सुश्री शीला पतकी
कवितेचा उत्सव
☆ “शब्दाविण…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
☆
मी मोगरा माळतो तुला
अन शब्द ओठात घोळतो
शब्द रेंगाळतो जिभेवर
मौन संवाद साधतो//
*
मौन भाषा कळते तुला
अन् तू कवेत घेते मला
स्पर्शही मग शब्द होतो
सारे कसे शब्दावीना//
*
शब्दाविना बोलतात डोळे
भावभाषी प्रेम ते
या ह्रदयाचे त्या ह्रदयाशी
मग संवाद स्पंदन साधते//
*
प्रेमाचा संवाद आगळा
देह सारा बोलतो
शब्दांचे मुकेपण तिथे तरी
भाव संवाद साधतो//
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈