(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं होली पर्व पर विशेष “भावना के दोहे ”। )
(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत हैं एक भावप्रवण रचना “साधौ हरि से हो गई प्रीत…”। आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २५ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
केशव रंगनाथ शिरवाडकर
केशव रंगनाथ शिरवाडकर(1926 – 25 मार्च 2018) हे साहित्य समीक्षक व वैचारिक लेखक होते.
ते वि. वा. शिरवाडकरांचे धाकटे बंधू.
केशव रं. शिरवाडकर हे तत्त्वज्ञान विषयातले भारतीय शिक्षण क्षेत्रातील प्रख्यात नाव होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात व नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी भाषा विषयात अध्यापन केले. त्यांनी ग्रामीण भागातही शिक्षणप्रसार केला. नांदेड येथे पीपल्स कॉलेज उभारण्यात त्यांचे मोठे योगदान होते. तेथे ते इंग्रजीचे अध्यापन करीत. पुढे ते तिथे प्राचार्य झाले.
पुस्तके :
आपले विचारविश्व (तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ)
तो प्रवास सुंदर होता :कुसुमाग्रज, वि. वा. शिरवाडकर -जीवन आणि साहित्य (चरित्रग्रंथ)
मर्ढेकरांची कविता :सांस्कृतिक समीक्षा.
सार गीतारहस्याचे
विल्यम शेक्सपिअर – जीवन आणि साहित्य.
संस्कृती, समाज आणि साहित्य
रंगविश्वातील रसयात्रा
साहित्यातील विचारधारा
मराठी साहित्य परिषदेने भरवलेल्या पहिल्या साहित्य समीक्षकांच्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (29-30 नोव्हेंबर 2012)
महाराष्ट्र सरकारकडून तत्त्वज्ञान व मानसशास्त्रावरील पुस्तकासाठीचा ना. गो. नांदापूरकर पुरस्कार त्यांच्या ‘संस्कृती, समाज आणि साहित्य’ या पुस्तकाला मिळाला.
☆☆☆☆☆
यशवंत नारायण ऊर्फ अप्पा टिपणीस
यशवंत नारायण ऊर्फ अप्पा टिपणीस (3डिसेंबर 1876 – 25 मार्च 1943) हे मराठी नाट्यनिर्माते, नाट्यलेखक, अभिनेते वेषभूषाकार होते.
त्यांनी रंगमंचावरील पात्रांच्या रंगभूषा, केशभूषा, वेशभूषा जास्तीत जास्त वास्तव बनवण्याचा प्रयत्न केला.
1904मध्ये टिपणीसांनी महाराष्ट्र नाटक कंपनीची स्थापना केली.’कांचनगडची मोहना ‘, (यात ते नायक होते), ‘कमला’, ‘सं. प्रेमसंन्यास ‘ ही नाटके त्यांनी सादर केली.
नंतर त्यांनी ‘भारत नाट्य मंडळी’काढून ‘मत्स्यगंधा’ नाटक केले. त्याचे लेखन, दिग्दर्शन त्यांनीच केले होते व त्यात भीष्माची भूमिकाही केली होती.नंतर त्यांनी ‘आर्यावर्त नाटक कंपनी’सुरू केली. त्यांनी ‘चंद्रग्रहण’ हे शिवाजीच्या जीवनावरचे नाटक लिहून सादर केले.या नाटकाद्वारे प्रथमच ऐतिहासिक स्वरूपातला शिवाजीचा जिरेटोप रंगमंचावर आणण्याचे श्रेय टिपणीसांना जाते.
ललितकला नाटक कंपनीतील ‘शहा शिवाजी ‘या नाटकातील काही पदे टिपणीसांनी रचली होती. या नाटकासाठी त्यांनी पुण्यातील बाबासाहेब घोरपडे यांच्याकडील ऐतिहासिक पुस्तकांचा संग्रह वाचून काढला आणि स्वतःच्या देखरेखीखाली अंगरखे, पगड्या शिवून घेतल्या. पुढे कित्येक वर्षे त्या नाटकांत व चित्रपटांत वापरल्या जात असत.
टिपणीसांनी एकूण 15 नाटके लिहिली.20 नाटकांत त्यांनी अभिनय केला.
पुणे येथे 1921 साली भरलेल्या सतराव्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
☆☆☆☆☆
मधुकर बाबूराव केचे
मधुकर बाबूराव केचे (18 जानेवारी 1932 – 25मार्च 1993) हे कवी, ललित निबंधकार होते.
एम. ए. करून ते मराठीचे प्राध्यापक झाले.
त्यांच्या कवितेत आधुनिक मानवाची निराशा, ईश्वराविषयी शंकाकुलता, ऐहिक प्रेरणांशी चाललेला संघर्ष या गोष्टी अधोरेखित होतात.
पुस्तके : ‘पालखीच्या संगे ‘, ‘आखर आंगण ‘, ‘एक भटकंती’, ‘एक घोडचूक’, ‘वंदे वंदनम’ हे ललित निबंध संग्रह.
‘पुनवेचा थेंब’, ‘आसवांचा ठेवा’, ‘दिंडी गेली पुढे’ हे कवितासंग्रह.
‘चेहरेमोहरे’, ‘वेगळे कुटुंब’ हे व्यक्तिचित्रसंग्रह.
‘झोपलेले गाव’, ‘माझी काही गावं’ ही प्रवासवर्णने.
‘मोती ज्याच्या पोटी’ ही कादंबरी.
मधुकर केचेंच्या तीन कवितासंग्रहांना महाराष्ट्र सरकारची लागोपाठ बक्षिसे मिळाली.
☆☆☆☆☆
केशव रंगनाथ शिरवाडकर, यशवंत नारायण टिपणीस व मधुकर बाबूराव केचे यांना त्यांच्या स्मृतिदिनी सादर प्रणाम.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, मधुकर केचे : वि. ग. जोशी, महाराष्ट्र नायक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘कोकीळ कुहू कुहू बोले’ गाण्याचे बोल रेडिओवरून कानावर पडताच वसंत ऋतुची चाहूल मनाला लागली! फाल्गुनातील रंगपंचमीचा रंग उधळत होळीच्या सणाची सांगता होते आणि वेध लागतात ते वसंताचे! सूर्याच्या दाहक किरणांनी सृष्टी पोळली जात असतानाच वसंताचे होणारे आगमन नकळत सृष्टीतील नव्या बदलाची जाणीव करून देते. संध्याकाळी येणारी थंड वाऱ्याची झुळूक वसंताचा निरोप आपल्याला देते! सुकलेल्या झाडांना पालवी येण्याचे दिवस जवळ येतात. पिवळी, करड्या रंगाची, वाळलेली पाने जमिनीवर उतरतात.जणू ती आपल्या आसनावरून- जागेवरून- पायउतार होतात आणि नव्याला जागा करून देतात.कॅशिया, गुलमोहरा सारखी रंगांचे सौंदर्य दाखवणारी झाडे आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर केशरी, जांभळे पिसारे फुलवून उभी असतात. त्याच वेळी आंब्याचा मोहर आपला सुगंध पसरवीत असतो!
आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक ऋतुचे स्वागत आपण सणाने करतो. वसंत ऋतु येतो तेव्हा चैत्रगौरीचा उत्सव सुरू होतो.
पूर्वी अंगणात चैत्रांगण घातले जाई.या चैत्रांगणातून चंद्र, सूर्य, गाई, झोका, कैरी … अशा विविध प्रतीकांची रांगोळी काढली जाई. निसर्गाप्रती कृतज्ञता दाखवण्याचा हा उत्सव असतो. चैत्री पाडव्या नंतर येणाऱ्या पहिल्या तीजेला चैत्र गौरीची
स्थापना करतात. देवीचा उत्सव म्हणून तिला पानाफुलांची सजावट करून झोक्यावर बसवतात. रुचकर कैरीची डाळ, कैरीचं पन्हं आणि खरबूज, कलिंगडासारखी थंड फळे देवीसमोर ठेवली जातात. या सर्व गोष्टींचा एकत्रित आनंद घेता यावा म्हणून चैत्रागौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीये पर्यंत हा सण साजरा केला जातो. हळदीकुंकू सारख्या समारंभात सुगंधित गुलाब पाणी शिंपडून, अत्तर, गुलाब देऊन सुवासिनी वसंताचे स्वागत करतात.
काही ठिकाणी ‘वसंत व्याख्यानमाला’चे कार्यक्रम चालू असतात. अशा व्याख्यानमालां मुळे लोकांना नवीन ज्ञान आणि मनोरंजन मिळत असते. याच काळात गायनाचे कार्यक्रम होत राहतात. कोणत्याही ऋतूत, सण साजरे
करून माणूस आनंद शोधत असतो. आणि त्यानिमित्ताने निसर्गाची जवळीक साधली जाते!
पंजाब, उत्तर प्रदेश यासारख्या भागात या दिवसात कलिंगड, खरबुजे यासारखी फळे ही थंड म्हणून खाल्ली जातात.फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी अधिक चांगले असते. त्यात वाळा, मोगरा टाकला की पाण्याला एक प्रकारचा सुगंधही येतो.
आपल्या महाराष्ट्रात कोकम, लिंबू, कैरी,वाळा,खस यांची सरबते थंडाव्यासाठी आपण वापरतो. निसर्गाने दिलेले नैसर्गिक पदार्थ या उन्हाळ्याच्या काळात वापरणे हे शरीराला हितकर असते. पुढे येणाऱ्या वर्षा ऋतूत कोणतेही त्रास होऊ नयेत म्हणून शरीराला सज्ज ठेवण्याचे काम नैसर्गिक विटामिन ‘सी’ घेण्यामुळे होत असते!
वसंत ऋतुची खासियत यातच आहे की, हा ऋतू नवीन सृजनाची सुरुवात करून देतो. वसंतोत्सवामुळे नवचैतन्य दिसते. शिशिर आणि हेमंत ऋतूत थंड, निद्रिस्त झालेले वातावरण वसंत ऋतूच्या आगमनाने चैतन्यमय बनते आणि तोच निसर्गाचा खरा ‘वसंतोत्सव’ असतो !
(पूर्वसूत्र- बेल वाजवली तेव्हा बरीच वाट पाहिल्यानंतर दार उघडलं गेलं. दारात आजोबा नव्हते. आजी होत्या. त्या हसून ‘या’ म्हणाल्या. पण ते नेहमीचे आनंदी,प्रसन्न हसू आज मात्र थोडे थकल्यासारखे वाटत होते.)
“हे काय?आजोबा नाहीयेत?”
“आहेत ना. हे काय. अहोs, बघितलं का हो कोण आलंय?”
आजोबा नवीन दिवाणावर मांडी घालून एकाग्रतेने जप करीत बसले होते. चेहरा शांत. हसतमुख. नवीन फर्निचरमुळे त्या हाॅलचं सगळं रुपच आकर्षक अशी नवी झळाळी आल्यासारखं बदलून गेलं होतं. आजोबांनी अलगद डोळे उघडले. माझ्याकडे पाहून समाधानाने हसले.
“अरे. . तुम्ही? कसे आहात?”
“मजेत. आजोबा, फर्निचर खरंच खूप छान झालंय”
आजोबांनी हसर्या चेहर्याने मान डोलावली.
“बसा. चहा करते.” म्हणत आजी उठू लागल्या. उठताना त्यांना होणारा त्रास आणि वेदना मला पहावेनात.
“आजी,मी चहाला पुन्हा येईन. नक्की येईन पण आता नको. तुम्हाला आधीच बरं नाहीये असं दिसतंय. थकलहात तुम्ही.” मी अतिशय आपुलकीने म्हणालो.
आजी अगतिकपणे आजोबांकडे पहात राहिल्या. आजींचे डोळे भरून आले.
“आजी, काय झालंय? तब्येत बरी आहे ना तुमची?”
” माझ्या तब्येतीचं काय हो? पण यांची काय दशा झालीय पाहिलंत का?”
“असं का म्हणताय? काय झालंय आजोबांना?”
आजोबा एवढंसं हसले. आजी मात्र मनात साठून राहिलेलं सगळं आवेगाने सांगू लागल्या. ऐकून मी हादरलोच. सगळं ऐकताना अंगावर शहाराच आला एकदम. आजोबांनी चटके देणारं हे दुःख कसं सहन केलं असेल या कल्पनेनेच मी कासावीस झालो. ‘इतकं होऊनही स्थितप्रज्ञासारखे इतके शांत राहूच कसे शकतात हे?’ मला प्रश्न पडला.
ती सकाळ उजाडली होती तीच मुळी एखाद्या काळरात्रीसारखी. सकाळची आठ-साडेआठ वेळ असेल. आजोबा पूजा करीत बसले होते. जेमतेम दहा बाय दहाच्या त्या किचनमधल्या नव्या फर्निचरबरोबरच आवर्जून करून घेतलेल्या त्या छोट्याशा सुबक देवघरातल्या देवांची ती पहिलीच पूजा होती ! कारण आदल्या संध्याकाळीच फर्निचरचं काम पूर्ण झालेलं होतं. दिवाणाच्या मापाच्या ऑर्डर दिलेल्या नव्या गाद्या,उशा,बेड-कव्हर्स सगळं घेऊन त्याच वेळी नेमकी डिलिव्हरीला माणसं आली म्हणून आजी त्यांच्या उस्तवारीत. तोवर पूजा आवरत आली होती. ती माणसं गाद्या उशा वगैरे ठेवून निघून जाताच आजी आत आल्या. तेव्हाच नेमके लाईट गेले. किचन मधली कामं करायला स्पष्ट कांही दिसेना तसं प्रकाश यावा म्हणून किचनमधली छोटी खिडकी आजीनी उघडली. पण बाहेर आभाळ भरून आल्यामुळे प्रकाश जेमतेमच आत आला. त्याबरोबर घोंगावणार्या वाऱ्याचे झोत मात्र आक्रमण केल्यासारखे आत घुसले. आजोबांनी चाचपडत काडेपेटी उचलली. निरांजन लावायला काडी ओढल्याचं निमित्त झालं आणि स्वयंपाकघरात आगीचे लोळ उठले. वाऱ्याच्या झोताबरोबर ते देवघराच्या दिशेने झेपावले. आजोबा पाठमोरे बसलेले. सकाळच्या गडबडीत बदललेला गॅस सिलेंडर लिक होता. भडकलेल्या ज्वाळांनी आजोबांची उघडी पाठ भरताच्या वांग्यासारखी भाजून काढली. आजोबा आक्रोश करु लागले. आजी भांबावून रडू लागल्या. आजोबांचा आक्रोश,आजींचं रडणं आणि दार ठोठावणाऱ्या शेजाऱ्यांचा आवाज या गदारोळात एखादंच मिनिट गेलं असेल. आजी भानावर आल्या न् रडत रडत दार उघडायला बाहेर धावल्या. दार उघडताच शेजारी आत घुसले. गॅसचा वास जाणवताच परिस्थितीचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं. एकाने गॅसशेगडीची बटणं बंद आहेत ना याची खात्री करुन घेतली. आणि रेग्युलेटर काढून बाजूला ठेवला. दुसऱ्याने तत्परतेने हाताला लागेल ते रग,कांबळं,सतरंज्या घेऊन आजोबांना पांघरेस्तोवर आजोबा अर्धमेल्या अवस्थेला पोचले होते. मग तातडीने मुला-सूनांना फोन, हॉस्पिटलायझेशन, तेथून कालच मिळालेला डिस्चार्ज आणि आजपासून हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेलं सर्वांचं रुटीन !
ऐकता ऐकता तो प्रसंग स्वतःच अनुभवत असल्यासारखा मी शहारलो होतो. अपार करुणेने मी आजोबांकडे पाहिले. ते नेहमीसारखेच शांत आणि हसतमुख ! या माणसाच्या स्थितप्रज्ञतेपर्यंत आगीच्या त्या झळा पोचल्याच नव्हत्या जशा काही. . . !!
“खूप भाजलंय ना?” आजोबांजवळ बसून त्यांचा हात हातात घेत मी कळवळून विचारलं. आजोबांनी होकारार्थी मान हलवली.
“पहायचंय?”
मी मानेनेच नको म्हटल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नसावं बहुतेक. कारण त्यांनी दोन्ही खांद्यांवर घेतलेल्या धोतराच्या एकेरी तलम वस्त्राची टोकं अलगद दूर करीत दुसऱ्या हातानं पाठीवरचे ते मऊसूत वस्त्राचे आवरण अलगद बाजूला केले. पाठभर पसरलेल्या त्या तांबूस ओल्या जखमा मला पहावेचनात. नजरेला चटका बसावा तशी मी नजर फिरवली.
“कसं सहन केलंत हो सगळं?” आजोबांची नजर शून्यात हरवली.
“परमेश्वराने दिलेली शिक्षाच होती ती. सोसायचं बळही त्यानेच दिलं.”
“शिक्षा? तुम्हाला? कशाबद्दल?” मला कांही समजेचना. त्यांची नजर मात्र स्वतःच्याच मनाचा तळ शोधत चाचपडत राहिली.
“तुमच्या लक्षात येतंय का ? हे सगळं ज्या दिवशी घडलं ना, त्या रात्री पहिल्यांदाच मी त्या नव्या कोऱ्या बेडवरच्या मऊसूत गादीवर प्रथमच पाठ टेकून शांत झोपणार होतो. पण देव ‘नाहीs. . ‘ म्हणाला.”
त्यांनी आवंढा गिळला. मी ते पुढे बोलायची वाट पहात त्यांचा प्रत्येक शब्द असोशीने कानात साठवायचा प्रयत्न करीत राहिलो.
” माझ्या मुलं-सुना- नातवंडांनी अपार प्रेमानं देऊ केलेलं ते सुख मी निर्लेप वृत्तीने कुठं स्वीकारलं होतं ? मनात कुठेतरी त्या सगळ्यांना वरकरणी ‘नको. . कशाला?’ असं म्हणत होतो खरा पण या ऐश्वर्याचा क्षणिक मोह मला पडलाच होता ! उमेदीच्या वयापासून कांबळ्याच्या चौघडीवरही शांत झोपणारा मी मग मला हा मोह का पडावा? पण तो पडला होता हे नक्की. आयुष्यात कधीच कसलेच उपभोग हव्यासाने न घेतलेलं हे शरीर मऊ मुलायम बेडवर पाठ टेकायला मात्र आसुसलेलं होतं. मग देवानेच मला बजावलं,
‘ विरक्त मनानं वानप्रस्थ स्वीकारलाय अशी मिजास मारत होतास ना? मग मोह आवरायचा. मोह आणि हव्यास मनातून हद्दपार होईपर्यंत अंथरुणाला पाठ टेकायची नाहीs. ‘ तुम्ही पहाताय ना? करपलेल्या जखमांनी भरलेली ही पाठ घेऊन असा बसून असतो रात्रंदिवस. आज पंधरा दिवस आणि पंधरा रात्री होतील,याच नव्हे कुठल्याच अंथरुणावर मी पाठ टेकून झोपून शकलेलो नाहीये.”
ऐकून मी थक्क झालो.
———–
त्यांना भेटून मी आत्ताच बाहेर पडलोय. खूप अस्वस्थ आहे. खरंतर अस्वस्थ त्यांनी असायला हवं. पण ते नेहमीसारखेच शांत आणि स्थितप्रज्ञ !
माझी अस्वस्थता आजोबांबद्दलच्या करुणेपोटीच निर्माण झालीय असं वाटलं होतं. पण नाही. आज त्यांच्या तोंडून बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दातून झिरपत राहिलेलं त्यांचं ‘अध्यात्म’ मला अस्वस्थ करतंय. स्वतःच्या अंतर्मनातच आपल्या परमेश्वराची प्रतिष्ठापना केलेल्या त्यांना त्या परमेश्वराच्या मनातला ‘आतला आवाज’ किती स्पष्ट ऐकू आलाय ! कोणत्याही कर्मकांडांत अडकून न पडता, स्वतःच्या आस्तिकतेचे स्तोम न माजवताही परमेश्वराचं बोट धरून प्रतिकूल परिस्थितीतही किती समाधानाने जगता येते याचं आजोबा म्हणजे एक मूर्तीमंत उदाहरण होते आणि मी. . ?
स्वत:ला आस्तिक म्हणवण्यातच आजपर्यंत धन्यता मानणाऱ्या माझ्या मनातला देव्हारा मात्र रिकामाच असल्याचा भास मला असा अकल्पितपणे झाला न् त्यामुळेच खरं तर मी खूप अस्वस्थ आहे !!