मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – फणसाचे झाड… – ☆ श्री आशिष  बिवलकर / सुश्री नीलांबरी शिर्के ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– फणसाचे झाड… – ? ☆ श्री आशिष  बिवलकर / सुश्री नीलांबरी शिर्के

१)

कितीही काटा छाटा,

जगण्याची हिम्मत नाही सुटली !

फळण्याच्या जिद्दीने,

फणसाला नवीन पालवी फुटली !

 

असला जरी काटेरी,

आतला गोडवा नाही सोडला !

कृतघ्नतेचे घाव साहून,

देण्याचाच  स्वभाव  जडला !

 

मधुर गरे दिले,

मधुर दिला सहवास !

घमघमाट फळाचा,

दरवळला गोड सुवास !

 

अचानक चालवावी,

क्रूरतेनने कसली कुठार !

घावावर घाव पडले,

ठेवला विश्वास केला ठार !

 

माणूस म्हणजे,

बेरकीच असतो !

स्वार्थापुढे कधीच,

कुणाचा तो नसतो !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

सुश्री नीलांबरी शिर्के

?– फणसाचे झाड… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

२) 

दानशूर  कर्ण आणि वृक्ष

यात फरक सांगा काय  ?

आयुष्यभर दान करूनही

फसवून  दान मागितल जाय !

 

कर्णानेही कवचकुंडलाचे दान

रक्तबंबाळ होत दिलं काढून

शौर्याने रणांगणी लढत गेला

करत राहिला प्रतिकार लढून |

 

वृक्षही लढतोय अजूनही

जरी छाटलेत हात  मान

मूळे धरतीत घट्ट अजून 

तया सतत असे भान |

 

बुंधा पहाता झाडाचा

आपण जरा डोळे उघडून 

दिसेल याची त्वचाही

नेलीये  क्रूरपणाने सोलून |

 

देणे धर्म सोडला नाही

बुंध्यावरही फुटवे येई

एवढा मोठा फणस त्याच्या

दातृत्वाची जाणिव देई |

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्याचे मोजमाप… ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

? कवितेचा उत्सव  ?

☆ आयुष्याचे मोजमाप… ☆ सौ.अस्मिता इनामदार

मी आता सोडून दिलंय

आयुष्याचं मोजमाप घेणं

करायचंय काय घेऊन

कुणाला आहे त्याचं देणं ?

 

दरवर्षी येतोच ना पावसाळा

तितकाच येतो कडक उन्हाळा

तशाच सोसल्यात मीही

सुखाबरोबर दु:खाच्या झळा..

 

हसले किती आनंदात

भिजले तशीच संकटात

आधार नव्हता कुणाचाही

तरीही चालले फुफाट्यात..

 

आता सारी पार केलीत

संसारातली धोक्याची वळणं

म्हणून आता सोडून दिलंय

आयुष्याचं मोजमाप घेणं…

 

© अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वर आले जुळूनी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

स्वर आले जुळूनी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

हसली राधा दिसला

मोहन

लपला जो लोचनी

अचानक स्वर आले जुळूनी

 

कुठे वाजता घुंघरवाळा

 बाळकृष्ण तो दिसे सावळा

हात पसरीता घ्याया उचलूनी पडली आलिंगनी

 

रित्या घटांतून भरता पाणी

कुजबुजलेला वाटे कोणी

मोरपिसांचा स्पर्श भासतो जाई रोमांचुनी

 

कदंब हसला हसले गोकुळ

हसता यमुना झाली व्याकुळ

आभासाचे मृगजळ उठवी लाज तिच्या लोचनी

 

परनिंदेचे तुफान वादळ

मनी माजवी अनंत खळबळ

दचकून उठला हसला मोहन

लपला जो लोचनी

 

राधा म्हणजे अविधाभक्ती

म्हणोत कोणी तीज आसक्ती

कणा कणातून वास हरिचा घालतसे मोहिनी

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ ‘ऐक ऐक सखये बाई…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘ऐक ऐक सखये बाई…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

सांगते मी तुला काही

        नको गुंतू ग कशामधे                                   

        नाही काही तुझे येथे

काय तुझे काय माझे

नसे काही तसे येथे

        काय संगे आणले होते

        काय निर्मीलेस तूगं येथे

सारे दान त्या सृजनाचे

सोहळे ते माय मातीचे

        माती पाणी उन वारा

        त्यास सांग नाव कोणाचे

माझे माझे कशापायी

व्यर्थ दुःख त्याचे पायी

        देह तुझा तुझा म्हणशी

        तोही मातीच्याच

        पोटी देशी

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – सजा… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– सजा…– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

पडत चालल्यात भेगा

  रानात खोल खोल

  पोटची पोरं जगवण्या

  धरणी मागते ओल

  पोटात बीज सुकत चालले

  वाट पाहून डोळे थकू लागले

  येरे ना रे मेधा..  बरस अंगभर

  मन माझेही कळवळू लागले

 जग पोशिंदा शेतकरी राजा

 कष्टकरी हा भूपुत्र  माझा

 कष्टाला दे न्याय तयाच्या 

 कशास देशी  ही क्रूर सजा —

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पावसाची आळवणी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?  कवितेचा उत्सव ?

पावसाची आळवणी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(पावसाची वाट पाहून सगळेच थकले आहेत. म्हणून त्याची केलेली आळवणी)

पुरे ना तुझे न येण्याचे बहाणे

दिसेना तुला का मयूर नाचणे॥

 

कितीदा तुझी मी आर्जवे करावी

किती आमिषे मी तुला दाखवावी

बालपणीचा लपंडाव खेळणे

शोभे ना  तुला फक्त लपून रहाणे

पुरे ना तुझे न येण्याचे बहाणे

दिसेना तुला का मयूर नाचणे॥

 

असेल जरी काही चुकले माकले

माफ कर झणी होउन आपले

चल दोघे मिळूनी गाऊ प्रित गाणे

हात सरीत तुझ्या लपेटणे

पुरे ना तुझे न येण्याचे बहाणे

दिसेना तुला का मयूर नाचणे॥

 

आसावली  सृष्टी आतूर सगळे

वर्षावात लेण्या मोती नी पोवळे

छेड तूच अता संतूरी तराणे

अनुभवूदे ना फक्त चिंब होणे

पुरे ना तुझे न येण्याचे बहाणे

दिसेना तुला का मयूर नाचणे॥

 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 160 – ओवी – देव गणेशा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 160 – ओवी – देव गणेशा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

आधी वंदू एकदंता…।

तूच असे बुद्धी दाता..।

सकलांचा सुखकर्ता…।

देव गणेशा..।।१।।

 

चौदा विद्यांचा अधिपती..।

देवगणांचा सेनापती ..।

वंदिते मी अल्पमती

गणनायका..।।२।।

 

शोभतसे गजवदन..।

तैसेची मूषक वाहन…।

दुंदील तनुचे भूषण …।

धुंम्रवर्णा..।।३।।

 

कार्तिकेयाचा अनुज…।

तुची असशी गिरिजात्मज….।

गुण वर्णाया बुद्धी मज…।

 विद्याधिशा…।।४।।

 

उटी शोभे शेंदूराची…।

माळ कंठी मुक्ताफळाची…।

बंध त्या फणीवराची…।

पितांबरी।।५।।

 

बहु मोदकाची आवडी..।

जास्वंदाची फुलझडी।

आणिक दुर्वांची जुडी…।

आवडे भारी…।।६।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वळीव… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ वळीव… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

रुणझुण रुणझुण ताल निनादत

अलवारसे गीत छेडित

ठुमकत ठुमकत गिरक्या घेत

वळीव सखा येई अवचित

 

वादळवाऱ्या संगे गर्जत

विंझणवाऱ्या संगे नाचत

वातलहरींची सुखमय संगत

येई कुठूनसा मना सुखवित

 

तरल सुगंधित फुलती धुमारे

अंगांगावर मृदुल शहारे

शांतवितसे तप्त झळा रे

शतशत गारा -फुले उधळीत

 

मनभावन हा मित्र कलंदर

खळाळता हा हसरा निर्झर

गुंफूनी अलगद करातची कर

जाई परतून हास्य फुलवित

 

चंचल अवखळ परी शुभंकर

हवाहवासा मनमीत मनोहर

सौख्यफुलांनी गंधित अंतर

चैतन्यमय सखा येई अवचित

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #182 ☆ ध्येय निष्ठा… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 182 – विजय साहित्य ?

🌼 ध्येय निष्ठा…! 🌼 ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

(स्वामी विवेकानंद स्मृती दिनानिमित्त)

स्वामी विवेकानंदांचे

दिव्य स्थान अंतरात

दत्त नरेंद्र नाथ हे

मुळ नाव दिगंतात…!

 

राम कृष्णांचा संदेश

पोचविला जगतात

रामकृष्ण मिशनाचे

कार्य जागे काळजात..!

 

पाश्चिमात्य तत्वज्ञान

घनिभूत देशभक्ती

स्वामी विवेकानंदांची

तर्कशास्त्र ध्येयासक्ती..!

 

सर्वधर्म परीषद

वेदांताचा पुरस्कार

भारतीय संस्कृतीचा

केला प्रचार प्रसार..!

 

गर्व,पैसा,कींवा भूक

नको अती उपभोग

अती हव्यासाने होई

वीषमयी नाना‌रोग..!

 

भारतीय दृष्टीकोन

विचारांचे दिले धन

सर्वांगीण विकासात

सेवाभावी तनमन..!

 

स्वामी विवेकानंदाचा

शब्द शब्द मौल्यवान

कार्य कर्तृत्वाचे यश

व्यासंगात परीधान…!

 

स्वामी विवेकानंदाची

दिव्य जीवन प्रणाली

एका एका अक्षरांत

ध्येय निष्ठा सामावली…!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ !! गुरु !! ☆ सौ. सुनिता जोशी ☆

सौ. सुनिता जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ !! गुरु !! ☆ सौ. सुनिता जोशी ☆

आक्रमित हा प्रवास, सत्-मार्ग माझा गुरु

अशाश्वत हा निवास, सत्–वास माझा गुरु..

 

बेबंध ही नाती, सत्–बंधन माझा गुरु

बेधुंद ही स्तुती, सत्–मंथन माझा गुरु..

 

चंचल हे मन, सत्–बुद्धी माझा गुरु

नश्वर हे तन, सत्–शुद्धी माझा गुरु..

 

बेगडी ही माया, सत्–प्रीत माझा गुरु

आभासी ही छाया, सत्–मित्र माझा गुरु..

 

अनिष्ट ह्या प्रथा, सत्–निष्ठ माझा गुरु

अरोचक ह्या कथा, सत्–गोष्ट माझा गुरु..

 

दिखाऊ ही विरक्ती, सत्–भाव माझा गुरु

सदोष ही मुक्ती, सत्–ठाव माझा गुरु..

 

अपरिहार्य हे जगणे, सत्–आचार माझा गुरु

अमतितार्थ हे मरणे, सत्–विचार माझा गुरु..

 

© सौ. सुनिता जोशी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares