल पण जन्मच गंधित

दो किरणांनी नभ उजळावे

दोन क्षणांचे अमृत चंचल

मातीच्या कुंभात भरावे !

☆ 

कधी नभातुन कोसळतांना

डंख स्वतःला स्वतः करावे

पतनाच्या मग राखेतुनही

फिनिक्स होवुन पुन्हा उडावे !

☆ 

चुका तयांच्या होत्या क्षुल्लक

सजा तुझी पण प्राणांतिक रे

तोडिलेस तू तुझेच लचके

चिंतन हेही कटू करावे !

☆ 

उत्कट व्याकुळ घन बरसाया

परी भिजाया नाही कोणी

तेजोभंगित  दातृत्वाचे

शल्य मूक हे हृदी धरावे !

☆ 

कोण इथे रे अजातशत्रू

जन्मच जेथे एक रणांगण

निशाण निवडुन तूही अपुले

रणधर्माने रण झुंजावे !

☆ 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्त्री शक्ती… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ स्त्री शक्ती… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

हरेन मी पुन्हा पुन्हा

जिंकेन परी मी शेवटी

यत्न ना सोडेन कधी

असले जरी मी एकटी ||

 

अबला न मी, कृतीशील मी

गंभीर पण खंबीर मी

ओझे आहे खांद्यावरी

आकाशही पेलेन मी ||

 

ध्येयधुंदी अंतरी

उत्साह मज बेबंद आहे

संकटांना नमविण्याचा

मज अनोखा छंद आहे ||

 

कोण मजला अडवितो

तटबंदीही भेदेन मी

दश दिशा मज मोकळ्या

सगळीकडे विहरेन मी ||

 

ढासळणारे धैर्य सावरुन

कोसळताना उठते मी

वैफल्याच्या धुक्यातूनही

क्षितिजा पल्याड बघते मी ||

 

गर्व आहे मज स्त्री शक्तीवर

पर्व नवे अनुभवते मी

अवश्य या आशीष द्यावया

सिद्ध आहे स्वागतास मी ||

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निसर्गातील रंगपंचमी…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? निसर्गातील रंगपंचमी… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल

अंबर जेधवा कृष्ण होते

लीला सगळ्या तेथे दावते

अंबर रंगीत ल्याली धरा

रंग उडवित राधा होते॥

अंतर दोघांचे एक होता

साद दोघांची मन ऐकते

अंतर सरते नकळत

अंतरंग प्रेमात रंगते॥

रंग पिचकारी रोखलेली

कृष्णांग इंद्रधनू भासते

रंग दावी कृष्णही राधेला

तरंगात ती भान हरते॥

पंचमी निसर्गाची अद्भुत

बारामाही किमया घडते

पंच मी होते अजाणताच

राधा कृष्ण तयास बोलते॥

धुलवड आज निसर्गाची

वातावरण का भारावते

धूल वड सरमिसळत

धार होऊन सळसळते॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जागतिक महिला दिना निमित्त –  आदि नारी ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ जागतिक महिला दिना निमित्त –  आदि नारी ☆ श्रीशैल चौगुले ☆

      जन्मोजन्मी सदैव युग हे

      नारी गौरव जगद्जननी

      सिता,कुंती सावित्री ही माता

      हे विश्व दिले दर्शना अजनी.

 

      जशी मृदा ही सृष्टी तारते

     कौशल्येच्या संस्कार ऋणांनी

      नि देवकी-यशोदा होऊन

     प्रेम-भक्तीने कृपा क्षणांनी.

 

     या नारीच्या चरणी जीवन

    सर्व सुख यश तीस अर्पण

     अनेक भुमिकेशी संसारी

     केवळ ऊरते ती दर्पण.

 

     या नारीचा हा जयजयकार

     शब्दसुमने ऊधळी मन

     माता मुलगी पत्नी देवी सत्य

     सहस्त्र  युगे  जन्माचे धन.

श्रीशैल चौगुले.

९६७३०१२०९०.

Please share your Post !

Shares