मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बावरे प्रेम… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी  कवितेचा उत्सव  ☆ बावरे प्रेम… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆  मी कलंदर हिंडणारा दशदिशा मज मोकळ्या प्रीतीच्या पाशात का बंदिस्त मज केलेहस तू कोण मी कुठला प्रवासी काय माझे प्राक्तन डोळ्यातून पण बोलक्या संकेत मज केलास तू   पापण्या झुकल्या जरा अन उमटली गाली खळी लाजरा मुखचंद्रमा तव कोरला हृदयात मी सोडताना हा किनारा पेटतो वणवा उरी आसवांची शपथ राणी परतुनी येईन मी   स्पर्शिले हळुवार तू अन्.. ग्रीष्म सारा लोपला माध्यान्हीच्या जळत्या उन्हाचे चांदणे केलेस तू याद ही रोमांचकारी नित्य राहील साथीला निद्रिस्त तारा अंतरीच्या छेडल्या आहेस तू © श्री रवींद्र सोनावणी निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५ मो. क्र.८८५०४६२९९३ ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #138 ☆ ज्ञानयोग..! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम  कवितेचा उत्सव  ☆ सुजित साहित्य # 138 ☆ ज्ञानयोग..! ☆ श्री सुजित कदम ☆ संतश्रेष्ठ मांदियाळी नाम  माउलीचे घेऊ ज्ञानदेव कृष्णरूप काळजाच्या पार नेऊ...! १   संत निवृत्ती सोपान मुक्ता बहिण धाकली वंशवेल अध्यात्माची भावंडात सामावली...! २   ग्रंथ भावार्थ दीपिका तमा अखिल विश्वाची संत कवी ज्ञानेश्वर तेज शलाका ज्ञानाची..! ३   ग्रंथ अमृतानुभव विशुद्धसे तत्वज्ञान जीव ब्रम्ह ऐक्य साधी माऊलींचे भाषा ज्ञान...! ४   मराठीचा अभिमान कर्म कांड दूर नेली ज्ञानेश्वरी सालंकृत मोगऱ्याची शब्द वेली...! ५   नऊ सहस्त्र ओव्यांचा कर्म ज्ञान भक्ती योग दिला निवृत्ती नाथाने अनुग्रह ज्ञानयोग...! ६   चांगदेव पासष्टीत ज्ञाना करी उपदेश पत्र पासष्ठ ओव्यांचे अहंकार नामशेष...! ७   सांप्रदायी प्रवर्तक योगी तत्वज्ञ माऊली ग्रंथ अमृतानुभव गीता साराची साऊली...! ८   भागवत धर्म तत्वे अद्वैताचे तत्वज्ञान आलें प्राकृत भाषेत वेदांताचे  दैवी ज्ञान...! ९   चंद्रभागे वाळवंटी अध्यात्मिक लोकशाही पाया रचिला धर्माचा सांप्रदायी राजेशाही...! १०   माऊलींची तीर्थ यात्रा हरीपाठ बोधामृत देणे पसाय दानाचे अभंगांचे सारामृत...! ११   इंद्रायणी तीरावर संपविला अवतार संत ज्ञानेश्वर नाम हरिरुप शब्दाकार...! १२   संजिवन समाधीचे झाले चिरंजीव रूप घोष माऊली माऊली पांडुरंग निजरूप...! ,१३ ©  सुजित कदम संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30 मो. 7276282626 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈...
Read More

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रंगांची उधळण! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक   चित्रकाव्य   ☆   रंगांची उधळण!  ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ ☆  सांजवेळी नभांगणी होई रंगांची उधळण, पाहून मज प्रश्न पडे रंग त्यात भरी कोण ? ☆ बघून स्वर्गीय नजारा गुंग होऊन जाई मती, नाना रंगांची वेशभूषा वाटे मग ल्याली धरती ! ☆ पाहून न्यारी रंगसंगती मन मोहरून जाई, कुठला त्याचा कुंचला, कुठली असेल शाई ? ☆ अदृश्य अशा त्या हाती असावा अनोखा कुंचला, आपण फक्त हात जोडावे त्या वरच्या रंगाऱ्याला ! ☆ फोटोग्राफर -  अस्मादिक © प्रमोद वामन वर्तक २५-११-२०२२ स्थळ - बेडॉक रिझरवायर, सिंगापूर. मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959 ई-मेल – [email protected] ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राधा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे  कवितेचा उत्सव  ☆ राधा... ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ एकटी तुझ्याविण, राहू कृष्णा, कशी मी वृंदावनी ! राधा करिते, मनी खंत ती, विरहाच्या त्या क्षणी!   गोकुळ सोडून, कान्हा जाई , दूर राहिली राधा! जाळीत राही, राधेला त्या, कृष्ण विरहाची बाधा !   कृष्ण बासरी, ऐकू येई राधेला अंतरी ! बासरीत त्या, सूक्ष्म होऊनी, राधा गाई उरी !   मोरपीस राधेने दिधले,  कृष्ण वागवे शिरी ! तुझीच साथ, सोबत कायम, ठेवील हो श्रीहरी!   अखंड दिसतो, कृष्ण तिला, मन वृंदावन होते ! राधाकृष्ण एकरूप होता मन तृप्त तिचे होते ! © सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈...
Read More

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 159 ☆ नातं ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे कवितेच्या प्रदेशात # 159 ☆ नातं ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ "अकारणच जवळीक दाखवली!" असे वाटून जाते, आजकाल!   निष्कारणच Attitude दाखवत, निघून गेलेली ती..... रिक्षात बसल्यावर , कसा करेल इतक्या प्रेमाने आपल्याला हात?? हे लक्षात यायला हवं होतं ! पण प्रतिक्षिप्त क्रियेसारखा.... उंचावला जातो हात... पण तिचं पुढचं वाक्य ऐकून जाणवतं, अरे, ती इतर कुणाशी बोलतेय,  आपल्या पाठीमागे असलेल्या !   किती फसवी असतात ना, ही नाती?? काल परवाच सांगितले, गूज मनीचे, पाश असतात कुठले, कुठले ! शेअर केल्या काही गोष्टी, की , शांत होते मन! आणि गळामिठी घातलीच जाते, त्या "हमराज" मैत्रीणीला !    पण नाती रहात नाहीत आता इतकी निखळ, पूर्वीही व्हायच्याच कुरबुरी...भांडणं रूसवेफुगवे! .....पण आजकाल दर्प येतात, अहंकाराचे! याच प्रांगणात खेळ सुरू झाले होते... पण "जो जिता वही सिकंदर" म्हणत पहात रहायची लढाई, बेगुमान! या युद्धात सहभागी व्हायचेच नसतेच खरेतर! पण युद्ध अटळ मैत्रीतही ! जो तो समजत असतो,  स्वतःला रथी महारथी ! ....नसतानाही ! आपण सांगून टाकतो आपले अर्धवट ज्ञान... म्हणूनच आपला होतोच, अभिमन्यू! मैत्रीच्या नात्यातही ! © प्रभा सोनवणे संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011 मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected] ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈...
Read More

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी कविता ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी परिचय  नाव : - सौ . पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी शिक्षण : - बी कॉम, ए.टी.डी., आर्ट मास्टर आवड : - कविता करणे, वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहिणे . वाचन आणि पर्यटन नोकरी : -  CBSE स्कुल मध्ये ड्रॉईंग टिचर म्हणुन सहा वर्ष कार्यरत आहे . कार्यशाळा : - कॅनव्हास पेंटीग, ओरिगामी, फ्लुएड आर्ट, क्राफ्ट वर्क पोत निर्मिती, बांधणी वर्क अशा अनेक कार्यशाळा मी घेते . फ्लुएड आर्ट : - यामध्ये ॲक्रॅलिक कलर्स वापरून कॅनव्हासवर पेंटीग केले जाते . याचे पुर्ण किट मिळते. कॅनव्हास पेंटींग : - यामध्ये ॲक्रॉलिक, ऑईल कलर्स चा वापर करून पेंटीग केले जाते. ओरिगामी : यामध्ये पेपर च्या घड्या घालुन कागदापासून कलाकृती साकारली जाते . बांधणी वर्क : बांधणी वर्क च्या कार्यशाळे मध्ये वेगवेगळ्या प्रकारे बांधणीचे प्रकार शिकवले जातात . यामध्ये कापडावर बांधणी प्रिंट शिकवले जाते. क्राफ्ट वर्क : -  यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले पेपर पासून, कापडापासून बनविण्यास शिकविली जातात . तसेच नॅपकिन पासुन फुले व त्याचा बुके बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. लहान मुलांसाठी क्लेपासुन छोट्या छोट्या कलाकृती करण्यास शिकविले जाते. व्हेजिटेबल, फ्रुट कार्व्हिंग : -...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 12 – नित्य तू जवळी रहा ……….  ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे ☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 12 ☆ ☆ नित्य तू जवळी रहा .......... ☆ सोबतीला तू हवा, दुसरे काही नको नित्य तू जवळी रहा,  मागणे दुजे नको !   याच त्या सुखी क्षणांचा, लागला  खे आहे लळा दिसणे तुझे, असणे तुझे, आणखी काही नको !   लिहून मी ठेविलें, माझ्याच या भाळी तुला पर्व हे सुरु जाहलें, वाढो त्याची कळा !   सात्त्विकता ही तुझी, आणखी देशील का रंगले मी तुझ्यात, तू ही माझ्यात रंगशील का?   गगनाहुनी ऊंच हा आनंद माझा वेगळा, सात्त्विकच्या रूपाने आयुष्य येई फळा !   © शेखर किसनराव पालखे  पुणे 17/05/20 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈...
Read More

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 1 – साक्षीदार ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे ( मराठी साहित्यकार श्री शेखर किसनराव पालखे जी  लगातार स्वान्तः सुखाय सकारात्मक साहित्य की रचना कर रहे हैं । आपकी रचनाएँ ह्रदय की गहराइयों से लेखनी के माध्यम से कागज़ पर उतरती प्रतीत होती हैं। हमारे प्रबुद्ध पाठकों का उन्हें प्रतिसाद अवश्य मिलेगा इस अपेक्षा के साथ हम आपकी  रचनाओं को हमारे प्रबुद्ध पाठकों तक आपके साप्ताहिक स्तम्भ - शेखर साहित्य शीर्षक से प्रत्येक शुक्रवार पहुँचाने का प्रयास करेंगे । आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता  “साक्षीदार”) ☆ साप्ताहिक स्तम्भ - शेखर साहित्य # 1 ☆ ☆ कविता – साक्षीदार ☆   एका रमणीय भूतकाळाचा वारसा असलेलो आपण एका उध्वस्त होऊ घातलेल्या वर्तमानाचे साक्षीदार होऊन नक्की कुठे चाललो आहोत?... एका भयावह विनाशाकडे की त्याच्याही शेवटाकडे?... का उभे आहोत आणखी एका नवीन सृजनाच्या उंबरठ्यावर... याच अस्वस्थ जाणिवेच्या विवंचनेत घुटमळतोय माझा आत्मा... येऊ नये त्याच्याही आत्म्याच्या मनावर भूतकाळातील पापांचे ओझे... लाभो त्याला सदगती- हीच एकमेव सदिच्छा!!! तेवढंच करणं माझ्या हाती...   © शेखर किसनराव पालखे  पुणे 12-04-20  ...
Read More

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य – श्रावण येतो  आहे ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते (समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है  श्रवण माह पर विशेष कविता  “श्रावण येतो  आहे” ) ☆ विजय साहित्य – श्रावण येतो  आहे ☆   पर्णफुलांचे ध्वज उंचावीत , श्रावण येतो  आहे. फुलवित हिरवी स्वप्ने आपली,श्रावण येतो आहे. ||धृ.||   घनगर्भित नभ गर्द सावळे, इंद्रधनुची अवखळ बाळे तनामनावर लाडे लाडे, कोण उचलूनी घेतो आहे? पर्णफुलांचे ध्वज उंचावीत , श्रावण येतो  आहे. फुलवित हिरवी स्वप्ने आपली,श्रावण येतो आहे. ||1||   भिजली झाडे,भिजली माती,सुगंध मिश्रीतअत्तरदाणी अन् चंदेरी गुलाबपाणी,  कोण धरेवर शिंपीत आहे? पर्णफुलांचे ध्वज उंचावीत , श्रावण येतो  आहे. फुलवित हिरवी स्वप्ने  आपली, श्रावण येतो  आहे. ||2||   श्रावण मासी,हर्ष मानसी,मनात हिरव्या ऊन सावली. रविकिरणांची लपाछपी ती,कोण चोरूनी बघतो आहे ? पर्णफुलांचे ध्वज उंचावीत , श्रावण येतो  आहे. फुलवित हिरवी...
Read More

मराठी साहित्य – कविता ☆ सुजित साहित्य – घुसमट…. ☆ सुजित शिवाजी कदम

सुजित शिवाजी कदम (सुजित शिवाजी कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है उनकी एक अतिसुन्दर भावप्रवण कविता  “घुसमट*....”। आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। )  ☆  सुजित साहित्य  –  घुसमट....☆    दिवसभर टपरीवर काम करून घरी गेल्यावर पोराला कुशीत घ्यायचं असुनही... कुशीत घेता येत नाही कारण... कपड्यांना येणाऱ्या तंबाखूच्या वासानं पोरगं क्षणभरही माझ्या कुशीत थांबत नाही तेव्हा वाटतं.. खरडून काढावा हा तंबाखूचा वास अगदी शरीराच्या कातड्यासकट जोपर्यंत दिवसभर पानाला कात लावून रंगलेले हात.. रक्ताने लाल होत नाही तोपर्यंत कारण.. दिवसभर ज्याच्या साठी मी जीवाच रान करून झटत असतो तेच पोरग जेव्हा माझ्याकडे पाठ करून आईच्या कुशीत शिरत तेव्हा काळजातल्या वेदनांना अंतच उरत नाही... आणि काही केल्या अंगाला येणारा तंबाखूचा वास काही जात नाही तेव्हा कुठेतरी...
Read More
image_print