मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ धुकं… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ धुकं… ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

अशी कशी तू धुक्यात

क्षणी जातेस विरुन

थोडं बघ वाटेकडे

सूर्य जाईल घेऊन

 

धुक्यांच्या वलयात

तू जातेस लपून

पहाटेच्या थंड दवा

चिंब अंग भिजून

 

धुक  दाट पडलेलं

त्यांन सूर्या धरलेलं

आसुशी  भेट धरा

तरी थोडं थांबलेलं

 

पडू दे विरहाच धुकं

पण तू विरू नकोस

मनवेड्या धुक्यात

आंधळी होऊ नकोस

 

वनी धुकं मनी धुकं

कसं  दिसे डोळ्यांना

आत शिरू दे सूर्याला

फूल येऊ दे कळ्यांना

 

वृक्ष वल्लरींना कसं

गेलं धुकं लपेटून

घरंगळती कांही मोती

ओल्या  पानांपानांतून

 

हळुहळू उजाडेल

चरी धुक्याचा वावर

थबकली सारी किरणं

पांघरली सूर्यानं चादर

 

© मेहबूब जमादार

मु -कासमवाडी पो .पे ठ  जि .सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #156 ☆ संत कबीर… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 156 ☆ संत कबीर… ☆ श्री सुजित कदम 

सत्य कर्म सिद्धांताचे

संत कबीर द्योतक

पुरोगामी संत कवी

दोहा अभंग जनक…! १

 

ज्येष्ठ पौर्णिमेचा दिन

कबिरांचा जन्म दिन

देव आहे बंधु सखा

जपू नाते रात्रंदिन….! २

 

कर्म सिद्धांताचे बीज

संत कबीरांची वाणी

धर्म भाषा प्रांतापार

निर्मियली बोलगाणी….! ३

 

सांगे कबिराचे दोहे

सोडा साथ अज्ञानाची

भाषा संस्कृती अभ्यास

शिकवण विज्ञानाची…! ४

 

बोली भाषा शिकोनीया

साधलासे सुसंवाद

अनुभवी विचारांना

व्यक्त केले निर्विवाद…! ५

 

एकमत एकजूट

दूर केला भेदभाव

सामाजिक भेदभाव

शोषणाचे नाही नाव…! ६

 

समाजाचे अवगुण

परखड सांगितले

जसा प्रांत तशी भाषा

तत्त्वज्ञान वर्णियले…! ७

 

राजस्थानी नी पंजाबी

खडी बोली ब्रजभाषा

कधी अवधी परबी

प्रेममयी ज्ञान दिशा…! ८

 

ग्रंथ बीजक प्रसिद्ध

कबीरांची शब्दावली

जीवनाचे तत्त्वज्ञान

प्रेममय ग्रंथावली…! ९

 

नाथ संप्रदाय आणि

सुफी गीत परंपरा

सत्य अहिंसा पुजा

प्रेम देई नयवरा…! १०

 

संत कबीर प्रवास

चारीधाम भारतात

काशीमधे कार्यरत

दोहा समाज मनात…! ११

 

आहे प्रयत्नात मश

मनोमनी रूजविले

कर्ममेळ रामभक्ती

जगा निर्भय ठेविले…! १२

 

हिंदू मुस्लिम ऐक्याचा

केला नित्य पुरस्कार

साखी सबद रमैनी

सधुक्कडी आविष्कार…! १३

 

बाबा साहेबांनी केले

संत कबीरांना गुरू

कबीरांचे उपदेश

वाट कल्याणाची सुरू…! १४

 

काशीतले विणकर

वस्त्र विणले रेशमी

संत कबीर महात्मा

ज्ञान संचय बेगमी…! १५

 

सुख दुःख केला शेला

हाती चरखा घेऊन

जरतारी रामनाम

दिलें काळीज विणून…! १६

 

संत्यमार्ग चालण्याची

दिली जनास प्रेरणा

प्रेम वाटा जनलोकी

दिली नवी संकल्पना…! १७

 

मगहर तीर्थक्षेत्री

झाला जीवनाचा अंत

साधा भोळा विणकर

अलौकिक कवी संत…! १८

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – कविता स्मरण… – शांता शेल्के ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– कविता स्मरण… – शांता शेल्के  ? ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर 

मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले

जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले

जखम जिवाची हलके हलके भरून यावी

तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले

घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छाया

दुःखाचीही अशी लागते अनवट माया

आक्रसताना जग भवतीचे इवले झाले

इवले झाले आणिक मजला घेरित आले

मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे

एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे

सुखदुःखाच्या मधली विरता सीमारेषा

गाठ काळजातली अचानक सुटते आहे

जाणिव विरते तरीही उरते अतीत काही

तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही

आतुरवाणी धडधड दाबून ह्रुदयामधली

श्वास आवरून मन कसलीशी चाहुल घेई

हलके हलके उतरत जाते श्वासांची लय

आता नसते भय कसले वा कसला संशय

सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा

मी माझ्यातून सुटते, होते पूर्ण निराशय……

रचना : शांता शेळके

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अस होत नसतं ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ असं होतं नसतं ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

(हिन्दी भावानुवाद ⇒  इसका मतलब ये तो नही…☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆)

रस्ता बंद झाला

म्हणजे रस्ता संपला

              ….असं होत नसतं

 

दिव्यातलं तेल संपलं

म्हणजे प्रकाश संपला

              ….असं होत नसतं

 

पानं झडून गेली

म्हणजे झाडही वठलं

              ….असं होत नसतं.

 

असतो एखादा क्षण काळाकुट्ट

पण तोच करतो मन घट्ट.

 

पुन्हा उठावं,लढावं आणि जिंकावं

असं वाटणं म्हणजे जगणं

 

मन खेळतच जाणार नवा खेळ,

क्षणाक्षणाला ;

पण बुद्धीच्या शृंखलांनी आवरावं त्याला,

झेप घ्यावी नव्या उमेदीनं अन्

व्हावं आपणही एक फिनिक्स !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 177 ☆ बाई… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 177 ?

💥 बाई… 💥 सुश्री प्रभा सोनवणे ☆

काहीतरी या मनात

सदा  आहेच सलते

दु:ख कोणते सदैव

 बाई  आहेच दळते

 

बाईपण सोसू कसे

चिंता अखंड करते

शैशवात फुलताना

काट्यावर ती  वसते

 

आई म्हणाली हळूच

कानी तेराव्याच वर्षी

“मोठी झालीस तू आता”

नको जाऊस दाराशी

 

 आत कोंडले स्वतःस

  नाही दारापाशी गेली

  रूप ऐन्यात पाहून

  स्वतः वरती भाळली

 

बाई आहे म्हणताना

जीणे अन्यायाचे आले

अशा त-हेने जगता

ओझे आयुष्याचे झाले

© प्रभा सोनवणे

१६ मार्च २०२३

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ग्रीष्म युग…. ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ग्रीष्म युग… ☆ श्रीशैल चौगुले ☆

सुखी मना  भाव पुन्हा

तोच जुना    ग्रीष्मात.

 

दुःख तसे   उन्ह तप्त

झळ  युक्त   अस्वस्थ.

 

याद गीत    गुप्त प्रीत

भेट नीत      काळजा.

 

सत्य बात    घडी घात

तुझी साथ   मरण.

 

एक मात्र    जीव सल

जणू दल    जीवंत.

 

 गत्  जन्म    ऋतू साक्ष

तो गवाक्ष     आशाळ.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #183 ☆ ठोकरून गेला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 183 ?

☆ ठोकरून गेला…  ☆

देहास फक्त माझ्या वापरून गेला

काळीज मी दिलेले ठोकरून गेला

 

माती सुपीक होती फाळ टोचणारा

देहास तापलेल्या नांगरून गेला

 

प्रेमात गुंतल्याची चाल बेगडी ती

जाळे शिताफिने तो कातरून गेला

 

एकाच तो फळाला चाखण्यास आला

कित्येक का फळांना टोकरून गेला ?

 

दाटी करून स्वप्ने सोबतीस होती

गर्दीत आठवांच्या चेंगरून गेला

 

मी बाहुलीच झाले फक्त नाचणारी

तोडून सर्व दोऱ्या डाफरून गेला

 

आकाश चांदण्याचे सोबतीस त्याच्या

पाहून का मला तो गांगरून गेला

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दुःख… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ दु:ख… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : पादाकुलक)

चिरते छाती आभाळाची

लखलख तलवारीची धारा

कधि दुःखाची अक्षय ज्योती

दे तिमिरावर मौन पहारा !

 

     बाण कुणाचा?रुतला कोठे ?

     स्थलकालाचे चाले मंथन

     यज्ञ संपला उरे तरीही

     समिधांचे रे ज्वलंत क्रंदन !

 

परदु:खांची जळते नगरी

तरी वाजवी कुणि सारंगी

कुणि करुणाकर पसरुन बाहू

गगन फाटके ह्रदयी घेई !

 

     दुःख भुकेचे न् दास्याचे

     खोल जखम ही भळभळणारी

     भविष्यातले सूचक तांडव

     मिणमिण पणती थरथरणारी !

 

नवीन दृष्टी नवीन सृष्टी

दुःख विलक्षण दुःख चिरंतन

मातीमधल्या भग्न नभाचे

असेच चाले शाश्वत चिंतन !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 126 ☆ वृक्षवल्ली आम्हां सोयरे… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 126 ? 

☆ वृक्षवल्ली आम्हां सोयरे… 

वृक्षवल्ली आम्हां सोयरे

नारे फक्त लावल्या गेले 

वन मात्र उद्वस्त झाले..०१

 

वृक्षवल्ली आम्हां सोयरे…

अभंग सुरेख रचला

आशय भंग झाला..०२

 

वृक्षवल्ली आम्हां सोयरे

झाडांबद्दलची माया 

शब्द गेले वाया..०३

 

वृक्षवल्ली आम्हां सोयरे

वड चिंच आंबा जांभूळ

झाडे तुटली, तुटले पिंपळ..०४

 

वृक्षवल्ली आम्हां सोयरे

संत तुकारामांची रचना 

सहज पहा व्यक्त भावना..०५

 

वृक्षवल्ली आम्हां सोयरे

तरी झाडांची तोड झाली

अति प्रगती, होत गेली..०६

 

वृक्षवल्ली आम्हां सोयरे

निसर्ग वक्रदृष्टी पडली 

पाणवठे लीलया सुकली..०७

 

वृक्षवल्ली आम्हां सोयरे

पाट्या रंगवल्या गेल्या 

कार्यक्रमात वापरल्या..०८

 

वृक्षवल्ली आम्हां सोयरे

वृक्षारोपण झाले

रोपटे तडफडून सुकले.. ०९

 

वृक्षवल्ली आम्हां सोयरे

सांगणे इतुकेच आता 

कोपली धरणीमाता..१०

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तळ्याकाठी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ तळ्याकाठी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

निळ्या तळ्याच्या कडेला

 माझे हेलावे अंतर

लाट धडके लाटेला

काटा माझ्या अंगावर

 

तळ्यातले पाणी होई

माझ्या मनाचा आरसा

कोंदटले मन माझे

इथे टाकते उसासा

 

झाड पाण्यात निरखी

आपलेच प्रतिबिंब

माझ्या काळजात खिळे

एक सय ओली चिंब

 

पाण्यावरी ओनावता

 दिसे माझाच चेहरा

 पाठमोऱ्या सावलीचा

 रंग झाला गोरा गोरा

 

गंधाळला रानवारा

येतो वाजवीत पावा

माझ्या ध्यानीमनी घुमे

तुझ्या सादाचा पारवा

 

आठवता सारे सारे

माझी ओलावे पापणी

भर घालते तळ्यात

थेंब भर खारी पाणी

 

माझ्या तुझ्या आसवांची

अशी पडे गळामिठी

वाट पाहतो कधीचा

बसुनीया तळ्याकाठी

 

आला घोंगावत वारा

तुझा सुवास घेऊन

उठलेल्या तरंगानी

गेली प्रतिमा वाहुनी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares