भाकरीचे उदाहरण देऊन संसाराचा सार्थ अनुभव बहिणाबाईंनी सांगितलाय. भाकरी हवी असेल तर त्यासाठी तव्याचे चटके, चुलीची धग सहन करायलाच हवी. कोणतीही इच्छित गोष्ट सहज प्राप्त होत नाही असेच बहिणाबाईंना सुचवायचे आहे. सुख हवे असेल तर दुःख झेलावे लागते,हिरवळ हवी असेल तर उन्हातानातून चालावे लागते,परमेश्वरभेट हवी असेल तर कठोर तपश्चर्या करावी लागते, मोह मायेपासून अलिप्त रहावे लागते. थोडक्यात एखादी गोष्ट विनासायास मिळाली की तिचे महत्व रहात नाही मात्र तीच वस्तू प्रयत्नातून,परिश्रमातून मिळाली असेल तर तिचा आनंद अवर्णनीय तर असतोच पण चिरंतर देखील असतो.
एखादी माऊली एकाग्र होऊन चटचट भाकरी थापते आणि प्रत्येक भाकरी टम्म फुगते.चुलीवरच्या त्या भाकरींचा ढीग आपण भान हरपून पहातो आणि तिच्या कौशल्याचे मनातून कौतुक करतो,किती छान वाटते आपल्याला!पण तिने हे कौशल्य आत्मसात करायला बराच वेळ घालवलेला असतो,निरीक्षण,प्रयोगातून आणि सरावातून हे कौशल्य तिला सहज प्राप्त होते. ‘Practice makes man perfect’ एखाद्या गोष्टीच्या सरावाने माणूस त्यात अव्वल होतो.
तरीही भाकरी करायला शिकण्यापासून ती परफेक्ट जमणे आणि सराव होणे ही तशी किचकटच प्रक्रिया आहे.चांगली भाकरी जमणे हे करणारीच्या हातोटीवर तर अवलंबून आहेच पण बाकीच्या गोष्टी पण त्यास कारणीभूत असतात.
खरे तर चांगल्या पिठापासूनच भाकरीची सुरुवात होते.गिरणीवर पीठ कसे दिले?यावर चांगल्या भाकरीची यशस्वीता अवलंबून असते.ज्वारी खूप जुनी असेल किंवा पावसात भिजलेली असेल तर पीठ वसवसते आणि भाकरी थापता येत नाही,कितीही पट्टीची सुगरण असली तरीही!
गिरणीत गव्हाच्या किंवा डाळीच्या दळणावर ज्वारी दळून दिली असेल तरीही भाकरी तव्याला चिकटते किंवा भाकरी डागलते.आजकाल बऱ्याच ठिकाणी ज्वारीची वेगळी आणि गव्हाची वेगळी गिरण असते त्यामुळं ती समस्या नसते मात्र ग्रामीण भागात अजूनही एकच गिरणी सगळ्या दळणाला वापरली जाते.हल्ली भाकरी गॅसवर हेंदालीयमच्या तव्यात भाजली जाते त्यामुळं भाकरीला सर्व बाजूने हवी तशी आच देऊन भाकरी चांगली करता येते.त्याचबरोबर आता पहिल्यासारखी कसलीपण ज्वारी नसते,प्रतवारीनुसार व गुणवत्तेनुसार बाजारात ज्वारी मिळते व अशा ज्वारीची भाकरी चांगलीच होते.एकूण काय तर हल्ली चांगली भाकरी यायला फारसे कष्ट पडत नाहीत किंवा नवशिकिला भाकरी लगेचच जमू लागते शिवाय हल्लीच्या मुलींना आत्मविश्वास खूपच आहे कारण काही बिघडले,चुकले किंवा पीठ,भाकरी वाया गेली तरी घरचे रागवत नाहीत.त्यामुळं थोड्याशा सरावाने तिला चांगल्या भाकरी जमू लागतात.पण आमच्या लहानपणी आम्ही मुळाक्षरापासून शब्द शिकण्यासारखे भाकरी करायला शिकलो.
सर्वसाधारण वय वर्षे बारा किंवा अगोदरच भाकरी करायला आली पाहिजे असा अलिखित दंडक होता. स्वैपाक प्रथम, शाळा दुय्यम होती, त्यामुळं तितक्या वर्षाची मुलगी झाली की लगेच कुणीपन घरात आले की लगेच पोरीला बघून विचारायचे,’स्वैपाक पाणी येतोय की नाही अजून?’ मग येत असला की कौतुक व्हायचं, नसला येत की नावे ठेवत, त्यामुळं आपल्याला स्वैपाक आला पाहिजे ही आंतरिक हुरहूर आणि तळमळ प्रत्येकीला असायची. पण एकदम भाकरी शिकणे किंवा नुसती भाकरी येण्यालाही महत्व नव्हतं;तत्पूर्वी घरातील बारीक सारिक कामे पहिली यायला हवीत, ती अगदी पहिली दुसरीपासून सुरू होत. झाडलोट, राखकेर भरणे, भाज्या निवडणे,पाणी भरणे, चुलीपुढं जळण आणून ठेवणे, दुकानातून काहीबाही घरच्या गरजेच्या वस्तू आणणे,आई स्वैपाक करताना तिथंच बसून हाताखाली लागणाऱ्या वस्तू देणे आणि हे करतच स्वैपाकाचे म्हणजेच भाजी कशी फोडणीला टाकायची, आमटी कशी करायची, कशात काय घालायचं आणि कशात काय घालायचे नाही? याचे अचूक निरीक्षण करायचे त्याचबरोबर आई, आजी किंवा घरातील मोठी स्त्री भाकरी कशी करते हेही स्वैपाकघरात बसून बघावे लागे. यातूनच मग स्वैपाकाचे तंत्र शिकता यायचे आणि गोडीही लागायची.अधे मध्ये एखादा छोटा गोळा घेऊन भाकरी थापता येते का याचे प्रात्यक्षिक करून बघायला मिळायचे.
अचानक एखादे दिवशी कोणीतरी म्हणे,’आज भाकरीला बस.’ त्यावेळी आनंद ही होई आणि भीतीही वाटे, भाकरी जमणार का नाही? प्रथम चुलीतला जाळ एकसारखा करायचा, लोखंडी जडशीळ तवा चुलीवर ठेवायचा, त्यात उसुळला (उथवणी) भाकरीच्या अंदाजाने पाणी ओतायचे. परातीत पिठाचे गोल आळे करायचे, त्यात तव्यातलं उकळलेले पाणी ओतायचे.उलथण्याने पीठ हळुवार कालवून बाजूला सारायच. तोपर्यंत तिकडं हलक्या बोटांनी चुलीचा जाळ एकसारखा करायचा,चार काटक्या आत सारून फडक्याला बोटं पुसून पीठ मळायला सुरुवात करायची.इथंच हाताला पहिला चटका बसतो.
☆ मागोवा स्वप्नांचा – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- मी स्वप्न पाहिलं होतं ते फक्त कर्तव्यपूर्तीचं आणि कितीही यश आणि ऐश्वर्य प्राप्त झालं तरीही न उतण्या-मातण्याचं त्या स्वप्नाची पूर्तता हेच माझं जीवन ध्येय होतं आणि ते ध्येय साध्य झाल्याचं समाधान हीच माझ्या उर्वरित आयुष्याला पुरूनही उरुन राहील अशी कृतार्थता..!
मला मिळालेली ही स्वस्थताच माझ्या मुलाला उत्तुंग स्वप्ने पहात उंच झेपावण्यासाठीचं विस्तिर्ण आकाश देऊ शकली.)
पिढीनुसार फक्त परिस्थितीतच नाही तर मुलांच्या आचारा-विचारातही फरक पडत जातो. तसा तो माझ्या मुलाच्या बाबतीतही पडत असणारच हळूहळू. पण त्याचं संगोपन करत असताना,तो मोठा होत असताना, त्याच्या आचार-विचारातला फरक आम्हाला फारसा जाणवलाच नव्हता. आमच्या पिढीतल्या बऱ्याच आई-बाबांचे संपूर्ण व्यवधान, मुलांची संख्या मर्यादित असल्यामुळे असेल, पण त्यांच्या मुलांभोवतीच केंद्रित झालेले असे.त्यांच्या प्रत्येक हालचालीवर, प्रत्येक निर्णयावर,प्रत्येक मतांवर त्यांच्या आई-बाबांना कांही ना कांही म्हणायचे असायचेच. मित्रांच्या गप्पात डोकावून आई-बाबा एखादं वाक्य जरी बोलले तरी त्यांच्या मुलांना ते रुचायचं नाही. मुलं मग त्यांच्या पद्धतीने आपली नाराजी व्यक्त करीत रहायची.पालक म्हणून मुलांच्या बाबतीतली जागरुकता कितीही आवश्यक असली, तरी त्यांच्या ‘स्पेस’मधे आपण अतिक्रमण तर करीत नाही ना याचे भान पालकांकडून बऱ्याचदा राखले जात नसे.यातील ‘स्पेस’ या शब्दाचा आणि अपेक्षेचा जन्म आमच्या सलिलच्या पिढीतलाच. आमच्या लहानपणी कुठल्याच वयोगटाची ‘ स्पेस ‘ ही गरज नसायचीच. तेव्हाची घरं म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’अशीच. खूप नंतर हळूहळू शेजारही ‘परका’ होत चाललाय, पण त्या काळी मात्र वाडा संस्कृतीतला शेजार एकमेकांच्या घरात घरच्या सारखाच वावरे.
या पिढीत त्यामुळेच असेल मुलं मित्रांमधेच जास्त रमतात. शिवाय मनातल्या बारीक-सारीक गोष्टीही मोकळेपणाने आई-बाबांशी नाही तर मित्रांशीच बोलून मन मोकळं करतात. आमच्याबाबतीत तरी हा प्रश्न कधीच येणार नाही असं आपलं आम्हाला वाटत होतं. कारण सलिल मित्रात रमायचा, त्याच्या मित्रांचं आमच्या घरी जाणंयेणं असायचं, तरीही तो आमच्याशीही मोकळेपणाने बोलायचा. पण त्यादिवशी मात्र आमच्यातला संवाद नकळत का होईना तुटत चाललाय का अशी एक पुसटशी शंका माझ्या मनात डोकावून गेलीच.सलिल सातवी- आठवीत असतानाची ही गोष्ट. रविवारचा दिवस होता.संध्याकाळ होत आली तसे त्याचे तीन चार मित्र त्याला खेळायला बोलवायला आले. आमच्या घरासमोरच्या विष्णूघाटावरील ग्राउंडवर त्यांचा क्रिकेटचा ‘रियाज’ तासनतास चालायचा. रविवारीच नाही फक्त तर रोज संध्याकाळी. त्या दिवशी हॉलमध्ये त्याच्या मित्रांच्या गप्पा रंगलेल्या. मी बाहेर जाण्यासाठी म्हणून हॉलमधे आलो तेव्हा सलिलच बोलत होता आणि तो मला पाहून बोलता-बोलता वाक्य अर्धवट सोडून कावराबावरा होऊन बघत राहिलेला. मी आपलं हसून दार उघडून निघून गेलो तरी माझं ते हसणं वरवरचंच होतं.’हा आपल्यापासून काहीतरी लपवतोय का’ हीच अनाठायी शंका मनात ठाण मांडून बसलेली. मी परत येईपर्यंत टीम क्रिकेट खेळायला गेलेली होती. मी माझ्या मनातली शंका आरतीला बोलून दाखवली तेव्हा ती हसलीच एकदम.
” काही नाही हो. त्यांच्या त्यांच्या गप्पा असतात. आपण लक्ष नाही द्यायचं ”
” हो पण त्याने तरी लपवायचं कशाला?”
” त्यांची खेळाची नियोजनं असतात ती.किंवा इतर विषय. आपण प्रत्येक गोष्ट सांगत बसतो का त्याला. आवश्यक असेल तेवढंच सांगतो. हो ना? मुलांचंही तसंच असतं. त्याला सांगावसं वाटतं ते तो न विचारताही सांगतो.”
“अगं पण..”
“हे बघा, ‘तू कितीही वेळ खेळ पण अभ्यास झाल्याशिवाय मी टीव्ही बघून देणार नाही आणि झोपूनही देणार नाही हे लक्षात ठेव.’असं एकदा सांगितलंय न् तो ते करतोय. मग काळजी कसली?”
तिचं त्याच्यावर आवश्यक तेवढं लक्ष होतं म्हणून मी निश्चिंत असायचो. पण त्याचा दहावीचा रिझल्ट लागला आणि त्याची वकिली करायची जबाबदारी मोठ्या विश्वासाने त्याने माझ्यावरच टाकली. कारण वकिली करायची होती ती त्याच्या आईकडे..!
तोवर दहावीनंतर पुढे काय करायचं, कोणत्या साईडला जायचं, पुढे त्याने काय व्हायचं हे त्याला गृहीत धरून हिने मनोमन ठरवूनच टाकलेलं होतं. त्याला सायन्स आणि मॅथस् मधे खूप चांगले मार्क्स होते तसेच चारही भाषांमधेही. ‘ अवांतर वाचनाची आणि क्रिकेटची टोकाची आवड वर्षभर बाजूला ठेवून त्याने मी सांगते म्हणून अभ्यास एके अभ्यास केला असतान एक वर्ष भर, तर तो बोर्डातही आला असता’ यापेक्षाही आपला बोर्डातला नंबर थोड्याच मार्कात हुकल्याचं त्याला काहीच वाईट वाटत नाही याचं हिला वाईट वाटत होतं आणि रागही येत होता. तरीही काही न बोलता ती शांत होती.त्याने सायन्सलाच जायचं हे तिने ठरवलं होतं म्हणण्यापेक्षा गृहितच धरलेलं होतं. कारण चांगलं करिअर म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर हे सर्रास गृहीत धरलेलं असण्याचा तो काळ.त्यातून अनेक वर्षे शिक्षकी पेशात ती विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका म्हणून कार्यरत.शाळेतले तिचे शिष्य प्रत्येक गोष्ट तिला विचारुन करायचे. त्यामुळे सलिलच्या बाबतीतला योग्य तो निर्णय तिने स्वतःशी घेऊन ठेवलेलाच होता. त्यात गैर असं कांही नव्हतंही.पण त्यामुळेच आज सलिलची वकिली तिच्याकडे करायची वेळ मात्र माझ्यावर आली होती. कारण त्याला सायन्सला जायचंच नव्हतं.
त्यालाही त्याचा म्हणून काही एक विचार आहे, त्याची काही स्वप्नं आहेत, हे मला त्याच्याबाबतीत जाणवलं ते त्यावेळी प्रथम.
“बाबा, तुम्ही सांगा ना आईला. ती तुमचंच ऐकेल. मला सायन्सला जायचं नाहीये. “
“मग कुठे जायचंय?”
“कॉमर्सला”
“कॉमर्सला ?”मला आश्चर्यच वाटलं.”कॉमर्सला का?”
“असंच”
त्याच ‘असंच ‘ हे उत्तर मला स्विकारता येईना.काय बोलावं तेही सुचेना.निर्णय घ्यायला एक दोन दिवसांचा अवधी होता. तोवर त्याची समजूत काढता येईल असा मी विचार केला.
“हे बघ,तुझी आई फक्त ‘आई’ म्हणून हे सांगत नाहीये. ती स्वतः टीचिंग लाईनमधे आहे. ती हे का सांगतेय ते तू नीट समजून घे आणि तुला कॉमर्सलाच का जायचंय हेही तिला पटवून दे. हवं तर माझ्यासमोर दोघं बोला. मी तुला शब्द देतो, तुझ्या मनाविरुद्ध मी काहीही होऊ देणार नाही. पण शक्यतो आईला दुखवून काही करायला नको. हो की नाही?” माझ्यापेक्षा तो त्याच्या आईशी जास्त अॅटॅच्ड होताच. म्हणूनच तर त्याला तिला दुखवायला नको होतंच.त्यामुळे मी सांगितलेलं त्याला लगेच पटलंही.
त्यानंतरचा त्यांचा संवाद म्हणजे वाग्युद्ध नसलं तरी ‘वाद विवाद स्पर्धा’ नक्कीच होती. आणि अर्थातच कसलेला प्रतिस्पर्धी समोर असल्यामुळे हरला सलिलच.त्याचा तेव्हाचा कसनुसा चेहरा आजही मला आठवतोय.
“तुला सायन्स-गणित या विषयांमधे चांगले मार्क्स असताना सायन्सला न जाता कॉमर्सला जाणं माझ्या दृष्टीने तरी अनाकलनीयच आहे.”
“मला चारही भाषांत चांगले मार्क आहेतच की. सायन्स गणितात मी खूप अभ्यास केला म्हणून स्कोअरिंग झालंय.त्या विषयांचा मी आवडीने अभ्यास केला म्हणून नाही.”
“भाषांचा तरी अभ्यास मनापासून आणि आवड होती म्हणूनच केलायस ना ? मग आर्टस् कां नाही?काॅमर्सच कां?”
“आर्टस् ला जाऊन करिअरचं काय ?”
“तुझं अवांतर वाचन चांगलं आहे. इतिहासाची तुला आवड आहे. तू इंग्लिश लिटरेचर मधे पोस्ट ग्रॅज्युएशन कर. एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षांची तयारी कर.”
“मला सरकारी अधिकारी होण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीय.”
“कॉमर्सला जाऊन तरी काय करणारायस? कुठंतरी नोकरीच ना?”
“आम्ही सर्व मित्र दांडेकर मॅडमशी बोललोय सविस्तर. नोकरी खेरीजही इतर अनेक संधी उपलब्ध असू शकतात. काय करायचं ते पुढचं
पुढं बघता येईल.”
“पुढचं पुढं नाही.आत्ताच ठरवायचं. उद्या निर्णय चुकले म्हणून आयुष्यातील फुकट गेलेली वर्षं परत येणार नाहीयेत. तुझे मित्र कॉमर्सला जाणार म्हणून तू कॉमर्सला जातोयस हे मला पटत नाही.”
“मित्र जातायत म्हणून मी जात नाहीयेss” सलिल रडकुंडीलाच आला ” बाबाs.., तुम्हीतरी सांगा ना हिला. मला क्रिकेट खेळायचंय. ट्रेकिंगला जायचंय.ते सगळं मनापासून करून मी अभ्यास करणाराय. मग न आवडणाऱ्या विषयांच्या अभ्यासाचं ओझं मी कां म्हणून वाढवून घ्यायचं ?”
“तुला दहावीपर्यंतच्या अभ्यासात कॉमर्सचा एकही विषय नव्हता.ते विषय आवडतील हे गृहीत धरून तू कॉमर्सला जाणार. उद्या ते विषय नाही आवडले तर..? मग सगळंच अधांतरी.”
सलिल निरुत्तर झाला. केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात राहिला. मी त्याला नजरेनेच दिलासा देऊन शांत करायचा प्रयत्न केला पण आपले भरून आलेले डोळे लपवत तो उठून त्याच्या रुममधे निघून गेला.आरती अस्वस्थच.
“तुम्ही तरी सांगा, समजवा ना हो त्याला.”
“मी बोलतो त्याच्याशी. समजावतो त्याला.पण कॉमर्सच्या विषयात न आवडण्यासारखं काही नसतं हे माझ्या अनुभवावरून मी तुला सांगतो. तो शहाणा आहे. समंजस आहे. त्याच्या मनाविरुद्ध काही करायला नको एवढं लक्षात ठेवू या. अखेर आयुष्य त्याचं आहे. आपण आपली मतं सांगू.तो घेईल त्या निर्णयाला मनापासून पाठिंबा देऊ.”
तिलाही हे पटलं असावं.पण कळलं तरी वळायला मात्र दुसरा दिवस उजाडावा लागला.
त्या रात्री सलिलला बाहेर घेऊन जाऊन मी त्याच्याशी सविस्तर बोललो. तुला क्रिकेट मधेच एवढा इंटरेस्ट आहे, तर त्यात करिअर कर. फक्त खेळाडू म्हणूनच नाही तर क्रीडा पत्रकार विश्लेषक अशा अनेक संधी त्याही क्षेत्रात असतील असंही त्याला सुचवलं.
“बाबा, खेळाकडं मी करिअर म्हणून नाही तर आवड म्हणून बघतो. खेळ, ट्रेकिंग, अवांतर वाचन हे फक्त आवड म्हणूनच मला जपायचंय. मी कोणतंही करिअर केलं तरी या सगळ्या आवडी रिलॅक्सेशन म्हणूनच मला जपायच्यात”
त्याचा निर्णय ठाम होता.
“मी आहे तुझ्याबरोबर. अर्थात तुझ्या आईच्या गळ्यात घंटा बांधायचं काम मात्र तुझं. ती तुझ्या मनाविरुद्ध काही करणार नाही. तू निश्चिंत रहा “
तो हसला. त्याने होकारार्थी मान हलवली. आम्ही घरी आलो.
“मग काय ठरलं?”आरतीने उतावीळपणे विचारलंच.
“आज रात्रभर विचार करतो. उद्या सकाळी नक्की सांगतो ” सलिल शांतपणे म्हणाला.आमचं बाहेर बोलणं झालं तेव्हा तो स्वतःशीच हसला तेव्हाच त्याने आईचं काय करायचं ते मनाशी ठरवलेलं आहे हे मी ओळखून होतो. काय ठरवलंय याबद्दल मात्र मलाही उत्सुकता होतीच.
दुसऱ्या दिवशी सकाळी चेहऱ्यावर नाराजी घेऊन तो किचनमधे घुटमळत राहीला.
“आई,…”आई वाट पहात होतीच. ” आई,मी तुझ्या मना विरुद्ध काहीही करणार नाहीय.तू म्हणतेस तशी मी सायन्सला ऍडमिशन घेतो. अभ्यासही चांगला करतो.” मी आश्चर्याने पहातच राहिलो. तिच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद. पण सलिल गंभीरच होता..”..पण, कोणत्याही कारणाने मी नापास झालो तर मात्र तू मला दोष द्यायचा नाहीस.” तो बोलला आणि चोरट्या नजरेने माझ्याकडे पहात बाहेर निघून गेला.आरती हतबुद्ध होऊन फक्त पहात राहिली.
” बघितलंत ना? हा असला अधांतरी आज्ञाधारकपणा काय कामाचा?”
” त्याने पडतं घेतलंय ना?
झालं तर मग “
“व्हायचंय काय? उद्या तो खरंच नापास झाला तर तुम्ही दोघेही दोष देणार मलाच. नकोच ते. होऊ दे त्याच्या मनासारखं. पण तरीही मी त्याला बजावून सांगणाराय. कॉमर्सला जा पण क्रिकेट खेळत आणि बाहेर उंडारत कशीबशी डिग्री मिळवलीस तर मला चालणार नाही.त्या क्षेत्रातली उच्च डिग्री मिळवण्याची तयारी असेल तरच मी मान्य करीन. नाहीतर सायन्सला जाऊन नापास झालास तरी चालेल” तिने तसे स्पष्ट शब्दात त्याला बजावलेही. आणि त्यानेही ते मान्य केले.
आता कसोटी सलिलची होती.त्या कसोटीला तो पुरेपूर उतरला.सीए करता करता बरेच विषय आणि अभ्यासक्रम सारखाच आहे हे लक्षात घेऊन त्याने एम्.काॅमसुध्दा पूर्ण केले.तेही डिस्टिंक्शनमधे.सीएची परीक्षा बुद्धी न् हुशारी इतकीच
चिकाटीचीही परीक्षा घेणारी.पण सीएही त्याने फर्स्ट अॅटेम्टलाच यशस्वीपणे पूर्ण केले. त्याच्या बरोबरीचे एक-दोन मित्रही सीए झाले. ते मल्टिनॅशनल कंपनीत हाय पॅकेजवर रुजूही झाले. सलिलने मात्र स्वतःची प्रॅक्टिस सुरू करण्याचा निर्णय घेतला.
योग्य वेळ आल्यावर मोकळेपणानं तो आमच्याशी जे बोलला, त्यातून त्यांचे स्वप्न न् आयुष्याकडे पहाण्याचा त्याचा नेमका दृष्टिकोन स्वच्छपणे प्रतिबिंबित झालेला होता.
‘मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करून स्वतःच्या बुद्धीचा उपयोग दुसऱ्याच्या फायद्यासाठी करू देण्यापेक्षा त्याच बुद्धीचा उपयोग करून मी स्वतः प्रॅक्टिस केली तर इतर स्थानिक गरजूंनाही त्यांची आयुष्यं उभी करायला मी मदत करु शकेन. मल्टीनॅशनल कंपन्यातील पगाराइतका आर्थिक लाभ मला प्रॅक्टिस सुरू केल्याबरोबर मिळणार नाही याची मला कल्पना आहे. पण कांही वर्षातच माझ्या व्यवसायात स्थिर होऊन मी माझं आयुष्य त्या सर्वांपेक्षाही अधिक अर्थपूर्ण रितीने जगू शकेन आणि तेच माझं ध्येय आहे.पुण्यामुंबईल्या हाय पॅकेजसाठी मला पहाटपासून स्वतःला चरकात पिळून घ्यायचं नाहीय..’ हे त्याचे विचार स्वतःच्या आयुष्याचा त्याने किती खोलवर विचार केलाय याचेच निदर्शक होते.
“बाबा, मी आपल्या सर्व कुटुंबाची आर्थिक जबाबदारी अजून किती महिन्यांनी घ्यावी असं तुम्हाला वाटतं..?”प्रॅक्टिस करायचा निर्णय घेतल्यानंतर त्याने मला विश्वासात घेऊन विचारलं होतं.
“गरज म्हणशील तर तू कधीच नाही घेतलीस तरी चालू शकेल.तेव्हा त्याचे दडपण नको. केवळ पैशासाठी व्यवसायवृद्धी करायची तर तत्त्वांशी तडजोड करावी लागेल.ते यश तात्पुरतं समाधान देणारं असेल.तुझे हे क्षेत्रही निसरड्या वाटांचेच आहे हे लक्षात ठेव. चार पैसे कमी मिळाले तरी चालेल, पण तोल जाऊ देऊ नकोस.एरवी तुझं भलंबुरं तू जाणीवच.” मी त्याला सांगितलं होतं.
आज प्रॅक्टिस सुरू करून पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे. त्याने फक्त सधनताच नाही तर निखळ यश आणि नावलौकीकही मिळवलाय. आज जवळजवळ वीस कर्मचारी असलेलं त्याचं ऑफिस माझ्या अभिमानाचा विषय आहे.त्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक लाभ देत व्यवसायवृद्धीतला योग्य वाटा तो न मागता त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. अनेक सामाजिक उपक्रमांशी त्याने स्वतःला जोडून घेतलेय. सूनही कर्तबगार आहे आणि त्याच्या प्रत्येक पावलावर तिचीही खंबीर सक्रिय साथ त्याला मिळते आहे.
माझ्या बाबांच्या आणि माझ्या आयुष्यात पाहिलेल्या स्वप्नांना तिलांजली न देता तीही स्वप्ने मुलासुनेने स्वतःच्या स्वप्नांशी जोडून घेतलेली पहायला मिळणं यापेक्षा आमच्यासाठी वेगळी कृतार्थता ती काय असणार..?
हे होतं स्वप्न. माझं..,माझ्या बाबांचं न् माझ्या मुलाचं. त्या स्वप्नांचा हा मागोवा. पिढी बदलेल तशी परिस्थितीनुसार स्वप्नेही वेगळी. पण तिन्ही पिढ्यात स्वप्नांइतकाच त्यामागचा विचारही महत्त्वाचा. पिढी बदलते तसे विचारही बदलतात. पण त्यामागची भावना तितकीच निखळ असते याचेही हा मागोवा एक निदर्शक म्हणता येईल. आमची तिघांचीही आयुष्यं आणि स्वप्नेही त्या त्या पिढीचं सर्वार्थाने प्रतिनिधित्व करणारी नसतीलही कदाचित. तरीही वैयक्तिक संदर्भ थोडेफार वेगळे असले तरी भू बरंमिका मात्र जवळपास अशाच असतील याची मला खात्री आहे.
आमच्या खळ्यामध्ये एक मोठे वडाचे झाड होते.लहानपणी वडीलांबरोबर मीही खळ्यात जात असे. बैलांची पायत बाजरीच्या कणसांवरून फिरत असे. वडाचा रूबाब व घेरा एवढा मोठा होता की शेकडो चिमण्या कावळे पक्षी त्यावर आनंदाने उड्या मारत असत, व वडाला आलेली लाल टेंभरे खात बागडत असत. मी पण खालच्या फांद्यांवर जाऊन बसत असे व त्यांची ती लपाछपी बघण्यात मला फार मजा येत असे. सुगी आणि उन्हाळा तसे सुटीचेच दिवस असल्यामुळे माझे खूप वेळा खळ्यात जाणे होई. कधी कधी तर वडावर बसून अभ्यास केल्याचे ही मला आठवते.
घरी आले की, खाटेवर माझे आजोबा मला बसलेले दिसायचे. माझ्या आजोबांनी व माझ्या पूर्ण कुटूंबानेच स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. माझे आजोबा, आई वडील माझी आत्या काका साऱ्यांनीच स्वातंत्र्यासाठी तुरूंगवास भोगला होता हे मोठी झाल्यावर मला कळले. तेव्हा खाटेवर बसलेले ते आजोबा आठवून अभिमानाने माझा ऊर भरून आला. देशासाठी खस्ता खाणारे माझे कुटूंब व त्यातील सदस्यांचे मला खूप कौतुक वाटले.
न कळत माझे मन त्या प्रशस्त वडाची व माझ्या आजोबांची तुलना करू लागले. तळपत्या उन्हात भली मोठी घेरदार सावलीचे छत्र धरणारा तो वड व माझे आजोबा सारखेच नव्हते काय..? हो सारखेच होते. नदी काठावर भर उन्हात थंडी पावसात भिजत आपला पर्ण पसारा वाढवत थंडगार सावलीचे छत्र धरणाऱ्या त्या वडात व माझ्या आजोबात मला खूप साम्य दिसले. अगदी जुन्या काळात १९१०/२० च्या काळात घरची अत्यंत गरीबी असतांना माझे आजोबा आजी संसार ओढत होते. आणि अशाही परिस्थितीत १९३० पासून ते गांधीजींच्या चले जाव आंदोलनात सामिल झाले.. केवढे हे देश प्रेम..!
नकळत माझे मन मनात बसलेल्या वडाशी तुलना करू लागते. त्या वडासारखाच माझ्या आजोबांचा त्याग नव्हता काय? तो वड जसा पाऊस पाणी थंडी वारा वीजा वादळ यांची पर्वा न करता आपल्या अंगाखांद्यावर वाढणाऱ्या गोकुळा साठी निसर्गातल्या साऱ्या संकटांशी लढत होता त्या प्रमाणे माझे आजोबाही देशावर आलेल्या पारतंत्र्याच्या संकटाशी दोन हात करत होते. मोठ्या कुटूंबाची जबाबदारी खांद्यावर असतांना गरिबीत ही देशासाठी तुरूंगवास भोगत होते. त्या काळी शिक्षणाची तशी वा न वा च असतांना अडाणी असले तरी देशप्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते व ते तुरूंगात जात होते. केवढी ही कर्तव्यनिष्ठा देशासाठी…!
वडाच्या पारंब्यांसारखाच आजोबांचा वंश विस्तार होता. वडाच्या पारंब्या म्हणजे माझ्या आजोबांचे शुभ्रधवल केसच जणू … त्या वडा सारखेच शांत मिष्किल हसणारे आजोबा मला दिसतात. जुना काळ असतांना सुविधा नसलेले दिवस आठवून त्यांचे कष्ट आठवतात व नकळत मी नतमस्तक होते. आजोबांच्या बरोबरीनेच वाढणाऱ्या त्या वडाला आणि आजोबांना गरिबीत नेटाने साथ देणाऱ्या आजीलाही मी मनोमन शतश: प्रणाम करते … हो, ते होते म्हणून तर आपण आहोत ना? केवढे त्यांचे उपकार की एवढे हे असे सुंदर जग त्यांनी आपल्याला दाखवले. त्यांच्या मुळेच या सुंदर जगाचा अनुभव ह्याची देही ह्याची डोळा आपण घेत आहोत ना….? आणखी काय पाहिजे …!
दृष्टिकोन किती महत्वाचा पहा……..गणित तर समजून घ्या…”मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा – एक मजेशीर गणित” पहा, सोडवा किंवा सोडून द्या, पण आनंद जरूर घ्या.*
आपण असे मानू या की….
A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26.
म्हणजेच A=1, B=2, C=3
असे मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या….
आपण असे म्हणतो की, आयुष्यात “कठोर मेहनत/ HARDWORK” केले तरच आयुष्य यशस्वी होते.
आपण “HARDWORK चे गुण पाहु या. H+A+R+D+W+O+R+K = 8+1+18+4+23+15+18+11 = 98% आहेत पण पूर्ण नाहीत.
दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे “ज्ञान” किंवा ‘Knowledge’.
याचे मार्क्स पाहु या
K+N+O+W+L+E+D+G+E = 11+14+15+23+12+5+4+7+5= 96% हे पहिल्या पेक्षा कमी.
काही लोक म्हणतात “नशीब”/ LUCK हेच आवश्यक. तर लक चे गुण पाहु या.
L+U+C+K = 12+21+3+11 = 47%,–“नशीब” तर एकदमच काठावर पास.
काहींना चांगले आयुष्य जगण्यासाठी “पैसा/MONEY” सर्व श्रेष्ठ वाटतो. तर आता “M+O+N+E+Y=किती मार्क्स?
13+15+14+5+25= 72%, पैसा ही पूर्णपणे यश देत नाही.
बराच मोठा समुदाय असे मानतो की, “नेतृत्वगुण/ LEADERSHIP” करणारा यशस्वी आयुष्य जगतो. नेतृत्वाचे मार्क्स =
12+5+1+4+5+18+19+8+9+16= 97%, –बघा लीडर ही शंभर टक्के सुखी, समाधानी नाहीत, आनंदी तर अजिबात नाहीत.
मग आता आणखी काय गुण आहे, जो माणसाला १००% सुखी, समाधानी आणि आनंदी ठेऊ शकतो? काही कल्पना करू शकता?…… नाही जमत?—-
मित्रांनो, तो गुण आहे, आयुष्याकडे पाहण्याचा “दृष्टिकोन/ATTITUDE”
आता एटिट्यूड”चे आपल्या कोष्टका नुसार गुण तपासू…
A+T+T+I+T+U+D+E = 1+20+20+9+20+21+4+5= 100%.— पहा– आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण करून सुखी, समाधानी आणि आनंदी आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा आहे, ‘आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन’. तो जर सकारात्मक असेल तर आयुष्य १००% यशस्वी होईल आणि आनंदी ही होईल.
“दृष्टिकोन बदला आयुष्य बदलेल”
संग्राहक : अस्मिता इनामदार
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते, चुकतो तो चिन्हांचा वापर.
बेरीज,वजाबाकी, गुणाकार,भागाकार ही चिन्हं योग्य पद्धतीने वापरली की उत्तर मनासारखे येते.
आयुष्यात कुणाशी बेरीज करायची, कुणाला केंव्हा वजा करायचे, कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि भागाकार करताना स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजले की उत्तर मना-जोगते येते.
आणि हो, मुख्य म्हणजे जवळचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट यांचा हातचा एक समजू नये, त्यांना कंसात घ्यावे ! कंस सोडविण्याची हातोटी असली की गणित कधीच चुकत नाही.
प्रस्तुति – कालिंदी नवाथे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(हम सुप्रसिद्ध वरिष्ठ व्यंग्यकार, आलोचक व कहानीकारश्री रमेश सैनी जी के ह्रदय से आभारी हैं, जिन्होंने व्यंग्य पर आधारित नियमित साप्ताहिक स्तम्भ के हमारे अनुग्रह को स्वीकार किया। किसी भी पत्र/पत्रिका में ‘सुनहु रे संतो’ संभवतः प्रथम व्यंग्य आलोचना पर आधारित साप्ताहिक स्तम्भ होगा। व्यंग्य के क्षेत्र में आपके अभूतपूर्व योगदान को हमारी समवयस्क एवं आने वाली पीढ़ियां सदैव याद रखेंगी। इस कड़ी में व्यंग्यकार स्व रमेश निशिकर, श्री महेश शुक्ल और श्रीराम आयंगार द्वारा प्रारम्भ की गई ‘व्यंग्यम ‘ पत्रिका को पुनर्जीवन देने में आपकी सक्रिय भूमिकाअविस्मरणीय है।
आज प्रस्तुत है व्यंग्य आलोचना विमर्श पर ‘सुनहु रे संतो’ की अगली कड़ी में आलेख ‘व्यंग्य निबंध – प्रवृत्ति पर व्यंग्य लेखन’।
☆ साप्ताहिक स्तम्भ – सुनहु रे संतो #6 – व्यंग्य निबंध – प्रवृत्ति पर व्यंग्य लेखन ☆ श्री रमेश सैनी ☆
[प्रत्येक व्यंग्य रचना में वर्णित विचार व्यंग्यकार के व्यक्तिगत विचार होते हैं। हमारा प्रबुद्ध पाठकों से विनम्र अनुरोध है कि वे हिंदी साहित्य में व्यंग्य विधा की गंभीरता को समझते हुए उन्हें सकारात्मक दृष्टिकोण से आत्मसात करें। ]
व्यंग्य ,साहित्य की वह महत्वपूर्ण विधा है.जो मानवीय और सामाजिक सरोकारों से सबसे अधिक नजदीक महसूस की जाती है. व्यंग्य ही समाज में व्याप्त विसंगतियांँ, विडंबनाएँ पाखंड, प्रपंच, अवसरवादिता, ठकुरसुहाती अंधविश्वास आदि विकृतियों, कमियों को उजागर करने में सक्षम विधा है। वैसे साहित्य में कहानी, उपन्यास और कविता आदि अन्य विधा भी उक्त विकृतियों को अनावृत करती है, किंतु उसका प्रभाव समुचित ढंग से समाज में नहीं दिखता, जितना कि व्यंग्य विधा के माध्यम से. इसके पीछे व्यंग्य का फॉर्मेट, भाषा,शिल्प और विषय है. जो उसको मुकम्मल रूप से जिम्मेदार ठहराता हैं. व्यंग्य की प्रकृति अपनी बुनाव, बनाव से सीधे-सीधे जनमानस पर प्रभाव डालता हैं. समाज और राजनीति में व्याप्त विसंगतियाँ समाज में घुन की तरह काम करती हैं. यदि समय रहते इसे उजागर ना किया जाए तो वह समाज में नासूर बन जाती हैं. कभी-कभी यह भी देखा गया है. कि अनेक व्यक्तियों में पाई जाने वाली प्रवृत्तियाँ भी समाज की नैतिकता चाल-ढाल रहन सहन जीवन शैली आदि को प्रभावित करती है. यह प्रवृत्तियाँ सामाजिक, मानवीय पतन की ओर सीधे-सीधे संकेत करती हैं. यहाँ एक बात अत्यंत महत्वपूर्ण है कि व्यक्तिगत कमजोरियाँ भी हमारे दैनिक जीवन को प्रभावित करती हैं. इन प्रवृत्तियों का मानवीय और सामाजिक जीवन में परोक्ष रूप से तो नहीं पर अपरोक्ष रुप से प्रभाव गहन होता है. इसे कमतर नहीं आँका जा सकता है. पूर्व के व्यंग्यकारों ने तो प्रवृत्तियों पर धड़ल्ले से लिखा है. उसी परम्परा का अनुसरण करते हुए समकालीन व्यंग्यकार भी प्रवृत्तियों पर प्रमुखता से लिख रहे हैं. यह प्रवृत्ति मूलक लेखन ने व्यंग्य को नई दिशा देने का काम किया है. प्रवृत्तियों पर लिखे गए व्यंग्य ने पाठक को चकित तो किया है और चमत्कृत भी. इस प्रकार की लेखन ने बरसात के प्रारंभिक दिनों की झड़ी से भींगी मिट्टी की सौगंध का अनुभव दिया है. यह प्रवृत्ति निंदा की हो सकती है. ठकुर सुहाती की हो सकती है. अन्याय, प्रपंच के पक्ष में चुप रहने की भी हो सकती है. इस प्रकार की प्रवृत्ति अन्याय प्रपंच निंदा आदि करने वालों से अधिक खतरनाक होती है. इनके पक्ष में चुप रहना .इन को प्रोत्साहित करने के समान होता है. इससे उन शक्तियों को बल मिलता है और वे बल पाकर अधिक दमदार होकर समाज को ऋणात्मक रुप से प्रभावित करती है. अगर प्रारंभ में ही इन विकृति जन्य प्रवृत्तियों को कुचल दिया जाए तो समाज और मनुष्य को बचाने में अधिक कारगर हुआ जा सकता हैं. इस कारण प्रवृति पर बहुतायत से व्यंग्य लिखा जा रहा है पाठक इसे पसंद भी कर रहे हैं. इसका लाभ यह दिख रहा है कि पाठक विकृतियों से अपने को बचाकर भी रखना चाह रहे है.
प्रवृत्ति में व्यंग्य लेखन कब से प्रारंभ हुआ. यह ठीक से नहीं कहा जा सकता है. पर हरिशंकर परसाई ने प्रचुर मात्रा में लिखा और इस प्रकार के व्यंग्य को सामाजिक संदर्भ में जोड़कर देखने का नया आयाम दिया. इसमें पाठक की भी रूचि बढ़ी. पत्र-पत्रिकाओं ने इसे हाथों हाथ लिया है .पाठक और पत्र-पत्रिकाओं में इस नई दृष्टि को आधारशिला के समान गंभीरता से लिया. जो प्रवृत्ति पर लेखन के लिए सहायक सिद्ध हुई. इस कारण अधिकांश व्यंग्य लेखकों ने अन्य विषयों की अपेक्षा इसे सहज सरल और प्रभावशाली माना. इसे प्रवृत्ति मूलक लेखन का प्रभाव ही कहा जा सकता है. हरिशंकर परसाई जी की चर्चित रचना “पवित्रता का दौरा “से अच्छे से समझ सकते हैं. वे लिखते हैं..
‘इधर ही मोहल्ले में सिनेमा बनने वाला था तो शरीफों ने बड़ा हल्ला मचाया. शरीफों का मुहल्ला है. यहाँ शरीफ स्त्रियां रहती हैं. और यहाँ सिनेमा बन रहा है. गोया सिनेमा गुंडों के मोहल्ले में बनना चाहिए ताकि इनके घरों की शरीफ औरतें सिनेमा देखने गुंडों के बीच में जाएँ. मुहल्ले में एक आदमी कहता है. उससे मिलने की एक स्त्री आती है. एक सज्जन कहने लगे – ‘यह शरीफों का मुहल्ला है. यहाँ यह सब नहीं होना चाहिए. देखिए फलां के पास एक स्त्री आती है.’ मैंने कहा – ‘साहब शरीफों का मुहल्ला है. तभी तो वह स्त्री पुरुष मित्र से मिलने की बेखटके आती है. वह क्या गुंडों के मुहल्ले में उससे मिलने जाती है.’
इस शरीफ दिखने दिखाने का ढोंग करने वाले व्यक्ति सब जगह मिल जाएंगे. जो सदा दूसरों से बेहतर दिखने का नाटक करते हैं. यहाँ पर प्रवृत्ति अनावश्यक रूप से द्वेष पैदा करती है. इस प्रवृत्ति वाले हर जगह अड़ंगा दिखाते मिल जाएंगे. शरद जोशी की एक अद्भुत रचना है ‘वर्जीनिया वुल्फ से सब डरते हैं’, शासकीय कार्यालयों में खुशामदी प्रवृत्ति पर तीखा व्यंग्य है. वैयक्तिक प्रवृत्ति पर प्रभावशाली व्यंग्य है. यह सीधे-सीधे मानवीय प्रवृति पर चोट करता है इस प्रवृत्ति मूलक व्यंग्य से समाज प्रत्यक्ष रूप से प्रभावित नहीं होता है, पर खुशामदी प्रवृत्ति शासकीय व्यक्ति या अफसरों के निर्णय लेने की क्षमता को प्रभावित करने में सक्षम होती है. जिसका प्रभाव बाद में समाज में परिलक्षित होता देख सकते है. आरंभ में प्रवृत्तियां प्रत्यक्ष रूप में समाज को प्रभावित करने वाली नहीं दिखती है. पर शनैः शनैः इसका प्रभाव ऋणात्मक रूप से सामने आ जाता है. शरद जोशी की इस रचना ‘वर्जीनिया वुल्फ से सब डरते हैं.’ में वे लिखते हैं
वे सचिवालय के तबादलों की ताजी खबरें सुनाते दुकान में घुस गए
सोमवार को फाइल बगल में दाबे छोटा अफसर बड़े अफसर के कक्ष में घुसा और ‘गुड मॉर्निंग’ करने के बाद बोला- कल की पिक्चर कैसी रही! सर.
बड़ा अफसर एक मिनट गंभीर रहा. सोचता रहा क्या कहें फिर उसने कंधे उचकाए और बोल’ इट वाज ए नाइस मूवी’! ऑफ कोर्स !
दोपहर को छोटे अफसर ने अगासे को बताया कि बड़े साहब को पिक्चर पसंद आई. वह कह रहे थे कि’ इट वाज ए नाइस मूवी’
दोपहर बाद एकाएक सभी लोग ‘हु इज अफ्रेड आफ वर्जिनिया वूल्फ’ की तारीफ करने लगे .
यह अफसरों में खुशामदी का बढ़िया उदाहरण है. यह ठकुरसुहाती की प्रवृत्ति अफसरों के निर्णय को प्रभावित करती है. जिससे अपरोक्ष रूप से समाज प्रभावित होता है. आज यह प्रवृत्ति राजनीति क्षेत्र में बहुत आसानी से देखी जाती है. राजीव गांधी के समय में यह कहा जाता था कि वे काकस से घिरे रहते थे.
प्रवृत्तियों पर लिखे गए व्यंग्य वैयक्तिक होते हैं पर उनका शिल्प और भाषा की संरचना ऐसा होती है कि वे सर्व सामान्य से दिखने लगती हैं. आजकल प्रवृति मूलक व्यंग्य रचनाओं में एक विसंगति उभर कर आ गई है. रचना वैयक्तिक व्यंग्य की होती है. आजकल प्रवृत्ति लिखे जा रहे व्यंग्य में व्यक्तिगत विसंगतियां अधिक है.जिन्हें लेखक प्रवृत्ति मूलक व्यंग्य कह रहा है. जबकि वह किसी व्यक्ति को केंद्र में लिखी गई हैं. कभी-कभी अनायास यह संयोग जुड़ जाता है कि व्यक्तिगत प्रवृत्तियां भी अनेक लोगों में संयोगवश मिल जाती है.जिन्हें भी प्रवृति वाला व्यंग्य कह जाते हैं. जबकि वे व्यंग्य व्यक्तिगत खुन्नस वाले होते है. जो पढ़ने में रोचक लग सकते हैं. पर पाठक पर इसका कोई असर नहीं पड़ता है जबकि प्रवृत्तिजनक व्यंग्य में सावधानी रखना जरूरी होता है. इस तरह का व्यंग्य का विषय/प्रवृत्ति सार्वजनिक और सामाजिक जीवन में दिखने वाला होना चाहिए. अनेक व्यक्तियों की कुछ आदतें ऐसी होती हैं जो अन्यत्र नहीं दिखती हैं. तब इस पर लिखा व्यंग्य वैयक्तिक हो जाएगा. पर परसाई जी की अनेक रचनाएं व्यक्तिगत परिपेक्ष में लिखी रचनाएं हैं. पर उनका प्रस्तुतिकरण आम प्रवृत्ति का रूप ले लिया है. उनकी एक रचना ‘वैष्णव की फिसलन’ वैयक्तिक प्रवृत्ति की रचना है.एक व्यक्ति की प्रवृत्ति पर लिखी गई है आज जब उसे हम पढ़ते हैं तो लगता है कि यह अनेक लोगों में अलग-अलग ढंग से देखी जा सकती है. यहाँ पर वैयक्तिक प्रवृत्ति समान्य व्यक्ति में परिणित हो गई है. यह व्यंग्यकार और व्यंग्य का कौशल है जो उसे सर्वजन हिताय बना दे. प्रवृत्ति पर लिखा लेखन मूल रूप से समाज और मानवीय जीवन में पनप रही प्रवृत्ति/विकृति को उजागर कर मनुष्य और मनुष्यता को बेहतर करने का पहला कदम है.
(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा रचित एक भावप्रवण कविता “बहा ले जाती नदी अपना ही किनारा”। हमारे प्रबुद्ध पाठक गण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे। )
☆ काव्य धारा # 49 ☆गीत – मुझे नही आता है ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध ☆
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(श्री सुरेश पटवा जी भारतीय स्टेट बैंक से सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों स्त्री-पुरुष “, गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की (नर्मदा घाटी का इतिहास) एवं तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व प्रतिसाद मिला है। आज से प्रस्तुत है आपकी एक विचारणीय साप्ताहिकआलेख श्रृंखला की प्रथम कड़ी “मैं” की यात्रा का पथिक…5”)
☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख – “मैं” की यात्रा का पथिक…5 – मोह ☆ श्री सुरेश पटवा ☆
“मैं” को संसार में बांधे रखने का काम मोह करता है परंतु यह जाने-अनजाने मन का एक विकार भी बन जाता है। जब लगाव गिने-चुने लोगों से होता है, हद में होता है, सीमित होता है, तब मोह सहायक रसों का नियामक होता है। जीवन में रस घोलता है। लेकिन हितों के अटलनीय संघर्ष में मोह घना होकर “मैं” को किंकर्तव्यविमूढ़ करके कर्तव्य पथ से विच्युत करता है।
जीवन के सबसे बड़े संघर्ष में अर्जुन की यही दशा है। अर्जुन ने युद्ध के मैदान में अपने विरोध में खड़े सभी सगे-संबंधियों को देखकर हथियार डाल दिए हैं। उसका मोह ग्रसित “मैं” कर्मपथ पर अग्रसित हो उसे युद्ध नहीं करने दे रहा है। अर्जुन पितामह, गुरु, परिजनों को सामने देख मोहग्रस्त होकर अस्त्र डाल देता है। मूल्यों के संघर्ष में वह कुछ लोगों से सम्बंधों के वशीभूत मोहग्रस्त है। मानवता कल्याण हेतु नए मूल्यों की स्थापना में संघर्ष से हिचकिचाता है। नियत कर्तव्य से पीछा छुड़ाना चाहता है।
जब “मैं” को जीवन का पहला खिलौना मिलता है तब उसमें स्वामित्व का भाव आता है। “मैं” का मेरा निर्मित होता है। यह स्वामित्व भाव ही मोह की प्रथम सीढ़ी है। फिर वह वस्तुओं, व्यक्तियों, स्थान सभी से मोहग्रस्त होने लगता है। मोह के संस्कार “मैं” के चित्त में इकट्ठा होते रहते है, जिससे इसकी जड़ें पक्की हो जाती हैं और कई बार चाहकर भी वह मोह को नहीं छोड़ पाता। वह मोह को ही प्रेम मान लेता है, जैसे युवक-युवती आपस में आसक्ति को प्रेम कहते हैं, जबकि वह प्रेम नहीं, मोह है।
मां-बाप जब अपने बच्चे को प्रेम करते हैं तो वह भी मोह कहलाता है। मोह का मतलब होता है आसक्ति, जो गिने-चुने उन लोगों या चीजों से होती है जिन्हें हम अपना बनाना चाहते हैं, जिनके पास हम ज्यादा-से-ज्यादा समय गुजारना चाहते हैं। अपना स्वामित्व स्थापित करके उनकी आज़ादी छीनना शुरू कर देते हैं। पति पत्नियों में भी अक्सर ऐसा होता है।
मोह भेद पैदा करता है। मोह वहां होता है जहां हमें सुख मिलने की उम्मीद हो या सुख मिलता हो। वहाँ मैं और मेरे की भावना प्रबल रहती है। एक होता है “लौकिक प्रेम” यानी सांसारिक प्रेम और दूसरा होता है “अलौकिक प्रेम” यानी ईश्वरीय प्रेम। सांसारिक प्रेम मोह कहलाता है और ईश्वरीय प्रेम साधना कहलाता है। संसारी प्रेम च्युइंग सा चिपकाव है, चबाते रहो तब भी मोह जैसा का तैसा बना रहता है। इसी मोह की वजह से व्यक्ति कभी सुखी, तो कभी दुखी होता रहता है। जबकि ईश्वरीय प्रेम समर्पण द्वारा “मैं” की पूर्ण स्वतंत्रता।
मोह से “मैं” में संग्रह की प्रवृत्ति आती है वही प्रवृत्ति धीरे-धीरे परिग्रह में बदलने लगती है। “मैं” ज़रूरत से अधिक संग्रह के प्रपंच में पड़ने लगता है। इस तरह “मैं” आसक्ति के चक्रव्यूह में फँस जाता है। व्यग्र बेचैन अस्थिर चित्त “मैं” की मोहग्रस्त प्रकृति हो जाती है।
मोह जन्म-मरण का कारण है क्योंकि इसके संस्कार बनते हैं, लेकिन ईश्वरीय प्रेम के संस्कार नहीं बनते बल्कि वह तो चित्त में पड़े संस्कारों के विनाश के लिए होता है। ईश्वरीय प्रेम का अर्थ है मन में सबके लिए एक जैसा भाव। जो सामने आए, उसके लिए भी प्रेम, जिसका ख्याल भीतर आए, उसके लिए भी प्रेम। परमात्मा की बनाई हर वस्तु से एक जैसा प्रेम। जैसे सूर्य सबके लिए एक जैसा प्रकाश देता है, वह भेद नहीं करता। जैसे हवा भेद नहीं करती, नदी भेद नहीं करती, ऐसे ही हम भी भेद न करें। मेरा-तेरा छोड़कर सबके साथ सम भाव में आ जाएं। अपने स्नेह को बढ़ाते जाओ। इतना बढ़ाओ कि सबके लिए एक जैसा भाव भीतर से आने लगे। फिर वह कब ईश्वरीय प्रेम में बदल जाएगा, पता ही नहीं चलेगा। यही अध्यात्म का गूढ़ रहस्य है।
“मैं” के सामने प्रश्न उठता है कि मोह जीवन के प्रत्येक क्षेत्र से जुड़ा है, जैसे स्वयं की देह, देह के दैहिक सुख, मानसिक सुख, बौद्धिक सुख, सम्मान के सुख, धन की कामना के सुख, व्यक्ति और स्थान की चाहत के सुख इत्यादि। क्या इन सारे सुखों में सन्निहित मोह से मुक्त होकर “मैं” की यात्रा का पथिक आगे के पड़ाव पर पहुँच सकता है।
जीवन निर्वाह हेतु इन सभी सुख कारक अवयवों की अनिवार्यता थी। मोह के बग़ैर जीवन सम्भव ही नहीं था। सनातन परम्परा में वानप्रस्थ मोह से निकलने की तैयारी का आश्रम होता है और सन्यास मोह को त्याग देने का।