सौ. नेहा लिंबकर
कवितेचा उत्सव
☆ सुंदर ते ध्यान… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆
सुंदर ते ध्यान, सुंदर मन
सुंदर ज्ञान—–संताठायी
सुंदर ते रूप, सुंदर स्वरूप
सुंदर प्रारूप—- देवाठायी
सुंदर ते भाव, सुंदर प्रभाव
सुंदर निभाव—– भक्ताठायी
सुंदर ते गुण, सुंदर निर्गुण
सुंदर प्रमाण—– द्वैताठायी
सुंदर ते परिमळ, सुंदर निर्मळ
सुंदर प्रेमळ—– अद्वैताठायी
सुंदर ते आकाश, सुंदर प्रकाश
सुंदर पाश—– मनाठायी
सुंदर ते भान, सुंदर पावन
सुंदर जीवन—–जीवाठायी
सुंदर ते प्रणव, सुंदर जाणीव
सुंदर नेणीव—— आत्म्याठायी
सुंदर सुंदर आत्म्याचे तादात्म्य
राहावे सदा परमात्म्याठायी
© सौ. नेहा लिंबकर
पुणे
मो – 9422305178
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈