श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ महात्मा गांधी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

एक वकील नामांकित होते,

मोहनदास करमचंद गांधी.

ब्रिटिश विरोधी लढ्याची,

त्यांनी आफ्रिकेत केली नांदी.

*

मायभूमीला आले परतून,

लढा इथेही पुकारला.

शस्त्राविण सत्तेशी लढाई,

 साबरमतीचा संत बोलला.

*

दया क्षमा शांती मार्गाने,

दानवास मानव केले.

हिंसेला नमवीते अहिंसा,

विश्वाला पटवून दिले.

*

जनतेला बापुजी बोलले,

स्वातंत्र्याचा करूया जागर.

नका करू आपसात दंगे,

नका सांडू रक्ताचे सागर.

*

सत्य अहिंसा शांती पुढती,

झुकली सत्ता ब्रिटिशांची.

चले जावचा देऊन नारा,

लाट उठविली क्रांतीची.

*

अखेर आम्ही स्वतंत्र झालो,

गगनी तिरंगा फडफडला.

झाली फाळणी जातीय दंगे,

जीव बापूचा तडफडला.

*

कुणी वेड्याने वेधुन छाती,

गोळी तयांवर चालविली.

“हे राम” म्हणत शांतिदूताची,

 प्राणज्योत ती मालवली.

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments