श्री प्रमोद वामन वर्तक
चित्रकाव्य
☆ प्रतारणा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
होता तिन्हीसांज सखये
मन माझे भरून येई
झाकोळल्या नभा सवे
जीव माझा व्याकुळ होई
*
आठवणीत तव प्रिये
बसलो किनारी निवांत
ही भरती सागराची
काहूर उठवी मनांत
*
वचन दिले तू मजला
आज भेटू सायंकाळी
वाट पहात बसलो इथे
मज नकोशा कातरवेळी
*
रवी गेला अस्ताचला
तरी कुठे ना तव चाहूल
तुझ्या खोट्या वचनाची
कशी पडली मला भूल
*
माझ्या खऱ्या प्रेमाची
करू नको प्रतारणा
खेळ तुझा हा प्रेमाचा
मज वाटे जीवघेणा
मज वाटे जीवघेणा
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈