श्री सतीश मोघे
कवितेचा उत्सव
☆ यान उतरले चंद्रावरती… ☆ श्री सतीश मोघे ☆
यान उतरले चंद्रावरती
आनंदाच्या सरी बरसती
शरदऋतूच्या प्रारंभाला
चंद्रभेटीची चांदणभरती
पहिला विक्रम केला आम्ही
उतरून दक्षिण ध्रुवावरती
आले अपयश खचलो नाही
पुन्हा नव्याने गेलो वरती
यश सारे हे शास्त्रज्ञांचे
जगी पसरली त्यांची ख्याती
कवितेमधल्या चांदोबाची
गाठ पडूनी होई भेटी
आनंदाची लहर देशभर
अभिमानाने फुगली छाती
दूरदृष्टीचा अमुचा नेता
लक्ष तयाचे सूर्यावरती
चंद्र आनंदे म्हणे धन्य मी
आज तिरंगा आला भेटी 🇮🇳
© श्री सतीश मोघे
मो – +91 9167558555
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈