सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ त्रिवेणी रचना—- स्पर्शिका ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
तू होतीस स्पर्शिका माझी
तेंव्हा क्षण होते दरवळलेले
आता प्रश्र्न हाती फक्त अवघडलेले
****
बंध रेशमी तुझ्यासवे जुळूनी
स्पर्शिका तू रंग नवे लेऊनी
आता क्षितीज रंग विस्कटलेले
****
मी स्मरणाच्या वाटांनी फिरतो
क्षण भेटीचे आपल्या आठवतो
तू होतीस स्पर्शिका माझी
****
होतीस प्रेमले स्पर्शिका माझी
वाटले क्षितीजच आले हाती
पण सखे अंतरेच फसवी होती
****
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈