डॉ. रवींद्र वेदपाठक

(प्रस्तुत है डॉ रवीन्द्र वेदपाठक जी की एक  सामयिक मराठी कविता  “महापूर”।) 

☆  महापूर ☆

 

संथ संत कृष्णामाई

झाली भलती अधीर

आली पाहुणा घेवून

नाव त्याचे महापूर……..!! १ !!

 

व्याकुळला ओला जीव

जणू गायीचा हंबर

सांज बुडता बुडता

कासावीस ते अंबर……..!! २ !!

 

दंश भिनला देहात

रानी पेटले काहूर

वाहणाऱ्या वेदनेची

हुळहुळे हूरहूर………!! ३ !!

 

मनस्विनी कृष्णामाई

छेडी दुःखाची लहर

संधिकाळी आक्रोशतो

ऊरी जीवांचा कहर……..!! ४ !!

 

मानवाच्या काळजात

जागविले देवघर

मनोमनी पालविले

चैतन्याचे औदुंबर………!! ५ !!

 

© डॉ. रवींद्र वेदपाठक

तळेगाव.

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments