(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “आभासी रिश्ते…“।)
अभी अभी # 371 ⇒ आभासी रिश्ते… श्री प्रदीप शर्मा
फेसबुक के रिश्ते कथित रूप से आभासी होते हैं, फिर भी उनमें कहीं ना कहीं असलियत अथवा वास्तविकता नजर आ ही जाती है।
मुझे याद आ रहे हैं, मेजर वर्मा, जिनसे मैं आज से ४५वर्ष पूर्व अपने बैंकिंग कार्यकाल के दौरान मिला था। आज मेजर वर्मा कहां हैं, हैं भी अथवा नहीं, मुझे कुछ पता नहीं।।
उनसे बहुत कम वक्त में ही इतना आत्मीय संबंध हो गया था कि शाम के फुर्सत के क्षणों में वे टहलते टहलते, हाथ में छड़ी लिए, मेरे निवास तक आ जाते थे। वे इतने वृद्ध नहीं थे, कि उन्हें लाठी का सहारा लेना पड़े, लेकिन कुत्तों से बचने के लिए छड़ी उनका एकमात्र विकल्प था।
आपसी बातचीत में अक्सर उनके परिवार का यदाकदा जिक्र आ ही जाता था। उनके एक सुपुत्र कैप्टन भरत वर्मा दिल्ली में पब्लिशर थे और दूसरे पुत्र श्री राज वर्मा स्टेट बैंक ऑफ इंडिया, भोपाल में तब कार्यरत थे।।
मैं उनके परिवार के किसी सदस्य से मिल नहीं पाया, इंदौर में वे अकेले ही एक किराए के मकान में निवास करते थे। कुछ समय के पश्चात् ही वे वापस हमेशा के लिए दिल्ली प्रस्थान कर गए। तब फोन की सुविधा इतनी आम नहीं थी, फिर भी कुछ समय तक हमारा आपस में पत्र व्यवहार चलता रहा।
कब हमारा यह संपर्क भी टूटा, कुछ याद नहीं, लेकिन वे स्मृति में आज भी हैं। फेसबुक पर अनायास एक नाम उभर कर आया, राज वर्मा, और मुझे उनके पुत्र का स्मरण हो आया। ये राज वर्मा भी भोपाल में ही स्टेट बैंक में कार्यरत अवश्य निकले, लेकिन इनका मेजर वर्मा के पुत्र राज वर्मा से कोई लेना देना नहीं था।।
एक अपरिचित, अनजान रिश्ते ने संयोगवश दूसरे आभासी रिश्ते को मुझसे जोड़ दिया। हमसे कब कौन मिलता है, और कब कौन बिछड़ता है, कुछ कहा नहीं जा सकता।
फेसबुक के राज वर्मा आज मेरे प्रिय फेसबुक मित्र हैं। इनकी साहित्यिक यात्रा बड़ी लंबी है और पुस्तकों से इन्हें विशेष प्रेम है। इनसे मिलने का कभी योग भले ही नहीं आया हो, लेकिन फेसबुक की एक और परिचित शख्सियत हेमा बिष्ट जी इनसे मिल चुकी हैं।।
हेमा बिष्ट जी से भी मैं कभी नहीं मिला, लेकिन बातचीत के दौरान उन्होंने जिक्र छेड़ा कि वे मेरे शहर इंदौर में कभी तीन वर्ष के लिए रह चुकी हैं। क्या आभासी खुशी भी होती है। आज वे आस्ट्रेलिया में हैं, लेकिन कभी वे मेरे शहर इंदौर में थी।
रिश्तों में करीबी का अहसास आभासी नहीं होता, हम कितने करीब आ जाते हैं, केवल आभास से। इसे आप स्वप्न भी नहीं कह सकते। जिस तरह हेमा जी लखनऊ जाकर राज जी से मिली, हमारी भी कभी ना कभी, कहीं ना कहीं भेंट संभव है, क्योंकि ;
(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी द्वारा रचित एक भावप्रवण रचना – “अभी भी बहुत शेष है” । हमारे प्रबुद्ध पाठकगण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।)
☆ ‘अनुगुंजन’ से – अभी भी बहुत शेष है ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆
☆
मंजिले पार करते हुये नित नई जिंदगी आज इस ठौर तक आ गई ।
राह फिर भी अभी भी बहुत शेष है इन चरण के चिरन्तन चलन के लिये ।। १ ।।
*
राह में मोड़ आये, चौराहे मिले कई उतारों-चढ़ावों के भी सिलसिले ।
कुछ तो सीखा है, फिर भी बहुत शेष है मौन मन के निरन्तर मनन के लिये ।। २ ।।
*
सड़कें चिकनी औ’ चौड़ी चमकदार हैं फिर भी कचरों औ’कांटों के अम्बार हैं।
रोशनी कम अँधेरा बहुत शेष है दूर करने अभी भी, किरण के लिये ।। ३ ।।
*
आये दिन सुख के नये लाखों साधन बने लोग फिर भी हैं सहमें, डरे अनमने ।
सीखना सबको अब भी बहुत शेष है रीति नई. प्रीति के आचरण के लिये ।। 8 ।।
*
पर लगा, आदमी बहुत उड़ने लगा छोड़ धरती सितारों से जुड़ने लगा ।
पर समझना सभी को बहुत शेष है यह धरा ही है जीवन मरण के लिये ।। ५ ।।
☆ “मुबंईचा डबेवाला…” ☆ श्री रत्नाकर दिगंबर येनजी ☆
काही दिवसांपुरी एका व्हाट्सअप ग्रुपवर माझ्या एका जीवलग मित्राने एक पोस्ट शेअर केली होती.त्यात TED वर एक व्यक्ती डबेवाले या विषयावर प्रेझेंटेशन करुन त्यावर Motivation speech देत होती. आता तुम्ही म्हणाल हे TED काय प्रकरण आहे? TEDम्हणजे (Technology, Entertainment, Design) ही एक Conference असते. जगभर वेगवेगळ्या किंवा युनिव्हर्सिटी कँम्पस किंवा आयोजित केलेल्या चर्चा सत्रात मोठ मोठ्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तीना आपण यशस्वी कसे झालात या विषयावर कमीत कमी पंधरा ते अठरा मिनिटे बोलायला देतात. त्यात आपण श्रोत्यांपुढे सुंदर परिणामकारक भाषण करुन त्यांची मने जिंकावी लागतात. ह्या भाषणाचे छायाचित्रण करुन ते TED च्या संकेतस्थळावर टाकतात व तिकडुन युट्युब वर सुध्दा प्रसरण होते.यामुळे आपण बोललले पंधरा ते अठरा मिनिटाचे भाषण जगातील करोडो लोकांकडे. पोहचते.
मी नेहमी युट्युब वर असे TED Motivation speech बघतो छान असतात. यात मी आपला मराठ मोळा सिध्दार्थ जाधव याचे एकदा भाषण पाहीले. आपले जाधव साहेब मस्तच बोलले .छाती गौरवाने फुलुन आली. अशाच एका TED च्या सत्रात आंतरराष्ट्रीय प्रेरणा व्याख्याते (International Motivational Speaker) डाँक्टर पवन अगरवाल यांनी स्वतः A study of Logistics and Supply Chain Management of Dabbawala in Mumbai’. या विषयात प्रबंध लिहुन डाँक्टर ही पदवी ग्रहण केली असल्याने त्यांनी मुंबईच्या डबेवाला या विषयावर रंगमंचावर स्वतः बनविलेले Power point presentation सादर केले.महत्वाचे म्हणजे त्यांनी सर्वांसमोर डबेवालाचा वेश परिधान करुन उत्तम ईग्रजी भाषेत प्रेझेंटेशन दिले. त्यांचे ते थोडक्यात सादरीकरण खरोखरच प्रेरणादायी व परिणामकारक (Effective) होते.
त्यांच्या सादरीकरणात त्यांनी जी माहिती दिली ती मी आपणास थोडक्यात सांगतो.
मुंबईत १८९० साली ही डबे कामाच्या ठिकाणी नेऊन पोहचवण्याची पध्दत सुरु झाली.आज मुबंईत त ५००० ( पाच हजार) डबेवाले जवळजवळ २००००० ( दोन लाख ) डबे डिलीव्हरी करतात. म्हणजे प्रत्येक डबेवाला दररोज चाळीस डबे प्रत्येक घरातुन पिकअप करतो व जवळच्या स्टेशनवर ड्राँप करुन पुन्हा संध्याकाळी त्याच संध्याकाळी पुन्हा रिकामी आलेला डबा सकाळी जिकडुन डबा घेतला तिकडे पुन्हा रिटर्न करतो. असे हे बारा महीने करावे लागते. आपण हे वाचताना आपले हिशोबी मन विचार करत असेल की याचे चार्जेस किती. याचे चार्ज फक्त साडे तिनशे ते चारशे रुपये.म्हणजे दिवसाला जास्तीत जास्त फक्त पंधरा ते वीस . पंचवीस घेतले तरी डोक्यावरुन पाणी.मला सांगा जी मंडळी स्वतःच्या कार्यालयाच्या दरवाज्या पर्यंत डबा डिलीव्हरी घेतो तो माणूस किंवा व्यक्ती महीना कमीतकमी लाखभर पगार घेत असेल त्याच्या साठी दिवसा (पिकअप व ड्राँप डिलीव्हरी)पंचवीस काहीच नाही. आता त्यांची तुमच्या भाषेत H.R. system कशी ती समजवतो. दहा डबेवाले एका मुकादम च्या हाताखाली काम करतात. मुकादम हे पद त्याच्या अनुभवाने व चांगले काम केल्याने मिळते. पण पण…थांबा या मुकादमाला ईतर डबेवाल्यापेक्षा जास्त पगार असेल अस समजु नका कारण मुकादमाचा पगार पुर्वी डबे डिलीव्हरी करत असताना मिळत होता तेव्हढाच आणि महत्वाचे म्हणजे कोणी डबेवाला आजारी किंवा पुर्व सुचनेनुसार गैरहजर असेल तर या मुकादमाला त्या डबेवाल्याचे काम करावे लागते. लोकांची अडचण किंवा त्याला डबा न मिळाल्याने उपास घडु नये हे उद्दिष्ठ.
१८९० पासून जेव्हा ही डबेवाल्यांची मुंबई भर यंत्रणा राबवायला सुरवात झाली तेव्हापासून त्यांनी प्रत्येक डब्यावर त्यांना समजेल अशा कोडींग व चिन्हांचा वापर करायला सुरुवात केली त्यामुळे कुठलाही डबा हरवला असा प्रश्नच आला नाही.१८९० साला पासुन या मंडळींनी एकदाही संप केला नाही व यांच्यापैकी एकाच्याही नावावर पोलिस केस किंवा तक्रार नाही.
एखादा कस्टमरने फक्त दहा महीने यांच्याकडुन सेवा घेतली तर फक्त दहा महिन्याचे डिलीव्हरी चार्जेस देतो व दोन महिने सुट्टी घेतल्याने त्या दोन महिन्याचे पैसे देत नाही. आपण आपल्या शाळेतल्या स्कुल बससाठी पुर्ण बारा महीन्याचे पैसे देतो हे लक्षात घ्या.
आपण म्हणाल हे सगळे कसे परवडते. कारण यांचे या मागे असते समर्पण (Dedication). ही मंडळी जे ह्या प्रकारचे कार्य करतात ते अस समजुन काम करतात की कस्टमर माझा परमेश्वर ( विठ्ठल) आहे. त्याला दररोजचे जेवण पोचवण्याचं काम म्हणजे एक प्रकारची विठ्ठल सेवा. ही सगळी मंडळी विठ्ठलभक्त वारकरी असतात .याची दखल ब्रिटिश राजपुत्र प्रिन्स चार्ल्स ने जेव्हा घेतली तेव्हा “मुबंईचा डबेवाला” हा धडा जगातल्या मोठमोठ्या मँनेजमेंटच्या इन्स्टिट्यूट मधे शिकविण्यास सुरवात झाली. ब्रिटिश राज घराण्यात जेव्हा कधी लग्न कार्य असते तेव्हा मुबंईचे तीन चार डबेवाले त्या कार्यक्रमात यजमानासाठी आवर्जून मराठ मोळी पैठणीचा आहेर घेऊन हजर असतात.आता महत्वाचा प्रश्न आपल्या डोक्यात मस्त लेझीम खेळत असेल तो म्हणजे यांचे मासिक वेतन किती. एवढे सगळ कौतुक केल्या वर मला सागांयला लाज वाटते. कारण त्यांचे वेतन रुपये पाच हजार फक्त
(माझीच दोन मुलं पण किती वेगळी निघावी?दैव तुझं, दुसरं काय ! बघायचं आता काय होईल ते. आपल्या हातात तरी दुसरं काय आहे.”) इथून पुढे —
त्यादिवशी सहज म्हणून शशांक प्राजक्ताच्या क्लिनिक मध्ये गेला. या सगळ्या भानगडीत तिच्या क्लिनिकचं काय झालं असेल हे तो विसरूनच गेला होता.
सहज कुतूहलाने आत गेला तर डॉ राही तिथे पूर्वीसारखीच काम करताना दिसली .शशांकला बघून ती गोंधळूनच गेली. “ ये ना शशांक,” तिने स्वतःला सावरून त्याचे स्वागत केले. दवाखान्यात पूर्वीसारखीच गर्दी होती आणि राही अगदी समर्थपणे सगळं संभाळत होती. ”.दोन मिनिटं हं शशांक.एवढं संपलं की मग मी फ्री होईन “ राही म्हणाली. हातातले काम संपवून राही म्हणाली,”आज इकडे कुठे येणं केलंस?”
“ राही,तुला वेळ असला तर आपण कुठेतरी कॉफी प्यायला जाऊया का? दवाखान्यात नको बोलायला.”
“हो चालेल की “ म्हणून राही तयार झाली.
एका चांगल्या हॉटेलमध्ये गेल्यावर शशांक म्हणाला, “राही, हे सगळं इतकं अनपेक्षित घडलंय की मी अजूनही त्यातून वर आलो नाही. मला एकच सांग,हे तुला माहीत होतं का?” राहीने हातांची अस्वस्थ हालचाल केली. “काय सांगू मी शशांक? प्राजक्ता काही दिवस खूप अस्वस्थ होती,.पण तिने मलाही हे काहीच सांगितलं नाही. पण अगदी जायच्या आधी म्हणाली ‘ राही,हा दवाखाना आता तूच संभाळ.मी इथे परत येणार नाही.’ खूप रडली ती आणि मग मला सगळं सांगितलं. म्हणाली, ‘ शशांक फार सज्जन आणि चांगलाच आहे. पण मला सलील जास्त कॉम्पीटंट वाटतो. कसं ग सांगू राही,पण माझं मन सलीलकडे जास्त ओढ घेतंय. हे चूक आहे हे समजतंय मला पण मी मनाला फसवून शशांकशी संसार नाही करू शकणार.’ .खूप रडली प्राजक्ता आणि म्हणाली ‘ मी सगळी माणसं दुखावली. सासर माहेरही तोडलं. पण माझा इलाज नाही.’ प्राजक्ता मग गेलीच घर सोडून आणि ती usa ला पोचल्याचा मेसेज आला मला. मलाही फार वाईट वाटलं शशांक. माझी इतकी जवळची मैत्रीण मला हे सगळं जायच्या आधी एक दिवस सांगते..“
शशांक स्तब्ध बसून हे ऐकत होता. ” राही, सोडून दे. नको वाईट वाटून घेऊ. हे विधिलिखित होतं असं समजूया आपण.” शशांक मग राहीला पोचवून घरी निघून गेला.
सलीलचे शशांकला मेसेज येत होते. ‘आम्ही छान आहोत, प्राजक्ता तिकडच्या परीक्षा देतेय, त्याशिवाय तिला इकडे जॉब मिळणार नाही’ असं लिहायचा तो. शशांकने कधी त्याला उत्तर नाही दिलं. हे म्हणजे जखमेवर आणखी मीठच नव्हतं का सलीलचं? शशांक आणखी आणखी शांत होत गेला आणि त्याने या गोष्टीकडे दुर्लक्षच करायचं ठरवलं. आयुष्य पुढे चाललं होतं आणि शशांकला मुली बघण्यात आता काहीही रस उरला नाही. आई कळवळून म्हणायची, “ अरे त्या नालायक भावासाठी तू का आयुष्य बरबाद करतोस शशांक?तू पुन्हा लग्न कर बाळा. झालं ते होऊन गेलं. ते दोघे तिकडे मजेत आहेत आणि तू का संन्याशाचं आयुष्य जगतोस ? कर छान मुलगी बघून लग्न आणि तूही हो सुखी ! “
त्या दिवशी ऑफिसमधून येताना त्याला राही दिसली. एका नव्या कोऱ्या कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसत होती ती. कुतूहलाने शशांक तिथेच थांबला आणि लांबून बघायला लागला पुढे काय होते ते. राही सीटवर बसली आणि सफाईदारपणे तिने कार सुरू केली आणि ती भुर्रर्रकन गेली सुद्धा. शशांकला अतिशय कौतुक वाटले राहीचे. ती पायाने थोडी अधू आहे आणि तिचा डावा पाय अशक्त आहे हे माहीत होते त्याला. मनोमन तिच्या जिद्दीचं कौतुक करत शशांक घरी आला. मुद्दाम, पण राहीला सहजच वाटेल असा तो तिच्या क्लिनिक वर गेला. ” वॉव राही,तुझी कार?कित्ती मस्त आहे ग! मला आण ना राईड मारून.” कौतुकाने शशांक म्हणाला. “ओह शुअर. थांब माझे पेशंट संपेपर्यंत.” राहीने मग काम संपल्यावर क्लिनिक बंद केलं आणि शशांकला म्हणाली “चला, बसा.”
ती ड्रायव्हिंग सीटवर बसली. शशांकने बघितलं की ही कार फुल्ली ऑटोमॅटिक आहे. तिला डाव्या पायाने ऑपरेट करण्याची गरजच नाहीये. मार्केटमध्ये अगदी नुकतीच आलेली ब्रँड न्यू नवीन टेक्नॉलॉजीची ही उत्कृष्ट कार घेतली होती राहीने. जणू काही ही आपल्या टू व्हीलर ऑटोमॅटिक ऍक्टिव्हा सारखीच झाली की नाही? शशांकने तिला गाडी एका रेस्टोरॉपाशी थांबवायला सांगितलं. राही हसत खाली उतरली.
” ओह,मी ट्रीट देऊ का तुला?डन,” असं म्हणत ती खाली उतरली. शशांक आणि राही हॉटेलात शिरले. एक छान जरा कोपऱ्यातले टेबल त्यांनी निवडले. ” राही,आता सांग. तुला अवघड वाटत नसेल तरच सांग हं. तुझ्या पायाला काय झालं होतं ग?रागावली नाहीस ना? “ “ नाही रे. त्यात काय रागवायचे?अरे मी लहान तीन वर्षाची असताना मला एक अपघात झाला. माझ्या डॅडींची नेहमी बदली होत असे. त्या खेड्यात माझ्या फ्रॅक्चर झालेल्या पायावर नीट उपचार झाले नाहीत. आणि मग ती कोवळी हाडे वेडीवाकडी कशीतरीच जुळली. मग मला डॅडी मुंबईला घेऊन आले, पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान होऊन गेलं होतं. तिथेही निष्णात सर्जनने माझी आणखी दोन ऑपरेशन्स केली म्हणून इतका तरी चांगला झाला पाय.पण मला तो वाकवता येत नाही आणि कमजोर राहिला तो.म्हणून मला थोडे लिम्पिंग आले. पण माझं काहीच अडू दिलं नाही मी त्यामुळे. पण मी त्यावर सहज प्रेशर देऊ शकत नाही. मग डॅडीनी मला ही स्पेशल , नवीन टेक्नॉलॉजीची नुकतीच लॉन्च झालेली जरा महागडी कार माझ्या वाढदिवसाला भेट म्हणून दिली.मी एकुलती एक लाडाची लेक आहे त्यांची.” राहीने हे अगदी हसत सहज सांगितलं. शशांकच्या डोळ्यात पाणी आलं. आत्ता हसत सांगतेय ही पण त्या लहान मुलीने हे कसं सोसलं असेल याची कल्पना येऊन त्याचे डोळे पाणावले. अपार प्रेम वाटलं त्याला तिच्याबद्दल. किती सुंदर.. सुशील आणि हुशार डेंटिस्ट होती राही. आपल्या कमीपणाचं भांडवल न करता किती पॉझिटिव्हली या मुलीनं आपलं करिअर घडवलं.
त्या दिवशी राहीने त्याला घरी सोडले.आणि सफाईदार वळण घेऊन ती घरी गेली सुद्धा. शशांक तिच्या घरी गेला. तिचे आई बाबा, राही सगळे घरात होते. शशांक म्हणाला,”काका काकू, तुम्हाला सगळं माहीत आहेच. माझा कोणताही दोष नसताना प्राजक्ता मला सोडून निघून गेली. आमचा रीतसर डिव्होर्स झाला आहे. मी अजून राहीलाही हे विचारलं नाहीये. तुमच्या समोरच विचारतो, ‘ राही, मी तुला पसंत असलो तर आणि तरच माझ्याशी लग्न करशील? मला फार आवडलीस तू. आणि तुझा पाय असा आहे म्हणून मी तुला विचारतो आहे असं समजू नकोस. या घटनेनंतरच मी तुला जास्त नीट ओळखायला लागलो राही. होतं ते बऱ्यासाठीच. कदाचित प्राजक्तापेक्षा उजवी मुलगी मला मिळावी असं देवाने ठरवलं असेल पण तुला हा असा लग्नाचा डाग लागलेला नवरा चालेल का? तुला माझं कोणतंही कम्पलशन नाही. विचार करून सांग सावकाश.’ “
काका काकू थक्क झाले. राही शशांकच्या जवळ येऊन बसली. “ अरे वेड्या,असं काय म्हणतोस? मी तुला काही आज ओळखत नाही. प्राजक्ता अशी वागली म्हणून मलाच जास्त दुःख झालं तुझ्यासाठी. तुला चालणार असेल तर करू आपण लग्न.. “ आणि पुढच्याच महिन्यात राही आणि शशांक विवाहबद्ध झाले.
शशांकच्या आईबाबांना तर अस्मान ठेंगणे झाले ही गुणी मुलगी बघून. राही शशांकचा संसार दृष्ट लागण्यासारखा चाललाय. छोट्या इराने त्यांच्या सुखात भरच घातली आहे.दोन्हीकडच्या आजीआजोबांना इराला संभाळताना आणि तिचे कौतुक करताना दिवस पुरत नाही. त्यांच्या घरात सलील प्राजक्ताचा विषयही कोणी काढत नाही. मध्यंतरी राहीला प्राजक्ताचे मेल येऊन गेले,पण राहीने तिला उत्तर द्यायचे नाही असेच ठरवले. त्या विषयावर शशांक, राही, आणि सगळ्यांनी कायमचा पडदा टाकला आहे..
मी मुख्याध्यापक झाल्यानंतर माझे ऑफिस दहाला सुरू होत असे. मी क्लार्क आणि सेवक यांचे काम दहा पासून सुरू होत असल्यामुळे आमचं लंच टाईम दुपारी दोन वाजता असे,
ज्यामुळे मुलींच्या मधल्या सुट्टीत मला त्यांच्याकडे लक्ष देणे सोयीचे जाईल. कारण त्यांची सुट्टी तीन वाजता होत असे. साधारणपणे डबा खाणा-या सगळ्या गटांमध्ये फिरून मुली डबा काय आणतात याचे मी निरीक्षण करत असे. बिस्किट, वेफर्स, चुरमुरे असे देणाऱ्या पालकांना मी पत्र देत असे किंवा बोलावून घेत असे आणि विद्यार्थिनींना पोळी भाजीचा डबा द्या असे आवर्जून सांगत असे. त्यांचे वाढीचे वय आहे तेव्हा त्यांना भरपूर आहार मिळाला पाहिजे.
या पद्धतीने मी वेगवेगळ्या गटात हिंडत असताना मग मुली आमचा एक घास घ्या ना बाई, आमचा एक घास घ्या ना, असा आग्रह करीत. त्याप्रमाणे जिच्या डब्यात अगदी साधं काही असायचं तो घास मी घेत असे.
सोलापुरात विशेषतः तेल-चटणी पोळी देण्याची पद्धत आहे. गरीब माणसांचे ते जेवण आहे. त्यामुळे बहुदा बऱ्याच वेळा मी तेल – चटणी पोळीवाला घास घेत असे.
हॉलच्या समोर एक मोठा गट बसलेला होता. पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांनी होत्या. आणि मी एका मुलीचा एक घास घेतला. तेव्हा मुलीने ओळखले ‘बाई तुम्ही तिची चटणी पोळी आहे म्हणून घेतलं ना, पण तिच्याजवळ अजून एक डबा आहे त्यात जिलबी आहे तो मात्र ती काही काढत नाही.
मी म्हणाले ‘चल असं कुठे असता कां ?’ती म्हणाली ‘बाई तिला विचारा तिच्या मांडीखाली एक डबा आहे. आणि ती मुलगी रडायला लागली.
इतक्यात बेल झाली आणि ऑफिसमध्ये मला फोन आला म्हणून बोलावणे आले. मी ऑफिसात गेले एस.एस.सी. बोर्डाचा फोन होता त्यामुळे मी त्या कामात गर्क होते.
मधली सुट्टी झाल्यामुळे मुली वर्गात गेल्या. सगळीकडे शांतता पसरली आणि एक मुलगी माझ्या ऑफिस बाहेर हमसून हमसून रडताना मला तिचा आवाज ऐकू आला.
मी कामात बिझी होते. मी दरवाज्या वरील माझे सेवक शिवा यांना हाक दिली. म्हणाले ‘शिवा काय चाललंय, कोण रडतंय.’
तेव्हा ते म्हणाले. ‘बाई एक मुलगी तुम्हाला भेटायचं म्हणते आणि खूप रडत आहे.’
‘ठीक आहे पाठवा.’ मग तीच ती मुलगी आत आली आणि माझा हात हातात घेऊन म्हणाली ‘बाई नाही हो मी तुम्हाला मुद्दाम जिलेबी दिली नाही असं नाही.
मला खरंच वाटायला लागलं. मी म्हणलं ‘काही हरकत नाही. तुला ती जिलबी खायची होती कां ?’ मी अगदी सहज म्हणाले आणि ‘अगं जे असेल डब्यात ना ते सगळ्यांनी वाटून खावं बाळा.’
त्यावर तिने जे उत्तर दिलं ते असं होतं.
ती म्हणाली ‘बाई माझी आई एके ठिकाणी घर कामाला जाते. त्यांच्या घरी आज काही कार्य होते. त्यांनी माझ्या आईला वाढून दिलेले जे ताट होते ते आई घरी घेऊन आली आणि तो दुसरा डबा तिने मला दीड वाजता आणून दिला त्यामध्ये जिलबी होती. पण त्याला भात लागलेला होता. त्यामुळे ते खरकट्या सारखं वाटत होतं. मला वाटलं न जाणं कोणाच्या पानातील असेल तर म्हणून मी ती जिलबी कोणालाच दिली नाही.’
आणि ती माझ्या कमरेला मिठी मारून अजूनच रडायला लागली. हे ऐकून माझे डोळे भरून आले. इतकेच काय आमचे सेवक शिवाजी कांबळे सुद्धा रडायला लागले. त्यांनी पटकन दार बंद करून पडदा सारखा केला.
मी खुर्चीवरून उठले. त्या मुलीला जवळ घेतलं आणि म्हणाले ‘बाळा या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण होय. तू खूप शिक आणि तुझ्या आईला सुखी कर. तुला शिक्षणाला जी कुठली मदत लागेल ती सेवा सदन शाळा, व्यक्तिशः मी कधीही करायला तयार आहोत. पण मन लावून अभ्यास कर आणि काही तरी बनण्याची जिद्द ठेव.’
नंतर तिची समजत घालून मी तिला पाठवून दिले. मला जाणवले की तिला लक्षात येत होते .. कुणीतरी वाढून दिलेलं ताटातलं अन्न आपण खातो आहोत. एवढ्या कोवळ्या जीवाला हे कळणं फार वाईट होतं. पण परिस्थिती पुढे इलाज नव्हता.
ही गोष्ट माझ्या मनात कुठेतरी खोल रुतून बसली. त्यानंतर सोलापूर आकाशवाणी वरती ‘गाणी मनातली’ या सदरामध्ये अनेक स्त्रियांच्या मुलाखती झाल्या. त्यामध्ये एखादं गाणं लावायचं आणि ते आपल्याला का आवडले त्याच्या मागची घटना, प्रसंग हे सांगणे… असा तो कार्यक्रम होता.
त्याचे प्रसारण रात्री दहा वाजता होत असे त्या कार्यक्रमां मध्ये पाच एक गाणी मी लावली आणि ती गाणी मला कां आवडली असे प्रसंग सांगितले. त्यामध्ये मी हा प्रसंग सांगितला आणि त्यानंतर ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है…’ हे गाणं लावण्याची मी विनंती केली.
त्या घटनेचा प्रभाव लोकांवर एवढा पडला की रात्री साडे अकरापर्यंत मला लोकांचे फोन येत होते- ‘किती मनाची पकड घेणारा प्रसंग आहे, आम्ही रडलो…’ असं लोक सांगत होते.
कार्यक्रम खूपच छान झाला होता.
त्यामध्ये साहित्यिक संपादक मा अरविंद जोशी सरांचा फोन आला. ते मला म्हणाले ‘तुम्ही शिक्षक असल्याचा मला आज हेवा वाटला.’
आणि हे वाक्य माझ्यासाठी त्या कार्यक्रमाची पावती ठरलं. त्यानंतर या प्रसंगावरती एखादी शॉर्ट फिल्म करावी असे माझ्या डोक्यात होते. सुमारे चौदा-पंधरा वर्षानंतर मी माझ्या एका शिक्षक मित्राला ही गोष्ट ऐकवली. त्यांनी त्याची पटकथा लिहून आणली. शिक्षणाचे महत्व पटवून देणारा एक प्रसंग त्याला जोडला आणि ‘जिलबी’ नावाचा लघु चित्रपट तयार झाला. त्यामध्ये डॉक्टर माननीय निशिगंधा ताई वाड यांनी मुख्याध्यापकाची भूमिका केली. विद्यार्थिनींच्या भूमिका इतर काही मुलींनी केल्या होत्या.
निशिगंधाताईंनी जेव्हा या चित्रपटाची पटकथा ऐकली तेव्हा त्यांचे ही डोळे भरून आले आणि तात्काळ त्यांनी या लघुपटात काम करण्यासाठी संमती दिली होती. या लघुपटाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर हा लघुपट अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये दाखल झाला. त्यात त्याला सहभाग मिळाला आणि त्याला बरीच पारितोषिके मिळाली.
त्यातल्या कथेला पारितोषिक मिळालं. मुख्याध्यापकाची भूमिका करण्याला निशिगंधाताईंना पारितोषिक मिळालं. विद्यार्थिनीची भूमिका करणाऱ्या मुलीला पारितोषिक मिळालं. दिग्दर्शकाला पारितोषिक मिळालं आणि फिल्मला पारितोषिक मिळालं. किमान पाच-सहा ठिकाणी या फिल्मला पारितोषिके प्राप्त झाली. याशिवाय बर्लिन येथील फिल्म फेस्टिवल मध्ये या लघुपटाची निवड झाली. मेलबर्न ला या फिल्मचे स्क्रीनिंग झाले. मुलांच्या भावविश्वातली वेगळी फिल्म म्हणून त्याला त्या ठिकाणी दाखवण्यात आले आणि सगळीकडेच या लघुपटला खूप गौरवण्यात आले. वृत्तपत्रांनी याच्यावरती भरभरून लिहिले.
अशा पद्धतीने एका छोट्या प्रसंगाचा हा एवढा मोठा चित्रपट उभा राहिला.
प्रसंग खूप घडत असतात. टिपणारा माणूस हवा. इतके खरे सेवा सदन शाळेच्या प्रांगणात घडणाऱ्या अशा अनेक घटनांनी वक्ता म्हणून माझी अनुभव समृद्धी वाढवली यात शंका नाही.
(माणसाने पूढील आयूष्यात कितीही श्रीमंती आली तरी आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवायचे असतात. परिस्थिती बदलते पण लहानपण सदैव आठवत रहातं.. अगदी जीवनाच्या अंतापर्यंत..)
☆ नारायण ठोसर ते समर्थ रामदास… भाग-२☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
(‘विश्वाची चिंता करायची म्हणजे काय करायचे असते हे समाजाला दाखवून द्यायचे होते आणि तसे करण्यासाठी हजारो तरुणांना तयार करायचे होते, तसेच त्यांची संघटना बांधून पुढेही अशी व्यवस्था चालू राहील याची रचना करायची होती.) – इथून पुढे —-
“शक्तीने मिळती राज्ये | युक्तीने येत्न होतसे |l शक्ती युक्ती जये ठाई | तेथे श्रीमंत धावती ||३०||”
अध्यात्म सार. – समर्थ रामदास
या उक्तीनुसार स्वतः शक्ती सामर्थ्य कमविणे गरजेचे वाटले म्हणून हा मुलगा आपल्या घरापासून कोसोमैल दूर असलेल्या टाकळीला गेला. टाकळीत पाय ठेवलेल्या दिवसापासून त्याच्या तपश्चर्येला सुरुवात झाली. ‘केल्याने होत आहे रे आधी या केलेची पाहिजे, नव्हे ! आपणच केले पाहिजे’ असे ठरवून त्याने स्वतः रोज सुमारे हजार सूर्यनमस्कार, नंतर सद्ग्रंथाचे वाचन, चिंतन, भिक्षेच्या निमित्ताने समाजमनाचे सूक्ष्म अवलोकन, असे विविध उपक्रम चालू केले.
साधारण बारा वर्षांनी साधनेचा अर्थात जीवीतकार्याच्या पूर्वतयारीचा एक टप्पा पूर्ण केल्यावर हा तरुण देशाटन करण्याकरिता टाकळीतून बाहेर पडला. अंदाजे चोवीस वर्षाचे वय. स्वयंप्रेरित होऊन स्वतःहून निवडलेला .. एका अर्थाने जगावेगळं संकल्प !!
“बहुत लोक मेळवावे| एक विचारे भरावे| कष्ट करोनी घसरावे| म्लेंच्छांवरी||१४||”
(श्रीसमर्थांचे संभाजी राजांना पत्र)
हा एकमेव उद्देश मनात ठेऊन संपूर्ण देशभर प्रवास केला. या मुलाने भारताच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून देश काल परिस्थितीचा अभ्यास केला आणि तो या अनुमानापर्यंत पोचला की आपल्याकडे भारतात कसलीच कमतरता नाही. कमतरता एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे असलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करुन, नीट योजना करून कार्य सिद्धीस नेणाऱ्या ‘योजकाची’. एका शब्दात सांगायचे तर संघटनेची आणि सक्षम, लोकोत्तर नेतृत्वाची. हिंदू मनुष्य पराक्रमात, सामर्थ्यात कुठेच कमी नव्हता. कमतरता एकाच गोष्टीत होती ती म्हणजे ‘मी जिंकू शकतो’ या वृत्तीची. आणि सर्वात महत्वाचा अभाव होता ‘राष्ट्रीय’ दृष्टिकोनाचा!! संघटनेच्या माध्यमातून समाज आपल्याला हवे ते सर्व करू शकतो हे सिद्ध करण्याची गरज होती. बारा वर्षांच्या देशाटनात श्रीसमर्थानी अशी हुकमी माणसे हेरून देशाच्या विविध भागात शेकडो मठ स्थापन केले. प्रत्येक मठात महंत नेमून मुख्य हनुमान भक्ती आणि बलोपासना ही कार्य सांगितलीच, पण सामान्य मनुष्यात स्वाभिमान जागृत करण्याचे महत्कार्य या तरुणांकरवी करायला सुरुवात केली.
“मुख्य हरिकथा निरुपण। दुसरे ते राजकारण।। तिसरे ते सावधपण। सर्वा विषई।।” ( दा.११.०५.०४)
त्या काळात दळणवळणाची अल्पस्वल्प साधने असताना देखील या सर्व मठातील संपर्क, सुसंवाद आणि सुसूत्रता उत्तम होती. याचा उपयोग छत्रपतींना ‘स्वराज्य’ संस्थापनेसाठी झाला हे सर्वज्ञात आहे. अलौकिक जीवनदृष्टीने कार्य करणाऱ्या आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या या तरुणास समाजाने उस्फूर्तपणे ‘समर्थ’ ही उपाधी बहाल केली. रोज हजार सूर्यनमस्कार घालणारा आणि प्रचलित पद्धतीने मठ स्थापन करुन राजाश्रयावर मठ न चालविणारा हा आगळा संत लोकांना आकर्षित करीत होता. तरुण पिढी हनुमान आणि बलोपासनेमुळे धष्टपुष्ट होत होती आणि संकुचित विचार सोडून समाजाचा म्हणजेच समष्टीचा विचार अंगी बाणवत होती.
छत्रपतींनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला हे खरेच. पण कोणीही एकटा मनुष्य राज्य तोपर्यंत निर्माण करू शकत नाही, जोपर्यंत तत्कालीन समाज ते मनापासून स्वीकारीत नाही. राज्य व्हावे ही श्रींची इच्छा !! ह्या उद्गारांना विशेष मूल्य नक्कीच आहे. पण हे वाक्य त्याकाळातील समाजातील प्रत्येक मनुष्याचे ‘ब्रीदवाक्य’ झाले होते, याचीही आपण दखल घेतली पाहिजे. जेव्हा समाज एका विशिष्ठ ध्येयाने प्रेरित होतो तेंव्हाच शिवाजी महाराजांसारखे असामान्य नेतृत्व आणि कर्तृत्व घडते. शिवाजी महाराजांचे भौगोलिक साम्राज्य आजच्या दोन-तीन जिल्ह्याइतके मर्यादित असले तरी भावनिकरित्या ते राज्य इथे राहणाऱ्या प्रत्येक मावळ्याचे होते. दिल्लीश्वराने स्वराज्य बुडविण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्याला त्यात कधीही यश मिळाले नाही. शेवटी त्याला स्वतःला दिल्ली सोडून महाराष्ट्रात यावे लागले आणि स्वतःला इथेच गाडून घ्यावे लागले तरीही स्वराज्य जिंकणे त्यास शक्य झाले नाही. ह्याला एकमेव कारण म्हणजे छत्रपतींच्या मागे असलेली समाजाची सात्विक शक्ती आणि विजिगीषू वृत्ती. ही वृत्ती प्रज्वलीत करण्याचे काम ह्या मठातून अखंड चालू राहिले.
त्या काळात युद्ध होतं होतीच, माणसे मरत होती, मारीत होती, जगत होती. फक्त कशासाठी जगायचे ? कशासाठी मरायचे ? कशासाठी मारायचे? हे सांगणार कोणी नव्हते. ते सांगण्याचे काम कोणी केले असेल तर त्या समर्थांनी. ह्यामुळेच जिवा महाला, बाजीप्रभू तानाजी, येसाजी मरायला तयार झाले. हे जेव्हा मरायला तयार झाले तेव्हा त्यांची पत्नी विधवा होणारच होती, त्यांच्या मुलांचे पितृछत्र हरपणारच होते. पण त्यांनी आपल्या कुटुंबापुरता संकुचित विचार न करता देशाचा, थोडक्यात कर्तव्याचा विचार केला आणि ही शिकवण समर्थांमुळेच शक्य झाली.
आपण संकल्पित केलेलं कार्य ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते. श्रीसमर्थ रामदास स्वामी या बाबतीत भाग्यवान ठरले. श्रीसमर्थांच्या चरित्राचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की श्रीसमर्थ कर्मयोगी होते. शके १७५२ (इसवीसन 1674) ला शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. हिंदूना सार्वभौम राजा मिळाला. सुमारे सातशे वर्षांची गुलामी नष्ट झाली. ही फक्त राजकीय गुलामी नव्हती तर सांस्कृतिक गुलामी देखील होती. छत्रपतींनी ही गुलामी झिडकारून टाकली आणि नवी हिंदू राज्यव्यवस्था निर्माण केली. अनेक बाटलेल्या हिंदूंना त्यांनी नवीन विधिविधान निर्माण करुन शुद्धीकरण करुन स्वधर्मात घेतले. छत्रपतींनी समर्थाना आपले गुरु मानले होते. सद्गुरुंची सेवा घडावी म्हणून शिवाजी महाराजांनी आपले सर्व राज्य समर्थांच्या झोळीत टाकले आणि समर्थानी निःस्पृहपणे ते परत देऊन टाकले. त्याकाळात आणि आजही असा संत महात्मा बघायला मिळणे अति दुर्मिळ! अशा या समर्थांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर ‘आनंदवनभुवनी’ हे काव्य लिहिले.
“उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करायला।”
एका सामान्य कुटुंबातील मुलगा मनाशी संकल्प करून प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्वतःच्या बुद्धिकौशल्याचा उपयोग करून, रामावर प्रचंड श्रद्धा ठेवून सामान्य मनुष्यातील सात्विक शक्तीचे जागरण करून हिंदू सिंहासन निर्माण करु शकतो. हे मराठवाड्यातील जांब गावच्या ठोसरांच्या नारायणाने सिध्द करून दाखविले. फक्त त्यासाठी त्याला ‘नारायणा’चे ‘रामदास’ व्हावे लागले. ‘नारायण ठोसर ते समर्थ रामदास’ हा प्रवास विलक्षण आहे, तो मुळातून अभ्यासायला हवा, खास करून तरूणांनी! आजची समाजाची परिस्थिती फार वेगळी आहे असे नाही. ‘संघशक्ती कलींयुगे’ हेच खरे.
दासनवमी म्हणजे श्रीसमर्थांचा निर्वाणदिन. संत सूक्ष्मातून जास्त कार्य करतात असे म्हटले जाते. धर्मजागृती चे त्यांचे कार्य चालू असेलच, त्याला आपला हातभार कसा लागेल याचा विचार आपण सर्वांनी करावा असे +नम्रपणे सुचवावेसे वाटते. बलोपासना आणि सगुणभक्ती या दोन गोष्टी सर्वांनी कराव्यात असा त्याचा प्रयत्न असे. प्रयत्न, विवेक आणि वैराग्य अशी त्यांची त्रिसूत्री होती. आजच्या पावनदिनी आपण सर्वांनी त्यांच्या चरित्राचे चिंतन करावे, रामनाम स्मरण करावे आणि राष्ट्रीय विचारसरणीने कार्य करणाऱ्या एखाद्या संघटनेत सक्रीय सहभागी व्हावे. *’समर्थ’ होण्याचा प्रयत्न जरूर करावा पण त्यासाठी आधी ‘दास’ होऊन दाखवावे. आपण प्रयत्न करू.
☆ “डिफॉल्ट मोड म्हणजे काय ?” – लेखक : डॉ. यश वेलणकर ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆
तुम्ही तुमच्या बोक्याला, कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह, हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा त्रास होतो आहे, असे पाहिले आहे का?
तशी शक्यता खूप कमी आहे. माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत. त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठरावीक भाग सतत काम करीत असतो. माणूस शांत बसलेला असतानादेखील हा भाग शांत होत नाही. हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात. त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि आपल्याला वरील सर्व आजार होतात.
आपण शांत बसलेले असतानादेखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो, त्याला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’असे नाव दिले आहे.
कॉम्प्युटर सुरू केला, की याच मोडमध्ये तो सुरू होतो. माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामध्येही ठरावीक भाग असा असतो, जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरू करतो.
डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. मार्कस राय्चल यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रिय असतो; पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला की, या भागातील सक्रियता कमी होते, असे त्यांनीच दाखवून दिले.
आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो, त्यावेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी ही साखळी चालू राहते, शरीर स्थिर असले तरी मन इतस्तत: भटकत असते.
आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत ऊर्जा वापरली जात असते. विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे महत्त्वाचे काम आहे; पण ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो, कंटाळतो, नैराश्याचा शिकार होतो.
मेंदूतील या भागाला विश्रांती कधी मिळते, माहीत आहे?
माणूस एखादी शरीर कृती लक्ष देऊन करू लागतो किंवा तो शरीराने काम करीत नसला तरी माइंडफुल असतो, सजग असतो त्यावेळी मात्र हा भाग शांत होतो आणि टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क (टीपीएन)सक्रिय होते. श्रमजीवी माणसात ज्यावेळी त्यांचे त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष असते. त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडी विश्रांती मिळते.
कुंभार त्याचे मडके तयार करीत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील हा मोड बदलला जात असतो. कारण मडके करण्याच्या कृतीवर त्याला एकाग्र व्हावे लागते.
बुद्धिजीवी माणसात मात्र असे होत नाही. शिकवताना, हिशेब करीत असताना किंवा कॉम्प्युटरवर काम करीत असताना मेंदूत विचार असतातच. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटत असता, त्यावेळी मेंदूतील विचार चालूच राहतात आणि डिफॉल्ट मोड काम करीतच राहतो. मग त्याला विश्रांती कशी मिळेल?
सजगतेने आपण ज्यावेळी श्वासामुळे होणारी छाती किंवा पोटाची हालचाल जाणतो किंवा त्याक्षणी येणाऱ्या बाह्य आवाजावर लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी डिफॉल्ट मोड शांत होतो. माणूस श्वासाचा स्पर्श जाणू लागतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क काम करू लागते.
आपल्या मेंदूच्या लॅटरल प्रीफ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता, त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते, त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते.
विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे वैशिष्ट्य आहे; पण सतत येणारे विचार मेंदूला थकवतात. तो थकवा दूर करण्यासाठी काही काळ हा ‘डिफॉल्ट मोड’ बदलणे आवश्यक आहे.
त्यासाठीचा एक साधा उपाय हे करून पहा:
शांत बसा. एक हात छातीवर, दुसरा पोटावर ठेवा. तुम्ही काहीही करीत नसलात तरी तुमचे शरीर श्वासोच्छ्वास करते आहे. त्यामुळे छाती किंवा पोट हलते आहे. तुमचे सर्व लक्ष तुमच्या हातांवर ठेवा आणि नैसर्गिक श्वासामुळे छाती अधिक हलते आहे की पोट हे जाणा.
ज्यावेळी ही हालचाल समजते, त्यावेळी तुमच्या मेंदूतील डिफॉल्ट मोड शांत झालेला असतो, त्याला विश्रांती मिळत असते. जो श्वास तुम्हाला समजतो, तो चांगला श्वास, गुड ब्रेथ.
असा गुड ब्रेथ मेंदूला ताजेतवाने करतो. दिवसभरात किमान तीन-चार वेळा श्वासाची हालचाल जाणायची असे ठरवता येईल?
अर्धा मिनिट, एक मिनिट, पाच – दहा श्वास, त्यावर लक्ष केंद्रित केलेत, की मेंदूतील डिफॉल्ट मोडला विश्रांती मिळून तुम्ही ताजेतवाने व्हाल. किती साधा आणि सोपा उपाय आहे!
फक्त त्याची आठवण होणे थोडेसे अवघड आहे. दर दोन तासांनी काही सजग श्वास घ्यायचे असा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करून पहा…
लेखक :डॉ. यश वेलणकर
प्रस्तुती :श्रीमती राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “विटामिन जिंदगी…” – लेखक : श्री ललितकुमार ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये तगारे ☆
पुस्तक – विटामिन जिंदगी
लेखक – श्री ललितकुमार
परिचय : डॉ. मुग्धा सिधये तगारे
आयुष्याला खुराक पुरवणाऱ्या, निराशावादी माणसाच्या डोळ्यात सणसणीत अंजन घालणारं हे पुस्तक… 47 वर्षाच्या एका (पोलिओग्रस्त) दिव्यांगाच्या आयुष्याची ही कहाणी आहे. लेखकाने अगदी बालपणापासून आपल्या आयुष्याचा पट इथे उलगडून दाखवला आहे. दिल्लीमधे सुतारकाम, मूर्तीकाम करणाऱ्यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. चौथ्या वर्षापर्यंत इतरांसारखाच तो सामान्य धडधाकट मुलगा होता. त्यानंतर एक दिवस खूप ताप आला… बरेच दिवस राहिला आणि पोलिओच्या विषाणूचं शरीरावर आक्रमण झालं. लेखक म्हणतो,” पुढच्या दुःख व कष्टांसाठी नियतीनं “माझी” निवड केली आणि जणु आणखी कोणाला वाचवलं.” संपूर्ण पुस्तकामधे लेखकाने आपली संघर्षयात्रा विस्तृतपणे उलगडून तर दाखवली आहे पण कुठेही रडगाण्याचा सूर नाही! शरीर विकलांग असलं तरी मनं अत्यंत सुदृढ आहे. लहानपणापासूनच खरं तर सगळ्याच बाबी त्यांच्या विरोधात होत्या. घरी शिक्षणाची फारशी पार्श्वभूमी नाही (वडिल ११ वी शिकलेले) आर्थिक स्तर निम्न मध्यमवर्गीय, घराजवळ, शाळेत फारसे कोणी मित्र नाहीत…. तरीही त्यांच्याकडे असणाऱ्या + ve गोष्टींच्या जोरावर ते आयुष्यात एक एक पाऊल पुढे टाकत गेले.
सुरुवातीपासूनच एकत्र कुटुंबातील आजी-आजोबा, आई-वडिल काका-काकू, बहिण भाऊ हे सारे ललितच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. बालपणी ४ वर्षांचा असताना अचानक पाय लुळे पडून उभं राहता येते नाही हा धक्का त्यांच्यासाठी मोठा होता. काहीही करून त्याला उभं करायचं या जिद्दीने त्याच्या घरच्यांनी वैदू, वैदय, डॉक्टर, जो कोणी जे काही सांगेल ते सर्व उपाय केले. सतत मालिश, पहाटे उठून गरम पाण्यात पाय बुडवून बसणे, नाही नाही ती चूर्ण, गोळ्या सतत खाणे काढे पिणे ह्या गोष्टी ४-५ वर्षाच्या मुलाच्या वयाला अतीच होत्या. पण लेखकाने बालपण कोमेजून गेलं असं न म्हणता घरच्यांचे प्रामाणिक प्रयत्न, जिद्द, कष्ट त्यांनी अधोरेखित केली.
शाळा कॉलेजमथले त्यांचे अनुभव वाचून समाज म्हणून आपण किती अससंस्कृत आहोत याचा सज्जड पुरावाच मिळतो. शाळेमधली मुलं त्याच्या कुबड्या हिसकावून घ्यायचे, चेष्टा करायचे पण शिक्षकही त्याच्यासमोरच त्याची कीव करायचे. एवढच की ११-१२ च्या वर्गातले शिक्षक, प्रयोगशाळा मदतनीसही त्याला काहीही मदत करायचे नाहीत. केवळ एका मित्राच्या मदतीमुळे मी रसायनशास्त्राचे प्रयोग करू शकलो असं लेखक म्हणतो. टोकाचा स्वाभिमानी, असलेल्या ललितला दुसर्याकडून कीव, दया, उपेक्षा मिळाली की चीड यायची. वाईट वाटायचं. आपल्याला इतरांसारखेच समानतेने वागणूक मिळावी एवढीच त्यांची इच्छा असायची. ती इच्छा फक्त परदेशी शिक्षणाच्या वेळी ‘स्काॅटलंड’ इथे पूर्ण झाली. होती. पण त्याची पायाभरणी फार पूर्वी शाळेतच झाली होती.
इतर दिव्यांगांपेक्षा ललित एवढा वेगळा आहे की त्याने आयुष्यात असाधारण गोष्टी केल्या. प्रत्येक वेळी सुरक्षित कोषातून तो बाहेर पडला व पुढे गेला. याचं कारण म्हणजे जिद्द व आत्मसन्मान. १२ वी मधे वर्गात त्याला सर्वात जास्त मार्क मिळाले. सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी (best outgoing) म्हणून मंचावरून नाव घोषीत झाले तेव्हा खरं तर त्याला खूप आनंद झाला होता. पण जेव्हा मागच्या ओळीत बसलेला मुलगा तो अपंग आहे ना.. असं म्हणाला तेव्हा क्षणार्थात तो आनंद झाकोळला गेला. तेव्हा मनाशी ठरवले की, मी कधीही अपंग कोट्यातून कुठेही प्रवेश घेणार नाही. इथेच त्याचा ‘वेगळा’ ते ‘विशेष’ हा प्रवास सुरु झाला. पण त्याआधी शाळेच्या पायऱ्या चढण्यासाठी, कुबड्या घेऊन बसमधे चढण्यासाठी, 4-4 km. चालण्यासाठी त्याला अविरत शारीरीक कष्ट कसे घ्यावे लागले ते वाचून अंगावर काटा येतो.
BSC करता करताच माहिती काढून (इ.स. २००० चा सुमार) नवीनच सुरु झालेले जीएनआयटीचे काँप्युटरचे कोर्सेस त्यांनी केले. तिथच उत्तम मार्क मिळवून आधीच्या वर्गातल्या मुलाना शिकवले. शिक्षणाला, ज्ञानाला कसा मान मिळतो याचा प्रथम अनुभव त्यांना तिथे आला. त्यानंतर त्यानी संयुक्त राष्ट्रसंघाच्या दिल्ली कार्यालयात काम करायला सुरुवात केली. बरचसं स्वयंसेवी पद्धतीचं हे काम होत. त्यातून पैसे कमी मिळाले तरी प्रचंड अनुभव गाठीशी आला. त्यातच पुढे त्या ऑफिसमधे कायम नोकरी मिळाली. तरी त्याचा राजीनामा देऊन त्यांनी परदेशात शिक्षणासाठी अर्ज केले. व संपूर्ण शिष्यवृत्तीसह स्कॉटलंडला बायोइनफोरमॅटिक्स मधे दीडवर्ष एकट्याने राहून डिग्री घेतली. पुढे भारतात परतल्यावर अपंगांसाठी online forum स्थापन, केला व भारतभरच्या दिव्यांगांशी ते जोडले गेले – computory ज्ञान वापरुन त्यांनी भारतीय काव्य एकत्र आणून विकीपिडियावर काव्यकोषाची निर्मिती केली. कॅनडामधे शिष्यवृत्ती मिळवून PHD साठीही ते गेले पण शरीर अजिबातच साथ देईना. त्यामुळे परत फिरावं लागलं तरी घरी राहून ते १०-१० तास, काम करतात. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष व्यक्तीचा रोल मॉडेल हा पुरस्कार मिळाला आहे.
आयुष्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल लेखक म्हणतो दुःख आणि असफलता हे जीवनाच्या इंजिनासाठी इंधन म्हणून उत्तम काम करतं. दुःखात जगणं व दुःखाबरोबर जगणं हया दोन्हीमधे खूप फरक आहे. खरंच किती समर्पक आहेत या ओळी ! म्हणूनच अत्यंत प्रेरणादायी असे हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे.
परीक्षण : डाॅ. मुग्धा सिधये – तगारे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈