प्रा. सुनंदा पाटील
कवितेचा उत्सव
☆ श्वास घेतला मल्हाराने… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆
☆
श्वास घेतला मल्हाराने जुळून आले जीवनगाणे
दा दिर दिर तों लयीत येता सजून आले प्रेमतराणे
*
घनघन झरल्या कोसळधारा वसुंधरेला फुटला पान्हा
आज नभाच्या छायेखाली रुजून आले हिरवे दाणे
*
लपून बसला हिरवा चाफा गर्द सभोती हिरवी राने
कालिदास ही शब्द घडविती म्हणून आले सुरात गाणे
*
प्रेमऋतूचा वेध घ्यायला ऋतू पातला पर्जन्याचा
वसुंधरेच्या भाग्यामधले घडून आले हिरवे न्हाणे
*
मिठीत आला मेघ सावळा प्रणयाराधन घडे सोहळा
चंद्रचांदण्या दीप विझविती वाऱ्यासंगे बरसत जाणे
☆
गझलनंदा
© प्रा.सुनंदा पाटील
गझलनंदा
८४२२०८९६६६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈