सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ वरमाला… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

कमनीय बांधा तुझा

ओठ लाल रसिले

घायाळ करती मला

डोळे तुझे नशिले

*

गहूवर्णी रंग तुझा

नाक चाफेकळी

वेड लावे मला तुझ्या

गालावरली खळी

*

घनदाट काळ्याभोर

कुंतली गजरा

धुंद करितो तुझा ग

मुखडा साजरा

*

डौलदार चाल तुझी

कमर सिंहकटी

उचलावी वाटे मज

तुझी हनुवटी

*

मनमोहक हास्य तुझे

लाघवी बोलणे

भेटीसाठी तुझ्या सखे

करू किती बहाणे

*

ठेवीन सुखात तुला

देतो मी वचन

सांग कधी येऊ प्रिये

वरमाला घेऊन

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments