श्रीशैल चौगुले

 

? कवितेचा उत्सव ?

☆ वैशाख… ☆ श्रीशैल चौगुले ☆

रणरण दुपार

वैशाख कडे-कपार

चटके देई माती

आभाळ पांढूर झार.

*

सावली उन्हे उब

शुकाट रस्ता नि रान

अंगाची लाही लाही

घामात चिंबून भान.

*

निस्तेज जित्राबात

त्राणच टिकवू पाही

ठिपका ढग कुठे

कसला सुगावा नाही.

*

मनात चिंता एक

मिरग कठिण भासे

काळ्या मातीची माया

फेकिल दुष्काळी फासे?

*

विश्वास येई जीवा

वार्याचा झोक जाणून

दिवस आशा धरे

दैवास गती मानून.

*

माणूस धरी धीर

पाखर पशूंचे काय?

झळाच सोसे धरा

डोळ्यातच पाणी, हाय!

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments