श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

जिथे… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

प्रेमाचा बोल नाही,

ममतेला मोल नाही,

कपाळाला आठि तिथे

जावे कशाला ?

 

ममतेला थारा नाही,

आदराचा वारा नाही,

आस्थाहीन घरांत त्या,

रहा कशाला ?

 

संवादाला जागा नाही,

कलहाला अंत नाही,

दुस्वासाचा ढोल तेथे,

ऐका कशाला ?

 

अंतरीची ओढ नाही,

मायेची ओल नाही,

नात्याचे नाटक तिथे,

करा कशाला ?

 

देव्हार्‍यात देव नाही,

भक्तीचा भाव नाही,

मुक्या मूर्तिला फूल,

वाहू कशाला ?

😟😟 

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments