सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ शुभंकरोती… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
☆
शुभंकरोती म्हणता स्मरते
ओसरी अंगण माहेराचे
कानामध्ये घुमू लागती
बाबांचे स्वर मांगल्याचे ||
*
शुभ करणारी दीपज्योती
प्रकाशते घराघरास
अज्ञानाचा तम संपवून
उजळते मनामनास ||
*
पाढे पर्वचा घोकंपट्टी
सूत्र शिकविति अभ्यासाचे
सराव त्यांचा करून गेला
गणित पक्के आयुष्याचे ||
*
ध्यान करता शुभंकराचे
सूर ऐकता आरतीचे
दान मिळते सद्बुद्धीचे
संस्कार घडती शुभंकरोतिचे ||
☆
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈