सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  कवितेचा उत्सव ?

☆ – दुःख उगाळून हाती… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

दुःख उगाळून हाती

काहीच लागत नाही..

दुःख विसरू म्हणता

विसरता ही येत नाही..

ह्यालाच जीवन असे नाव असावे..

उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत

नव्याने आयुष्य जगत रहावे..

आशावादी मन हार मानत नाही,

हेच खरं जिंकण आहे..

भूत काळातल्या गोड आठवणी

आठवून भविष्य पाहणं

हेच नियतीशी लढणं आहे..

बळ दे ईश्वरा सहनशक्तीचे..

वेदनेवर मात करून जगण्याचे..

नाती, गोती, मोह, माया

साराच गुंता आहे..

सोडवून हा रेशीम गुंता पुन्हा

नव्याने आयुष्य विणायचे आहे..

साथ विश्वासाची, साथ आरोग्याची

हाच आशीर्वाद मागते..

काळजी दुःख साऱ्या तुझ्या चरणी वाहते..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments