मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक मनोगत…डाॅ.दीपाली घाडगे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ एक मनोगत…डाॅ.दीपाली घाडगे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

लिहायला हवंच खरं तर. हा विषय डोक्यात नव्हता. कालपासून ग्रुपवर मेसेज बघितल नव्हते. आत्ता पाहिले,आणि मग राहवलं नाही. मी स्वतःला तसं कधी मानत नाही, पण शेवटी सत्य तेच असतं. म्हणून विचार केला की इतक्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करते, आता विधवांचं देखील करावं.

मुळात मला स्त्रियांमध्ये विधवा, सधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता ,कुमारिका, असा भेद करणं मान्य नाही. सगळ्या पुरुषांच्या नावाच्या आधी श्रीयुत लावलं जातं, मग सौभाग्यवती आणि श्रीमती असा भेद का असावा ? थोडंसं परखड होईल पण पुढील गोष्टीवरुन लक्षात येतं की पुरुषप्रधान संस्कृतीमधील हे जोखड आहे, किंवा आपमतलबी पुरुषांनी तयार केलेली ही संस्कृती आहे.

समस्त स्त्रियांना नटण्याची, छान दिसण्याची आवड असते हा मुद्दा बाजूला ठेवला तरी —– मंगळसूत्र,मांग-टीका,जोडवी, सिंदूर ही आभूषणे काय दर्शवतात? या एका स्त्रीचं लग्न झालेलं आहे आणि त्या एका स्त्रीचं झालेलं नाही. फक्त एखाद्या पुरुषाला बघून कळतं का, तो अविवाहित आहे की विवाहित? स्त्रीकडे बघून मात्र लगेच लक्षात येतं आणि अंदाज देखिल बांधले जातात.

आता मुद्दा विधवा स्त्रियांनी ओटी भरून घेणं, हळदीकुंकू लावून घेणं– हे नाकारण्याचे, तिच्यावर हजारो वर्षापासून झालेले संस्कार आहेत, ” तू जर शुभकार्यात पुढे झालीस तर तिथे काही तरी अशुभ होईल.”—- मग कोणाला वाटेल की आपल्यामुळे कोणाचे वाईट व्हावे?—- मी एक स्वावलंबी, सुशिक्षित, पुरोगामी, काहीशी बंडखोर वृत्तीची असून सुद्धा काही वेळा माझ्या मनात असा किंतु क्षणैक का होईना येतो. मग ज्या महिला परावलंबी आहेत, कमवत नाहीत, त्यांच्या मनात भीती असणारच ना आणि सालोसाल चालत आलेल्या संस्कारांचे ओझे झुगारून देणे अजिबातच सोपं नसतं.

कोणत्याही धर्माबद्दल मला काही म्हणायचे नाही. परंतू = गार्गी मैत्री राहतात पुराणात. वर्तमानात अजूनही माझ्यासारख्या महिलेला ओवसायला जाताना कोणी हाक मारीत नाही, की वडाची पूजा करताना पर्यावरणाचा विचार करून सुद्धा कोणी बोलावीत नाही.—- तुम्ही साऱ्याजणी डॉक्टर आहात विचाराने पुरोगामी आहात. पण समाजातील हे प्रमाण किती टक्के? बहुसंख्य समाज झी मराठी आणि कलर्स प्रमाणे चालतो. तिथले सगळे सणवार हेव्यादाव्यांसह, श्रद्धा-अंधश्रद्धा यासह समाजात साजरे केले जातात.

कधी कधी वाटते, .. फुले, आंबेडकर, आगरकर, शाहू महाराज, यांचा पुरोगामी महाराष्ट्र हाच आहे का? सुदैवाने माझे सासर, माझ्या सर्व मैत्रिणी अतिशय पुरोगामी आहेत. त्या असा कोणताही भेदभाव करीत नाहीत. पण मला वाटायचे की असे व्यक्त व्हायची गरज का असावी? फक्त एका स्त्रीतत्वाने दुसऱ्या स्त्रीतत्वाचा सन्मान करणं जमू नये का? जसं पंढरीच्या वारीत प्रत्येक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला माउली म्हणून भेटतो, त्याचप्रमाणे तू कोणीही अस– विधवा, सधवा, घटस्फोटिता अथवा कुमारी – तुझ्यातल्या स्त्रीत्वाचा माझ्यातलं स्त्रीत्व सन्मान करतंय, आणि म्हणून मी तुला हळदीकुंकवाची दोन बोटं लावते, एवढं साधं आहे. – आणि हे जमू नये हे आपलं दुर्दैव.

बाकी मधु, विषयाला वाचा फोडल्याबद्दल खरंच आभारी आहे आणि सावंतवाडी वैद्य राण्यांमधील सर्व सख्यांचे पण आभार.

लेखिका – डॉ. दिपाली घाडगे, विटा..

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी — लेखक – डाॅ. विनय काटे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ मराठी — लेखक – डाॅ. विनय काटे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

माझा लय जीव हाय ह्या बाईवर. मस्त, मोकाट, उंडारल्या खोंडासारखी भाषा ! लावल तितके अर्थ कमी ! पंढरपूरच्या घाटापासून ते पुण्यातल्या पेठेपर्यंत किती कळा तिच्या अंगात !

नाकातून आवाज आला की लगेच कळतं की कोकणातून लेले किंवा नेने आलेत. “रांडेच्या” म्हणले की लगेच कोल्हापुरी पांढरा रस्सा आठवतो. ” का बे छिनालच्या ” म्हणलं की सोलापूरची शेंगा चटणी आणि “पोट्ट्या” म्हणलं  की नागपुरी सावजी जेवण. पोरीच्या तोंडून ” मी तिथे गेलो” आणि  “ऐकू आलं  म्हणलं  की सांगली !! “काय करून राहिला?” म्हणलं की नाशिक, “करूलाल?” म्हणलं की लातूर आणि ” विषय संपला ” म्हणलं की पुणे !! हेल काढून बोललेला नगरी किंवा बीडचा आणि “ळ” चा “ल” केला की कोकणी ! एका वाक्यात माणसाचं गाव कळतं.

हिंदी बोलताना तर मराठी माणूस लगेच कळतो. आमच्या इतकी हिंदीची चिंधी कुणीच केली नसेल. मराठी माणसाचे हिंदी आणि मुसलमान बागवान लोकांची मराठी म्हणजे विष विषाला मारते त्यातला प्रकार. ” हमारी अडवणूक हो रही है ” हे मराठी हिंदी, आणि ” वो पाटी जरा सरपे ठिवो ” ही बागवानी मराठी ऐकून मी लय खुश होतो राव ! मराठी खासदार आणि राजकारणी लोकांचं हिंदी ऐकून तर हिंदी पत्रकारांना घाम फुटत असावा.

एकाच गोष्टीला प्रतिशब्द तरी किती ? बायको, पत्नी, सौभाग्यवती, अर्धांगिनी, सौ, खटलं, कुटुंब, बारदान, बाई, गृहमंत्री, मंडळी—- इत्यादी सगळ्याचा अर्थ एकच– ! “इ” सारख्या आडवळणी शब्दापासून पण सुरु होणारे कितीतरी वेगवेगळे अर्थाचे शब्द… जसे की “इस्कोट”, “इरड करणे”, “इरल”, “इकनं”. — “ग्न” ने शेवट होणारे चार शब्द मराठीत आहेत … लग्न, मग्न, नग्न आणि भग्न. किती मस्त क्रम आहे ना? हे “ग्न” बाबत आमच्या मास्तरच ज्ञान !

इदुळा, येरवा, आवंदा, कडूस पडाय, झुंजूमुंजू, दोपार, सांच्याला, रातीला, तांबडं फुटायला— यातून जो वेळ कळतो त्याची मजा am, pm ला कधीच येणार नाही. कोरड्यास, आमटी, कट, शेरवा, तर्री, शॅम्पल यातला फरक कळायला महाराष्ट्र उभाआडवा बघावा लागतो. खेकडा कुठला आणि चिंबोरी कुठली? उंबर कुठलं आणि दोड्या कुठल्या? शाळू, ज्वारी आणि हायब्रीड यातला पोटभेद कळायला रानातली मराठी लागते. कडवाळ कुठलं न मका कुठला हे शेरातला शाना कदीबी सांगू शकत नाय !

खाण-पिणं असू द्या, जनावरं-जित्राब असू द्या, शिव्याशाप असू द्या, लाडाची नाव असू द्या, वेळ-काळाची गणित असू द्या, हुमान-कोडी असू द्या, ओव्या-अभंग असू द्या, अंगाई असू द्या, सणवार असू द्या, झाडाझुडुप असू द्या, शेतीची अवजारे असू द्या, कापडचोपड असू द्या नाहीतर अजून काही,—- मराठी प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. प्रत्येक गावात, शहरात, कामात, धंद्यात … सगळीकडे मराठीचा वेगळा बाज असतो, अंदाज असतो आणि लकब असते. दिवसातून ५ वेळा कपडे बदलणाऱ्या अवखळ, सुकुमार पोरीसारखी ही भाषा सगळीकडे नवनवे रंग उधळत असते.

माय मराठी… तुझ्यावर लय जीव आहे बाये !!! अशीच उंडारत राहा… वारं पिलेल्या खोंडासारखं !!

लेखक : डॉ. विनय काटे

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सरते शेवटी.. ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ सरते शेवटी.. ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

पाहता पाहता २०२२ संपत आलं, नव्हे संपलंच. प्रत्येक नवीन वर्षात अनेक गोष्टी , अनेक घटना घडतात. काही खूप संवेदनशील असतात तर काही आयुष्यभर आनंद उत्साह निर्माण करणाऱ्या असतात. तर काही हे घडलं नसतं तर बर झालं असतं, असे मनाला वाटून जाणाऱ्या  असतात. काही आनंद हे दुःखाची झालर वा अस्तर लावून येतात. पण चेहऱ्यावर कधीच त्याच्या छटा दिसू दिलेल्या नसतात. पण असं का ?  खरं जगावं, सुखात आनंदी, दुःखात थोडं निराशा दाखवण्याचे स्वातंत्र्य नाही का आपल्याला…! खरं जगूया, खरं बोलूया ! एकमेकांच्या सोबत सुख दुःख वाटून घेऊ या..!

वेदनेचं गाणं करता यावं आणि संवेदनेने ते गात रहावं. आणि हो आनंदाचा उन्माद होऊ नये एवढं मात्र नक्की करावं

ग़म का ख़ज़ाना तेरा भी है, मेरा भी

ये अफ़साना तेरा भी है, मेरा भी

अपने ग़म को गीत बना कर गा लेना

राग़ पुराना तेरा भी है, मेरा भी

तू मुझको और मैं तुझको समझाऊं क्या

दिल दीवाना तेरा भी है, मेरा भी

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ राधिका भांडारकर

२०२२— वर्ष संपलं.

आज वर्षाचा शेवटचा दिवस.

उद्यापासून नवे वर्ष सुरू.

नवे पान, नवे पर्व, नवे संकल्प, येणाऱ्या नव्या वर्षाने निर्माण केलेली नवी आशा,  नवी स्वप्नं, उगवणारा नेहमीचाच सूर्यही जणू नवरंगांची किरणं घेऊन अवतरलाय, असा भास देणारा नव्या वर्षाचा पहिला दिवस!

मागे वळून पाहताना, जाणाऱ्या या वर्षाला निरोप देताना,  मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ आहे.  काळाच्या बारा पावलांची, कधी सरळ, कधी वळणावळणाची, कधी चढ उताराची, काट्यांची, फुलांची, दगड गोट्यांची, रंगीत व रंगहीन वाट, पुन्हा एकदा न्याहाळून पाहताना, सहज मनात येते.. वर्ष संपले म्हणजे नक्की काय झाले?

कालचक्र अव्याहत फिरत असते.  कालगणनेची गणितं मनुष्यनिर्मित आहेत.  बाकी खरं म्हणजे एक दिवस जाणारा आणि एक दिवस येणारा यापेक्षा नवे काय? फक्त काळाच्या बारा पावलांनंतर आज आणि उद्या मधल्या अंतरात काही क्षणांची विश्रांती, असं म्हणूया आपण. वर्षाच्या चार आकडी संख्येच्या एककामध्ये एकाने झालेली बेरीज. भिंतीवरच्या जुन्या कॅलेंडरला काढणे आणि त्या जागी नवे कोरे कॅलेंडर लटकवणे.  काय बदलतं?

कसे गेले हे वर्ष?

राजकीय, सामाजिक, वैयक्तिक बेरजा वजाबाक्या  यांचं गणित मांडताना उत्तराचा झालेला गोंधळ हाही काही वेगळा असतो का?कुठे मंगल तोरणे तर कुठे प्रिय जनांचा वियोग.कुठे बढती कुठे बेकारी.कुठे यश कुठे अपयश.वादळं,तुफान,भूकंप तर कधी हिरवळ..आंसु आणि हंसु..माणसाने वर्षे मोजली आणि नियती हसली..

त्याच त्याच राजकीय धुळवडी पाहिल्या. नवे भाष्य, नवी विधानं, आरोप प्रत्यारोप, धार्मिक अन्याय,भावनिक गळचेपी वगैरे वगैरे… सगळा खमंग गोंधळ कान टवकारुन आणि डोळे फाडून पाहिला— ऐकला.  काही आत गेले काही बाहेर आले. निवडणुका रंगल्या. कोणी हरले कोणी जिंकले.  गुलाल उधळले, ढोल वाजले. पण हे सारं पाहताना मनात एवढंच आलं यापेक्षा मागचं वर्ष चांगलं गेलं!

आंतरराष्ट्रीय परिषदा भरल्या. सगळेच गोलमाल.युद्धे चालूच आहेत.सत्तेपायी अमानुषता बोकाळलीय्.प्रचंड हिंसाचार.”थांबवा रे!मला शांती हवी आहे!” हे सूरच गोठलेत.

पर्यावरणाविषयी कळवळून मुद्दे मांडले गेले आणि प्रत्यक्ष मात्र आम्हाला डोंगर तोडणारे, झाडे तोडणारे हातच दिसले. वीज नाही, पाणी नाही म्हणत वणवणारी जनताच दिसली.  कव्हर पेजवर विकासाची गणित मांडणारे आलेख, हसणारे चेहरे, दाटलेली हिरवळ आणि आतल्या पानात खून, बलात्कार,अपघात, भूकबळी. मसल पाॅवर. असा रक्तबंबाळ माणूस.. पूर्ण विश्वातलाच.. पाहताना एवढंच वाटलं काय बदललं?

डाव्या हातातलं जाणारं वर्ष उजव्या हातातल्या येणाऱ्या नव्या कोऱ्या वर्षाला सांगते आहे,” बघ रे बाबा! तुला काही जमतय का? मी तर चाललो. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!”

जन्माला आलेलं हे दोन हजार तेवीस  नावाचं बाळ मात्र खूपच गोंडस भासतंय.  कुणा युगंधराचा अवतार असंच वाटतंय.  कायापालट घडवून आणेल हे बाळ! या क्षणी तरी  अनेक आशा, स्वप्नं,  सुख- शांती, समृद्धी घेउन अवतरले आहे , असं आतून जाणवत आहे. बघूया याच्याही कुंडलीतले नवग्रह योग!  विधात्यांनी मांडलेली २०२३ची ही पत्रिका अखिल विश्वासाठी फलदायी ठरो!इतकंच..

असावे सकारात्मक..

असावे आशादायी…

बाकी नम्रपणे वंदन—त्या कालचक्राला…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(आज निसर्गाने पुन्हा हे नागडं…. म्हातारं पोर माझ्या ओंजळीत घातलं होतं…. मी पुन्हा बाप झालो…. पुन्हा बाप झालो यार….!!!) इथून पुढे —

शरमलेल्या बाबांना मी म्हणालो, “ बाबा लाजू नका, आपण आता मस्त आंघोळ करू….” 

तेवढ्यातूनही बाबा म्हणाले, “ माझ्या लोकांनी मला नागडं करून जेवढी लाज आणली, त्यापेक्षा ही लाज काहीच नाही बाळा …”

यानंतर बाजूच्या दुकानदारांकडून बादली, पाणी आणि मग आणून, फुटपाथवर सूर्यानं जिथं ऊन दिलं होतं, तिथं या उन्हामध्ये बाबांना बसवलं आणि साबणाने त्यांना आंघोळ घातली….डोक्यावर प्रत्येक वेळी पाण्याचा तांब्या मी उपडा केला की ते म्हणायचे ….”शंभो”…! — इथे मला जाणवलं, की मी कुण्या माणसाला आंघोळ घालत नाहीये…. तर मी अभिषेक करतोय…. !!!

निर्वस्त्र बसलेल्या त्या बाबांचा पाय मी धुवायला घेतला….  आणि सहज त्या निर्वस्त्र रूपातल्या बाबांकडे माझं लक्ष गेलं…. त्या क्षणी  मला वाटलं… आता मला कोणत्याही मंदिरात जाऊन साष्टांग नमस्कार घालण्याची गरज नाही… माझ्या हातात साक्षात पाय आहेत ! 

खरंतर आठ महिने अंघोळ नसताना, शौच वगैरे गोष्टी कपड्यातच घडत असल्यामुळे त्यांच्या अंगाला एक विचित्र असा वास येत होता…. खरंतर त्यांच्या आसपास, चार फुटाच्या परिसरात जाणेसुद्धा अतिशय क्लेशदायक होतं… 

याची जाणीव त्या बाबांना सुद्धा असावी…. प्रत्येक वेळी ते म्हणत होते, “ माझ्या जवळ येऊ नकोस, मी अत्यंत घाणेरडा झालो आहे… I am infected…!!!”

मी मनात हसत त्यांना म्हणालो, “ जाऊ दे बाबा , आमच्यापैकी सर्वच जण असे आहेत, तुम्ही ते कबूल करत आहात, आम्ही ते कबूल करत नाही, इतकाच काय तो फरक ! “

कडक टॉवेलने अंग पुसून, बाबांना पांढराशुभ्र सदरा आणि लेंगा घातला. मघाचे बाबा ते हेच काय ? असे वाटावे इतका कायापालट झाला होता. यानंतर कडेवर घेऊन मी त्यांना ॲम्बुलन्समधील स्ट्रेचरवर झोपवलं…. एका मिनिटात ते गाढ झोपी गेले…. लहानपणी सोहमला मी असाच अंघोळ घालून, कडेवर फिरवत कॉट वर ठेवायचो आणि तो गाढ झोपी जायचा…. !

का कोण जाणे, परंतु या बाबांमध्ये मला माझा मुलगा दिसत होता…. ! 

” एकरूप ” होणं हा भाव असेल, तर ” एकजीव ” होणं ही भक्ती आहे असं मला वाटतं… ! 

नकळतपणे मी या बाबांशी एकरूप नव्हे…. एकजीव झालो होतो ! 

मी हळूच झोपलेल्या बाबांच्या अंगावर चादर टाकली…. 

याचवेळी पलीकडच्या मशिदीतून आवाज आला…. कानावर अजान आली…. “अल्लाह हु अकबर”

— चला, बाबांच्या अंगावर  टाकलेली माझी चादर मंजूर झाली तर….! 

सोमवार १९ डिसेंबर रोजी या बाबांना आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे. 

बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून मी परत निघालो, बाबा आता प्रसन्न हसत होते. जाताना मला म्हणाले, “ बाळा इतकं केलंस. आता आणखी एक शेवटचं कर… माझ्या घरातल्या लोकांशी संपर्क कर आणि त्यांना माझा निरोप दे, म्हणावं…. मी खुशाल आणि आनंदात आहे. माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही जे वागलात, त्यात तुमचीही काहीतरी अडचण असेल, फक्त त्यावेळी मला ती समजली नाही इतकंच…. हरकत नाही, माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणतीही अढी नाही. मी तुम्हाला माफ केलं आहे… त्यांना सांग, मी सर्वांना खरोखर मनापासून माफ केलं आहे “. 

— खूप मोठ्या मुश्किलीने शून्यात पहात नमस्कार करण्यासाठी त्यांनी हात जोडले….  नजरेच्या या शून्यात त्यांना त्यांच्या घरातले सर्वजण दिसत असावेत…

इतका वेळ शांत असणारा मी… त्यांची ही वाक्ये ऐकून मात्र चिडलो… रागाच्या भरात ओरडून, मी त्यांना म्हणालो,

 “ मी त्या तुमच्या लोकांशी कोणताही संपर्क करणार नाही…. तुमचा माफीनामा पोचवणार नाही… ज्यांनी तुम्हाला इतका त्रास दिला त्या लोकांची थोबाडं मला पाहायची नाहीत… मी काय रिकामा बसलो नाही तुमचा माफीनामा पोचवायला, बाकीची अजून शंभर कामं आहेत मला….”

माझा तोल सुटला होता… म्हाताऱ्या या माणसाला त्यांच्याच घरातल्या सर्वांनी इतकं अडचणीत टाकलं होतं ,  त्याचा राग मला येत होता आणि हे बाबा त्यांना माफ करायला निघाले होते, त्याचा दुप्पट राग मला आला होता … 

 यानंतर, तितक्याच शांतपणे हे बाबा मला म्हणाले, “ अरे बाळा चिडू नकोस…. माझ्या घरातल्या लोकांना मी प्रेम, माया, आनंद, सुख, समाधान, दया, क्षमा, शांती या पुस्तकातल्या सर्व शब्दांचा अर्थ आयुष्यभर समजावण्याचा प्रयत्न केला…. परंतु त्यांना हे अर्थ संपूर्ण आयुष्यात कधीही समजले नाहीत… या आजारपणात मी टिकेन की नाही याची खात्री तुलाही नाही आणि मलाही नाही… जिवंत असताना त्यांना कोणत्याही शब्दाचा अर्थ शिकवू शकलो नाही … आता मरताना  ” माफी ” या शब्दाचा अर्थ तरी मला त्यांना शिकवू दे बाळा….!!!  प्लीज बाळा …. प्लीज हा निरोप त्यांना दे … आयुष्याच्या उताराला, माफी हा शब्द तरी त्यांना शिकण्याची संधी देऊ आपण…! नाही म्हणू नकोस बाळा. माझा “माफीनामा” त्यांना पोचव…. “. 

आज मला पुन्हा एकदा पटलं…. सतारीवर दगड जरी मारला तरी तिच्यातून मधुर झंकारच बाहेर येतात…!!!

बाबांनी जे विचार मांडले, त्यात माझ्या खुजेपणाची मला जाणीव झाली…! डॉक्टर झालो …खूप शिकलो … सुशिक्षित सुद्धा झालो, परंतू या सर्व प्रवासात सुसंस्कृतपणा शिकायचं माझ्याकडून सुद्धा राहूनच गेलं यार….! 

रस्त्यावरच्या बाबांनी आज मला “ माफी “  या शब्दाचा अर्थ त्यांच्या वागण्यातून समजावून सांगितला…! 

बाबांनी पुन्हा हात जोडण्याचा प्रयत्न केला…. काही केल्या नमस्कारासाठी हात जुळत नव्हते…. मी ते दोन्ही हात माझ्या हाताने जुळवले…!

जुळवलेल्या या दोन्ही हातांना कपाळाशी लावून मी फक्त इतकंच म्हणालो, “ बाबा मला माफ करा…!!! “

माफी …. क्षमा ….  या पुस्तकात वाचलेल्या शब्दांचा अर्थ मी आज खऱ्या अर्थाने हृदयात घेऊन सुसंस्कृत झालो होतो…. बाबा माझा प्रणाम स्वीकार करा !!!

— समाप्त — 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(खरा सुखी कोण ? आपल्याकडे सगळं काही असणारे आपण ?? की सर्वस्व गमावलेले ते ???) इथून पुढे —-

बाबांची अवस्था पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं…. 

गेले आठ महिने अंघोळ नाही, संडास लघवीवर कंट्रोल नाही आणि त्यामुळे ती कपड्यातच होते, बाबांच्या घरातल्या लोकांनी त्यांची जरी साथ सोडली तरी सुद्धा रस्त्यावरच्या किड्यांनी, माशांनी बाबांची साथ सोडली नव्हती…. ते त्यांच्या डोक्यात आणि हाता पायावर, चेहऱ्यावर मुक्तपणे फिरत होते…!

आम्ही तुमच्या सोबत आहोत बाबा, असं तर या कीड्या आणि माशांना सांगायचं नसेल ? 

…… अडचणीत साथ सोडणारे घरातले आपले ? की संकटाच्या काळात सोबत करणारे हे किडे आणि माशा आपले ?? आपण अडचणीत सापडलो की लोक हात पकडण्याऐवजी आपल्या चुका पकडतात हेच खरं…. ! 

ज्या दिवशी बाबा मला आठ महिन्यांपूर्वी शेवटचे भेटले होते, त्यानंतर त्यांना पॅरालिसिसचा आणखी एक झटका आला होता. ते आता जास्त हालचाल करू शकत नव्हते आणि म्हणून ते एकाच ठिकाणी पडून राहिले….

रस्त्यावर भेटलेल्या अनेकांना त्यांनी माझ्यापर्यंत हा निरोप पोहोचवा असे सांगितले, परंतू आठ महिन्यात एकाही माणसाने माझ्यापर्यंत हा निरोप पोहोचवला नाही….

रोजच्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम मध्ये मी अडकावं…. त्यानंतर मी रस्ता बदलावा…. तिथेही पुन्हा ट्रॅफिक मध्ये मी अडकावं…. मला हे बाबा दिसावेत…. ही निसर्गाची योजना होती ! 

बाबांशी बोलत होतो, परंतु डोक्यात विचारांची गर्दी झाली….

काय करता येईल या बाबांचे ?  यांचे आत्ता आधी हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेणे गरजेचे आहे… त्याआधी यांना संपूर्ण स्वच्छ करायला हवं… ! पुढे बघू नंतर जे सुचेल ते करू…

काही एक विचार करून, मी बाबांना म्हणालो, “ बाबा आज आत्ता शनिवारचा दुपारचा दीड वाजला आहे, मला उद्याचा दिवस द्या…. सोमवारी सकाळी दहा वाजता मी परत इथे येतो… ! “

खरंतर बाबा अतिशय गंभीर अवस्थेत होते…. त्यांना त्याच वेळी ऍडमिट करणे गरजेचे होते, परंतू कायद्याच्या चौकटीत राहून अनेक बाबी करणे अपरिहार्य असतं, आणि त्यासाठी मला थोडा वेळ हवा होता….!

बाबांना मी दोन पंप दिले … दर पंधरा मिनिटांनी ते पंप ओढायला सांगितले…. आठ महिने जगलात तसे आता सोमवार सकाळी दहा वाजेपर्यंत जिद्द सोडू नका, असं सांगून मी तिथून पुढल्या बाबी करण्यासाठी निघणार, इतक्यात बाबांनी मला खुणेने बोलावलं…. खूप मोठ्या मुश्किलीने ते बोलले…. “ काळजी करू नकोस , तू येईपर्यंत मी मरणार नाही…. अरे, डोळे मिटले म्हणून कोणाला मरण येत नाही…. चार चौघांनी आपल्याला खांद्यावरून खाली ठेवलं… बाजूला केलं की येतं ते मरण ! “ बाबांचा रोख त्यांच्या कुटुंबावर होता….! खरं होतं बाबांचं …. मी आता तिथून निघालो…  

शनिवार रविवार आवश्यक त्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या… मनीषाने बाबांची पूर्ण बॅग भरली… साबण, टूथपेस्ट पासून अंडरपॅन्टपर्यंत तिने सर्व तयारी केली…न पाहिलेल्या बापाची ती मुलगी झाली होती…!  मी दाढी कटिंग चे सामान तयार ठेवले…. ‘मंगेश वाघमारे’, माझा सहकारी, याला आवश्यक त्या सर्व सूचना देऊन, सोमवारी सकाळी दहा वाजता स्पॉटवर येण्यास सांगितले…. 

रविवारची अख्खी रात्र तळमळण्यात गेली….अतिशय गंभीर अवस्थेत असलेले हे बाबा मी जाईपर्यंत जाणार नाहीत ना… ? ते असतील ना ? मी जाईपर्यंत राहतील ना ? या विचारात पहाटेचे साडेचार वाजले….

एखाद्याची जबाबदारी मनापासून घेतल्यानंतर… ती व्यक्ती पूर्णतः आपल्यावर विश्वास ठेवते… एखाद्याचा हा विश्वास जपण्यात जीवाची किती ओढाताण होते, हे मी शब्दात काय सांगू ??? 

आणि प्रश्न इथे एका बापाचा होता…. ! 

सोमवारी सकाळी लवकर सर्व तयारीनिशी मी गडबडीत निघालो,  लिफ्टमध्ये सर्व सामान घेऊन जाताना मनीषा म्हणाली, “ अरे अभिजीत गडबडीत तू बूट किंवा चप्पल घातलीच नाहीस…” – च्याआयला , गडबडीत खरंच मी पायात काही घातलं नव्हतं…

यानंतर मी पायात बूट अडकवला पण जाणीव झाली, ज्या बापासाठी चाललो आहे, त्या बापाच्या पायात सुध्दा काही नाही… मग जाताना यांना एक बूट घेतला ! हे सगळं करून स्पॉटवर जाईपर्यंत मला अकरा वाजले…. 

मी त्या स्पॉटवर पोहोचलो…. परंतु त्या स्पॉटवर कोणीही नव्हते… ज्या स्पॉट वर बाबा राहत होते तिथे मी पोहोचलो, तेव्हा मला फक्त त्यांचे रिकामे अंथरूण दिसले…. इतर काही साहित्य दिसले … पण बाबा दिसले नाहीत…!

 

हे सर्व पाहून माझं अवसान गळालं… सोमवार पर्यंत सुध्दा बाबा माझी वाट पाहू शकले नाहीत…. ते गेले, या विचाराने माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू यायला सुरुवात झाली…

 

आणि तितक्यात मला एक आवाज आला…” सर आम्ही इकडे आहोत…” . हा आवाज मंगेशचा होता…!

मी वळून पाहिलं…. आमच्या मंगेशने या बाबांना घाणीतून बाहेर काढून दुसऱ्या स्वच्छ ठिकाणी ठेवलं होतं , म्हणून मला ते जुन्या ठिकाणी दिसले नाहीत..!… क्या बात है…! 

मी सुखावलो होतो… मी येईपर्यंत जीव सोडू नका, असं मी माझ्या बापाला सांगून आलो होतो…. आज माझ्या बापानं माझा शब्द पाळला होता….मी खूप आनंदी होतो….

आज मी ऍम्ब्युलन्स आणली होती…. माझा बाप आज जिवंत आहे या आनंदात…. त्यांनी माझा शब्द पाळला या खुशीत,  मी मस्त राजेश खन्ना स्टाईलमध्ये गाडीतून टुणकन खाली उडी घेतली… रजनीकांत स्टाईलने मी गाडीची किल्ली माझ्या बोटाभोवती फिरवत, बच्चन स्टाईलने चालत बाबांजवळ पोहोचलो … ! 

हो…. माझ्या बापाने आज शब्द पाळला होता…. मी  येईपर्यंत तो जगलेला होता… ! निसर्गाने त्यांना जगवलं होतं….

मी लय खुश होतो राव …. इलेक्ट्रिकच्या खांबाच्या आधाराने या बाबांना बसवून आधी मी या बाबांची दाढी कटिंग केली… इलेक्ट्रिकचा खांब लाईट द्यायला नाही, परंतु कोणाच्या आयुष्यात प्रकाश पाडायला आज प्रथमच उपयोगी आला असावा….! 

माझ्या अंगावर ॲप्रन ….गळ्यात स्टेथोस्कोप आणि फुटपाथवर बसून मी रस्त्यावरच्या गलिच्छ दिसणाऱ्या माणसाची दाढी करतो आहे….

मला पाहणाऱ्या अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं…!  हा नेमका डॉक्टर आहे की न्हावी आहे  ??? 

मी मात्र डॉक्टर आणि न्हावी या दोन तीरांच्या मध्ये असलेल्या “माणूस” नावाच्या “पात्रात” डुंबून, न्हाऊन निघत होतो…. ! असो….

यानंतर संडास आणि लघवीने भरलेले कपडे काढून मी फेकून दिले…. बाबा आता पूर्ण उघडे – नागडे झाले रस्त्यावर…. ते थोडे शरमले…. ! नागड्या बाबांना पाहून, इथे मला माझ्या मुलाची, सोहमची आठवण झाली, जन्मला तेव्हा नर्सने तो असाच उघडा नागडा माझ्या ओंजळीत त्याला दिला होता…. !

आज निसर्गाने पुन्हा हे नागडं…. म्हातारं पोर माझ्या ओंजळीत घातलं होतं…. मी पुन्हा बाप झालो…. पुन्हा बाप झालो यार….!!! 

— क्रमशः भाग दुसरा

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

दर पंधरा दिवसातल्या एका वारी मी इथं येत असतो… आंबा खाऊन  कोय फेकून द्यावी तशी कोयी सारखी पडलेली अनेक माणसं मला इथे दिसतात…

या कोयीचं भवितव्य काय ? … तरीही मी त्यांना स्वच्छ करून जमिनीत पुन्हा रुजवून झाड लावण्याचा  प्रयत्न करत आहे ! 

… या इथे हे मंदिर दिसतंय… त्या तिकडे मस्जिद आहे आणि पलीकडे चर्च आहे… या तीन कोनाच्या ” पायाशी ” बसलेला मी फक्त एक माणूस !

याचक मंडळींना गोळ्या औषधं देणं हा फक्त एक बहाणा असतो. मी त्यांच्याशी यानिमित्ताने चर्चा करून ते काही काम करतील का ? त्यांच्या अंगात काही स्किल आहे का  ? या गोष्टींची चाचपणी करून त्यांना व्यवसाय मांडून देत असतो. 

तर, या ठिकाणी मला ठरलेल्या वेळी एक आजोबा नक्की भेटतात. ते पूर्वी काम करायचे, घरातल्या लोकांना पैसे द्यायचे, त्यांना मदत करायचे… घरातले लोक सुद्धा त्यांच्यावर प्रेम करायचे…

एके दिवशी, त्यांना पॅरालिसिसचा झटका आला… नोकरी गेली… घरात पैसे द्यायचे बंद झालं आणि याचबरोबर मग घरातल्या लोकांनी प्रेम करणं सुद्धा बंद केल…. ! बाबांना वाटलं, माझ्याच तर घरचे लोक आहेत, मला सांभाळतीलच… परंतु त्यांचा हा विश्वास फोल ठरला…. घरातल्या प्रत्येकाने स्वतःच्या अडचणी सांगून, आम्ही तुम्हाला सांभाळण्यास असमर्थ आहोत, असं सांगितलं आणि तेव्हापासून बाबा रस्त्यावर आले …

बाबा फक्त सुशिक्षित नाहीत तर सुसंस्कारित सुद्धा आहेत….!  सुशिक्षित आणि सुसंस्कारित यामध्ये फरक असतो, सुशिक्षित असेल ती व्यक्ती सुसंस्कारित असेलच याची खात्री नसते ! 

बाबांना दम्याचा त्रास आहे, ते काहीतरी करून मी जिथे आहे तिथे येतात आणि मला म्हणतात, Hey Sir, give me pump….! दम्याचा अटॅक आल्यानंतर एका छोट्या पंपमधून श्वासाद्वारे औषध घेतलं की हा अटॅक कमी होतो… त्यांना दरवेळी तो पंप लागतो. मी नेहमी त्यांना पंप देतो… मला भेटल्यानंतर, दरवेळी माझ्या शेजारी बसून माझ्याशी ते वैचारिक चर्चा करायचे…. ! नीट बोलता येत नसतानाही बाबा बोलून व्यक्त व्हायचे, परंतु त्यांच्या मनात प्रचंड विचारांची खळबळ सुरू आहे हे मला नेहमी जाणवायचं…! 

खरंच आहे…. बोलून व्यक्त होतात ते शब्द….!

न बोलताही व्यक्त होते ती भावना….!!

आणि मनात नुसतेच रेंगाळतात ते विचार !!!

एके दिवशी अचानक बाबा यायचे बंद झाले, आज या गोष्टीला जवळपास आठ महिने लोटले….

बाबा का येत नाहीत ? याची चौकशी मी अनेकांकडे केली, परंतु कोणालाच काहीही माहित नव्हतं. मला वाटलं, कदाचित त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांचा स्वीकार केला असावा ! आणि या विचारांमुळे सुखावून मी त्यांची चौकशी करणे सोडून दिले….

यानंतर बरोबर आठ महिन्यानंतर म्हणजे  शनिवारी १७ डिसेंबर २०२२ रोजी, याचकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी मोटरसायकलवर सर्व साहित्य घेऊन मी निघालो असता, एका रस्त्यात ट्रॅफिक जाममुळे मी अडकलो…. मग वैतागून दुसरा रस्ता घेतला, हा सुद्धा रस्ता पुढे ब्लॉक होता, मला या ट्रॅफिक मध्ये सुद्धा अडकावं लागलं… मग गुपचूप थांबुन राहिलो…

मोटर सायकल बंद करून मी उगीच इकडे तिकडे निरीक्षण करत राहिलो… ट्रॅफिकमध्ये निर्जीव गाड्या अक्षरशः एकमेकांना चिकटून उभ्या होत्या… मला कळत नाही, मग सोबत जगताना  जिवंत माणसांत इतकं अंतर का पडतं ? 

हल्ली चार माणसं एकाच दिशेने, एकाच विचाराने, तेव्हाच चालतात, जेव्हा पाचव्याला खांद्यावरून पोचवायचं असतं…. ! No Entry मधून Right घेऊन चुकण्यापेक्षा, योग्य रस्त्याने Left घेवून बरोबर राहणं हे केव्हाही चांगलं…मात्र हे कळेपर्यंत उशीर झालेला असतो ! …. 

डोक्यात हे असं काही चालू असताना, अचानक विचारांची मालिका खुंटली….

मी थांबलो होतो, त्याच्या बाजूच्या फुटपाथवरून एक दाढी वाढलेले आजोबा, सरपटत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होते. अंगावर जे काही कळकट्ट होतं त्याला कपडे का म्हणायचं ? हा मोठा प्रश्न…! 

दोन-चार इंच पुढे सरकतानासुद्धा त्यांना वेदना होत असाव्यात, हे दाढी आडून चेहरा स्पष्ट सांगत होता. 

दोन-चार इंच पुढे सरकताना सुद्धा त्यांना भयानक दम लागत होता…. आकाशाकडे तोंड करून ते एक मोठा श्वास घ्यायचे आणि पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते… सरपटत चालताना बऱ्याच वेळा त्यांचा तोल जात होता, ते पडत होते… पुन्हा उठून बसत होते आणि पुढे सरकत होते…. 

ट्रॅफिक मध्ये ताटकळत थांबलेले सर्वजण हा ” तमाशा ” बघत होते….. त्यांचा ” टाईमपास ” होत होता…! 

या आजोबांकडे पाहून मला पटलं… पडणं म्हणजे हरणं नव्हे…. पुन्हा उठून उभं न राहणं म्हणजे हरणं ! हरणं ही फक्त एक मानसिक अवस्था आहे…. जोपर्यंत आपली हार आपण मनाने कबूल करत नाही, तोपर्यंत आपण जिंकलेलोच असतो…! … यश म्हणजे हापूस आंबा असेल तर अपयश म्हणजे हापूस आंब्याची कैरी ! प्रत्येक आंबा कधीतरी कैरी असतोच…. कैरी असण्यात गैर काय… ? कैरी परिपक्व होते तेव्हाच तर ती आंबा होते… कैरीपासून आंबा होणे ही फक्त एक नैसर्गिक प्रक्रिया असते….! 

… अपयश जेव्हा परिपक्व होतं, प्रयत्न करून आपण या अपयशावर काहीतरी प्रक्रिया करतो, आणि यानंतर जे मिळतं, त्याला यश म्हणतात…! 

मी या बाबांकडे एकटक पाहत होतो…. डोक्यात वरील विचार सुरू होते आणि एका क्षणी, माझ्या या विचारांची शृंखला तुटली…. मला जाणवलं, ‘ अरेरे हेच ते बाबा…. जे माझ्याकडून पंप मागून घ्यायचे ! बापरे… यांची अशी कशी अवस्था झाली ? इतके दिवस मी समजत होतो त्यांच्या घरातल्यांनी यांचा स्वीकार केला आहे….’

मोटर सायकल स्टॅंडवर लावून, मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना नावाने हाक मारली… डोळे किलकिले करत त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मला ओळखलं…. मला ते हसत म्हणाले, ‘How are you doc?’

मी म्हणालो, “ मी बरा आहे बाबा, तुम्ही कसे आहात ?”

ते याही अवस्थेत, हसण्याचा प्रयत्न करत, दम लागलेल्या आवाजात म्हणाले, “I am perfectly fine sir, no problem… “ 

त्यांना दम लागला होता…. वरील चार शब्द बोलण्यासाठी त्यांना चार मिनिट लागले आणि तरीही ते म्हणत होते ‘ मी 

“परफेक्टली फाईन” आहे… No Problem!’

आपल्याकडे सगळं काही असून सुद्धा, आपण आयुष्यात कधीही I am perfectly fine असं म्हणत नाही…. मला कोणताही Problem नाही असं कधी म्हणत नाही…. आणि आज आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर रस्त्यावर उभे राहून हे बाबा म्हणत होते, I am perfectly fine! No problem…

… खरा सुखी कोण ? आपल्याकडे सगळं काही असणारे आपण ?? की सर्वस्व गमावलेले ते ???

— क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उतारवय आनंदात घालवायचे असेल तर — … लेखक – श्री विश्वास नागरे पाटील ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ उतारवय आनंदात घालवायचे असेल तर — लेखक – श्री विश्वास नागरे पाटील ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆ 

वयाच्या ४५/ ५५/ ६५नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर…. त्यासाठी १२ नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील.—- हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. 

१) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत, त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते. 

धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल प्रुफ’असो. त्यामुळे कदाचित तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामुळे या वयात गुंतवणूक करू नये.

२)  तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजिबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात. 

3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवढाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासारखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नसताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.

४) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तू व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एक जण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून एन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा एन्जॉय करणे कठीण असते. 

५) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघितले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणाऱ्या आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामुळे भूतकाळातील वाईट आठवणींमुळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील.

६) तुमचे वय काहीही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य, यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो. 

७) स्वतःविषयी अभिमान बाळगा. तो अंतरबाह्य असू दे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, परफ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे नीटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.

 ८) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुशाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल. 

९) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्किंग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचित तुमचे जुने मित्र किंवा मैत्रिणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे. 

१0) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचित तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागितले तरच. उगीचच्या उगीच त्यांचेवर टीका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला. 

११) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजिबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामुळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा. 

१२) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्वीकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामुळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा, दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात..

लेखक –  श्री विश्वास नागरे पाटील

प्रस्तुती : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नात्यांचा प्राजक्त…” – सुश्री सुधा मूर्ती ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ “नात्यांचा प्राजक्त…” – सुश्री सुधा मूर्ती ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

दिवसातून एकदा तरी आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलत जा  .. माध्यम कोणतेही असो doesn’t matter..संवाद महत्वाचा जो तुमच्यातली ओढ कायम ठेवतो.. आपण नाकारले तरी fact ही आहे की आपण सतत कोणावर तरी विसंबून असतो, आपल्याही नकळत.

आम्ही खूप घरे बदलली. एका घराच्या अंगणात प्राजक्ताचे झाड होते..रात्री त्याची फुले ओघळायला सुरवात व्हायची ती अगदी पहाटेपर्यंत तो सोहळा चालायचा. परीक्षेचे दिवस असले की मी रात्री जागून अभ्यास करायचे..दिवसा कॉलेज आणि नोकरीमुळे अभ्यास करणे शक्य नव्हते.. रात्री मी अभ्यासाला बसले की खिडकीजवळ बसायचे. खिडकीतून तो प्राजक्त मला दिसायचा, त्याची एक फांदी त्या खिडकीजवळ आली होती. त्याच्या फुलांच्या मंद सुवासाने मन एकदम फ्रेश व्हायचे आणि अभ्यासाला मूड लागायचा. हळूहळू मला त्या झाडाची सोबत वाटायला लागली. कधीकधी ते माझ्याशी काही बोलू पाहते आहे असे मला वाटायचे.. मग मी खिडकीत आलेल्या त्याच्या फांदीवरून हात फिरवायचे तेव्हा तो सळसळायचा. मी त्याची फुले गोळा करायचे. देवातल्या कृष्णाला वाहायचे. कधी कानातल्यासारखे कानातही घालायचे. त्याची माझी छान दोस्ती जमली आणि हळूहळू आमच्या गप्पा सुरू झाल्या..मी रोज खिडकीत उभी राहून त्याच्याशी बोलायचे. त्याला किती कळत होते नाही माहीत, पण तो आपल्या फांद्या हलवून, कधी पाने नाचवून, तर कधी सतत फुले ओघळवून प्रतिसाद द्यायचा. एखाद्या दिवशी मला बोलायला नाही जमले तर त्या दिवशी त्याचा फुलांचा सडा कमी दिसायचा.. माझे डोळे भरून यायचे..शेवटी आम्ही भाडेकरू होतो..कधी न कधी आम्हाला तिथून दुसरीकडे राहायला जावे लागणार होते..तेव्हा काय होईल त्याचे आणि माझेही ? असा मला प्रश्न पडायचा. मलाही त्याची, त्याच्याशी बोलायची सवय झाली होती. …. 

काही दिवसानी आम्हाला ते घर सोडावे लागले. मी त्याला सांगितले त्यानंतरचे दोन दिवस तोही मलूल वाटत होता..ना त्याने मला पाहून फुले बरसवली..ना पानांची सळसळ केली .. काही दिवसानी अखेर तिथून दुसरीकडे जाण्याचा दिवस उजाडला.. मला तर त्याच्याकडे बघवेना.. तरी मनाचा हिय्या करून मी त्याच्याजवळ गेले, त्याच्या खोडाला मिठी मारली आणि ओक्साबोक्षी रडून घेतलं.. डोळे उघडले तेव्हा माझ्या आजूबाजूला फुलांचा सडा पडला होता..मी त्यातली काही फुलं ओंजळीत घेतली. त्यांचा हलका वास घेऊन माझ्या रुमालात ठेवली..आणि नकळत त्याला हात जोडून मी तिथून निघाले.. 

काही दिवसांनी कळले..तो प्राजक्त आहे.. पण ती खिडकीजवळची फांदी मात्र सुकून गेली.. 

आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलत रहा.. माहिती नाही कधी नात्याचा प्राजक्त सुकेल..

काय ? पटतयं का ?

लेखिका : सुश्री सुधा मूर्ती  

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘टाहो…’ – भाग – 2 – सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘टाहो…’ – भाग – 2 – सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(विनाकारण इंग्लिश, रोमन लिपी यांचा वापर इतका अतिरेकी वाढलाय की बोलून सोय नाही. सई परांजप्यांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्येष्ठ स्त्रीलाही काळजी वाटावी अशी परिस्थिती खरंच आहे भोवती.)

(… तर त्या ऑइंटमेंटने डोळ्याखालच्या ब्लॅक सर्कल्सना गुडबाय करता येते.. तर मंडळी, आता स्पीक !) — इथून पुढे —

करमणुकीच्या क्षेत्रातदेखील आपल्या मातृभाषेबद्दल विलक्षण उदासीनता आहे. नाटकांची नावे पाहिली की, मराठी शब्द सगळे झिजून गेले की काय अशी शंका वाटते. ऑल द बेस्ट, फायनल ड्राफ्ट, लूज कंट्रोल, बॅलन्सिंग अ‍ॅक्ट, गेट वेल सून, प्लेझंट सरप्राइझ, ऑल लाइन क्लियर आणि अशी किती तरी. चित्रपटांची तीच गत आहे. पोस्टर बॉयज, शुगर, सॉल्ट आणि प्रेम, पोस्टर गर्ल, फॅमिली कट्टा, हंटर, चीटर, लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड, सुपर स्टार, बाइकर्स अड्डा, हे झाले काही नमुने. आकाशवाणी आणि प्रकाशवाणीवर तर सर्व मंडळी आपली खास गंगाजमनी भेसळ भाषाच बोलतात. निवेदक, वक्ते, नट, बातमीदार, तज्ज्ञ, स्पर्धक आणि पंच, झाडून सगळे जण. उदाहरणं देत बसत नाही (किती देणार?) पण आपल्या टी.व्ही. सेटचं बटण दाबलं तर प्रचीती येईल. मी चुकूनही मराठी कार्यक्रम पहात नाही. आपल्या भाषेच्या चिंधड्या उडताना नाही बघवत. मुलं म्हणतात, ‘‘काही तरीच तुझं. जमाना बदलतो आहे. भाषा बदलणारच.’’ कबूल, पण दुर्दैव असं की, मी नाही बदलले. माझ्या या आग्रही वृत्तीमुळे घरात मराठी वृत्तपत्रदेखील मी घेत नाही. ‘आजची यंग जनरेशन फ्रस्ट्रेटेड का?’, ‘दबावांच्या टेरर टॅक्टिक्स’, ‘तरुण जोडप्याचा सुइसाइड पॅक्ट’ असे मथळे; आणि लाइफ स्टाइल, हेल्थ इज वेल्थ, स्टार गॉसिप, हार्ट टु हार्ट, अशी सदरं पाहिली की वाटतं, सरळ इंग्रजी वृत्तपत्रच का घेऊ नये? ‘तुम्हाला आपल्या भाषेचं प्रेम नाही?’ मला विचारतात. प्रेम आहे म्हणून तर हा कठोर नियम मी लागू केला आहे. माझा स्वत:चा असा खासगी निषेध म्हणून मी इंग्रजी बिरुदं मिरवणारी नाटकं आणि सिनेमे पहात नाही. दृष्टीआड भ्रष्टी.

इतका वेळ मी इंग्रजी शब्दांच्या आगंतुकीवर आग पाखडून, आपले शब्द नाहीसे होत आहेत याबद्दल खेद व्यक्त केला; पण शब्दच काय- अवघी भाषाच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपल्या असंख्य लहान मुलांना मराठी नीट लिहिता- वाचता- बोलता येत नाही. ‘मम्मी, व्हॉट इज प्रतिबिंब?’ असं आमचा मिहिर विचारीत होता, अशी लाडाची तक्रार अलीकडेच कानी आली; पण त्याबद्दल खेद वाटण्याऐवजी मम्मीला खोल कुठे तरी अभिमानच वाटत होता. इंग्रजी येणं, हे आजच्या काळाची नितांत गरज आहे, याबद्दल दुमत नाही. सद्य युगामधली ती प्रगतीची भाषा आहे, हे कुणीही मान्य करील; पण इंग्रजी अथवा मराठी, या दोन भाषांमधून एकीची निवड करा, असा प्रश्नच नाही आहे. इथे निवड नव्हे तर सांगड घालण्याबद्दलची ही किफायत आहे. आजच्या जमान्यात मुलांना तीन भाषा यायला हव्यात- मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा- इंग्रजी. दुर्दैव असं की, या तिन्हीपैकी एकही भाषा उत्तम येते असं कुणी क्वचितच आठवतं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी विशेष दक्ष राहिलं पाहिजे. हे अशक्य नाही, हे मी स्वानुभवाने सांगते. सात ते अकरा वर्षांमधल्या माझ्या बालपणीचा काळ ऑस्ट्रेलियात गेला, कॅनबेरा शहरात. साहजिकच शाळा इंग्रजी होती आणि झाडून सगळ्या मित्रमैत्रिणी इंग्रजी बोलणाऱ्या, पण घरात मात्र कटाक्षाने शुद्ध मराठी बोलले जाई.

– मी मराठी पुस्तकं वाचीत असे आणि दिवसाकाठी दोन-तीन पानं काहीबाही मराठीतून लिहिण्याची मला सक्ती असे. दुर्दैवाने मला मिळालेला हा वसा पुढे चालू ठेवण्यात मी अपयशी ठरले. माझ्या मुलीची मुलं मराठीमधून विचारलेल्या प्रश्नांना इंग्रजीतून उत्तरं देतात. सुरुवातीला मी अन्शुनीला माझ्याबरोबर मराठीतून बोलायची सक्ती करीत असे; पण मग पुढे मी येणार आहे हे कळताच, आता मराठी बोलावं लागणार म्हणून ती धास्तावते, असं विनीने मला सांगितलं. तेव्हा मी तो नाद सोडून दिला. एका व्यक्तिगत पराभवाची नोंद झाली.

उद्याच्या मराठी भाषादिनी, या भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींची आवर्जून आठवण करावीशी वाटते.

सुमारे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी मॅक्सीन (आडनाव आठवत नाही) नावाची तरुण अमेरिकन विद्यार्थिनी मराठी भाषा शिकण्यासाठी महाराष्ट्रात येऊन राहिली होती. पाहता पाहता ती उत्तम मराठी बोलू लागली. एवढंच नव्हे तर पुढे तिने फलटणला चक्क मराठी शाळा काढली. फलटणला एका पार्टीत ती मला भेटली. ती काठापदराचं लुगडं नेसली होती. ‘छान साडी आहे तुमची,’ मी तिला म्हटलं. मॅक्सीन हसून म्हणाली, ‘मळखाऊ आहे.’ तिचा हा शब्द मी आजतागायत विसरले नाही. दुसरा उल्लेख आहे माजी तुरुंगाधिकारी उद्धव कांबळे यांचा. बिकट परिस्थितीला तोंड देऊन, उत्तम प्रकारे आपलं शिक्षण पूर्ण करत कांबळे यांनी पुढे यूपीएससीची परीक्षा दिली. ही परीक्षा मराठीमधून देणारे ते पहिले विद्यार्थी. पुढे त्यांच्या क्षेत्रात एक अतिशय सक्षम अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमावलं. मराठी भाषेवर त्यांचं निस्सीम प्रेम असून समर्पक सुंदर प्रतिशब्दांची त्यांनी एक सुंदर यादी बनवली आहे. माझ्या ‘आलबेल’ नाटकाच्या आणि पुढे ‘सुई’ या एड्सवरच्या लघुपटाच्या तुरुंगाबाबतच्या प्रवेशांसाठी त्यांची बहुमोल मदत झाली.

काही वर्षांपूर्वी मराठी भाषा तारण्यासाठी शिवसेनेनं झेंडा फडकावला होता. कुरकुरत का होईना, पण जनतेनं- आणि विशेष करून दुकानदारांनी तिची दखल घेतली; पण पुढे हा संग्राम मंदावला आणि परकीय पाहुणीचं- इंग्रजीचं फावलं. खरं तर, मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? इमारतीला सदन, हवेली किंवा महाल म्हणण्याऐवजी ‘हाइट्स’ किंवा ‘टॉवर्स’ म्हटलं की तिची उंची वाढते का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं. त्यासाठी जागतिक मराठी परिषदेचं अधिवेशन भरण्याची वाट पाहू नये.

लहानपणी केलेले एक अवलोकन मला छान आठवतं. सभोवतालची वडीलधारी मंडळी बदलत्या चालीरीती, पुसट होत चाललेले रीतिरिवाज आणि तरुण पिढीचे एकूण रंगढंग, यावर सतत तोंडसुख घेत असत. त्याचं मला फार वैषम्य वाटायचं. आपण मोठं झाल्यावर चुकूनसुद्धा असं काही करायचं नाही, असा मी ठाम निश्चय केला होता; पण काळ लोटला तसा तो निर्धार शिथिल झाला असावा. मीही आता जनरूढीच्या बदलत्या आलेखाबद्दल तक्रारीचा सूर आळवू लागले आहे, याची मला कल्पना आहे. तसंच तळमळीचे हे माझे चार शब्द म्हणजे निव्वळ अरण्यरुदन ठरणार आहे याचीही मला पूर्ण जाणीव आहे. पण काय करू? मामलाच तसा गंभीर आहे. प्रसंग बांका आहे. आपली मायबोली काळाच्या पडद्यामागे खेचली जात आहे आणि ‘कुणी मला वाचवा होऽ’ असा टाहो फोडते आहे; पण ही हाक कुणाला ऐकूच जात नाही, कारण तिची लेकरं बहिरी झाली आहेत. डेफ्  स्टोन डेफ्!

— समाप्त —

लेखिका : सुश्री सई परांजपे

(मी मराठीप्रेमी)

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print